रत्नागिरी : राजापूर शहरात भर वस्तीत बिबट्याचं दर्शन होत असल्यामुळे खळबळ माजली आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहर परिसरात बिबट्याचे दर्शन होतंय विशेष म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावरील शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याचा वावर हा पाहावयला मिळतोय. बिबट्याच्या दर्शनामुळे राजापूर शहरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील भटक्या कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाकडे करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिबट्यांचा वावर गेल्या अनेक दिवसांपासून मानवी वस्तीत होताना दिसत आहे. एवढंच नव्हे तर आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर या तीन तालुक्यांच्या सरहदीवर भागडी गाव आहे. पंधरा दिवसांपासून या गावात दिवसरात्र बिबट्याचा वावर पाहायला मिळतो. एवढचं नव्हे तर गावातील काही कुत्र्यांना उचलून त्यांना फडशा पाडलेला दिसतो. यावरून बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढल्याचं दिसत आहे.


बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढवण्यामागचं महत्वाचं कारण वाढलेली मानवी वस्ती. मानवी वस्तीच्या वाढलेल्या कक्षा. माणूस हळूहळू आपल्या कक्षा वाढवत आहे. त्यामुळे बिबट्यांचा वावर मानवी वस्तीत होताना दिसत आहे. 


तसेच संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला येथे पाण्याच्या शोधात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. आंबी दुमला येथे डाळिंबाचे शेत आहे. तेथूनच एक ओढा वाहत असून तेथेच एक विहीर आहे. विहिरीचा अंदाज न आल्याने पाण्याच्या शोधात फिरणारा बिबट्या विहिरीत पडला. यावरून लक्षात येतं की, बिबट्यांना आपल्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी जंगलाच्या बाहेर यावं लागत आहे.