लातूर :  लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यामधल्या ऊसतोड कामगाराच्या एका १७ वर्षीय मुलीचं एप्रिल महिन्यात अपहरण करुन, जवळपास दीड महिने तिच्यावर ठिकठिकाणी बलात्कार केला गेला. 


धक्कादायक जबाब, पीडितेनंच न्यायालयात नोंदवला 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गंभीर बाब म्हणजे पीडित मुलगी गर्भवती असल्याचं समजल्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी, देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांनी गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा धक्कादायक जबाब पीडितेनंच न्यायालयात नोंदवला आहे. 


पोलिसांकडून कारवाईसाठी ४० हजारांची मागणी


या प्रकरणी ऊसतोड मुकादम अरुण राठोड आणि ट्रकचालक सुरेश पवार यांच्यावर पीडितेनं आरोप केला आहे. या प्रकरणी देवणी पोलिसांनी कारवाईसाठी ४० हजार रुपयांची मागणी, केल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केला आहे. 


अपहरण आणि त्यानंतर बलात्काराचा गुन्हा


आधी पोलिसांनी अपहरण आणि त्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मात्र फक्त ट्रकचालक सुरेश पवारलाच अटक केली. तर मुख्य आरोपी अरुण राठोड फरार आहे.