लातूर : शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. अर्धा-एक तासाच्या अंतरानं पडणा-या या पावसामुळे शेतकऱ्यांसहित सर्वानाच दिलासा मिळालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहा दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर लातूर शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी दुपारी आणि रात्रीही लातूर शहरात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे सखल भागात पाणी साचले होते. तर कचरा नाल्यात तुंबल्यामुळे औसा रोड भागातील काही दुकानांत पावसाचे पाणी शिरले होते.  तर या पावसामुळे ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे. 


ज्या शेतकऱ्यांनो पेरण्या केल्या होत्या, त्यांची पिके माना टाकत होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. मात्र सलग दोन दिवसांपासून  पडणा-या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील पिकांना जीवदान मिळणार आहे.