Ganesh Visarjan Live Blog : मुंबई, पुणेसह राज्यभरात गणपती बाप्पाला भक्तीभावाने निरोप

नेहा चौधरी Thu, 28 Sep 2023-10:09 pm,

Maharashtra Ganesh Visarjan 2023 LIVE : गेल्या 10 दिवसांपासून गणराया पाहुणचार घेऊन आज गावी निघणार आहे. पुण्यातील मानाचे गणपती, नागपूरचा राजासह महाराष्ट्रातील गणेश विसर्जनची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Maharashtra Ganesh Visarjan 2023 LIVE : यथासांग पाहुचार घेतल्यावर पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी गावी निघणार आहे. अख्खा देश गेल्या काही दिवसांमध्ये बाप्पामय झाला आहे. वाजत गाजत बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील गणेश विसर्जनाची प्रत्येक दृष्य आणि पोलीस बंदोबस्तासह वाहतूक व्यवस्थेबद्दल प्रत्येक अपडेट...


 

Latest Updates

  • वाशिष्टीच्या नदी पत्रात बोटीतून गणपती बाप्पाना निरोप, वाशिष्टीच्या नदीपात्रात खोल पाण्यात गणपती आणि गौरीचा विसर्जन करण्यात आलं. पारंपारिक पद्धतीने होडीने गणपती बाप्पा डोहात आणून विसर्जन करण्याची प्रथा आहे

  • जळगाव
    जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव इथं गणेश भक्त सागर खेडकर या तरुणाने आपल्या लाडक्या बाप्पाला अनोख्या पद्धतीने निरोप दिला आहे पाण्याच्या तळाशी जाऊन सागर खेडकर या तरुणाने आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तीपूर्ण वातावरणात निरोप दिला असून पाण्याच्या तळाशी जात बाप्पाला निरोप देताना ची दृश्य ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

  • नाशिक
    नाशिकमध्येही गणेश विसर्जनाला गालबोट लागल्याची बातमी समोर आली आहे. मित्रांसोबत विसर्जनसाठी आलेले दोन जण वालदेवी धरणात बुडाले. 

  • रत्नागिरी
    टेम्पो विसर्जन मिरवणुकीत घुसल्याने 15 पेक्षा जास्त भाविक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पाचेरी आगार इथं ही दुर्घटना घडली आहे. टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि मिरवणुकीत टेम्पो घुसल्याची प्राथमिक माहिती आहे. 

  • रायगड
    गणेश विसर्जनासाठी गेलेले चार गणेश भक्त वाहून गेल्याची घटना रायगडमध्ये घडली आहे. कर्जत तालुक्यातील उल्हास नदीत पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने हे चौघं वाहून गेले. यातला एक जण सुखरुप बचावला तरएकाचा मृतदेह सापडला आहे.  दोन जण अद्याप बेपत्ता आहे. बेपत्ता गणेश भक्तांचा शोध  सुरु आहे. 

     

  • Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला लागले गालबोट
    - दोन तरुणांमध्ये झाली हाणामारी
    - भद्रकाली परिसरात झाली हाणामारी
    - हाणामारीत एक जण गंभीर जखमी
    - डोक्याला जबर मार लागल्याने रकताच्या थारोळ्यात पडला खाली 
    - जखमीला पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल; दुसऱ्याला घेतले ताब्यात 
    - हाणामारीचं कारण अस्पष्ट

     

  • Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : वाशिम मध्ये मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणेश विसर्जन करून दिला हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश 

    आज एकीकडे गणेश विसर्जन होत असताना दुसरीकडे ईद सणसुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आणि यातच हिंदू मुस्लिम एकतेच अनोखं प्रतीक हे वाशिम मध्ये पाहायला मिळत Eus. वाशिमचे जुम्मा शाहा हे आपल्या सहकाऱ्यांसह गेल्या बारा वर्षापासून वाशिम शहरातील असलेल्या देवतलावात तरफ्याच्या साह्याने गणपतीचे व्यवस्थित खोल पाण्यात गणेश विसर्जन करत असतात. यावर्षी ईदच्या दिवशीही त्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे.

  • Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : पुण्यातील मानाचा पहिल्या कसबा गणपतीचे 4 वाजून 36 मिनिटांत पतंगा नटराज घाटावर विसर्जन

  • Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : पुणे शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस;
    वडगाव धायरी परिसरात रस्त्याला नदीचे स्वरूप

     

  • Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : महाराष्ट्र सदनातील गणपतीचं विसर्जन

    राजधानी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथील लाडक्या गणरायाला मोठ्या भक्ती भावात निरोप दिला जात आहे. महाराष्ट्र सदनात गणपती बाप्पांच्या विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे. अभिनेते आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांनी बाप्पाची आरती करत निरोप दिला.सोबतच काँग्रेसचे खासदार मुकुल वासनिक देखील यावेळी उपस्थित होते

  • Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : 1 किलोचा पर्यावरण पूरक चॉकलेटच्या गणपतीचा दुधात विसर्जन

    दहा दिवसानंतर आता गणपती बाप्पांना निरोप देण्यात येत आहेय..अकोल्यातही श्रींच्या विसर्जनाला सुरुवात झालीय..तर भुइंदर छतवाल या गणेश भक्ताच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या 31 किलोचा पर्यावरण पूरक चॉकलेटच्या गणपतीचा दुधात विसर्जन करण्यात आलं..प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यामुळं प्रदूषण होतं ही बाब आत्मसाध करून हा चॉकलेटचा गणपती तयार आला होता..गणेशाची ही मूर्ती दुधात विसर्जित करण्यात आली असून हे दूध प्रसाद स्वरूपात भक्तांमध्ये वितरित करण्यात आल..

  • Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : मिरजेत ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

    सांगलीच्या मिरजेत ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकींना मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली आहे.ढोल-ताश्याचा गजरात आणि लेझीमच्या ठेक्यावर वाजता गाजत मिरवणुकीने आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यात येत आहे.पारंपरिक वेशभूषा आणि टाळ-मृदुंगच्या गजरासह महिलांनी देखील सहभाग घेतला होता.भव्य-दिव्य मिरवणुकीने गणेश विसर्जन करण्याची परंपरा असून विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली ,जिल्ह्यातील दोन हजार 300 गणेश मंडळांचे गणेश विसर्जन होत असून मिरज शहरात 250 मंडळाचं विसर्जन पार पडत असून यानिमित्ताने तगडा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे,अशी माहिती पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली आहे

  • Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : सोलापुरात मानाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी देखील लेझीम खेळण्याचा आनंद घेतला

    - सोलापुरातील गवळी वस्ती तालीम मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला थाटात सुरुवात

    - पारंपरिक लेझीम खेळत लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत मिरवणुकीत सहभाग नोंदवला

    - शारीरिक आणि बौद्धिक क्षमता सिद्ध करणारा लेझीम खेळ अनेकांना आकर्षित करतोय

  • Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : नागपूरच्या (Nagpur News) राजाची विसर्जन मिरवणुकी दुपारी एकच्या सुमारास निघाली. मंडपातून बाहेर पडल्यानंतर बाप्पाची मिरवणूक वाजत गाजत गणेशभकतांच्या जयघोषात मार्गस्थ झाली. तुळशीबाग, महाल असं मार्गक्रमण करत नागपूरच्या राजाची मिरवणूक संध्याकाळपर्यंत कोराडी येथील विसर्जन स्थळापर्यंत पोहोचेल. यावेळी बाप्पाला निरोप देताना गणेश भक्तही भावूक झाले होते.

  • Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) मानाच्या आणि ग्रामदैवत असलेल्या आराध्य संस्था गणपतीची आरती शहरातील सर्व मंत्र्यांनी एकत्रित येत केली. यावेळी सांदीपान भुमरे, भागवत कराड, अतुल सावे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या गणपतीची आरती केली आणि मिरवणुकीला सरुवात केली. यावेळी मिरवणुकीत बँड च्या तालावर या मंत्र्यांनी ताल धरला इतकच नाही तर विरोधी पक्षा नेत्याने मंत्र्यांना ओढत त्यांच्यासोबत फुगडी सुद्धा घातली.. या मिरवणुकीच्या सुरुवातीनंतर आता शहरात गणेश विसर्जनाची सुरुवात होते.

  • Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : राज्यात लाडक्या गणरायाला उत्साहात निरोप दिला जात असतांनाच नाशिकच्या (Nashik News) मनमाडमध्येही (Manmad News) गणेश विसर्जनाला सुरवात झाली. मनमाडचे आराध्य दैवत वेशातील निलमणी गणेश मूर्तीच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली.अश्वस्वार युवती, सनई चौघडा ,ढोल - ताश्यांच्या गजर, पारंपरिक संबळ,खंजीर तालावरील मराठमोळं वाघ्या मुरळीचा गोंधळ अश्या थाटात निघालेल्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

  • Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : अहमदनगर (Ahmednagar News) शहरांमध्ये सकाळपासूनच गणेश विसर्जनाची तयारी सुरू झाली आहे महापौर रोहिणी शेंडगे यांच्या बागरोजा परिसरातील शिवप्रतिष्ठ गणेश मंडळाची विसर्जन तयारी सुरू झाली असून रुद्रांश ढोल पथकाचे पारंपारिक ढोल आणि ताशाचे वादन सुरू झाले आहे या पथकामध्ये तरुणांसोबत तरुणींचा आहे मोठा सहभाग असून मंडळासमोर पथकाचे वादन सुरू आहे दुपारी तीन नंतर या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे

  • Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : गेल्या दहा दिवस गणरायाचे मनोभावे प्रार्थना करत गणेश उत्सव येवलेकरांनी (Yeola news) मोठ्या उत्साहात साजरा केला. आज घरगुती गणपती विसर्जनास सकाळपासूनच सुरुवात झाली असून येवला शहरातील अंगणगाव येथील अहिल्याबाई होळकर घाटावर आपल्या घरगुती गणरायाचे विसर्जन करण्याकरता येवलेकर येताना दिसत असून नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी गणपती विसर्जनाची पुरेपूर व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात देखील प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी गणेश कुंड तयार करण्यात आले असून या ठिकाणी देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

     

  • Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : अकोल्यात (Akola news) ही गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहेय ...मानाचा गणपती बाराभाई गणेशाच्या पूजे नंतर सार्वजनिक गणेश मिरवणुकीला सुरुवात झालीय..सोबतच घरगुती गणेश विसर्जनाला सुद्धा सुरुवात झालीय..घरघुती गणेश विसर्जनाचा वैशिष्टय म्हणजे गणेश विसर्जन हे अकोला महापालिकेच्या वातिने बांधण्यात आलेल्या कुंडात विसर्जन करण्यात येतं , आपण पाहत आहो अकोल्याचे हे दृष्य जिथे भाविकांनी गणेश विसर्जनाला सुरुवात केली आहेय ...शहरातील मोर्णा नदीत प्रदूषण थांबविण्यासाठी या सात कुंडांची निर्मिती केलीय..तर येथील विसर्जित केलेल्या श्रींच्या मूर्ती एकत्र करून १७ कि.मी च्या अंतरावर असलेल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीत विसर्जित केल्या जातात....दरम्यान अकोल्यातील गणेश उत्सवादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय.

  • Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : दहा दिवसाच्या पाहुणचारानंतर वाशीम (Washim news) जिल्ह्यात तीन टप्प्यामध्ये श्री चे विसर्जन होणार आहे पहिल्या टप्प्या मध्ये आज वाशीम शहरतील बाप्पाचे मिरवणुकीला सुरुवात झाली आहे पहिला मानाचा असलेला शिवशंकर गणेश मंडळाच्या गणपतीची खासदार भावना गवळी यांनी पूजा आरती करून स्थानिक शिवाजी चौकातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.शिवाजी चौकातून या मिरवणूक  बालू चौक,मन्नासिंग चौक, बाहेती गल्ली, काटीवेश मार्गे देव तलावात विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गणेश विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी विविध उपाय योजनांसह पोलीस दल सज्ज आहे.मिरवणूकी साठी गणेशभक्तामध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

  • Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : संगमनेर (Sangamer News) 128 वर्षांची परंपरा असलेल्या गणरायाचे माजी महसूलमंत्री थोरात यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. संगमनेर शहरातील मानाचे सोमेश्वर तरुण मित्र मंडळाने गणरायाच्या आरतीनंतर मिरवणुकीला सुरुवात केली. यावेळी बाळासाहेब थोरात यांच्यासह डॉ.सुधीर तांबे आणि दुर्गा तांबे उपस्थित होते. ढोल ताशे, पारंपरिक वाद्यांसह मिरवणुकीतलाठी काठी सह विविध पारंपरिक खेळांचा ही सहभाग आहे. 

  • Ganesh Visarjan 2023 Nashik LIVE : राज्यात गणरायाच्या विसर्जन जय्यत तयारी सुरू आहे... त्याच प्रमाणे नाशिक शहरात देखील गणरायाच्या मिरवणूक विसर्जनाची तयारी जोरदार सुरू आहे सकाळी 11 वाजेच्या सुमारास पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या गणपतीचा आरती होऊन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे यावर्षी पहिल्यांदाच सकाळी लवकर गणरायाचे मिरवणूक सुरू होणार आहे मिरवणुकीच्या पार्श्वभूमी पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी निवडणूक मार्गावर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे आणि चार ड्रोन च्या साह्याने मिरवणूक मिरवणुकी वरती लक्ष ठेवणार आहे.. यावर्षी पारंपारिक वाद्यांसह डॉल्बीचा आवाज देखील शहरात गुंजणार आहे यावर्षी गणेश मंडळांची वीस पेक्षा जास्त मिरवणुकीत सहभाग असणार आहे.

  • Ganpati Visarjan 2023 Pune ganpati Mandal :  पुण्यातील मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम मित्र (Guruji Talim Manacha) मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला काहीच वेळा सुरात होणार असून लाडके बाप्पा आकर्षक अशा फुलांनी सजविलेल्या रथात विराजमान झाले आहेत राम राज्य रथ या विसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण असून विविध रंगीत फुलांनी सजविलेला रथ हा प्रमुख आकर्षण ठरत असून मोठ्या संख्येने भावी फक्त लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत .

    मुंबईतील गणेश विसर्जनाचा सोहळा -  Mumbai Ganesh Visarjan 2023 LIVE: निरोप घेतो देवा...; लालबागच्या राजाची मिरवणूक पाहा थेट दृश्य...

    पुण्यातील मिरवणूक - पुण्यातील मानाच्या 'कसबा पेठ' गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

  • Ganesh Visarjan 2023 Maharashtra LIVE : कोल्हापुरात (Kolhapur Ganesh Visarjan 2023) देखील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात झालीय. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणपती अग्रभागी आहे. कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे, आमदार जयश्री जाधव, मनपा आयुक्त के मंजूलक्ष्मी, जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीची पुजा करण्यात आली आणि त्यानंतर या मिरवणुकीला सुरुवात झाली... पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि ढोल ताश्याच्या गजरात ही मिरवणूक सुरु झाली आहे. . गणेशोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जन मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर देखील असणार आहे.

  • Ganpati Visarjan 2023 Pune ganpati Mandal :  पुण्यातील मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी (Tambdi Jogeshwari) गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला काही वेळातच सुरुवात होणार असून लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक चांदीच्या पालखीतून काढली जाणार असून मंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सज्ज पाहायला मिळत असून पारंपारिक पद्धतीने लाडक्या बाप्पाला ढोल ताशाच्या गजरात निरोप दिला जाणार आहे.

