रत्नागिरी : कोकणात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हर्णेमध्ये तर अनेक घरात पावसाचे पाणी घुसलं आहे. ठिकठिकाणी पावसाचं पाणी घुसल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिवृष्टीमुळे दापोली तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं 700 मच्छिमार बोटींनी किनारा गाठलाय. तसंच मच्छिमारांचं अतोनात नुकसान झालं आहे. समुद्रात काही बोटी आणि मच्छिमार अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आहे.


रत्नागिरीला काल झोडपणा-या मुसळधार पावसानं आज सकाळपासून उसंत घेतली आहे. काल रत्नागिरीत ढगफुटी झाल्यासारखा पाऊस कोसळला त्यामुळे  जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली होती. दरम्यान, गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण 1032.80 मिमी पाऊस पडला आहे. तर सरासरी 114.76  मिमी इतका पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील 9 तालुक्यांपैकी 6 तालुक्यांमध्ये 100 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यातही चिपळूण आणि दापोली तालुक्यात 150 मिमीपेक्षा जास्त पाऊस गेल्या 24 तासांत पडला आहे.