मुंबई : राज्यात गेल्या तासांमध्ये ११३ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ७४८ वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबईत ८१, पुणे १८, औरंगाबाद ४, अनगर ३, केडीएमसी २, ठाणे २, उस्मानाबाद १, वसई १, इतर राज्यातून आलेला १ असे ११३ रुग्ण आज वाढले आहेत. काल ५२ रुग्ण आढळले होते. त्यामुळे कालच्या पेक्षा आज कोरोना रुग्णांचा आकडा दुपटीने वाढलेला दिसतोय. पुण्यात आतापर्यंत पाचजण कोरोनामुळे दगावले आहेत. मुंबई आणि पुण्यात कोरोना झपाट्याने वाढताना दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईमध्ये सर्वाधिक ३० रुग्ण दगावले आहेत. तर ठाणे जिल्ह्यात ६, पुण्यात ५, औरंगाबाद, बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव, हिंगोली, गोंदिया, सिंधुदुर्गात प्रत्येकी १-१ रुग्ण कोरोनामुळे दगावला आहे.  


गेल्या २४ तासात राज्यात मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक ८१ रुग्ण वाढले, तर पुण्यात ही संख्या १८ने वाढली. औरंगाबादमध्ये ४, अहमदनगरमध्ये ३, कल्याण डोंबिवलीमध्ये २, ठाण्यात २, उस्मानाबादमध्ये १, वसईमध्ये १ आणि दुसऱ्या राज्यातला १ रुग्ण वाढला आहे. 



कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असताना ही अद्याप ही नागरिक विनाकारण आपली वाहन घेऊन रस्त्यावर फिरताना दिसत आहे. नवी मुंबई इथल्या कामोठे पोलिसांनी गेल्या चार दिवसांपासून दुचाकी आणि चार चाकी अशा ३५द वाहनचालकांवर कारवाई करत गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे कारवाईला समोर जायच नसेल तर रस्त्यावर विनाकारण वाहन आणू नका असं आवाहन कामोठे पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांनी केले आहे.