नागपूर : फ्रान्सच्या दसो एव्हिएशन आणि अनिल अंबानी समूहाच्या रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेड तर्फे संयुक्तपणे नागपूरच्या मिहान येथे सुरु होणाऱ्या प्रकल्पाचे आज भूमिपूजन आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय महत्वाच्या या प्रकल्पात भारतीय वायू सेनेकरता रॅफेल विमानाचे निर्माण होणार असून या शिवाय इथे रडार आणि संरक्षण मंत्रालयाकरता आवश्यक असलेल्या महत्वाच्या समाग्रीचे निर्माण देखील होणार आहे. 


आज दुपारी ४.१५ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, फ्रांसच्या संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ले, रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी, फ्रान्सचे देशातील राजदूत, कंपनीचे अध्यक्ष, अनेक केंद्र-राज्यातील मंत्री आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत.


नागपूरच्या मिहान प्रकल्पात आजवरची कदाचित ही सर्वात मोठी आणि महत्वाची गुंतवणूक असण्याची शक्यता आहे.