Breaking News Live Updates: मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट, कोकणाला रेड अलर्ट

Mon, 08 Jul 2024-10:48 pm,

Breaking News Live Updates: राज्यातील व देशभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा, जाणून घेऊया.

Mumbai Rain Live Updates: मुंबईत दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. तर, राज्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही जिल्ह्यात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. तर, एकीकडे आज पावसाळी अधिवेशनदेखील सुरू आहे. राज्यातील व देशभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा, जाणून घेऊया.

Latest Updates

  • Breaking News Live Updates: 'या' ठिकाणच्या शाळांना सुट्टी

    संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने धुमशान घातले आहे. कोकणात पावसाने कहर केला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. खरबरदारी म्हणून प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. 

  • Breaking News Live Updates: मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट, कोकणाला रेड अलर्ट

    सकाळी 8.30 ते रात्री 8.30 दरम्यान मुंबईत 100-120mm पावसाची नोंद झाली आहे. यावेळी मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर कोकणाला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

  • Breaking News Live Updates: धोकादायक गावातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा- आदिती तटकरे

    धोकादायक गावातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा अशा मंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. आदिती तटकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून घेतला जिल्ह्यातील सद्य स्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात 103 गावं धोकादायक क्षेत्रात तर 9 गावे अतिधोकादायक क्षेत्रात, 11 गावे मध्यम धोकादायक आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेवून यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्यात

  • Breaking News Live Updates: सीएनजी, पाईप गॅसचे दर वाढवले; आज मध्यरात्रीपासून होणार दरवाढ लागू

    महानगर गॅसने सीएनजीचे आणि पाईप गॅसचे दर वाढवले. सीएनजीमध्ये प्रति किलो 1.50 रुपयाने दरवाढ झाली आहे. तर पाईप गॅसच्या किंमतीत 1 रुपयाने वाढ झाली आहे. आज मध्यरात्रीपासून होणार दरवाढ लागू होणार आहे. आता सीएनजीची किंमत 75 रुपये प्रति किलो

  • Breaking News Live Updates: 'ड्रंक अँड ड्राईव्ह' रोखण्यासाठी कडक कारवाया करा- मुख्यमंत्री

    मुंबईतील ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणे रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिली असून यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कडक कारवाया करण्यात याव्यात, अशी सूचना त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज आणि बारवरही कारवाया करण्यात याव्यात, अशी सूचनाही मुंबई महापालिकेसह पोलीस प्रशासनास देण्यात आली आहे.

  • Breaking News Live Updates: ठाण्यात पुढील तीन दिवस अनियमित पाणीपुरवठा

    भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे. दोन्ही पंपिंग स्टेशनमध्ये पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पाणीपुरवठा कमी होत असल्याने महापालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्यात समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे, ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील तीन दिवस (०९, १० आणि ११ जुलै, २०२४) अपुऱ्या प्रमाणात अनियमित पाणीपुरवठा होईल अशी माहिती ठाणे महालिकेने दिलीय.

  • Breaking News Live Updates: मराठा व ओबीसी आरक्षणासंदर्भात होणारी सर्वपक्षीय बैठक रद्द 

    आज सायंकाळी होणारी मराठा व ओबीसी आरक्षणासंदर्भात होणारी सर्वपक्षीय बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक उद्या सायंकाळी ६.३० वाजता होणार असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली आहे. मुसळधार पावसामुळे बैठक रद्द झाली आहे

  • Breaking News Live Updates: 267 मिमिपेक्षा जास्त पाऊस पडल्याने मुंबईत पूरस्थितीः मुख्यमंत्री शिंदे

  • Breaking News Live Updates: गरजेशिवाय घराबाहेर पडू नकाः मुख्यमंत्र्यांचे मुंबईकरांना अवाहन

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालिकेच्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले आहेत. त्यांनी राज्यातील पावसाचा आढावा घेतला आहे.

