राष्ट्रवादी अजित पवार गटाची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर; महादेव जानकर परभणीतून निवडणूक लढणार
राष्ट्रवादी अजित पवार गटाची लोकसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. महादेव जानकर परभणीतून उमेदवारी देण्यात आली आहे.
Mahadev Jankar : राष्ट्रवादी अजित पवार गटाची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. रासपचे महादेव जानकर परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत लोकसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.
जानकरांना बारामतीतून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे आता जानकरांना महायुतीतून परभणीतून जागा देण्याची शक्यता वर्तवली जात होती. बारामतीतून सुनेत्रा पवारांनीच निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्यामुळे जानकरांना परभणीतून उमेदवारी देण्यात आली आहे.
महायुतीत रायगड लोकसभेसाठी सुनील तटकरेंचं नाव निश्चित झालंय. मात्र त्यामुळे स्थानिक भाजपमध्ये नाराजी दिसून येतेय. रायगडच्या जागेसाठी भाजप पदाधिकारी अजूनही आग्रही आहेत. रायगडची जागा भाजपलाच मिळावी या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील पदाधिका-यांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांना भेटणारेत.