एस्केलेटरच्या दोन्ही बाजूला ब्रश का असतात? पायातले बूट चमकवण्यासाठी नाही...तर 'हे' आहे खरं कारण

Escalator :  खालच्या मजल्यावरुन वरच्या मजल्यावर जाण्यासाठी सुरूवातीला पायऱ्या किंवा लिफ्टचा वापर केला जायचा. पण आता अनेक ठिकाणी धावत्या पायऱ्या अर्थात एस्केलेटरचा वापर केला जाऊ लागला आहे. पण तुम्हाला माहित आहे का एस्केलेटर वापरण्याचेही काही नियम आहेत. 

| Oct 24, 2024, 17:15 PM IST
1/8

एस्केलेटरच्या दोन्ही बाजूला ब्रश का असतात? पायातले बूट चमकवण्यासाठी नाही...तर 'हे' आहे खरं कारण

2/8

मुंबईत पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांवर एस्केलेटर बसवण्यात आले आहेत. मेट्रो आणि मोनो स्थानक असो की मॉल प्रत्येक ठिकाणी एस्केलेटर हमखास दिसतात. प्रवाशांना पायऱ्या चढण्याच्या त्रासापासून वाचवण्यासाठी एस्केलेटर हा उत्तम पर्याय ठरला आहे. 

3/8

खालच्या मजल्यावरुन वरच्या मजल्यावर जाण्यासाठी सुरूवातीला पायऱ्या किंवा लिफ्टचा वापर केला जायचा. परंतु त्यानंतर एस्केलेटरचा शोध लागला आणि मॉल किंवा रेल्वे स्टेशन सारख्या ठिकाणी याचा सर्वाधिक वापर होऊ लागला. 

4/8

सुरूवातीला लोकांना एस्केलेटरचा वापर कसा करायचा हे माहित नव्हतं. लोकं एस्केलेटरवरुन प्रवास करण्यासाठी घाबरायचे, पण आता रेल्वे स्टेशन सारख्या ठिकाणी एस्केलेटर आल्यामुळे लोकं आता एस्केलेटरला चांगलीच सरावली आहे. 

5/8

पण एस्केलेटर वापरण्याचेही काही नियम आहेत. तुम्हा एस्केलेटरवरुन जाताना एस्केलेटरच्या दोन्ही बाजूला ब्रश लावण्यात आलेले पाहिले असतील. अनेक जणांना या ब्रशचा वापर पायातील बूट साफ करण्यासाठी असतात असा गैरसमज आहे. पण  तुम्हाला यामागील खरं कारण माहित आहे का?

6/8

एस्केलेटरच्या दोन्ही बाजूला पिवळ्या पट्टयांच्यावरती हे ब्रश लावण्यात आलेले असतात. ही पिवळ्या रंगाच्या पट्टी सावध करणारी असते. एस्केलेटरवर उभं राहाताना पिवळ्या पट्टीच्या आत उभं राहा असंही पट्टी सुचवते. 

7/8

तर एस्केलेटरच्या दोन्ही बाजूला असलेले ब्रश कपडे आणि वस्तूंना एस्केलेटरमध्ये अडकवण्यापासून वाचवण्याचं काम करतात. एस्केलेटरवरील ब्रश हे सेफ्टी फीचर म्हणून काम करतात. तुमचा पाय पिवळी पट्टी ओलांडून त्या ब्रशजवळ पोहोचताच, हा ब्रश तुम्हाला पाय पिवळ्या पट्टीच्या आत घेण्याच्या सूचना देतो.  

8/8

एस्केलेटर वापरताना अनेकजण या ब्रशने शूज स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. परंतु असं करणं टाळा, असं करणं जीवावर बेतू शकतो. त्यामुळे एस्केलेटर वापरताना काळजी घ्या.