भटक्या कुत्र्यांच्या समस्येविरोधात मनसेचं लातुरात आंदोलन
लातूर महानगरपालिकेच्या हद्दीत मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे
लातूर : लातूर महानगरपालिकेच्या हद्दीत मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. या मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना तसेच वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे. मोकाट कुत्र्यांच्या या समस्येवर लातूर महानगरपालिका काहीही करीत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोखं आंदोलन केलं. भटक्या कुत्र्यांच्या अंगावर मनसे कार्यकर्त्यांनी पोस्टर लावून भटक्या कुत्र्यांच्या समस्येला विरोध केला.
हे मोकाट कुत्रे अनेकांना चावत असल्यामुळेही त्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे या गंभीर समस्येकडे मनसेने उपहासात्मक आंदोलन करून मोकाट कुत्र्यांचा विषय चव्हाट्यावर आणला आहे. त्यामुळे महापालिका आता तरी या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार का असा सवालही विचारला जात आहे.