Loksabha Election 2024 Live Updates : भटकती आत्मा असते तसा वखवखलेला आत्माही असतो - उद्धव ठाकरे

Tue, 30 Apr 2024-8:42 pm,

Loksabha Election 2024 Live Updates : जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही... कराडच्या सभेत पंतप्रधान मोदींनी ठणकावलं.

Loksabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता आणणारी भटकती आत्मा, असं म्हणत पुण्याच्या सभेत शरद पवारांचं नाव न घेता मोदींचा हल्लाबोल केला. तर खटाखट, टकाटक म्हणत राहुल गांधींचीसुद्धा खिल्ली उडवली. पंतप्रधानांनी प्रचारसभांदरम्यान केलेल्या या वक्तव्यांनंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चा आणि नवे सूर पाहायला मिळाले. या सर्व परिस्थितीवर आणि सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या टीकांवर पवार नेमकं काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


 

Latest Updates

  • Loksabha Election 2024 Live Updates :  भटकती आत्मा कुणाला म्हणाले? भटकती आत्मा असते तशी वखवखलेला आत्माही असतो. आम्ही आमच्या मुलांसाठी फिरतो. हा फक्त स्वतःसाठी फिरतो अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : वेल्ह्यातील सभा उरकून पुण्यातील सभेला निघत असताना हेलीकॉफ्टर उड्डाण करू शकले नाही. त्यामुळे शरद पवार अखेर त्यांच्या गाडीतून पुण्याच्या दिशेला निघाले

  • Loksabha Election 2024 Live Updates : पंतप्रधान मोदी फक्त गुजरातचे पंतप्रधान नाहीत... - नाना पटोले 

    पंतप्रधान मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, ते फक्त गुजरातचे पंतप्रधान नाहित असा नाराजीचा सूर नाना पटोले यांनी आळवला. पंतप्रधान मोदी गुजरातपुरताच विचार करतात, त्यामुळं त्यांनी फक्त गुजरात मध्येच प्रचार करावा. सोमवारच्या सभेत खुर्च्या रिकाम्या होत्या असा दावा करत गांधी परिवारावर आरोप करत राहणे हेच त्यांचे राजकारण असल्याचा नाराजीचा सूर त्यांनी आळवला. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : राज्यामध्ये महाविकास आघाडीचे 40 पेक्षा अधिक खासदार निवडून येतील 

    महाविकास आघाडीचे राज्यामध्ये 40 पेक्षा अधिक खासदार निवडून येतील असा विश्वास भाजप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. तसेच शरद पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली टीका ही भाजपा सह अन्य कोणालाही आवडली नाही असाही दावा त्यांनी केलेला आहे. कमी होणारा मतदान हे महाआघाडीच्या पथ्यावर पडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. धुळ्यामध्ये काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बाळासाहेब थोरात आले होते. यावेळेस त्यांनी झी 24 तासशी बोलताना राज्यांमध्ये महायुतीच्या विरोधात वातावरण आहे. त्यामुळेच भाजपाचे प्रचाराचे मुद्दे भरकटले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

  • Loksabha Election 2024 Live Updates : महायुतीत तिढा कायम 

    पालघरच्या जागेबाबत महायुतीत तिढा कायम असतांना  पालघर चे विदयमान  खासदार राजेंद्र गावित यांनी थोड्या वेळापूर्वी ठाण्यातील शुभ - दीप निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. लातूर मध्ये मुख्यमंत्री सभेला जाण्यापूर्वी राजेंद्र गावित आणि माजी खा. आनंद परांजपे यांनी  मुख्यमंत्री यांची भेट घेऊन आगामी काळात  पालघर मध्ये तसेच कल्याण मध्ये कशाप्रकारे प्रचार करावा याबाबतची माहिती घेतली तसेच राजेंद्र गावित हे  भाजपच्या चिन्हावर लढणार का ? की ते  शिवसेनेच्या चिन्हावरच लढणार हे अध्यापही निश्चित नाही. यबाबत राजेंद्र गावित यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे त्यामुळे लवकरच पालघर बाबत निर्णय होण्याची शक्यता.

  • Loksabha Election 2024 Live Updates : नाशिकच्या जागेचा तिढा कायम 

    नाशिकच्या जागेचा तिढा कायम असतांना भुजबळ फार्मवर हालचाली वाढल्या असून, भाजपचे पदाधिकारी मंत्री छगन भुजबळांच्या भेटीला पोहोचले. माजी आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष प्रशांत जाधव आणि विजय साने भुजबळांच्या भेटीला पोहोचले. थोड्याच वेळात दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉ. भारती पवारही भुजबळांची भेट घेणार 
    असल्याची सूत्रांची माहिती. भुजबळ महायुतीच्या प्रचारात अंतर राखून असल्यानं या भेटीला महत्त्व असून, दिंडोरीसह नाशिक लोकसभा मतदार संघात भुजबळांची मोठी ताकद आहे, त्यामुळं या राजकीय घडामोडींवर सर्वांचीच नजर राहील. 

