Kirit Somaiya Viral Video: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरून (Viral Video)राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांच्या कथित वादग्रस्त व्हायरल व्हिडिओप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. हा मुद्दा आपण अधिवेशनात उचलणार असल्याचं अंबादास दानवेंनी झी 24 तासला सांगितले. किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ZEE 24 तास या व्हिडिओची पुष्टी करत नाही. आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणात झी 24 तासनं किरीट सोमय्या यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. याप्रकरणात किरीट सोमय्यांशी संपर्क झाल्यानंतर आपल्याकडे त्यांच्यामार्फत प्रतिक्रिया दिली जाईल असं सोमय्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. 



किरीट सोमय्या यांनी अनेकांचे घोटाळे बाहेर काढले


किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीत अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले. किरीट सोमय्या यांच्या खळबळजनक आरोपांमुळे अनेक नेते ED, CBI च्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. आता सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी केली आहे.