नंदूरबार येथे शिवारातील बिबट्याच्या दोन पिल्लांपैकी एकाला जीवदान
जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील गोंडाळा शिवारात बिबटयाची दोन पिल्ल आढळून आली. त्यांपैकी एक पिलू आगीत होरपळल्याने जागीच मृत्यू पावलं तर दुसऱ्या पिल्लाला वनविभागाने ताब्यात घेतले असून त्यावर उपचार सुरु आहेत.
नंदूरबार : जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील गोंडाळा शिवारात एक दुर्दैवी घटना घडली. सुदाम पाटील यांच्या शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना बिबटयाची दोन पिल्ल आढळून आली. त्यांपैकी एक पिलू आगीत होरपळल्याने जागीच मृत्यू पावलं तर दुसऱ्या पिल्लाला वनविभागाने ताब्यात घेतले असून त्यावर उपचार सुरु आहेत.
ऊसाचे पाचट जाळताना घटना
दरम्यान शेतमजुरांचा समय सूचकतेने एका लहान पिल्याचे जीव वाचले आहे. पाडवी यांच्या शेतात सकाळी ऊस तोडण्यासाठी शेतमजूर ऊसाचे पाचट जाळत होते. त्या दरम्यान ऊस तोडणी करताना एका शेत मजुराला किंचाळण्याचा आवाज आला. त्या मजुराने मग दुसऱ्या मजुरांना कळवले.
आगीत एकाचा मृत्यू
शिवारात त्यांना तिथे अंगावर ठिपक्के असलेले एक महिन्याचे बिबट्या मादी जातीचे दोन पिल्लं आढळून आलीत. यातील एकाचा आगीत मृत्यू झाला तर दुसऱ्याला वाचविण्यात यश आले. दरम्यान, या पिल्लांच्या आईने आगीचे रौद्ररूप पाहून जीव वाचवीण्यासाठी पळ काढला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.