कोंबड्यांच्या खु-याड्यात सापडला बिबट्या, गावात एकच खळबळ
कोंबड्यांच्या खु-याड्यात बिबट्या सापडल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडलीये. लांजा तालुक्यात भांबेड- दैत्यवाडी इथं बिबट्याला पकडण्यात यश आलंय.
रत्नागिरी : कोंबड्यांच्या खु-याड्यात बिबट्या सापडल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडलीये. लांजा तालुक्यात भांबेड- दैत्यवाडी इथं बिबट्याला पकडण्यात यश आलंय.
कुठे लपला होत बिबट्या?
घरामागे असलेल्या खुराड्यामध्ये कोंबड्या का आवाज करतात हे पाहण्यासाठी गेलेल्या माय-लेकींना खुराड्यात चक्क बिबट्या दिसला. त्यांनी मोठ्या धीरानं खुराड्याचा दरवाजा बंद करुन बिबट्याला कैद केले. त्यानंतर वनविभागाला पाचारण करण्यात आले. चार वर्षांची बिबट्याची मादी १७५ से. मी. लांब तर ६४ से.मी उंच आहे.
बिबट्याला जंगलात सोडले
पकडलेल्या बिबट्याला नंतर जंगलात सोडण्यात आलं. कोंबड्यांना खाण्यासाठी बिबट्या खुराड्यात शिरला. सुषमा शिवगण आणि त्यांची मुलगी स्वाती या दोघी मायलेकी मुंबईला राहतात. कामानिमित्त त्या गावी आल्या होत्या. त्यांचा घराच्या पडवीत खुराड्यात त्यांना बिबट्या दिसला. मात्र धीरानं त्यांनी खुराड्याचा दरवाज्या बंद केल्यानं बिबट्याला पकडणं शक्य झालं.