सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील तळेगावात गोव्यातील 87 लाखांची दारू जप्त(Liquor stock ) करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाने(State Excise Department ) ही धडक कारवाई केली आहे. एका ट्रकमधून दारूची तस्करी करण्यात येत होती. दारु तस्करी करणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. गोव्यातून महाराष्ट्रात या दारूची तस्करी करण्यात येत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोवा राज्य निर्मीत व गोवा राज्यात विक्रीकरीता आलेल्या विदेशी मद्यावर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईअंतर्गत  87 लाखांची विदेशी मद्य साठा जप्त करण्यात आला आहे.


प्रवीण परमेश्वर पवार (वय 24 वर्षे), देविदास विकास भोसले (वय 29 वर्षे) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (ई), 81, 83, 90, 103 आणि 108  अन्वये गुन्हा नोंद केला आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायदा असताना छु्प्या पद्धतीने दारु तस्करी करण्यात येत होती.