  • Ganesh Visarjan 2023 Chhatrapati Sambhajinagar LIVE : संभाजीनगरचा ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीच्या पूजनाला सुरुवात झाली आहे ही पूजा झाल्यानंतर या गणेश मूर्तीच्या विसर्जनाची तयारी सुरू होते आणि या गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात होऊन शहरातील बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन सुरू होतं.

  • Ganesh Visarjan 2023 Amravati LIVE : आज गणेश विसर्जनासाठी अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात महापालिकेमार्फत बनवण्यात आलेल्या कृत्रिम खड्डयात विसर्जनासाठी शहरातील हजारो नागरिक येत असतात मात्र या ठिकाणी महापालिकेकडून गढूळ, दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला असल्याने भक्तांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे या विषयी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता हे पाणी स्वच्छ असल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे त्यामुळे गणेश भक्त संताप व्यक्त करत आहे. दरम्यान या ठिकाणी आमदार रवी राणा यांनी जाऊन पाहणी केली असता दुर्गधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला असल्याचे निदर्शनाला आले आहे.

  • Ganpati Visarjan 2023 Satara : सातारा शहरातील अनेक गणेश मंडळांनी नवव्या दिवशी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. रात्री उशिरा पर्यंत ढोल ताशांच्या गजरात,डॉल्बी तालावर नाचत तरुणाई मोठ्या संख्येने शहरातून निघालेल्या या विसर्जन मिरवणुकीत सामील झाली होती.या विसर्जन मिरवणूक मोठा उत्साह पहायला मिळाला. काल झालेल्या आणि आज होणाऱ्या विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी या साठी पोलीस प्रशासन सज्ज आहे.

  • Ganesh Visarjan 2023 Manmad LIVE : नाशिकच्या मालेगावमध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली असून, शहरात तीन ठिकाणी पारंपारिक सह 10 कृत्रिम असे 13 गणेश कुंडात गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली.त्याठिकाणी होणारी पाहता पोलिसांची महापालिकेच्या मदतीने ठिकठिकाणी बॅरिकेटिंग केले आहे. तसेच विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची तसेच लाईट व विज पुरवठा खंडित झाला तर जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच मिरवणुकीवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे.अनेक मुख्य रस्त्यावरील वाहतूकही वळविण्यात आली आहे.अपर पोलीस अधिकरी,दोन डीवायएसपी,12 पोलीस निरीक्षक,18 दुय्यम अधिकारी 200 होमगार्ड,300 पोलीस,एक राज्य राखीव दल व दोन दंगा नियंत्रण पथक मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मुख्य रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली आहे

  • Ganesh Visarjan 2023 Nagpur LIVE : राज्याची उपराजधानी नागपुरातही बाप्पांच्या निरोपाची तयारी पूर्ण झालीय.. शहरात 211ठिकाणी 413 विसर्जन तलाव तयार करण्यात आलेय...तर 4 फुटावरील मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था कोराडी येथे करण्यात आलीय.. शहरातील दहाही झोनमधील वेगवेगळ्या 211 विसर्जनस्थळी एकूण 413 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आलेली असून यामध्ये 19 फिरत्या विसर्जन तलावांचा देखील समावेश आहे. 4 फुटापेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कोराडी येथील विशाल कृत्रिम तलावामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे.

  • Ganesh Visarjan 2023 Nagpur LIVE : गणेश विसर्जन आणि ईद मिरवणूक एकाच दिवशी होणार असल्यानं शांततेत पार पडण्यासाठी नागपूर जिल्हा प्रशासन पोलिसांकडून तयारी करण्यात आली आहे.  ईद साजरी करण्यासाठी 1 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. तर अनंत चतुर्दशीसाठी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी दुपारी 2 वाजता नंतरची वेळ पोलिसांकडून देण्यात आली आहे. यासोबतच पोलीस 10 ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही नजर ठेवणार आहेत. 4 फुटापेक्षा जास्त उंचीच्या गणपती विसर्जन शहराबाहेर कोराडी येथे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे.