  • 'त्या नेत्याला शिक्षा देण्याची वेळ आली!' माढाच्या सभेत पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर निशाणा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढ्यात भाजपचे लोकसभा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. एका नेत्याने माढात पाणी देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु, अद्यापही पाणी मिळालेले नाही. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्या नेत्याला शिक्षा देण्याची वेळ आली आहे असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

     

  • Loksabha Election 2024 Live Updates : माळशिरस येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यासपीठावर आगमन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यासपीठावर आगमन. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमेदवार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार बबन शिंदे, आमदार संजय शिंदे, सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित आहेत. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : रविंद्र वायकर यांना उमेदवारी 

    रविंद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी. महायुतीकडून वायकरांच्या नावे जाहीर करण्यात आली उमेदवारी. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : उत्तर मुंबई मतदारसंघात नाराजीनाट्य कायम 

    उत्तर मुंबई मतदारसंघात काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य कायम. वर्षा गायकवाड आज अर्ज  दाखल करणार, नसीम खान गैरहजर राहणार ? हाच प्रश्न उपर्षित करण्यात येत आहे. शिवाय भाई जगताप, हंडोरे सुरेश शेट्टी उपस्थित राहणार का ? यासंदर्भातील चर्चाही इथं रंगू लागल्या आहेत. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : ... हे पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही

    'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भटकता आत्मा म्हणून केलेला लेख कुणाच्या संदर्भात आहे हे महाराष्ट्र जाणतो. जिवंत व्यक्तीला भटकता आत्मा म्हणून हिणवणे हे पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही. पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा एक नागरिक म्हणून निषेध करतो', अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : चंद्रशेखर बावनकुळे यांचे शाब्दिक बाण 

    'महाराष्ट्राचे महानालायक उद्धव ठाकरे यांचा आदरणीय मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल बोलताना आज पुन्हा तोल गेलाच. उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या नावानं कितीही शिव्याशाप दिले तरी जनता जनार्दनाचे आशीर्वाद देवेंद्रजींसोबत आहेत. 
    खरं तर समर्थ रामदास स्वामींनी मुर्खांची लक्षणं सांगतांना लिहून ठेवलंय.
    तोंडाळासीं भांडों नये | वाचाळासीं तंडोंनये |
    संतसंग खंडूं नये | अंतर्यामीं ||||', असं ट्विट बावनकुळे यांनी केलं. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : पियूष गोयल भरणार उमेदवारी अर्ज

     उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग वाढलीय. भाजपचे पियूष गोयल मुंबई उत्तरमधील उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल करतील. वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात ते अर्ज भरणारेत. त्यांच्याविरोधात मविआला उमेदवारच सापडत नाहीय. इकडे उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड अर्ज भरतील. भाजपनं त्यांच्याविरोधात उज्ज्वल निकमांना मैदानात उतरवलंय. उत्तर पूर्व मुंबईतून संजय दिना पाटील उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यांच्या विरोधात असलेल्या मिहीर कोटेचा यांनी दोन दिवसांपूर्वीच अर्ज दाखल केलाय. इकडे कल्याण मतदारसंघात महायुतीसमोर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर रिंगणात आहेत. त्या आज शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करतील. यावेळी आदित्य ठाकरेंचा रोड शो होणारेय. कल्याणमध्ये शिंदेंकडून अधिकृतरित्या अजूनही श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा झालेली नाही. धुळ्यामध्ये काँग्रेस अंतर्गतच विरोधाचा सामना करावा लागलेल्या शोभा बच्छाव यांचाही आज अर्ज भरण्यात येणारेय. यावेळी बाळासाहेब थोरात उपस्थित असतील. त्यांच्यासमोर भाजपच्या डॉ. सुभाष भामरेंचं आव्हान असणारेय. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा 

    महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभेचे आयोजन करण्यात आला आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. ही सभा उद्या दुपारी 2.30 वाजता शहरातील गरूड चौकात असणार आहे.

  • Loksabha Election 2024 Live Updates : शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची आज पुण्यात सभा

    महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची आज पुण्यात सभा आहे.. पुण्यातील वारजे मध्ये ही सभा आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला पवार आणि उद्धव ठाकरे आजच्या सभेतून काय उत्तर देणार याकडे सा-यांचं लक्ष लागलंय. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : अमित शाह आज ३ राज्यांच्या दौऱ्यावर

    अमित शाह आज ३ राज्यांच्या दौऱ्यावर. आसाममध्ये पत्रकार परिषद. तर, बंगालच्या बिष्णूपूर आणि गुजरातच्या नरोडा गावात सभांचं आयोजन

     

  • Loksabha Election 2024 Live Updates : बड्या नेत्यामुळं महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण 

    पुण्यातील सभेत शरद पवारांचं नाव न घेता मोदींनी हल्लाबोल केलाय. 'भटकती आत्मा' अशा शब्दांत पवारांवर मोदींनी टीका केलीय. बड्या नेत्यामुळं महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरूये. 45 वर्षांआधी एका नेत्याने राजकीय खेळ सुरु केला. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरू असल्याचं मोदी म्हणाले. तर मोदींना मत मतमोजणीनंतर लक्षात येईल की, ही भटकती आत्मा नसून, ही भारताची आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे. असा पलटवार जयंत पाटलांनी केलाय. 

     

  • Loksabha Election 2024 Live Updates :  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचाराचा झंझावात आजही राज्यात

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचाराचा झंझावात आजही राज्यात पाहायला मिळणार आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज राज्यात तीन सभा होणार आहेत.  माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये आज मोदींच्या सभा असतील. माढामधील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माळशिरस येथे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्यासाठी धाराशिवमध्ये. तर भाजपच्या सुधाकर शृंगारेंच्या प्रचारासाठी लातूरमध्ये मोदी सभा घेणार आहेत. त्यांच्या या सभांची जय्यत तयारी करण्यात आलीये. 

  • Loksabha Election 2024 Live Updates : काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही

    जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही. कराडच्या सभेत पंतप्रधान मोदींनी ठणकावलं. धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण देण्यास विरोध करत देशात अनुचित प्रकार घडवण्याचा कट असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. 

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link