Maharashtra Breaking News Live : इंदापुरात अज्ञाताकडून गोळीबार, एक गंभीर जखमी…
Maharashtra Breaking News Live : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक यासोबतच इतरही क्षेत्रातील अपडेट्स पाहा...
Maharashtra Breaking News Live : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्यात बऱ्याच घडामोडी घडत असून, त्याव्यतिरिक्त आणखी कोणत्या गोष्टींवर संपूर्ण राज्याचं लक्ष असेल? पाहा सविस्तर....
Latest Updates
इंदापुरात अज्ञाताकडून गोळीबार, एक गंभीर जखमी…
बारामती मधील घटना ताजी असतानाच इंदापुरात अज्ञाताने एकावर गोळीबार केलाय. या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. राहुल चव्हाण असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नांव आहे. तो इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावचा असल्याची माहिती मिळतेय. इंदापूर कॉलेज समोरच ही घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींचा ठाणे दौरा
ठाणे शहरात कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 रोजी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान यांच्या या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी पूर्वतयारीची बैठक सोमवारीठाणे महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. सुमारे 40 हजार नागरिकांची उपस्थिती या कार्यक्रमास अपेक्षित आहे.
सेबीचे अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन
सेबीचे अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्या विरोधात युथ काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. माधवी पुरी बुच यांच्या विरोधात मोठ्याप्रमाणात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी सेबी कार्यालय बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
सेबी कार्यालया बाहेर पोलिसांनी सर्व युथ काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतले.तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे
काही दिवसांपासून तिरुपती मंदिरात मिळणाऱ्या लाडू प्रसादात भेसळ असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात आता सुप्रीम कोर्टाने आंध्रप्रदेश राज्यसरकारवर ताशेरे ओढले आहेत. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला म्हंटले की, 'लाडू प्रसाद तपासाचा निकाल न निघता माध्यमांमध्ये निवेदन देण्याची काय गरज होती?'. सुप्रीमकोर्टाने मुख्यमंत्र्यांनाही याबाबतचा जाब विचारला. कोर्टाने म्हंटले की, 'SIT ने कुठपर्यंत तपास केला ? मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून जबाबदारीची अपेक्षा आहे. अहवाल जुलै मधे आला मग सप्टेंबर महिन्यात त्यावर भाष्य का केले? तुम्हीच अशी विधान करत असाल तर मग तपासाची काय गरज?' असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. तसेच सुप्रीम कोर्टाने म्हंटले की, 'देवाला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे. अहवाल पाहता प्रथमदर्शनी असे दिसते की प्रसाद बनवताना भेसळयुक्त सामग्री वापरली गेली नव्हती'.
तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे
काही दिवसांपासून तिरुपती मंदिरात मिळणाऱ्या लाडू प्रसादात भेसळ असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात आता सुप्रीम कोर्टाने आंध्रप्रदेश राज्यसरकारवर ताशेरे ओढले आहेत. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला म्हंटले की, 'लाडू प्रसाद तपासाचा निकाल न निघता माध्यमांमध्ये निवेदन देण्याची काय गरज होती?'. सुप्रीमकोर्टाने मुख्यमंत्र्यांनाही याबाबतचा जाब विचारला. कोर्टाने म्हंटले की, 'SIT ने कुठपर्यंत तपास केला ? मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून जबाबदारीची अपेक्षा आहे. अहवाल जुलै मधे आला मग सप्टेंबर महिन्यात त्यावर भाष्य का केले? तुम्हीच अशी विधान करत असाल तर मग तपासाची काय गरज?' असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. तसेच सुप्रीम कोर्टाने म्हंटले की, 'देवाला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे. अहवाल पाहता प्रथमदर्शनी असे दिसते की प्रसाद बनवताना भेसळयुक्त सामग्री वापरली गेली नव्हती'.
Maharashtra Breaking News Live : सरकारचा धडाका; समाजातील घटकांचं मन जिंकण्यासाठी 2 तासात 38 निर्णय
दोन तासांच्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल ३८ निर्णय घेण्यात आले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णयांचा धडाका.
