Breaking News Live Update : पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू, बांगलादेशमधील अस्थिरतेवर चर्चा
Breaking News Live Update : राज्यात आचारसंहिता नेमकी कधीपासून लागू होणार याविषयीची उत्सुकता असतानाच आता अनेक राजकीय खलबतं सुरू झाली आहेत.
Breaking News Live Update : विधानसभा निवडणुकांसाठी काही दिवस शिल्लक असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पण, या साऱ्यामध्ये राज्यात मोठ्या मुक्कामासाठी आलेला पाऊस मात्र माघार घेताना दिसत नसल्यामुळं काही भागांमध्ये अडचणीची परिस्थिती उदभवताना दिसत आहे.
Latest Updates
पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल बैठकीला उपस्थित
बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीवर बैठकीत चर्चा
बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचं कांस्य पदक हुकलं
Lakshya Sen vs Lee Zii Jia Bronze Medal Match: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज 10 व्या दिवशी भारताच्या पदरी निराशा पडली आहे. बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचं कांस्य पदक हुकलं आहे. ऑलिंपिकमध्ये उपांत्य फेरी खेळणारा तो पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू ठरला होता.
भारत-बांगलादेश सीमेवरील परिस्थितीवर बारकाईने लक्ष, बीएसएफकडून पत्रक जारी
भारत-बांगलादेश सीमेवरील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत
कोणतीही अनपेक्षित परिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी बीएसएफ सज्ज आहे.
बीएसएफ डीजी पूर्व कमांडमध्ये उपस्थित आहेत.
भारत-बांगलादेश सीमेवरील परिस्थिती सध्या सामान्य आहे.
भारतीय सीमेवरील सैन्य सतर्क आहे.
सध्याच्या परिस्थितीबद्दल सैन्य जागरूक आहे.
राज ठाकरे धाराशीवमध्ये मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले; भेट नाकारल्याने मराठा आंदोलक संतप्त
गणेश मंडळांना सरसकट पाच वर्षांची मंडप परवानगी द्या, पालिका आयुक्तांना पत्र
कोणत्याही अटी शर्थींशिवाय परवानगी देण्याची मागणी
मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लिहिले पत्र
मुंबई महापालिका आयुक्तांना मंत्री लोढांचे पत्र
मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या बैठकीनंतर मंत्री लोढांची मागणी
शेख हसिना भारतात दाखल
शेख हसिना यांचं विमान हिंडन एअरबेसवर उतरलं
भारतीय लष्कर अधिकाऱ्यांनी शेख हसिनांचं केलं स्वागत
थोडा वेळ भारतात थांबून करणार पुढील प्रवासाला सुरुवातसुप्रीम कोर्टात उद्या शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी
उद्या सुप्रीम कोर्टात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पार पडेल आणि त्यानंतर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी पार पडणार
सुप्रीम कोर्टात 7 नोव्हेंबरला शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादीची सुनावणी पार पडणार
सुनावणी एकाच दिवशी होणार
मात्र दोन्ही याचिकेवर स्वतंत्र सुनावणी पार पडणारशिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश जे. बी. पारडीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठांसमोर होणार आहे
निवडणूक आयोगातील राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह याबाबतची सुनावणी देखील उद्या होण्याची शक्यता
बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता बीएसएफने मागील 24 तासांपासून देशातील सीमेवर अलर्ट जारी केला आहे
बीएसएफ डीजी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत
बीएसएफ डीजी दलजीत चौधरी कोलकाता येथे आहेत
बीएसएफने सीमेवर जवानांची संख्या वाढवली
बांगलादेशात उलटफेर, शेख हसीना यांचा राजीनामा; लष्कराने सत्ता घेतली ताब्यात
What Is The Issue In Bangladesh Why India Neighbouring Country Burning: भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशमधील सत्तात लष्काराने हाती घेतली आहे. चौथ्यांदा पंतप्रधान झालेल्या शेख हसिना यांनी पदाचा राजीनामा देऊन भारताच्या आश्रयाला आल्या आहेत. बांगलादेशमधील पंतप्रधानाच्या निवासस्थानावर हजारोंच्या संख्येनं जमावाने हल्ला केल्यानंतर लष्करी हेलिकॉप्टरने हसिना भारतात दाखल झाल्या आहेत.
