Latur Crime News : महाराष्ट्राला हादरवाणारी घटना मराठवाड्यात घडली आहे. लातूरमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे कृत्य शाळेच्या मुख्याध्यापकाने केला आहे. एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने त्याच्याच  शाळेत शिकणा-या 14 मुलींचा विनयभंग केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पिडीत मुलींचे पालक संतप्त झाले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी  लातूर शहरातील MIDC पोलीस ठाण्यात पोलिसांनी मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या निंदनीय घटनेची गंभीर दखल घेत, संबंधित मुख्याध्यापकाला तातडीनं निलंबित करण्यात आलं आहे. या घटनेमुळे शालेय विद्यार्थींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 


पिडीत मुलींनी पालकांकडे याची तक्रार केली. यानंतर पालकांनी शाळेतील शिक्षकांकडे याबाबत विचारणा केली. गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे याची तक्रार करण्यात आली. यानंतर शाळेत विशाखा समिती स्थापन करण्यात आली. या समितीमार्फत पिडीत विद्यार्थीनींच्या तक्रारीची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकानेच मुलींचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले. यानंतर या मुख्याध्यापकाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तसेच या शिक्षकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 


मुंबईतील भांडुपमधील शाळेत देखील विचित्र प्रकार घडला आहे.  भांडुपमधील नामांकित शाळेत तीन विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय..शाळेमध्ये लिफ्टच्या कामासाठी आलेल्या कामगाराने भांडुपच्या एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला. गोपाल गौडा असे आरोपीचं नाव आहे..विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार त्यांच्या शिक्षकांना सांगितला आणि तातडीने शाळेच्या प्रशासनाने गोपाल गौडाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.