Maharashtra Breaking News LIVE : जयंत पाटील यांची पत्रकार परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर

दक्षता ठसाळे-घोसाळकर Thu, 24 Oct 2024-6:39 pm,

LIVE Updates on October 23 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 23 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • जयंत पाटील यांची पत्रकार परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर 

    विधानसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही पहिली उमेदवार यादी जाहीर केली. 

  • मावळ तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊलीभाऊ दाभाडे यांचे पक्षाकडून निलंबन

    मावळ तालुक्यातील काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे.मावळ तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊलीभाऊ दाभाडे यांचे पक्षाकडून निलंबन करण्यात आले आहे.  पक्षाची शिस्त मोडल्याने त्यांच्यावर तब्बल सहा वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.   पक्षाचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

  • शिवडी विधानसभेचा तिढा सुटला, अजय चौधरींना उमेदवारी

     

    शिवडी येथील विधानसभा जागेवरून विद्यमान आमदार अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यात तिढा होता. मात्र गुरुवारी मातोश्रीवर अजय चौधरी आणि विधानसभेचे इच्छुक उमेदवार सुधीर साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यांच्यात काहीकाळ चर्चा झाली आणि शिवसेना ठाकरे गटाकडून अजय चौधरींना शिवडी येथून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. 

  • शिवडी विधानसभेचा तिढा आज सुटण्याची शक्यता, शाखाप्रमुख मातोश्रीवर दाखल

    विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून शिवडी येथील विद्यमान आमदार अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यातील तिढा अद्यापही सुटलेला नाही. 
    याच संदर्भात शिवडी विधानसभेचे शाखाप्रमुख मातोश्रीवर दाखल झाले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सगळ्यांशी संवाद साधून शिवडी विधानसभेचा निर्णय आज घेणार आहेत. शिवडी विधानसभेचे इच्छुक उमेदवार सुधीर साळवी आणि आमदार अजय चौधरी मातोश्रीवर दाखल थोड्याच वेळेत बैठकीला सुरूवात होणार असल्याची माहिती मिळतेय. 

  • सोलापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार ठरला 

    आगामी विधानसभा निवडणुकांच्या पाश्ववभूमीवर सोलापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार अखेर ठरला आहे. माजी महापौर महेश कोठे यांना उद्या शरद पवार गटाकडून एबी फॉर्म दिला जाणार असून ते 28 ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी दिली आहे. सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या विजयकुमार देशमुख विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महेश कोठे यांच्यात लढत होणार आहे. 

  • सर्वोच्च न्यायालयाचा शरद पवार आणि अजित पवार दोघांनाही इशारा 

    सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की दोन्ही गटांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे. जर मुद्दाम निर्देशांचे उल्लंघन कोणी केलं तर आम्ही स्वतःहून अवमान ठपका ठेवू असा इशारा न्यायालयाने दिला आहे. तर आम्ही स्वतःहून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केल्याचे प्रतिज्ञापत्र आणि पुरावे सादर करू असे आश्वासन अजित पवारांनि दिले. 

  • नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका, 7 ते 14 नोव्हेंबर दरम्यान दौरा करणार 

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पाश्ववभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. 7 ते 14 नोव्हेंबर दरम्यान मोदींचा महाराष्ट्र दौरा असणार असून यात ते भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतील. 

  • NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा इस्लामपुरातून उमेदवारी अर्ज दाखल 

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शहरातून भव्य रॅली काढत जयंत पाटलांनी तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आपली उमेदवारी सादर केली. 

  • मंत्री दिलीप वळसे पाटीलांनी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज केला दाखल

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव शिरुर विधानसभा मतदार संघातून महायुतीचा उमेदवार म्हणून विधानसभेसाठी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांची कन्या पुर्वा वळसेपाटील या त्यांच्या सोबत होत्या. वळसेपाटलांनी आज आंबेगावमधून शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभा घेऊन जनतेला संभोधित केले. 

  • राष्ट्रवादी शदरचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन आज इंदापुरातून उमेदवारी अर्ज दाखल करणारे आहेत. ते थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळेंनी हर्षवर्धन पाटलांचं औक्षण केलं. 

  • राष्ट्रवादी शदरचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन आज इंदापुरातून उमेदवारी अर्ज दाखल करणारे आहेत. ते थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळेंनी हर्षवर्धन पाटलांचं औक्षण केलं. 

  • शरद पवार आव्हाडांच्या निवासस्थानी उपस्थित राहीले आहेत. ठाण्याचील निवासस्थानी शरद पवारांच्या उपस्थित सचिन आव्हांडांनी फॉर्म भरला आहे. 

  • कल्याण पूर्वमध्ये भाजपचं जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. सुलभा गायकवाड थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहेत. विनोद तावडेंच्या उपस्थितीत भव्य रॅली होणार आहे.  महायुतीत बंडखोरी होणार नाही असं यावेळी विनोद तावडे यांनी सांगितलं आहे. 

  • समरजीत घाटगेंनी उमेदवारीचा अर्ज भरला आहे. कागल मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. कागलमध्ये शक्तीप्रदर्शन करत घाटगेंनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

  • अहिल्यानगरच्या राहुरी मतदार संघात भाजपकडून शिवाजीराव कर्डिले अर्ज भरणार आहेत.राहुरी येथे आपल्या मोजक्याच कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.12 वाजता ते अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचतील. 

