जालना : जालना जिल्ह्यातील वड़ीगोद्री परीसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका वासरासह दोन शेळ्या ठार झाल्या आहे. तर गोठ्यात बांधलेल्या शेळया देखिल जखमी झाल्याची घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


घटनास्थळावर बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्यानं बिबट्यानेच हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जातोय. 


दरम्यान या घटनेमुळे परीसरात भितीचं वातावरण पसरलंय. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केलाय. 



महिनाभरापtर्वी याच परीसरातील नागरिकांना बिबट्या दिसला होता,मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीला फारसं गांभीर्याने न घेतल्याने ही घटना घडल्याचं नागरीकांचं म्हणणे आहे, अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून बिबटयाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.