Breaking News Live Updates : पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपींना अटक

Mon, 26 Aug 2024-8:31 pm,

Breaking News Live Updates : राज्यासह देशात राजकारणापासून इतर सर्व क्षेत्रांपर्यंत नेमकी काय आणि कशी परिस्थिती? पाहा Live Updates

Breaking News Live Updates : आजच्या दिवशी राज्याच्या राजकारणाला मिळणार नवी दिशा? देश पातळीवर कोणत्या घडामोडींकडे असेल लक्ष? पाहा सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे Live Updates.....


 

Latest Updates

  • Breaking News Live Updates : पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपींना अटक 

    पुण्याचे सहाय्यक पोलीस पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड हे रस्त्यावर सुरु असलेलं भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यात हडपसर परिसरात घडली होती. या घटनेतील आरोपींना पुणे पोलिसांनी सोलापूर मधून अटक केली असून  या आरोपीला पॉलिसी खाक्या दाखवत पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

     

  • मुंबई गोवा महामार्गावरील अपघातास ठेकेदार जबाबदार, सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा - मुख्यमंत्री शिंदे 

    मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार 26 ऑगस्ट रोजी स्वतः मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी काहीही करून गणेशोत्सवपूर्वी हा रस्ता नीट करून वाहतुकीसाठी सुरळीत करावा असे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. तसेच मुख्यमंत्र्यांनी, 'महामार्गावरील अपघातास ठेकेदार जबाबदार असून त्यांना केवळ ब्लॅकलिस्ट करू नका तर जेल मध्ये टाका', असं म्हंटल आहे. तसेच मुंबई गोवा महामार्गावरील बेजबाबदार ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. 

  • महाराजांच्या पुतळ्याच्या कामात पण कमिशन खाल्ले? कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करा -वडेट्टीवार

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 ला मालवण मध्ये नौदल दिनानिमित्त या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. यावरून आता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवरायांचा हा पुतळा उभारणाऱ्या कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट केलं पाहिजे असं म्हटलं आहे. विजय वडेट्टीवारांनी आरोप केला की, "हा पुतळा उभारण्याचा काम ठाण्यातील एका कंत्राटदारला दिले होते. महाराजाच्या कामात पण कमिशन खाल्ले? महाराजांना पण टक्केवरीतून सोडले नाही
    या कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट केलं पाहिजे" असे म्हंटले. तसेच या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. 

  • छ. शिवरायांचा पुतळा कोसळल्याने आमदार वैभव नाईकांचा संताप, PWD चं ऑफिस फोडलं 

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 ला मालवण मध्ये नौदल दिनानिमित्त या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. शिवरायांचा हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप स्पष्ट नाही, मात्र यामुळे उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. या पुतळ्याच्या देखभालीची जबाबदारी सिंधुदुर्गातील PWD कार्यालयाकडे होती. तेव्हा शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक यांनी PWD कार्यालयाची तोडफोड केली. वैभव नाईक यांनी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही घटना घडल्याचा केला आरोप केला आहे. 

  • गणेशोत्सवापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंकडून मुंबई- गोवा महामार्गाची पाहणी 

    गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार 26 ऑगस्ट रोजी स्वतः मैदानात उतरले आहेत. या रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवताना येणाऱ्या अडचणी इत्यादी समजून घेत मुख्यमंत्री मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत. काहीही करून गणेशोत्सवपूर्वी हा रस्ता नीट करून वाहतुकीसाठी सुरळीत करावा असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. तसेच तातडीने या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रेपीड क्विक सेटिंग हार्डनर ( एम -60 ) चा वापर करून हे खड्डे बुजवता येतील का?  याचाही आढावा शिंदे घेत आहेत. याबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीवेळीच त्यांनी संबंधित यंत्रणांना हे रस्ते सुरळीत करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. या सूचनांची कितपत अंमलबजावणी झाली याचाही आढावा ते या दौऱ्यात घेणार आहेत.

  • Breaking News Live Updates : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला 

    नौदल दिनानिमित्त छञपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आहे. शिवरायांचा हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप स्पष्ट नाही, मात्र यामुळे शिव प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 ला मालवण मध्ये नौदल दिनानिमित्त या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी घटास्थळाला भेट देऊन पाहणी केली असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही घटना घडल्याचा केला आरोप केला आहे. 

  • Breaking News Live Updates : कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला

    कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आले असून धरणातून भोगावती नदीपत्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तुळशी, दूधगंगा, कुभी धरणातून देखील विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकडच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा आदेश दिला आहे. जिल्ह्यात पडत असलेल्या संतातधार पाऊसामुळे पंचगंगा नदी पून्हा एकदा पात्रा बाहेर पडली आहे. 

