Maharashtra Assembly Election 2024 LIVE Updates: महाविकास आघाडीचा ८५,८५,८५ चा फॉरमॅट

Wed, 23 Oct 2024-7:04 pm,

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या.

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर, मनसेही 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. आज महाविकास आघाडीही उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घ्या.

Latest Updates

  • ठाकरेंच्या शिवसेनेच्या ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर 

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.  पहिल्या  यादीत ६५  उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. 

     

  • मावळमध्ये अजित पवार गटाला धक्का 

    महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांचा पदाचा राजीनामा दिला आहे.  मावळ विधानसभा निवडणूक अपक्ष लढवण्याचा बापू भेगडे यांनी निर्णय घेतला आहे. 

  • मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला आजच ठरणार - विजय वडेट्टीवार

    महाविकास आघाडीचं जागावाटप कधी होणार याची उत्सुकता सर्वांना आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लवकरच जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होईल असं म्हटलं आहे. महाराष्ट्रात सरकार आणण्यासाठी महाविकास सज्ज असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. आजच महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होईल असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

  • गँगस्टर छोटा राजनला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा

    गँगस्टर छोटा राजनला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे.  त्याला हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. याशिवाय याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे.  या शिक्षेला छोटा राजननं दिलेलं आव्हान निकाली लागत नाही, तोपर्यंत स्थगिती कायम राहील, असं हायकोर्टाने स्पष्ट केलंय. मात्र इतर प्रकरणातील अटकेमुळे छोटा राजनचा मुक्काम तुर्तास कारागृहातच राहणार आहे. 2001 मध्ये हॉटेल व्यावसायिक जया शेट्टीची खंडणीसाठी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. छोटा राजनच्या सांगण्यावरूनच ही हत्या झाल्याचं मान्य करत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं 30 मे रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

  • Breaking News LIVE Updates: महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा 3- 4 जागांवर अडली 

    3-4 जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटात फोनवरून चर्चा सुरू. काही तासात हा वाद सुटणार असल्याची सूत्रांची माहिती. 4 वाजता होणारी महा विकास आघाडीची पत्रकार परिषद काही वेळासाठी पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता

  • Breaking News LIVE Updates: राष्ट्रवादीकडून 6 नव्या चेहऱ्यांना संधी 

    हिरामण खोसकर (पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते)
    सुलभा खोडके (पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते)
    राजकुमार बडोले (पूर्वाश्रमीचे भाजप नेते)
    नजीब मुल्ला
    निर्मला विटेकर
    भरत गावित (माणिकराव गावित यांचे पुत्र, भाजप)

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून सस्पेन्स कायम. हडपसर विधानसभेतून चेतन तुपे यांना उमेदवारी वडगाव शेरी वरून सुनील टिंगरेंची धाकधूक वाढली. 38 जणांच्या पहिल्या यादीत सुनील टिंगरे यांचे नाव नसल्याने वडगाव शेरी मतदारसंघ भाजप लढणार असल्याची शक्यता वाढली.

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाच्या 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. सर्वप्रथम भाजपने 99 उमेदवार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 45 उमेदवार आणि आता अजित पवार यांनी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. अजित पवार बारामतीतून लढणार आहे. तर छगन भुजबळ येवल्यामधून निवडणूक लढणार आहेत. 

    कोणाला कुठून उमेदवारी संपूर्ण माहिती - Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर; अजित पवार बारामतीतून लढणार, वाचा संपूर्ण यादी

     

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates:  अमित ठाकरेंविरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना देणार 'हा' उमेदवार?

    दादर माहिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंचा शिवसेना पक्ष विभागप्रमुख महेश सावंत यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता. या मतदारसंघात होणार चुरशीची तिरंगी लढत. मनसेतर्फे अमित ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर यांची उमेदवारी जाहीर. तर आता ठाकरे गट महेश सावंत यांना दादर माहिमच्या मैदानात उतरवण्याच्या तयारीत. आज दादर माहिममधील पदाधिका-यांची मातोश्रीवर होतंय बैठक, या बैठकीत महेश सावंत यांचे नाव निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. 

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates:  वर्ध्यात विधानसभेच्या रणसंग्रामाला सुरुवात

    विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आणि इच्छुक उमेदवार उमेदवारी मिळविण्यासाठी कामाला लागले. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात अद्यापही उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले नसले तरी निवडणूक कार्यक्रमानुसार नामांकन अर्ज स्वीकारण्यास व दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी चारही विधानसभा मतदारसंघात एकूण 154 अर्जाची उचल करण्यात आली

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: संभाजी ब्रिगेडची व शिवसेनेची युती तुटणार? 

    संभाजी ब्रिगेड 50 च्या वर उमेदवार जाहीर करणार. शिवसेनेबरोबर असणारी युती संभाजी ब्रिगेड तोडणार 

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: शंकरराव गडाख यांच्या अडचणी वाढणार

    माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखालील कारखाना असलेला मुळा सहकारी साखर कारखान्याला आयकर विभागाची नोटीस. 137 कोटी रुपये भरण्याचे आदेश. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नोटीस आल्याने खळबळ

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: चालकाचा ताबा सुटल्याने एसटी बसचा अपघात

    एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात घुसली. पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यानची घटना घडली आहे. पुणे शिरपूर बसला अपघात झाला आहे. नगर - मनमाड महामार्गावर घडला अपघात. सुदैवाने बसमधील 40 प्रवासी थोडक्यात बचावले

  • संजय राऊतांची पत्रकार परिषद 

    आम्ही सौदा करत नाही; आव्हान स्वीकारतो - राऊत
    मविआचं जागावाटप लवकर होणार - राऊत 
    वरळीतून ट्रम्प, प्रिन्स चार्लसला उभं करणार का? - संजय राऊत 
    वरळीच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचा खोचक टोळा

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: अजित पवारांकडे घड्याळ राहणार की जाणार? 

    Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला दुसरं चिन्ह द्यावं या मागणीसाठी शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या, २४ ऑक्टोबर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमुर्ती सूर्यकांत आणि न्यायमुर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २९ तारखेला संपणार असल्यामुळे यापुर्वी न्यायालय काही निर्णय देतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: शेकापचे सहा उमेदवार जाहीर; रायगड जिल्ह्यात नवीन चेहऱ्यांना संधी 

    Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने आपल्या ६ उमेदवारांची घोषणा केली. अलिबाग इथं जोरदार शक्ती प्रदर्शन करीत पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी उमेदवार जाहीर केले. यामध्ये शेकापने नवीन तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. अलिबाग मधून चित्रलेखा पाटील, पेणमधून अतुल म्हात्रे , तर उरण मतदार संघातून प्रीतम म्हात्रे हे नवीन चेहरे रिंगणात उतरवले आहेत. तर पनवेल मधून माजी आमदार बाळाराम पाटील हे उमेदवार असतील. लोहा कंधार मधून विद्यमान आमदार श्याम सुंदर शिंदे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. सांगोल्यातून डॉ. बाबासाहेब देशमुख हे उमेदवार असतील.

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: पोहरादेवी येथील महंत सुनील महाराजांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र

    Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: आठ दहा महिन्यांपासून उद्धव ठाकरे भेटत नसल्याने पोहरादेवी चे महंत सुनील महाराज यांचा उद्धव सेनेला जय महाराष्ट्र केला आहे. भेटीसाठी वेळ मागत असून वेळ मिळत नसल्याने दिला राजीनामा. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल यांच्या वंशजांची गरज नाही. असे म्हणत जड अंतकरणाने राजीनामा दिला असल्याचे सांगितले

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: महाविकास आघाडीने कळवण सुरगाणा विधानसभेची जागा माकपाला दिली

    Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: नाशिक जिल्ह्यात मा कपचा गड म्हणून ओळखला जाणारा कळवण सुरगाणा मतदारसंघ महाविकास आघाडीने जे पी गावित या माकपच्या उमेदवारासाठी सोडला आहे. लोकसभेमध्ये जे पी गावित यांनी माघार घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील कळवण सुरू गाण्याची विधानसभा निवडणुकीची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला देण्यात येणार होती

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: निलेश राणे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

    Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: निलेश राणे दुपारी 4 वाजता कुडाळ येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नारायण राणे, दीपक केसरकर, उदय सामंत, भरत गोगावले, दादा भुसे व अन्य नेतेमंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कुडाळ हायस्कूल पटांगणात भव्य मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. कार्यकर्ता मेळाव्याला जवळपास १५००० लोक उपस्थित राहतील असा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: हडपसर रोड नाकाबंदीदरम्यान 22 लाखांची रक्कम सापडली

    Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: पुण्यातील हडपसर रोडवर नाकाबंदी दरम्यान २२ लाख रुपये गाडीत सापडले आहेत.आचारसंहितेच्या कारणास्तव पोलीस चेकिंगच्या वेळेस हडपसर पोलिसांना चेकिंग करताना एका गाडीमध्ये मोठी रक्कम सापडली आहे. किराणामालं दुकानदाराची रक्कम असल्याची माहिती मिळत आहे. 

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणातील मोठी अपडेट

    Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: पुण्यातील बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीची डीएनए टेस्ट करण्यात येत आहे. शोएब बाबू शेख याचा डीएनए नमुना काढून फोरेन्सिकला पाठवण्यात आले आहेत. अत्याचार प्रकरणातील फिर्यादी , साक्षीदार , यांची  पोलिसांकडून ओळख परेड होणार आहे. आणखी एका म्हणजे तिसऱ्या आरोपीचा पोलिसांकडून तपास सुरुच आहे. नागपूर आणि मध्यप्रदेश मध्ये पुणे पोलिसांची पथके शोध घेत आहेत

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाचा मतदारसंघ समजला जाणाऱ्या साकोली मतदारसंघात काँग्रेसकडून नाना पटोले हे उमेदवार असणार आहेत. तर महायुतीमधील भाजपकडे हा मतदार संघ आहे. तर दुसरीकडे नाना पटोले यांना टक्कर देण्याकरिता उमेदवार नसल्याने आता भाजपला राष्ट्रवादीमधून आयात करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भाजपच्या पदाधिकारीमध्ये नाराजीचा सूर पाहायला येत असून भाजपच्या गोटात अंतर्गत कलह वाढणार असून जर राष्ट्रवादीमधून आयात केला गेलं तर संपूर्ण मतदार संघातील भाजपा पदाधिकारी सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत

     

  • Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: कोल्हापूर उत्तरचा पेच कधी सुटणार?

    Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील दोन उमेदवारांना शिवसेनेने उमेदवारी देऊ केली आहे. राधानगरीमधून शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश अबिटकर तर करवीर विधानसभा मतदारसंघातून चंद्रदीप नरके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातून कोण याचे उत्तर अजून गुलदस्तात आहे. कोल्हापूर उत्तरवर भाजपने दावा सांगितल्यामुळे उत्तरचा पेच अद्याप सुटलेला नाही हे स्पष्ट होतंय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link