लातूर : शिक्षणाचा आदर्श लातूर पॅटर्न देणाऱ्या लातूरच्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या विरोधात संस्थापक सदस्यांच्या वारसांनीच आंदोलन उभारलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संस्थेचे संस्थापक सदस्य असलेले भगवानराव तळेकर आणि मुरलीधरराव शिंदे यांच्या वारसांना संस्थेत सदस्य म्हणून घेण्याचा संस्थेचा १९९८ मध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव झाला आहे. 


त्यानुसार आपल्याला सदस्यत्व मिळावं यासाठी संस्थापक सदस्यांचे वारस असलेले वैभव तळेकर आणि बाजीराव शिंदेंनी संस्थेच्या सुप्रसिद्ध राजर्षी शाहू कॉलेज पुढे उपोषण केलं.