सर्व घटकांना खूष करण्याचा सरकारचा प्रयत्न.कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणाही लागू
(महसूल विभाग)ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान
(नियोजन विभाग)ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार. एमएमआरडीए ला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता
(नगर विकास विभाग)ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १२ हजार २०० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता
(नगर विकास विभाग)ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारणार
(नगर विकास विभाग)देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना.
(पशुसंवर्धन विभाग)यासह इतरही निर्णय.
Maharashtra Breaking News Live : बारामतीच्या टीसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला जीवे मारलं
बारामतीच्या टीसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा खून झाल्याची घटना समोर आली असून, कोयत्याने वार करून विद्यार्थ्यांचा खून करण्यात आला आहे. खून झालेला आणि खून करणारे विद्यार्थी तिघेही अल्पवयीन असून ही घटना पूर्व वैमनस्यातून घडली असल्याचं सांगितलं जात आहे. खून करणाऱ्या दोघांपैकी एकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात दुसऱ्याचा शोध सुरू. कॉलेजमध्येच खून झाल्याने बारामती शहरात खळबळ.
Maharashtra Breaking News Live : रत्नागिरी - भोस्ते घाटातील गुढ मृतदेह प्रकरणात महत्त्वाची अपडेट
रत्नागिरी - भोस्ते घाटातील गुढ मृतदेह प्रकरणात महत्त्वाची अपडेट. योगेश आर्या हा तरुण शुक्रवारपासून बेपत्ता. पोलिसांकडून शोध सुरू.
मृत व्यक्ती स्वप्नात येत असल्याचा योगेश आर्याचा होता दावा. पोलिसांनी घेतलेल्या शोधानंतर घटनास्थळी आढळून आला होता मृतदेह. मुलाच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात वडिलांच्या फेऱ्या, फरार होण्यापूर्वी योगेश आर्याने लिहिलेली चिट्ठी पोलिसांच्या ताब्यात. पण त्या चिट्टीत नेमके काय? याबाबतीत पोलिसांकडून मात्र काहीही खुलासा नाही.धारावीमधील अतिक्रमण प्रकरण : ...तर सरकार कारवाई करेल; लोढांची माहिती
ते स्वतः अतिक्रमण काढत आहेत. सरकारने दिलेला कालावधी संपलेला आहे. अजून काही बाकी असल्यास सरकार कारवाई करेल, असं धारावीमधील अतिक्रमणाबद्दल बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं.
गोशाळांना देशी गायींपोटी प्रतिदिन 30 रुपये चारा अनुदान
आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रात नोंदणीकृत असलेल्या गोशाळांना देशी गायींपोटी प्रतिदिन 30 रुपये चारा अनुदान देण्याचा निर्णय झाल्याची माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
Maharashtra Breaking News Live : रत्नागिरीत जिल्ह्यातील तीन जागांवरील उमेदवारांवर शिक्कामोर्तब?
जिल्ह्यातील तीन जागांवरील उमेदवारांबाबत ठाकरेंकडून जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. दापोली, गुहागर, राजापूर जागेवर उमेदवार जवळपास निश्चित. रत्नागिरीमधून उदय सामंतांविरोधात कोण? याबाबत अद्याप निर्णय नाही. दापोलीतून संजय कदम, तर राजापूरमधून राजन साळवींचं नाव निश्चित. गुहागरमधून भास्कर जाधव निश्चित; तर विक्रांत जाधव यांच्या नावाची विचारणा झाल्याची माहिती.
Maharashtra Breaking News Live : नरहरी झिरवाळ सरकार विरोधातच आक्रमक
अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार नरहरी झिरवाळ सरकार विरोधातच आक्रमक. धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या सरकारच्या भूमिके विरोधात नरहरी झिरवाळ आजपासून मुंबईत आंदोलनाला बसणार आहेत. धनगर आरक्षण तसंच पेसाभरतीच्या प्रश्नांसाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मंत्रालयासमोर धरणे आंदोलनाला बसणार आहेत. त्यांच्या या आंदोलनात राज्यातील विविध आदिवासी संघटनाही सहभागी होणार आहेत.