  • Breaking News Live Updates :बदलापूरच्या दुर्दैवी घटनेनंतर लातूर पोलीस ॲक्टिव मोडमध्ये 

    बदलापूर च्या दुर्दैवी घटनेनंतर लातूर पोलीस ॲक्टिव मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. लातूरच्या पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हातील प्रत्येक शाळेत मुलींच्या सुरक्षतेसाठी विविध पथके स्थापन करण्यात आले आहेत. औसा तालुक्यातील किल्लारी येथील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी शाळेत जावून विद्यार्थ्यांना कायद्याबद्दल ची माहिती मुलींची छेड काढल्यास अथवा शाळेत रॅगिंग केल्यास त्यांना काय शिक्षा आहे याची माहिती देण्यात येत आहे. मुलींना असुरक्षित वाटत असेल तर 112 हेल्प लाईन नंबर वर संपर्क करण्याचे आव्हान ही पोलिसांनी केलं आहे. 

  • भिवंडीत दूधाचा टँकर पलटला

    भिवंडीमधील पारोळ मार्गावर दूधाचा टँकर पलटी झाला आहे. त्यामुळे दूध शेतात वाहून गेलं. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची दूध भरून घेण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

  • Breaking News Live Updates : महाराष्ट्र दिल्लीपुढं झुकणार नाही- आदित्य ठाकरे 

    केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता येणारच. सध्याचं सरकार हे घटनाबाह्य असून, महाराष्ट्रात संविधानाचा अपमान झाला आहे. महाराष्ट्र दिल्लीपुढं झुकणार नाही, असं म्हणज आदित्य ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये आपली स्पष्ट भूमिका मांडत सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. 

  • Breaking News Live Updates : गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपाच्या पावित्र्यात

    गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपाच्या पावित्र्यात. कृती समितीला आश्वासन देऊनही निर्णय न झाल्याने एसटी कर्मचारी संपावर जाणार. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही असं म्हणत एसटी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे. 3 सप्टेंबरपासून संपाचा इशारा देण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन वेतनाचा मुद्दा निकाली काढा अशी मागणी एसटी युनियनने केलं आहे. 

  • Breaking News Live Updates : बदलापूर प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी 

    बदलापूर येथे शालेय मुलींवर करण्यात आलेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. कल्याणच्या जलद गती न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. या निकालानंतर आता या आरोपीची 
    आधारवाडी कारागृहात होणार रवानगी. 

  • Breaking News Live Updates : संभाजीनगरमधील तणावग्रस्त परिस्थितीनंतर अंबादास दानवे म्हणाले... 

    संभाजीनगर येथील राड्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपच्या आंदोलनावर टीका करत आंदोलनं शांतीत करायला हवीत, काल आम्ही पंतप्रधान यांचा आदर करून आंदोलन केले. पण, आज भाजप व्यक्तिगत आंदोलन करत होते, आमच्या शिवसैनिकांना राग आला आणि ते पुरून उरले... असं दानवे म्हणाले. 

    आमचे आंदोलन मोदींविरोधात नव्हते असं म्हणत, आम्ही स्त्रियांच्या सुरक्षेसाठी उतरलो होतो. कुठल्याच प्रकरणाची बरोबरी कुठ करू नये या शब्दांत त्यांनी भाजपचा विरोध केला. 

  • Breaking News Live Updates : संभाजीनगरमध्ये राडा; भाजप आक्रमक 

    संभाजीनगरमध्ये आज आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत. आगामी  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज पाच सभा घेणार आहे.  कन्नड, वैजापूर, पैठण, गंगापुरात आदित्य ठाकरे  स्वाभिमान मेळावा घेणार आहे.. संभाजीनगर जिल्ह्यातील  4 जागांवर आदित्य ठाकरे  दावा करणार आहेत. दरम्यान संभाजीनगरमध्ये ज्या हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे थांबलेत, त्या हॉटेल बाहेर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलाय, भाजपने आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस फौज फाटा तैनात आहे..

  • Breaking News Live Updates : पुण्यात पुढील 60 दिवस नवा नियम लागू 

    पुणे शहरात पुढीले 60 दिवस लेझर दिव्यांच्या वापरावर बंदी घालणारा आदेश पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी काढला आहे. घातक लेझर प्रकाशझोतांवर गणेश विसर्जन मिरवणुकीत बंदी घालण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकताच दिला होता. त्यापाठोपाठ या नव्या आदेशामुळे दहीहंडी उत्सवातही लेझर बीमवर बंदी राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

  • Breaking News Live Updates : कळवा स्थानकात लातूर एक्सप्रेस थांबली आणि... 

    कळवा स्टेशनला लातूर एक्सप्रेस थांबल्याने मध्य रेल्वे सेवा खोळंबली. तांत्रिक बिघाडामुळे लातूर एक्सप्रेस जवळपास 20 मिनटं कळवा स्थानकात थांबली होती. ज्यामुळं लोकल गाड्या अर्धा तास उशीराने धावल्या. यामुळं मुंबईकडे येणाऱ्या फास्ट ट्रॅक वरची सेवा खोळंबली. काही वेळानं ही लातूर एक्प्रेस स्थानकाबाहेर काढण्यात आली आणि ठाण्याच्या क्रमांक 8 च्या फलाटावर उभी करण्यात आली. तांत्रिक बिघाडामुळं ही रेल्वे रिकामी करण्यात आली असून त्यामुळं त्यातील प्रवासी लोकलनं प्रवास करत आहेत. 

