राज्यात पुढील चार दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता
पुढचे आणखी चार दिवस राज्याच्या विविध भागात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबई : पुढचे आणखी चार दिवस राज्याच्या विविध भागात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, (Konkan) विदर्भ (Vidarbha) आणि मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) खास करून हा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात गारपिट होण्याचीही शक्यता आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या विविध भागात हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काल राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी रिमझीम पाऊस (Rain) काल झाला. काल सकाळपासून मुंबईसह (Mumbai) नवी मुंबई, (Navi Mumbai) वसई,(Vasai) पालघर, (Palghar) रायगड जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. तर पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. आजही ढगाळ वातावरण दिसून येत आहे. पुढील चार दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. काल सायंकाळी काही ठिकाणी ढगांचा गडगडात झाला.
आजही ढगाळ वातावरण असून पुण्याच्या ग्रामीण भागातही असेच चित्र दिसून येत आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यात ढगाळ वातावरण असणार आहे, तसे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, वसई विरारमधील शहरी तसेच ग्रामीण भागात ढगाळ वातावरण आहे. काल अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वसई तालुक्यात पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या. या पावसाने वातावरणात गारवा पसरला असला तरी अनेक व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. काल नवी मुंबईमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण होते. शहराच्या अनेक भागात अधूनमधून रिमझीम पाऊस पडला. आजही ढगाळ वातावरण दिसून येत आहे. तर पालघर जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. डहाणू, पालघर, वाडा, विक्रमगड या भागात रिमझिम पाऊस झाला.
तर रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला. अलिबाग ते पोलादपूर या सर्वच तालुक्यात रिमझीम पावसाची हजेरी लावली होती. जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे.