लातूरमध्ये पोलिसांनी दारुची हातभट्टी केली उध्वस्त
जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील कोराळवाडी शिवारात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच हजाराहून अधिक रसायनमिश्रित हातभट्टी उद्ध्वस्त केली. शेतात रसायन आणि गुळ मिश्रित रसायनाची दारू बनवली जात होती. तर जवळपास 15 हजार लीटर दारू बनविण्यासाठी वेगवेगळ्या खड्ड्यात टाक्या आणि बॅरेल लपवून ठेवण्यात आले होते.
लातूर : जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील कोराळवाडी शिवारात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच हजाराहून अधिक रसायनमिश्रित हातभट्टी उद्ध्वस्त केली. शेतात रसायन आणि गुळ मिश्रित रसायनाची दारू बनवली जात होती. तर जवळपास 15 हजार लीटर दारू बनविण्यासाठी वेगवेगळ्या खड्ड्यात टाक्या आणि बॅरेल लपवून ठेवण्यात आले होते.
उद्ध्वस्त केलेल्या साठ्याचे बाजारमुल्य पाच लाख 76 हजार रुपये इतकी होती. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर हि कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी बाबू नागप्पा पंदले पळून गेला. याप्रकरणी बाबू पंदले याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. तर दूसरीकडे पोलिसांसोबत असलेल्या आर्थिक व्यवहारामुळेच ही कारवाई केली जात नव्हती असा आरोप स्थानिकांनी केला आहे.