  • पुण्यात दिव्यांग आणि 85 वर्षापेक्षा वृद्धांना घरबसल्या मतदानाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी मतदारांना '12 ड' अर्ज भरून द्यावा लागणारेय. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात झाली आहे. 27 ऑक्टोबरपर्यंत मतदारांना अर्ज भरून द्यावा लागणार आहे. 

  • गुरू पुष्य योगाच्या शुभ मुहूर्तावर सोन्याचांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. सोन्याच्या दरात 600 रूपये प्रति तोळे तर चांदीच्या दरात अडीच हजार रुपये प्रतिकीलोची घट झाली आहे.  त्यामुळे आज सोन्याचे भाव GSTसह 80 हजार 500 प्रती तर चांदीचा दर GSTसह 1 लाख 1 हजार रुपये प्रतिकिलो एवढा झाला आहे. 

    सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

  • जळगाव-एरंडोलमध्ये दीड कोटींची रोकड जप्त

    नाकाबंदीवेळी पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली आहे. जळगाव एरंडोलमध्ये दीड कोटींची रोकड जप्त करण्यात आलंय. एरंडोलच्या कासोदगावात नाकाबंदीवेळी कारमध्ये रोकड सापडली आहे. 

  • आम्ही मेरिटवर निवडणूक लढवत आहोत ृ विजय वडेट्टीवार 

  • समसमान जागांवर बोलणी पक्की - संजय राऊत 
    कुणाला जागा द्यायची हा पत्राचा प्रश्न - संजय राऊत 
    तिकीट नाकारणारे आरोप करतात - संजय राऊत 
    आता फक्त जागांमध्ये अदलाबदल होऊ शकते 
    आणखी 25 ओव्हर खेळणं बाकी आहे - संजय राऊत 

  • निलेश राणे 52000 मतांनी जिंकणार - एकनाथ शिंदे 

  • ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांच्या पक्षाचं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे.. मनसे नेते अविनाश जाधव आज उमेदवारी अर्ज भऱणार आहे.. त्यासाठी राज ठाकरे ठाण्यात उपस्थित राहणार आहे.. यावेळी मनसेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.. तर दुसरीकडे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार पक्षाकडून जितेंद्र आव्हाड हे सुद्धा आज कळवा मुंब्रा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.. यावेळी शरद पवार ठाण्यात येणार आहेत.. कळवा रेती बंदर येथे पवारंवर JCB मधून पुष्पवृष्टी करण्यात येईल. तसंच मुंब्रा येथील दत्तवाडी परिसरातून बाईक रॅली काढत जितेंद्र आव्हाड उमेदवारी अर्ज दाखल करतील.. 

  • पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळली असून या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. ढिगा-याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भोसरी येथील सद्गुरु नगरमधील घटना आहे. 

  • भाजप नेते आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट झाली आहे. राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. पण या भेटीचं कारण गुलदस्त्यात. ही चर्चा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्याची चर्चा रंगली आहे. 

  • रायगड जिल्हयातील उरणच्या जागेवरून शेकाप आणि शिवसेना ठाकरे पक्षाचं घोडं अडलं आहे. उरणसाठी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापने प्रीतम म्‍हात्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर  ठाकरे पक्षाने माजी आमदार मनोहर भोईर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उरणसाठी रस्सीखेच सुरू आहे. 

  • मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत इच्छूक उमेदवारांची पहिल्या टप्प्यातील बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. यावेळी विधासभेसाठी जरांगे कोणाला उमेदवारी देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 25 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. फडणवीसांना दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. 

  • मुख्यमंत्री शिंदे 24 तारखेऐवजी 28 तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 24 तारखेला अनेक उमेदवारांचे फॉर्म भरणार असल्याने शिंदे त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहणार आहेत. यामुळे अर्ज भरण्याची तारीख बदलण्यात आली.

  • कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सुभाष भोईर आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दरम्यान 'आता पुन्हा संधी मिळाली आहे. त्यामुळे 2019 चा बदला 2024 मध्ये घेतला जाईल अशी प्रतिकिया सुभाष भोईर यांनी दिलीय आहे. 

  • मनसेचे अविनाश जाधव आज उमेदवारी अर्ज दाखल करणारेत. त्यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेही असणारेत. अविनाश जाधवांना ठाणे शहरातून उमेदवारी देण्यात आलीये.

  •  आदित्य ठाकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
    - शिवसेना UBTकडून वरळीतून आदित्य ठाकरे रिंगणात
    - सकाळी 10 वाजता दाखल करणार उमेदवारी अर्ज
    -  वरळीत आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे लढत

  • विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरमधून सांगितले की, संध्याकाळपर्यंत काँग्रेसची यादी जाहीर होईल. तसेच आम्ही विदर्भात 42 ते 43 जागा लढतोय, ही माहिती त्यांनी यावेळी दिली. आम्ही आकड्यावर गेलो नाही मेरिटवर गेलो असंही त्यावेळी ते म्हणाले. विजयाची मुहूर्तमेढ विदर्भात रोवणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link