Breaking News Live Update : माळशेज घाटात कारचा अपघात; दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी
कल्याण नगर महामार्गावर माळशेज घाटातील भोरांडे गावाजवळ असलेल्या वळणावर चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर जावुन धडकली,या अपघातात कार मधील समोरच्या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे, त्यामुळे जखमी आणि मृत तरुणांना कार मधुन बाहेर काढण्यासाठी वेळ लागला.घटना स्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघातस्थळी राष्ट्रीय माहामार्ग पोलिस माळशेज घाट आणि टोकावडे पोलिस निरीक्षक दिनकर चकोर हे उपस्थित होते जखमी आणि मृत तरुणांना क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले.जखमी आणि मृत तरुणांना मुरबाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमधील सर्व जण हे कल्याण रेवती आणि गोवेली परिसरातील आहेत.
Breaking News Live Update : गरिबांना जमिनीचा हक्क आम्ही देणार- देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना निर्णय घेऊन झोपडपट्टीमध्ये जे लोक वर्षानुवर्ष राहत आहे, त्यांना राहत्या जमिनीवरच मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा नागपूरत मोठी कारवाई केली होती. नंतर काही अडथळे आले.. ते दूर करण्याचा प्रयत्न आपण केला.. खाजगी जमिनीवरील झोपडपट्टीचा प्रश्न होता. नव्याने 2022 ला सरकार आल्यानंतर तो आम्ही सोडवला आहे. टीडीआर देऊन त्या जमिनी अधिकृत करण्याचा आणि तिथल्या झोपडपट्टीवासियांना मालकी हक्क देण्याचा निर्णय आम्ही केला आणि त्यानुसारच आज काही जणांना मालकी हक्काचे अधिकार दिले आहे. पुढेही हजारो गरिबांना जमिनीचा हक्क आम्ही देणार आहोत.
Breaking News Live Update : विधानसभेसाठी मनसेकडून दोन उमेदवारांची नावं जाहीर; कोण आहेत ते?
मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा - नवनिर्माण यात्रा सुरु असून आज सोमवार सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे राज ठाकरे यांनी मनसेच्या खालीलप्रमाणे दोन विधानसभा उमेदवारांची घोषणा केली आहे. हे उमेदवार आहेत...
शिवडी विधानसभा- बाळा नांदगांवकर
पंढरपूर विधानसभा - दिलीप धोत्रेBreaking News Live Update : मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर
पुण्यातील पूरसदृश्य परिस्थिती नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर. पुण्यातील एकता नगरची करणार पाहणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत करणार बैठका. मदत , स्वच्छता, पुनर्वसन, नियोजन यावर घेणार बैठका. या सोबतच मृतांच्या नातेवाईकांचीही घेणार भेट , देणार धीर. आज मुख्यमंत्री ११ वाजता कलिना गेट नंबर ८ इथून पुण्यासाठी रवाना होणार. संध्याकाळपर्यंत वर्षा बंगल्यावर दाखल होणार. अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर आता मुख्यमंत्री सुद्धा दौऱ्यावर जात असल्याने पुण्यातला आजचा दिवस महत्त्वाचा.
Breaking News Live Update : भाजपनं मोर्चा वळवला...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच मिशन मराठवाडा. सोमवारी रात्री 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील भाजप आमदारांची होणार बैठक पार पडणार आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला, मराठवाड्यात आलेल्या अपयशानंतर भाजपच मराठवाड्याकडे विशेष लक्ष देणार आहे. कोणकोणत्या कारणांमुळे लोकसभेला मराठवाड्यात भाजपाला अर्थात महायुतीला फटका बसला या संदर्भात विचार मंथन होणार आहे.Breaking News Live Update : शिंदे-पवार बैठकीत 'अदानी'चे अधिकारी?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फारच योगायोग घडत असून, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेल्या आठवड्यामध्ये भेट घेतली होती. दहा दिवसांच्या आतच झालेली ही दुसरी भेट. विशेष म्हणजे, या वेळी उद्योगपती अदानी यांच्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे तीन ज्येष्ठ अधिकारीही वर्षा बंगल्यावर उपस्थित होते असं म्हटलं जात आहे.
Breaking News Live Update : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईत वाहतूक कोंडी
मुंबईतील सायन इथं असणाऱ्या रेल्वेमार्गावरील पूल बंद करण्यात आल्यामुळं या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. इथं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा पाहायला मिळत आहेत. 1 ऑगस्टपासून सायन ब्रीज बंद करण्यात आला. मुंबईतला सायन स्टेशन समोरचा 112 वर्ष जून पुल पाडून नवीन पूल करण्यात येणार आहे. त्यामुळे येथून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
Breaking News Live Update : स्फोटातील रिसिव्हर उडून ४०० मीटर अंतरावरील चाळीवर पडला
बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत रासायनिक कंपनीत स्फोट झाला असून यात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. हा स्फोट इतका भीषण होता, की रिऍक्टरचा रिसिव्हर उडून तब्बल ४०० मीटर लांब खरवई परिसरातील एका चाळीवर जाऊन पडला. या दुर्घटनेत कुटुंबातील लहान मुलीसह तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने कंपनीतील कामगार बाहेर पळून गेल्याने ते बचावले ,बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत रेअर फार्मा नावाची कंपनी असून त्यात केमिकल्स उत्पादन केलं जातं.
Breaking News Live Update : कल्याणमध्ये रेल्वे तिकीट काउंटरवर प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये राडा
कल्याणमध्ये रेल्वे तिकीट काउंटरवर प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये राडा झाला. इथे एक प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये तिकीट काढताना सुट्टे पैसे नसल्याच्या वादात प्रवाशांनी गोंधळ घातला. यावेळी महिला प्रवाशांनी या सगळ्याचा व्हिडिओ काढल्याने रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्यांनी या महिला प्रवाशाला धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा आरोप आहे. हे बघताच इतर प्रवाशांनी गोंधळ घालत या स्टाफच्या हातातून त्या महिला प्रवाशाची सुटका केली .अर्धा तास हा गोंधळ सुरू असताना रेल्वे पोलिसांनी मध्यस्थी करून प्रवासी आणि तिकीट काउंटर वरील स्टाफ यांच्यातील वाद मिटवला.
Breaking News Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोलापुरात, म्हणाले...
225 ते 250 जागा मी लढवणार असं आधीच सांगितलं होतं. तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केलं जात आहे. आरक्षणाचं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे. नोकरी, शिक्षणासाठी जातीचा प्रश्न येतोच कुठे? आरक्षणाचा मुद्दा म्हणजे मतांचं राजकारण... म्हणत राज ठाकरे सोलापुरात कडाडले.
Breaking News Live Update : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा उबाठा गठात मोठे फेरबदल
पालघर मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वूमीवर मोठा उबाठा गठात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोन्ही पालघर जिल्हा प्रमुखांची उचलबांगडी कण्यात आली असून त्याठिकाणी अजय ठाकूर आणि अनुप पाटील या नवीन जिल्हा प्रमुख नेमणूक करण्यात आली आहे.तर निलेश गंधे आणि गिरीश राऊत यांची सह संपर्क प्रमुख पदी वर्णी लागली आहे. तर ओमकार पाटील यांची जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सदर नियुक्त्या केल्या असल्याचं पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Breaking News Live Update : ठाकरे गटाच शिष्टमंडळ घेणार बेस्टचे व्यवस्थापक अनिल डीग्गीकर यांची भेट
ठाकरे गटाच शिष्टमंडळ घेणार बेस्टचे व्यवस्थापक अनिल डीग्गीकर यांची भेट. दुपारी 2.30 वाजता बेस्ट भवन कुलाबा येथे ठाकरे गटाच शिष्टमंडळ आणि बेस्टचे अधिकारी यांची होणार बैठक. बेस्ट उपक्रमानं लावलेल्या नवीन विद्युत स्मार्ट मीटर विरोधात निवेदन देण्यासाठी ठाकरे गटाच शिष्टमंडळ भेट घेणार आहे.
