लता मंगेशकर यांचं ``आजोळ`` दुःखात
लता मंगेशकर आणि खानदेशचं काय खास नातं? दीदींच्या निधनानंतर गावात शोककळा
प्रशांत परदेशी, झी 24 तास, धुळे : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. शिवाजीपार्क इथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला राजकीय नेत्यांपासून कलाविश्वापर्यंत अनेक दिग्गज उपस्थित होते.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जाण्याने खानदेशातही हळहळ व्यक्त केली जात आहे. लतादीदी यांचं आजोळ हे धुळे जिल्ह्यातील थाळनेर येथील असल्याने त्यांना खानदेश कन्या देखील म्हटल जात होतं. लतादीदींच्या आई, माई मंगेशकर या थाळनेर गावातील रहिवाशी होत्या.
मंगेशकर कुटुंबाचा याठिकाणी गेल्या 25 वर्षापासून वावर नसला तरी आजही थाळनेर हे मंगेशकर कुटुंबाचं आजोळ म्हणून परिचित आहे. लता मंगेशकर यांच्या जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
थाळनेर वासियांनी मंगेशकर कुटुंबाच्या जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे. हृदयनाथ मंगेशकर हे येऊन गेल्याचेही गावकरी सांगतात. लता मंगेशकर यांच्या आई या थाळनेरच्या असल्याने मंगेशकर कुटुंबाला या गावाविषयी विशेष जिव्हाळा होता.
माई मंगेशकरांच्या हाताने या गावांमध्ये दोन झाडे देखील लावण्यात आली आहेत. ती देखील आज पाहायला मिळतात. मंगेशकर कुटुंबाशी ऋणानुबंध असलेल्या थाळनेरकरवासीयांनी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्तानंतर शोक व्यक्त केला आहे.
लतादीदी यांचं निधन, पाहा लता मंगेशकर यांच्याशी संबंधित बातम्या
प्रेमात पडूनही लतादीदींना शेवटपर्यंत अविवाहित राहण्याचा निर्णय का घेतला?
हँड्स अप! जेव्हा Lata Mangeshkar यांनी CID च्या एसीपी प्रद्युम्नच्या डोक्यावरच धरली रिव्हॉल्वर
लतादीदींचे हे फोटो तुम्ही कधी पाहिले नसतील
Lata Mangeshkar Death : हेमा ते लता मंगेशकर कसा होता दीदींचा रंजक प्रवास?
कोण होता तो मुलगा? त्याच्या निधनाची बातमी ऐकून लता दीदींना बसला होता धक्का
लता दीदींच्या निधनाने बॉलिवूड हळहळलं, ट्विट करत वाहिली श्रद्धांजली
lata Mangeshkar Death : लतादीदी निधनानंतर मागे ठेवून गेल्या कोट्यवधींची संपत्ती
'कम्बख्त कभी बेसुरी ही नहीं हुई', दीदींबद्दल असं कोण बोललं ज्यामुळं माजलेली खळबळ?
एका निर्णयामुळे लतादीदी-आशाताईमध्ये आलेला दुरावा; कारण बरीच वर्षे होतं गुलदस्त्यात
Lata Mangeshkar Awards List: भारतरत्न लता मंगेशकर यांची 7 दशकातील पुरस्कारांची सुवर्ण कमाई
Best Of Lata Mangeshkar : तुमच्या प्ले-लिस्टचा भाग असलीच पाहिजेत अशी लतादीदींची 10 सुपरहिट गाणी
वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी लता दीदींनी 8 चित्रपटांमध्ये केले होते काम
lata Mangeshkar Death : लता मंगेशकर यांच्यावर झाला होता विषप्रयोग
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा, सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर