Mumbai Ganesh Visarjan 2023 : 'पुढच्या वर्षी 7 सप्टेंबरला मी येतोय...'; लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न

Mumbai Ganesh Visarjan 2023 :'पुढच्या वर्षी 7 सप्टेंबरला मी येतोय...'; लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न

Mumbai Ganesh Visarjan 2023 : 'पुढच्या वर्षी 7 सप्टेंबरला मी येतोय...'; लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न

Ganesh Visarjan 2023 : दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपतीबाप्पा आता निरोप घेतला. मुंबईत लालबागचा राजा, गणेशगल्ली मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकायाचा राजा अशा गणपती मंडळांच्या मिरवणुकांनी लालबाग परळ परिसर खुलून गेला होता.  तर, शहराच्या इतर भागांमधून येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या. अतिशय वाजत गाजत गणपती बाप्पा आले आणि अखेर पाहुणचार घेऊन आपल्या गावी गेले. पाहता पाहता आनंदाचे हे दिवस कसे सरले अनेकांनाच कळलं नाही. पण, या उत्सवाची सांगता सर्वांनीच एका आशादायी आश्वासनानं केली. आता ओढ पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची... गणपती बाप्पा मोरया!!!

29 Sep 2023, 09:20 वाजता

Ganesh Visarjan 2023 LIVE: यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची सांगताही त्याच उत्साहात झाली. मुंबईत अनेक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांचं विसर्जन शुक्रवारी सकाळी पार पडलं. मानाचा लालबागचा राजाही शुक्रवारी सकाळी 9 वाजून 14 मिनिटांनी विसर्जित झाला. यावेळी कोळी बांधवांनीही आपआपल्या होड्या आणत राजाला निरोप दिला. अतिशय उत्साहात बाप्पा आले आणि पाहुणचार घेऊन त्यांच्या गावाला गेले. आता ओढ पुढच्या वर्षीच्या गणेश चतुर्थीची... गणपती बाप्पा मोरया!!!

 

29 Sep 2023, 09:02 वाजता

Ganesh Visarjan 2023 LIVE: गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन सुरु, कोळी बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती.

 

29 Sep 2023, 08:51 वाजता

Ganesh Visarjan 2023 LIVE: मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर एकिकडे इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांचं विसर्जन सुरु असतानाच तिथं लालबागच्या राजाचंही अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्यानं विसर्जन करण्यात येत आहे. 

 

29 Sep 2023, 08:17 वाजता

Ganesh Visarjan 2023 LIVE: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारीसुद्धा मोठ्या गणेश मंडळांच्या मूर्तींचं विसर्जन गिरगाव चौपाटीवर सुरुच होतं. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, डोंगरीचा राजा, गिरगावचा महाराजा या आणि अशा इतरही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती दाखल झाल्या असून, आता त्यांच्या विसर्जनास सुरुवात झाली आहे. 

 

29 Sep 2023, 07:34 वाजता

लालबागचा राजा ओपेरा हाऊस परिसरापर्यंत पोहोचला असून समुद्राला ओहोटी आल्याने विसर्जनासाठी उशीर होण्याची शक्यता आहे. 

29 Sep 2023, 06:52 वाजता

लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांनी प्रचंड गर्दी

29 Sep 2023, 06:45 वाजता

लालबागचा राजा व्हीपी रोडवर पोहोचला आहे. थोड्याच वेळात होणार बाप्पाचं विसर्जन

28 Sep 2023, 21:58 वाजता

 मुंबईतल्या गणपतींचं चौपाट्यांवर विसर्जन सुरू आहे.  गणरायाला निरोप द्यायला मुंबईकरांची गर्दी पहायला मिळत, लालबागचा राजा भायखळ्यात दाखल झाला आहे. 

28 Sep 2023, 19:25 वाजता

Mumbai Ganesh Visarjan 2023 LIVE: प्रभादेवीतील आदर्श नगरचा वक्रतुंडला साश्रुनयनांनी निरोप

28 Sep 2023, 19:19 वाजता

Mumbai Ganesh Visarjan 2023 LIVE: 'मुंबईचा राजा' गिरगाव चौपाटीवर दाखल, थोड्याच वेळात होणार विसर्जन