  • Ganesh Visarjan 2023 Nashik LIVE : नाशिक महानगरपालिकेकडून अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशाच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे.आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिकेने सहाही विभागांत 27 नैसर्गिक व पारंपरिक ठिकाणी व नदी प्रदूषण टाळण्यासाठी तब्बल 57 कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे... सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री उशिरा मूर्ती संकलन होईपर्यंत हे केंद्र सुरू राहणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. गणेशमूर्तीचे नदीपात्रात विसर्जन न करता मनपाच्या गणेश विसर्जन स्थळांवर गणेशमूर्ती आणि निर्माल्य संकलित करण्यात येणार आहे. यासाठी मनपाने शहरातील सर्व सहा विभागांत एकूण 84 नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांची निश्चिती केली आहे. महापालिकेच्यावतीने नाशिकरोड, नाशिक पूर्व, पंचवटी, सिडको, नाशिक पश्चिम, सातपूर अशा एकूण 83 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. यात नैसर्गिक घाट 27 तर 56 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे...

  • Ganpati Visarjan 2023 Pune ganpati Mandal : अखिल मंडई गणपती मंडळ

    मंडळाची विसर्जन मिरवणूक भव्य अशा ‘विश्वगुरू’ रथातून निघणार आहे. स्वामी समर्थांची 10 फूट उंचीची मूर्ती रथावर असून, श्री दत्त महाराजांचे त्रिमिती (थ्रीडी) पेंटिंग रथावर साकारले आहे. 30 फूट उंची आणि 15 फूट रुंदी असलेल्या या रथाची लांबी २१ फूट आहे. रथामध्ये हायड्रोलिक तंत्राचा वापर केला आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे नगारावादन आणि त्यामागे गंधर्व बँड, शिवगर्जना वाद्य पथक, नादब्रह्म ढोल-ताशा पथक ट्रस्ट सहभागी होतील.

  • Ganpati Visarjan 2023 Pune ganpati Mandal : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट

    यंदा श्री गणाधीश रथामध्ये मंडळाचे गणराय विराजमान होणार असून, आकर्षक विद्युत रोषणाईने रथ उजळून निघणार आहे. भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेशी रथ सुसंगत आहे. रथावर आठ गजस्तंभ असून, भगवान शंकरांच्या आठ गणांच्या मूर्ती आणि हनुमानाच्या दोन मूर्ती आहेत. मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी असणार आहे. प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-लेझीम पथक, सनई-चौघडा मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मंडळ यंदा दुपारी चार वाजता लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणुकीत सहभागी होणार आहे.

  • Ganpati Visarjan 2023 Pune ganpati Mandal : श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणपती मंडळ

    मंडळाच्या गणरायाची मिरवणूक पारंपरिक लाकडी रथातून निघणार आहे. यामध्ये समर्थ ढोल-ताशा पथक, रमणबाग ढोल-ताशा पथक आणि श्रीरा

  • Ganpati Visarjan 2023 Pune ganpati Mandal : मानाचा पाचवा गणपती - केसरीवाडा गणपती मंडळ

    केसरीवाडा गणेश मंडळाचे गणराय रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या पारंपरिक पालखीत विराजमान असतील. मिरवणुकीत बिडवे बंधू यांचे नगारा वादन, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, श्रीराम ढोल-ताशा पथक आणि राजमुद्रा ढोल-ताशा पथक सहभागी होणार आहेत. तसेच इतिहास प्रेमी मंडळातर्फे ‘चापेकर बंधूंना प्रेरणा देणारे लोकमान्य टिळक’ हा जिवंत देखावा सादर केला जाणार आहे.