Breaking News Live Update : पुजा खेडकरची युपीएससीच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल
युपीएससी ने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केली होती, तसंच त्यांना शो कॉज नोटीस बजावली होती. या विरोधात आता पूजा खेडकरची उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Breaking News Live Update : जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर
जम्मू काश्मीर मधे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. आज (5 ऑगस्ट 2024) अनुच्छेद 370 रद्द केल्याला 5 वर्ष पूर्ण झाल्याने यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रा आज एक दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काश्मीरमधील चौका चौकात सुरक्षा दलाचे जवान तैनात.
Breaking News Live Update : गिरणा नदीपत्रात 12 ते 13 जण अडकले
गिरणा नदीपत्रात 12 ते 13 जण अडकलेत... काल संध्याकाळी 5 वाजेपासून मालेगाव तालुक्यातील सवंदगाव शिवारात गिरणा नदीत पाण्यात 12 ते 13 जण अडकले. धुळ्याहून SDRF टीमला बोलवण्यात आलं असून अद्याप रेस्क्यू ऑपरेशन सुरुय. बचावासाठी मालेगाव अग्निशमन दलाचीही मदत घेण्यात येतेय. पाण्यात होड्या सोडून त्यातून तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. तरुणांना गिरणा नदीच्या पाण्यात अडकून 12 तासापेक्षा जास्त वेळ झालाय. मासे पकडण्यासाठी गेलेले असताना अचानक पाणी वाढल्यानं तरुण अडकलेत. मासेमारीची हौस या तरुणांच्या जीवावर बेतलीय.
Breaking News Live Update : उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
उजनी धरणातून आज सकाळी आठ वाजल्यापासून 80 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडला जाणार आहे त्यामुळे भीमा नदीकाठी पूरस्थिती निर्माण होण्याचे शक्यता आहे
Breaking News Live Update : गोदावरी पाणबोटातील सर्व धरणे ओसंडून वाहू लागली
सलग 48 तास झालेल्या पावसाच्या बॅटिंगमुळे नाशिक जिल्ह्यात गोदावरी पाणबोटातील सर्व धरणे ओसंडून वाहू लागलीये... गोदावरी नदीनं निफाड तालुक्यापासून रौद्ररूप धारण केलंय. नांदूर मधमेश्वर धरणातून 44 हजार क्युसेक वेगानं पाणी सोडलं जातंय...
Breaking News Live Update : नाशिक जिल्ह्यात 24 तासांत मुसळधार पाऊस
नाशिक जिल्ह्यात 24 तासांत मुसळधार पाऊस सुरूय. इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वाधिक पाऊस झालाय. त्यामुळे गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरुय. नाशिकमध्ये सध्या पूरस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासन त्याकडे लक्ष ठेवून आहे. गंगापूर धरण समुहातून विसर्ग सुरू असल्यामुळे मराठवाड्याला दिलासा मिळालाय. जवळपास 50 हजार क्युसेकनं विसर्ग मराठवाड्यासाठी सुरूय.
Breaking News Live Update : आज पहिला श्रावणी सोमवार
पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ज्योर्तिंलिंग भीमाशंकरमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. मंदिर गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे. पहाटेपासूनच बम बम भोलेच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदूमून गेलाय.