  • Breaking News Live Updates : पावसामुळं कोल्हापुरात धोका वाढला! 

    कोल्हापुरातल्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला. पंचगंगा नदीचे पाणी पुन्हा पात्रा बाहेर येण्यास सुरुवात झाल्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पंचगंगेची पाणीपातळी 26 फूट 5 इंचावर पोहोचली असून, जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 

  • Breaking News Live Updates : कर्नाटकमध्ये पुन्हा ऑपरेशन लोटस?

    ''कर्नाटकचे सरकार पाडण्यासाठी भाजपने 100 कोटींची ऑफर दिली होती'' असा दावा करणारं वक्यय आणि गौप्यस्फोट काँग्रेस आमदार रविकिशन गौडा यांनी केला आहे. ''दोन दिवसापूर्वी मला फोन करून 100 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती'' असं म्हणाल्याचं सांगत 
    ''भाजपाला 50 आमदार विकत घ्यायचे आहेत, त्यासाठी मला फोन आला होता पण मी नकार दिला'' असंही ते म्हणाले. 

  • Breaking News Live Updates : महापालिकेच्या होर्डिंग धोरणाच्या मसुद्याला रेल्वेचा आक्षेप

    महापालिकेच्या होर्डिंग धोरणावर आक्षेप घेणारे पत्र रेल्वेने 20 ऑगस्टला पाठवलं, ''इतर शासकीय एजन्सी'' हा शब्द वगळण्याचा पत्राद्वारे केला आग्रह. ''इतर शासकीय एजन्सी'' याचा अर्थ हे धोरण रेल्वेलाही लागू होतो त्यामुळे हा शब्द वगळून टाका, पत्राद्वारे रेल्वेची मागणी. पालिकेच्या होर्डिंग धोरणाच्या एका परिच्छेदात, ''सार्वजनिक प्राधिकरणांच्या जमिनींवर उदा. बांधकाम विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, मुंबई मेट्रो, बेस्ट, मोनो रेल किंवा कोणतीही इतर सरकारी संस्था,'' असे म्हटले आहे. यावर रेल्वेने आक्षेप नोंदवला असून हा शब्द काढून टाकण्याची मागणी केली आहे.

  • Breaking News Live Updates : नांदेडमधील काँग्रेस खासदारांचं कालवश 

    राजकीय वर्तुळातून ज्येष्ठ नेत्याची एक्झिट. नांदेडच्या काँग्रेस खासदाराचं निधन. खासदार वसंत चव्हाणांचं यांचं निधन. हैदराबादमधील रुग्णालयात सुरू होते उपचार. 

  • Breaking News Live Updates : पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस 

    पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. रविवारी इथं 200 मिलिमीटर च्या वर पावसाचे नोंद झाली असून, भोर, वेल्हा, मुळशी ,मावळ या डोंगर माथा परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. भोर तालुक्यातील निरा देवघर धरण क्षेत्रात सर्वाधिक पाऊस झाला असल्याची माहिती प्रशासनानं दिली असून, इथं 214 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर, हिरडोशी भागात 190 मिलिमीटर, पांगारी भागात 165 मिलिमीटर, शिरवली भागत 142 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद इथं करण्यात आली. 

  • Breaking News Live Updates : सहकार भवनसाठी सायनमध्ये म्हाडाची जागा 

    सहकार भवनसाठी सायनमध्ये म्हाडाची जागा देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. सहकार भवनासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला म्हाडाची ही जागा 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे. याआधी मुंबै बँकेच्या सहकार भवनसाठी गोरेगावमधील तीन एकर जागा देण्याचा निर्णय शासकीय संकेतस्थळावर जारी झाला होता. मात्र लगेचच तो हटवण्यातही आला होता. मात्र आता या सहकार भवनला सायनमध्ये म्हाडाची जागा देण्यात आली आहे.

  • Breaking News Live Updates : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी 

    पनवेलच्या पळस्पे नाका इथून दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा सुरू होणार आहे. मुख्यमंत्री मुंबई गोवा महामार्गाच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पाहणी दौऱ्याला महत्त्व आहे. मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरण काम आणि हायवेची सध्याची स्थिती याचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहे. 

  • Breaking News Live Updates : बदलापूर अत्याचार प्रकरणी नराधमाची आज न्यायालयात हजेरी

    बदलापूर अत्याचार प्रकरणी नराधम आरोपी अक्षय शिंदेला आज कोर्टात हजर करणार आहे. त्याची पोलिस कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे त्याला कोर्टात हजर करणार आहे. पोलीस त्याची कोठडी वाढवून मागणार आहे. त्यामुळे नराधम आरोपीला कोर्ट आणखी किती दिवसांची कोठडी देणार हे पाहावं लागणार आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link