मुंबई : आज संगीत क्षेत्रातील एका युगाचा अंत झाला आहे. ज्येष्ठ गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींच्या संगीत करिअरमधील सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. पण त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल आपण खूप कमी गोष्टी आपण जाणतो. लता दीदींचे चाहते संपूर्ण जगात आहे आणि प्रत्येकाच्या मनात आजही एक प्रश्न भेडसावत आहे तो म्हणजे लतात दीदींनी का लग्न केलं नाही?
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, लता दीदींच एका व्यक्तीवर प्रेम होतं. पण ती व्यक्ती कुणी सामान्य नव्हती. तर ते एक महाराज होते. लता मंगेशकर यांना आपल्या भावाचा हृदयनाथ मंगेशकरांचा मित्र आवडत होता. लता मंगेशकर यांनी कुणी एका सामान्य व्यक्तीला नाही तर एका महाराजाला निवडलं होतं.
जर त्या महाराजासोबत लता दीदींच लग्न झालं असतं तर आज लता मंगेशकर एका राज्याच्या राणी असत्या. मात्र लता दीदींच्या आयुष्यात काही तरी वेगळं घडणार होतं. जेव्हा पण लता दीदींना त्यांच्या लग्नाबद्दल विचारलं जातं तेव्हा त्यांनी कायम एकच उत्तर दिलं की, घरच्या जबाबदारीमुळे त्या लग्न करू शकल्या नाहीत.
लता दीदी डुंगरपूर राजघराण्यातील महाराज राज सिंह यांच्या प्रेमात होत्या. लता दिदी आणि महाराज राज यांची ओळख तेव्हा झाली जेव्हा ते वकिलीचा अभ्यास करण्याकरता मुंबईत आल्या. तेव्हा लता दीदी देखील त्यांना भेटायला हृदयनाथ मंगेशकरांसोबत त्यांच्या घरी जात असतं.
मात्र लता दीदी आणि राज यांनी लग्न केलं नाही. कारण राज यांच्या कुटुंबियांनी अगोदरच सांगितलं होतं की, ते कोणत्याही सामान्य मुलीशी लग्न करू शकत नाही. महाराज राज यांनी देखील आपल्या कुटुंबियांना दिलेला शब्द पाळला.
पण हे दोघं एकमेकांच्या प्रेमात एवढे आकंठ बुडाले होते की त्यांनी आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लतादीदींची प्रेम कहाणी शेवटपर्यंत अधुरी राहिली.