वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर : मुलगी नको ही मानसिकता कालही समाजात होती आणि आजच्या तंत्रज्ञान युगातही ती कायम आहे. मुलगी शिकली, प्रगती झाली असं आपण कितीही म्हणत असलो तरी आजही जन्माला आलेली मुलगी नकुशीच असते. मुलगा-मुलगी हा भेद आजही कायम आहे. नकोच ती मुलगी या मानसिकतेमुळे आजही अंगावर काटा आणणाऱ्या घटना घडत असतात. काही काळ हळहळ व्यक्य होते, पण एकविसाव्या शतकात येऊन स्थिरावल्यानंतरही ही मानसिकता बदलायला मात्र ते तयार नाही. अशीच एक धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जन्मदात्या आईनेच गळा घोटला
दुसरी मुलगी झाल्याने जन्मदात्या आईनेच तीन दिवसाच्या बाळाचा गळा घोटल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील गातेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. उस्मानाबात जिल्ह्यातील होळी इथली रेखा किसन चव्हाण हि महिला प्रसुतीसाठी काटगाव तांडा इथं माहेरी आली होती. 27 डिसेंबर रोजी जवळा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ती महिला प्रसुतीसाठी दाखल झाली, तीने गोंडस मुलीला जन्म दिला.


दरम्यान दुसऱ्यांदा मुलगी रेखा चव्हाण नाराज होती. त्याच रागातन तीने रूमालाच्या सहाय्याने तीन दिवसाच्या चिमुरडीची हत्या केली. दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात महिलेनेच बाळाचा खून केल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार गातेगाव पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली मुलगी झाल्यानंतर या दाम्पत्याने पुन्हा मुलासाठी प्रयत्न केला. पण दुसऱ्या वेळीही मुलगी झाली. 


मुलगा म्हणजे वंशाचा दिवा
मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे परक्याचे धन, ही वर्षानुवर्षे रुढी, परंपरा आजही कायम आहे, किंबहुना तशी सोयच करून ठेवण्यात आली आहे. जोपर्यंत ही मानसिकता बदल नाही, तोपर्यंत समाजात अशा घटना घडतच राहणार.