  • Ganpati Visarjan 2023 Pune ganpati Mandal : मानाचा चौथा गणपती - तुळशीबाग गणपती मंडळ

    विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळ महाकाल रथाची सजावट करणार आहे. रथ 28 फूट उंच असून फुलांनी सजवलेली 12 फूट उंचीची महाकालची पिंड, हे आकर्षण असणार आहे. उंचीला मर्यादा असल्याने मंडळ पहिल्यांदाच ‘हायड्रोलिक’चा वापर करणार आहे. उज्जैन येथील श्री महाकालेश्वराची सवारी ज्याप्रमाणे निघते, त्याप्रमाणे मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी उज्जैनच्या अघोरी महाराज यांचा सहभाग असेल. मिरवणुकीत लोणकर बंधूंचे नगारावादन आणि स्वरूपवर्धनी, गजलक्ष्मी व शिवप्रताप वाद्य पथके सहभागी होणार आहेत.

  • Ganpati Visarjan 2023 Pune ganpati Mandal : मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालीम गणपती मंडळ

    मंडळाच्या श्रींची मिरवणूक स्वप्नील आणि सुभाष सरपाले आणि अविनाश जिंदम यांनी तयार केलेल्या ‘जय श्रीराम-रामराज्य’ या फुलांच्या आकर्षक रथातून निघणार आहे. या मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारावादन, गंधर्व ब्रास बँड, फुलगावच्या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळेचे सैनिक प्रात्यक्षिके व ढोल-ताशा पथक, नादब्रह्म ढोल-ताशा पथक आणि नादब्रह्म ट्रस्ट ढोल-ताशा पथक सहभागी होणार आहेत.

  • Ganpati Visarjan 2023 Pune ganpati Mandal : मानाचा दुसरा गणपती - ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ

    सकाळी नऊ वाजता जोगेश्वरी चौकातील उत्सव मांडवात श्रींची मूर्ती चांदीच्या पालखीत विराजमान होईल. 10.30 वाजता टिळक पुतळा या ठिकाणाहून मुख्य विसर्जन मिरवणुकीत मंडळ सहभागी होईल. सतीश आढाव यांचे नगारावादन, पारंपरिक पोशाखातील अश्वारूढ कार्यकर्ते, न्यू गंधर्व ब्रास बँड, समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, ताल ढोल-ताशा पथक मिरवणुकीत सहभागी होतील. शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाने तयार केलेल्या खास शिवराज्याभिषेक रथाचे सादरीकरणही मिरवणुकीत होणार आहे.

  • Ganpati Visarjan 2023 Pune ganpati Mandal : दहा दिवस वातावरणात चैतन्य आणलेल्या बाप्पा निरोप देण्याची वेळ आली आहे. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांनी नेहमीप्रमाणे विसर्जन मिरवणुकीचे नियोजन यंदाही मोठ्या थाट्यामाट्यात केलं आहे. मानाचा पहिला गणपती - ग्रामदैवत श्री कसबा गणपती सार्वजनिक मंडळाची मिरवणूक सकाळी 10.30 वाजता सुरु होणार आहे. ही मिरवणूक रमणबाग प्रशाला, रूद्रगर्जना ढोल-ताशा पथक आणि कलावंत ढोल-ताशा पथक ही तीन पथके सहभागी होती. तसंच नगारखाना, प्रभात बँड, कामयानी प्रशाला आणि बँक ऑफ इंडिया या दिंड्यात सहभागी होतील. 

  • Ganesh Visarjan 2023 Nashik LIVE : नाशिकच्या (Nashik) गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी (Ganesh Visarjan) सार्वजनिक मंडळासह महापालिका, पोलिसांनी कंबर कसली आहे. बाप्पाला निर्विघ्न निरोप देण्यासाठी मिरवणूक मार्गावर जवळपास 70 कॅमेरेसह चार ड्रोनद्वारे लक्ष ठेवून असणार आहे. 

  • Ganesh Visarjan 2023 Chhatrapati Sambhajinagar LIVE : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील खालील दिलेले रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे.  