  • Breaking News Live Updates: मुंबईतील अतिवृष्टीचे पडसाद विधीमंडळ कामकाजावर

    विधानसभा आज दिवसभरासाठी स्थगित. उद्या सभागृह सकाळी 11 वाजता सुरू होईल

  • Breaking News Live Updates: हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्ववत

    वडाळा आणि मानखुर्द दरम्यान डाऊन आणि अप हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

  • Breaking News Live Updates: आज समुद्राला 1.57 मिनिटांनी भरती

    आज दुपारी एक वाजून 57 मिनिटांनी भरती आहे. याच दरम्यान 4.40 उंचीच्या लाटा उसळणार असल्याची माहिती महापालिकेकडून मिळत आहे. दरम्यान याच काळात मुसळधार पाऊस जर कोसळत राहिला तर मुंबईत पुन्हा एकदा पाणी भरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे

  • Breaking News Live Updates: पुढील 24 तासात राज्यात मुसळधार वा अतिवृष्टी होण्याची शक्यता

    पुढील 24 तासात पश्चिम विदर्भातील अकोला,अमरावती, यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट. नागपूर प्रादेशिक वाहन विभागाने जारी केला अलर्ट मुसळधार वा अतिवृष्टी होण्याची शक्यता. बुलढाणा आणि नागपूरच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता. विदर्भातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.

  • Breaking News Live Updates: पुढील 24 तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता 

    पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी. 

  • Breaking News Live Updates: हतनुर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली 

    हतनूर धरणाचे ४१ पैकी १० दरवाजे १.०० मी. उंचीने उघडलेले, तापी नदीपात्रात सद्यस्थितीत १९ हजार १०५ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू. संततधार पाऊस सुरू असल्याने पुढील काही तासांत २५,००० ते ३०,००० कयुसेस पर्यंत विसर्ग तापी नदी पात्रात होण्याची शक्यता

  • Breaking News Live Updates: मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास, पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत; अजित पवारांचे ट्विट

    काल रात्री मुंबईत सहा तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे. हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या १० टक्के पाऊस आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. वर्षातील 365 दिवस दुष्काळ, पूर, वादळ यांचा सामना करण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलली पाहिजे. त्यासोबतच अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

  • Breaking News Live Updates: रविवारी मध्यरात्रीपासून ते सोमवार सकाळपर्यंत मुंबईत २६७.९ मिलिमीटर इतका पाऊस

     
    हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी मध्यरात्रीपासून ते सोमवारी सकाळपर्यंत मुंबई जवळपास २६७.९ मिलिमीटर इतका पाऊस झाला.
  • Breaking News Live Updates: पवई तलाव ओव्हर फ्लो

    पवई तलाव ओव्हर फ्लो काल रात्री पडलेल्या पावसाने ६ तासात तलावातील पाणीसाठा वाढून ओव्हर फ्लो

  • Breaking News Live Updates: CSMT-ठाणे दरम्यान लोकल वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

    सीएसएमटी - ठाणे दरम्यान डाऊन आणि अप फास्ट मार्गावरील मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा मर्यादित वेगाने पूर्ववत करण्यात आली. मेल एक्सप्रेस गाड्याही हलवल्या जात आहेत.

  • Breaking News Live Updates: मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसाचा नाशिकच्या रेल्वे प्रवाश्यांना फटका

    नाशिकहून मुंबई जाणाऱ्या रेल्वे अर्धा तास उशिरा आहेत. तर मुंबईहून येणाऱ्या रेल्वे उशिरा असल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी आहे. मुंबईहून भुसावळसह अन्य ठिकाणी जाणारी रेल्वे वाहतूक सेवा विस्कळित झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळित झाल्याने प्रवाश्यांना मनस्ताप

  • Breaking News Live Updates: तब्बल तीन तासांच्या खोळंब्यानंतर अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना

  • Breaking News Live Updates: मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परिक्षा पुढे ढकलल्या

    मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाइन एज्युकेशन (आयडॉल ) ज्या परीक्षा सकाळच्या सत्रात होत्या त्या परीक्षा  मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात आले आहेत आजच्या सर्व परीक्षा 13 जुलै रोजी होणार असल्याचा मुंबई विद्यापीठाने नोटीस जारी करत सांगितले आहेत

  • Breaking News Live Updates: लोकल पुन्हा कोलमडली; CSMT- ठाणे जलद मार्गावरील वाहतूक ठप्प

    ठिकठिकाणी पाणी साचल्याने सीएसएमटी-ठाणे दरम्यान डाऊन आणि अप जलद मार्गावरील मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा बंद आहे. मात्र, डाऊन आणि अप धीम्या मार्गावर धावत आहेत. चुनाभाटी येथे पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

  • Breaking News Live Updates: मुंबई- नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी ब्रिजवर वाहतूक कोंडी

    मानखुर्द मध्ये झालेल्या वाहतूक कोंडीचा परिणाम मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी ब्रिजवर दिसून येतोय. वाशी ब्रिजवर वाशी कडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

  • Breaking News Live Updates:वडाळा आणि जीटीबी स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी

    वडाळा आणि जीटीबी स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. आज पहाटे 1 ते सकाळी 7 वाजेपर्यंत मुंबईत 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. दिवसभरात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे

  • Breaking News Live Updates: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ट्रेन 20 ते 25 मिनिटे उशिराने

    मुसळधार पावसामुळे माटुंगा रोड ते दादर दरम्यान रुळावरून पाणी साचल्याने उपनगरीय गाड्या 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वे रुळांवरून पाणी काढून टाकण्यासाठी उच्च क्षमतेचे जलपंप वापरले जात आहेत: पश्चिम रेल्वे

  • Breaking News Live Updates: कोल्हापूर जिल्हयात पावसाचा जोर, पंचगंगा नदी पात्राबाहेर, 50 हून अधिक बंधाऱ्यांवर पाणी

    कोल्हापूर जिल्ह्यात देखील 24 तासात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहात असून पंचगंगा नदीचे पाणी पात्रा बाहेर पडले आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फूट 2 इंच इतकी असून एका रात्रीत दीड फुट पाणी वाढले आहे. जिल्ह्यातील 50 बंधारी पाण्याखाली गेले असून 14 धरण क्षेत्रात अतिवृष्टी सदृष्ये पाऊस झाला आहे.

  • Breaking News Live Updates:  रात्रभर झालेल्या दमदार पावसामुळे नालासोपाऱ्यात रस्ते जलमय

    वसई विरार परिसरात काल रात्री मुसळधार पावसाच्या सरी बरसल्याने शहरातील सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. नालासोपारा पूर्वेच्या आचोळे रोडवर दरवर्षीप्रमाणे यंदाही दोन फूट पाणी साचले आहे, या साचलेल्या पाण्यामुळे शहरातील वाहतूक मंदावलेली पाहायला मिळत आहे

  • Breaking News Live Updates: रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला 

    मध्यरात्रीपासून पाऊस थांबल्यामुळे जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या अद्यापही इशारा पातळीवर असून काजळी अर्जुना कोदावली, शास्त्री , मुचकुंदी  इशारा पातळीवर आहेत. चांदेराई बाजारपेठेतील पाणी ओसरलं असलं तरी हवामान विभागाचा आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

  • Breaking News Live Updates: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी; हळू हळू परिस्थिती पूर्व पदावर

  • Breaking News Live Updates: मुंबईतील या ठिकाणी कोसळला सर्वाधिक पाऊस

    मुंबई शहर आणि उपनगरांत दिनांक ८ जुलै २०२४ रोजी मध्यरात्री १ वाजेपासून सकाळी ७ वाजेदरम्यान सर्वाधिक पाऊस कोसळलेली ठिकाणे आणि पावसाचे प्रमाण. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - वीर सावरकर मार्ग महानगरपालिका शाळा (३१५.६ मिमी)

