जळगाव : पोलीसी कारवाईपासून वाचण्यासाठी लोक काय शक्कल लढवतील आणि त्याचे काय परिणाम होतील याचा काही नेम नाही...जळगाव जिल्ह्यातल्या निमखेडी नावाच्या गावात असाच एक भन्नाट किस्सा घडलाय. 


अख्ख्या गावाला चढली झिंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दारु बनवणाऱ्यांनी पोलीसी कारवाईच्या भीतीनं बनवलेली दारू विहीरीत ओतली...आणि मग निमखेडीला झिंग चढली..आबाल वृद्धांना मदिरेची चव मिळली...अनेकांना उल्ट्या जुलाब झाले...तर बहुतांश लोक सोमवारचा अख्खा दिवस नशेतचा अनुभव घेत होते. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रच्या सीमेवरचं हे गाव पाचोरा तालुक्यात आहे. 


विहीरीत ओतली होती दारु


गावच्या ग्रामपंचायतीनं पाण्यासाठी विहीर बांधलीय. रविवारी या विहिरीतून नळयोजनेद्वारे  पाणी पुरवठा झाला. पाण्याला उग्र वास येत होता. पण क्लोरिन जास्त झालं असावं असा कयास लावून अनेकांनी हे पाणी प्राशन केलं.  आणि त्याच नशेत अनेक जण झोपून गेले....गावतल्या काही जणांनी विहिरीकडे धाव घेतल्यावर त्यातून दारुचा उग्र वास आला...आणि सगळा प्रकार उघड झाला...