    सिटीचौक ते जुनाबाजार मार्गे भडकलगेट.
    जिन्सी चौक ते संस्थान गणपती, जाफरगेट- मोंढा ते राजाबाजार.
    निजामोद्दीन दर्गा रोड ते निजामोद्दीन चौक व डावीकडे शहागंज चमन.
    भुरे पहेलवान यांचे घर ते निजामोद्दीन चौक व उजवीकडे शहागंज चमन..
    चेलीपुरा चौक ते गांधी पुतळा, मंजुरपुरा चौक ते गांधीपुतळा.
    लोटाकारंजा ते सराफा रोड, रोहिला गल्ली ते सराफा रोड.
    कामाक्षी लॉज ते सिटीचौक व पुढे गुलमंडी, बाराभाई ताजिया, गोमटेश मार्केट मार्गे पैठणगेट या रस्त्यावरील सर्व पुर्व-पश्चिम गल्ल्या बंद राहतील.
    सिटीचौक पोलीस स्टेशन पश्चिमेकडील बु-हाणी हायस्कूलकडे जाणारी गल्ली.
    बुढीलाईन, जूने तहसिल कार्यालय, जुना बाजार, बारुदगरनाला.
    सिल्लेखाना चौक, पैठणगेट, बाराभाई ताजिया, रंगारगल्ली, सिटीचौक.
    सावरकर चौक, एम. पी. लॉ कॉलेज, महात्मा फुले पुतळा/ बळवंत वाचनालय चौक.
    अंजली टॉकीज, महात्मा फुले चौक ते बाबुराव काळे चौक.
    रॉक्सी कॉर्नर, जिजामाता कॉलनी ते बाबुराव काळे चौक.

  • Ganesh Visarjan 2023 Chhatrapati Sambhajinagar LIVE : अनंत चतुर्दशीसाठी (Ananta Chaturdashi) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात गणेश विसर्जनासाठी (Ganesh Visarjan) काही विशिष्ट मार्ग आज बंद आहेत. विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोस्तर लावण्यात आला आहे. 

  • Maharashtra Ganesh Visarjan 2023 LIVE : बंदोबस्तावर असणा-या पोलिसांनी कुटुंबासमवेत गणेश विसर्जन मिरवणूकीत मनसोक्त डान्स केला..शिर्डी (Shirdi Ganesh Visarjan) पोलीस ठाण्यातील गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी पोलिसांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला.

  • Maharashtra Ganesh Visarjan 2023 LIVE : मनमाड-मुंबई (Manmad Ganesh Visarjan) गोदावरी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांनी बसवलेल्या गणेशाचं अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला वाजत गाजत विसर्जन करण्यात आलं... तीनचाकी सायकलवर विराजमान गणेशाचं वाहन मूषक सायकल चालवताना पाहायला मिळाला... दरवर्षी या गोदावरी एक्स्प्रेमधले मनमाड-मुंबई असा नियमित प्रवास करणारे प्रवासी गाडीतच गणपतीची स्थापना करतात. 

  • Pune Dagdusheth miravnuk : पुण्यात (Pune Ganeshotsav 2023) गणपती विसर्जन मिरवणुकीत दगडूशेठ गणपती मंडळ चार वाजता सहभागी होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक थाटात काढणार आहे. 

  • Pune Dagdusheth Ganesh 2023 LIVE : पुण्यात दगडूशेठ गणपतीची मूर्ती मुख्य मंदिरात नेण्यात येत आहे. आज सकाळीच दत्त चौकातल्या अयोध्या मंदिराच्या देखाव्यातून मूर्ती मुख्य मंदिरात नेऊन स्थानापन्न करण्यात येत आहे. दरवर्षी मूर्ती मुख्य मंदिरात नेण्याची क्रिया खूप उशिरा सुरू होते. मात्र यावर्षी मूर्ती पहाटेच मुख्य मंदिरात नेण्याची सुरूवात केलीय. गणेशमूर्तीसमोर सालाबादप्रमाणे दाक्षिणात्य वादकांनी वादन केलं. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link