Ganesh Chaturthi 2024 Live Updates : कल्याणमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन
Ganesh Chaturthi Celebration Live Updates : महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोत साजरा केला जातो. हिंदू धर्माच गणेश चतुर्थीला खुप महत्व आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात ही गणेश पूजनाने केली जाते. गणेश चतुर्थीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रत्येक अपडेट पाहा एका क्लिकवर
Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : विघ्नहर्ताची मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्यादूर होतात. तसेच गणपती बाप्पाला प्रिय असलेले मोदक , लाल फुल आणि दुर्वा अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. सर्वत्र वातावारण बाप्पामय झालं आहे. कोकणाचं आराध्य दैवत गणेशाचं वाजत गाजत आणि पारंपरिक पद्धतीने आगमन होतंय. मुंबईतील लालबागचा राजा आणि पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भक्तांची रीघ लागली आहे.
Latest Updates
गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे. वारंवार मागणी करून देखील कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले नाहीत. या खड्ड्यातून गणरायाचे आगमन झाले. मनसेकडून कल्याणमध्ये आज अनोखे आंदोलन करण्यात आले. गणेशाची वेशभूषा धारण करून गणेश खड्डे रस्त्यावर अवतरले. त्यांनी खड्ड्यातच ठाण मांडले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मालवणी भाषेत देवा महाराजा हे गाऱ्हाणे घातले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी गणरायाचं आगमन झालंय. मुख्यमंत्र्यांचं वर्षा या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं. यावेळी कुटुंबीयासोबत मुख्यमंत्र्यांनी गणराजयांची मनोभावे पूजा करून दर्शन घेतलं. सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी येवो, असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणरायाकडं घातलंय. यावेळी त्यांनी राज्यातील नागरिकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छाही दिल्या.
Breaking News : कुर्ला पूर्व रेल्वे स्थानकाजवळच्या सबेरा इमारतीला आग
शनिवारी कुर्ला पूर्व रेल्वे स्थानकाजवळील सबेरा इमारतीला आग लागली होती. मात्र अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांना ही आग विझरवण्यात आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मागील चार दिवसापासून सिंदखेडराजा येथे संपूर्ण कर्जमाफी,पीक विमा, सोयाबीन,कापूस दरवाढ मिळावी या करिता अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे, आज आंदोलनचा चौथा दिवस असून रविकांत तुपकर यांची तब्येत खालावल्याने तुपकर यांचे समर्थक कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत, हिंगोली जिल्ह्यांतील तुपकर यांच्या समर्थक शेतकऱ्यांनी नांदेड-वाशिम राष्ट्रीय महामार्ग कन्हेरगाव (नाका) येथे अडवून टायर जाळून आंदोलन सुरू केलंय,
हे सरकार जावं म्हणून जनतेने बाप्पा चरणी प्रार्थना केली असेल - जयंत पाटील
आज घरोघरी गणरायाचं आगमन होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील बोलताना म्हटले की, "दरवर्षी प्रमाणे यंदाही गणपती बाप्पांचं थाटात स्वागत झाले आहे, नोव्हेंबर महिन्यामध्ये नवं सरकार यावं. हे सरकार जाऊन महा विकास आघाडीचे सरकार यावं. हे सरकार जावं म्हणून जनतेने बाप्पा चरणी प्रार्थना केली असेल".
Pune Ganpati : पुण्यातील मानाचा गणपती श्री गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात
पुण्यातील तिसरा मनाचा गणपती असलेल्या श्री गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. यंदा फुलांनी सजवलेल्या रथातून ही मिरवणूक काढण्यात आली असून यंदा गजमहालात बाप्पा विराजमान होणार आहेत. पुनीत बालन आणि जान्हवी धरीवाल यांच्या हस्ते गणपतीची प्राणप्रतिष्ठा होईल. मानाच्या तिसऱ्या गणपतीच्या आगमन मिरवणुकीत शिखंडी ढोल पथक सहभागी झाले आहे.
Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी गणरायाचं आगमन झालंय. मुख्यमंत्र्यांचं वर्षा या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं. यावेळी कुटुंबीयासोबत मुख्यमंत्र्यांनी गणराजयांची मनोभावे पूजा करून दर्शन घेतलं. सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी येवो, असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणरायाकडं घातलंय. यावेळी त्यांनी राज्यातील नागरिकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छाही दिल्या.
Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : राज्यासह देशभरात विघ्नहर्ता लाडक्या बाप्पाचं आज आगमन होत आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांच्या घरीही गणरायाचे आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानी बाप्पाची प्रतिष्ठापणा करण्यात आलीय. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह कुटुंबीय उपस्थित आहेत.
Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : सर्वत्र गणेशाचे आगमन मोठ्या थाटामाटात होत आहे.. कोल्हापुरात देखील हाच उत्साह पाहायला मिळत असून छत्रपती घराण्याचा गणपती देखील नवीन राजवाड्यावर दाखल होत आहे. सध्या राजवाड्यावरचा हा गणपती नवीन राजवाड्यावर दाखल होत आहे.. नूतन खासदार शाहू महाराज छत्रपती आणि इतर सदस्य गणेशाचे स्वागत करून आत्त मध्ये गणेश मूर्ती घेणार आहेत.
Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाच आगमन झालंय. सहकुटुंब त्यांनी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली.
Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. कोकणातल्या ग्रामीण भागात गणरायाला आपल्या डोक्यावरून घरी आणण्याची परंपरा आहे. भाताच्या हिगव्यागार शेतातून डोक्यावरून गणपती घरी आणले जातात. कोकणातल्या अनेक खेडेगावात ही परंपरा आजही गणेशोत्सवात कायम आहे. रत्नागिरी तालुक्यातील नाणीज गावातले हे विलोभनीय दृष्य गणेशभक्तांचं लक्ष वेधून घेत आहे. ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन झालं. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी कोकणात गणराय विराजमान होतात.
Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : विघ्नहर (ओझर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा.ओझर मधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे. ओझर हे गाव कुकडी नदीवर वसलेले आहे.
Ganesh Chaturthi 2024 LIVE Updates : पुण्यामध्ये बाप्पांच्या आगमनाची सुरुवात झालीय. अनेक गणपतीच्या मिरवणुका निघत असून... ढोल पथकांचं वादन सुरू आहे. त्यामुळे भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण सध्या पुण्यात पाहायला मिळतंय. मिरवणुकीसमोर वेगळेवेगळे वादन, नृत्य, आणि लाठी-काठीचं प्रात्यक्षिकं सादर केलं जातंय.
Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : नागपूरकरांचे आराध्य दैवत अन् दिग्गजांचे श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणपती
नागपुरातील टेकडी गणपती मंदिर हे प्राचीन आहे. तसंच, या ठिकाणी असलेल्या गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे. दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवासाठी येथे आकर्षक रोषणाई केली. याशिवाय स्वयंभू मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहिला मिळत आहे. पूर्वीच्या काळात भोसले राजघराण्यातील मंडळी नियमित येथे दर्शनाला येत होते. टेकडीच्या गणपतीचा ३५० वर्षे जुना इतिहास आहे. विदर्भातील अष्टविनायकांमध्ये पहिला मान टेकडी गणपतीला आहे.
Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : गणेशगल्ली, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणेश भक्तांनी गणेशगल्ली, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याची पाहिला मिळत आहे. या बाप्पाच्या दर्शनासाठी देशविदेशातील लोक दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात.
Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : अकोल्यात हिंदू-मुस्लिम एकोप्याच उदाहरण पाहायला मिळतंय. शहरातील आगामी सण उत्सव लक्षात घेता अकोल्यात ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आलाय...यासाठी हिन्दू-मुस्लीम गठबंधन करण्यात आलं आहे. गणेशोत्सव आणि ईद-ए मिलादुन्नबी समन्वय समिती गठीत करण्यात आली आहेय..
Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : जळगावातील सुवर्णनगरी सराफ बाजारात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे... बाप्पासाठी लागणारे चांदीचे आभूषण घेण्यासाठी नागरिक चांगलीच गर्दी करतायेत... सराफ बाजारात चांदीचा मोदक, दूर्वा, मुकुट, गळ्यातील माळ, चांदीचं जास्वंदाचे फुल, पान, जानव अशा वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत..
Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : मालेगावच्या सावता गणेश मंडळाच्या मानाच्या महागणपतीचं शहरात भव्य आगमन झालंय. 11 विविध सांस्कृतिक पथकानं 22 फूट मूर्तीच्या बाप्पाचं स्वागत केलं. टाळ-मृदुंगासह शिवकालीन मर्दानी खेळ, आदिवासी नृत्य, मनमाडचे ढोल पथक आदी पथक मिरवणुकीत सामील झाले.
Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : दादरमध्ये पेणच्या पर्यावरण पूरक गणपतीला मोठी मागणी होत असल्याची पहायला मिळत आहे.. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांचा कल वळतोय.. गणेश मूर्ती ही पर्यावरण पूरक असली पाहिजे, त्यासाठी शाडूच्या मातीची किंवा कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणेश मूर्ती घेऊन त्याची स्थापना केली जात आहे...
Ganesh Chaturthi 2024 LIVE Updates : लाडक्या बाप्पा घरोघरी विराजमान होणार आहे. अख्ख महाराष्ट्र गणेशमय झालंय. विघ्नहर्त्या 10 दिवस आपल्याकडे पाहुणा असणार आहे. त्यामुळे गणेशाची प्राणप्रतिष्ठापनेपासून शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि साहित्य जाणून घ्या
बातमी सविस्तर वाचा - Ganesh Chaturthi 2024 : गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी फक्त काही तासांचा अवधी, शुभ मुहूर्त, पूजा साहित्य, विधीसह संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : नागपुरातील टेकडी गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ
नागपुरातील टेकडी गणेशाच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागलीय.... नागपूर विदर्भातून भक्त नागपुरातील टेकडी गणपतीच्या दर्शनाला पोहोचत.....शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पहाटे टेकडी गणेशाची विधिवत पूजा आणि आरती पार पडली....त्यानंतर आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय...
Maharashtra Ganesh Chaturthi Celebration Live Updates : रत्नागिरीतील गणपती पुळ्याचा बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
रत्नागिरीतील गणपती पुळ्याचा बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोप-यातून गणेश भक्त गर्दी करत असतात... गणेश उत्सवामध्ये गणपतीपुळे पंचक्रोशीत एक गाव एक गणपती प्रथा आहे... त्यामुळे गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशीच भाविकांसाठी गणपतीपुळ्यात गाभारा खुला करण्यात येतो.. वर्षातून एकदाच श्रींच पद स्पर्श करण्याची संधी भाविकांना मिळते, त्यामुळे गावकरी पहाटेपासून या ठिकाणी गर्दी करतात..
Uddhav Thackeray Shivsena Wish Ganesh Chaturthi: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं गणरायाला गणेश चतुर्थीनिमित्त साकडं
"विद्येची, बुद्धीची, ज्ञानाची देवता व चौसष्ट कलांचा अधिपती म्हणून श्रीगणेशाचे अनन्यसाधारण महत्त्व तर आहेच; पण दुःख दूर करणारा, संकटांपासून वाचवणारा, अरिष्ट दूर करणारा विघ्नहर्ता म्हणून भक्तांच्या मनात गणरायाचे म्हणून एक अढळ स्थान आहे. त्यामुळे देशातील व महाराष्ट्रातील शासनकर्त्यांनी जी संकटे महाराष्ट्रासमोर, देशासमोर व जनतेसमोर निर्माण करून ठेवली ती दूर करायची तर गणरायालाच प्रार्थना करावी लागेल," असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं गणरायाला गणेश चतुर्थीच्या दिवशीच 'सामना'च्या अग्रलेखातून साकडं घातलं आहे.
बातमी सविस्तर वाचा - 'गणनायका, शिंदे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचं साकडं
Ganesh Chaturthi 2024 LIVE Updates : पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आगमन मिरवणूक थोड्याच वेळात
जगभरातील गणेश भक्तांचं आकर्षण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आगमन मिरवणूक थोड्याच वेळात सुरू होणारेय.... साडेआठ वाजता गणरायाची मिरवणूक मूळ मंदिरापासून सुरू होईल आणि कोतवाल चावडी इथल्या उत्सव मंडपात विराजमान होईल. 11 वाजून 11 मिनिटांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल...दुपारी 12 वाजल्यानंतर भक्तांना दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेता येणारेय....यावर्षी मंडळाने जटोली इथल्या श्री शिव मंदिराची भव्य प्रतिकृती साकारलीये.... त्यावरील रोषणाईच संध्याकाळी 7 वाजता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
Ganesh Chaturthi 2024 LIVE Updates : पुण्यात गणरायाच वाजत गाजत आगमन
पुण्यामध्ये बाप्पांच्या आगमनाची सुरुवात झालीय. अनेक गणपतीच्या मिरवणुका निघत असून... ढोल पथकांचं वादन सुरू आहे. त्यामुळे भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण सध्या पुण्यात पाहायला मिळतंय. मिरवणुकीसमोर वेगळेवेगळे वादन, नृत्य, आणि लाठी-काठीचं प्रात्यक्षिकं सादर केलं जातंय.