COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूर : लातूर जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने चांगलंच झोडपलंय. या पावसामुळे आशीव-मातोळा या गावाला जोडणारा छोटा पूल वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झालीय. तर निलंगा तालुक्यातील मदनसुरी-हाडगा या गावाला जोडणाऱ्या एका छोट्या पुलाचा कठडा पावसामुळे तुटला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे.


एकूणच जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावलीय.  ५६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. ज्यात निलंगा, उदगीर आणि औसा तालुक्यात अतिवृष्टी झाली. तर या तालुक्यातील अनेक मंडळात काही मंडळात ढगफुटीही झाली. यामुळे अनेक ठिकाणचे ओढे-नाले हे भरभरून वाहत आहेत. 


निलंगा तालुक्यात ९२ मिमी, औसा तालुक्यात ९८ मिमी तर उदगीर तालुक्यात ७२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.