    - एमसीएमसीआर पवई (३१४.६ मिमी)

    - मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा (२९२.२ मिमी)

    - चकाला महानगरपालिका शाळा (२७८.२ मिमी)

    - आरे वसाहत महानगरपालिका शाळा (२५९.० मिमी)

    - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका शाळा (२५५.० मिमी)

    - नारीयलवाडी शाळा (२४१.६ मिमी)

    - जिल्हाधिकारी वसाहत (कलेक्टर कॉलनी) महानगरपालिका शाळा (२२१.२ मिमी)

    - प्रतीक्षानगर महानगरपालिका शाळा (२२०.२ मिमी)

    - नूतन विद्यामंदिर (१९०.६ मिमी)

    - लालबहादूर शास्त्री मार्ग महानगरपालिका शाळा (१८९.० मिमी)

    - शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा (१८५.८ मिमी)

    - रावळी कॅम्प (१७६.३ मिमी)

    - धारावी काळा किल्ला महानगरपालिका शाळा (१६५.८ मिमी)

    - बी. नाडकर्णी उद्यान महानगरपालिका शाळा (१५६.६ मिमी

  • Breaking News Live Updates: मध्य मार्गावर लोकल ट्रेन सेवा पुन्हा सुरू

    पावसाचे पाणी ओसरल्यानंतर मध्य मार्गावर लोकल ट्रेन सेवा पुन्हा सुरू झाली आहे. कुर्लायेथून लोकल रवाना झाली आहे.

  • Breaking News Live Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा, आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज

    हवामान खात्याने मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर  बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, ही विनंती.
     

  • Breaking News Live Updates:  कोल्हापूरहून मुंबईला जाणारी एक्स्प्रेस अंबरनाथमध्ये रखडली

    कोल्हापूरहून मुंबईला जाणारी एक्स्प्रेस अंबरनाथमध्ये रखडली आहे. मुंबईत रेल्वेसेवा बंद असल्यानं अंबरनाथच्या सायडिंगला एक्स्प्रेस उभी असून सकाळपासून एक्स्प्रेस उभी असल्यानं प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

  • Breaking News Live Updates:  रायगड - अलिबाग व मुरुड तालुक्यातील शाळा , महाविद्यालयाना सुट्टी

    रायगड - अलिबाग व मुरुड तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयाना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. अलिबाग मुरुड तालुक्यात काही भागात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. पावसाची शक्यता लक्षात घेवून प्रशासन अलर्ट मोडवडवर असून रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

  • Breaking News Live Updates:  मध्य रेल्वेवरील सायन आणि भांडुप स्थानकातील लोकल वाहतूक पूर्ववत

    मध्य रेल्वेवरील सायन आणि भांडुप रेल्वे स्थानकातून लोकल वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. जलद मार्गावरुन काही प्रमाणात लोकल सोडण्यात येत आहेत. रेल्वे रूळांवरुन पाणी ओसरायला सुरुवात झाल्यानंतर लोकल सुरू करण्यात येत आहेत.

  • Breaking News Live Updates: हार्बर मार्गावर पाणी साचले, लोकल कोलमडली

    हार्बर मार्गावर रुळांवर पाणी साचल्यामुळं लोकल विस्कळीत झाली आहे. लोकल उशिराने धावत आहेत. 

  • Breaking News Live Updates: मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले, वाहतूक कोंडी

    मुंबईत सायन, माटुंगा, दादर सखल भागात पाणी साचल्याने त्याचा रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वेस्टर्न एक्सप्रेस वेवर अंधेरी-पार्ले या भागात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे.  

  • Breaking News Live Updates: अलीबागच्या नेहूली खंडाळा भागात ढगफुटी सदृश्य पाऊस

    अलिबाग तालुक्यातील नेहुली खंडाळा परिसरात पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. गावातील 6 ते 7 घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. या घरात साधारण दीड फुटापर्यंत पाणी होते.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link