Maharashtra Breaking News Live : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात वंचित पाठोपाठ मनसेही उमेदवार देण्याच्या तयारीत आहे... मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अमरावती येथे विदर्भातील विविध मतदार संघाचा आढावा घेतला...यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचं निश्चित झाल्याचे समजतेय. तुषार गिरे यांना दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात लढणार असल्याची चर्चा आहे.
Maharashtra Breaking News Live : सरकार आमच्यावर कुठे तरी दुजाभाव करत आहे- नरहरी झिरवाळ
धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून नरहरी शिरवाळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना काही महत्त्वाच्या गोष्टी प्रकाशात आणल्या. 'धनगर आणि धनगट या शब्दांचा अप्राय असून त्या बाबत शासनाने निर्णय घेऊ नये अशी आमची मागणी आहे. तेव्हा शिंदे समिती केली आता 4 ते 5 आयएएस कमिटी केली. सरकार आमच्यावर कुठे तरी दुजाभाव करत आहे. आमची मागणी आहे टाटा इन्स्टीट्यूटने अहवाल दिलाय तो अहवाल प्रसिद्ध करा तो केला जात नाही. हा रिपोर्ट बाहेर न येणं ह संशयास्पद आहे. यावरून आम्ही आता निर्णय घेतला असून, आमदार खासदार माजी लोकप्रतिनिधी आंदोलनात सहभागी होत आहेत', असं झिरवाळ ठामपणे म्हणाले.
Maharashtra Breaking News Live : प्रणिती शिंदे यांच्याकडून भाजपवर गंभीर आरोप
हिंदू-मुस्लिमचा वाद भाजपने आपल्या देशात पेटवला असा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदेंनी केलाय. जात-पात-धर्मावर भाजपने राजकारण केलं ज्याला अनेकजण बळी पडले असंही त्या म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीत आपल्या देशाला कीड लागली, बुरशी लागली. अशी टीका प्रणिती शिंदेंनी सरकारवर केली.
Maharashtra Breaking News Live : अलिबाग मुरुडच्या जागेवर काँग्रेसचा दावा
रायगड जिल्ह्यात एकीकडे महायुतीत कर्जतच्या जागेवरून वाद सुरू असताना दुसरीकडे महविकास आघाडीत देखील आलबेल आहे, असे चित्र नाही. काँग्रेसने अलिबाग मुरुडच्या जागेवर दावेदारी करायला सुरुवात केलीय. त्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण ठाकूर यांनी अलिबाग मतदार संघातून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी पक्षाकडे केलीय. या मतदार संघात शेकाप प्रबळ दावेदार मानला जातो. त्यामुळे अलीबागच्या जागेवरून महाविकास आघाडीत धुसफूस होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Breaking News Live : बाणगंगा तलावाच्या जीर्णोद्धारसाठी आता नव्याने निविदा
ऐतिहासिक अशा बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती देण्यासाठी पालिका प्रशासनाने आता तीन वेगवेगळ्या निविदा मागवण्याचे ठरवले आहे. आधीच्या कंत्राटदाराने पायऱ्यांचे नुकसान केल्यामुळे त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले होते. आता पालिकेने गाळ काढण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची नेमणूक करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत तर ऐतिहासिक रामकुंड पुनरुज्जिवित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतगर्त येणाऱ्या हार्बर इंजिनिअरींग विभागाला काम देण्यात येणार आहे.
Maharashtra Breaking News Live : अक्षय शिंदेला दफन करण्यात आलेल्या स्मशानभूमीत बसवले सीसीटीव्ही कॅमेरे
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा अखेर 6 दिवसानंतर काल उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत दफनविधी पार पडला. मात्र या दफन विधीस शिवसेनेचा शिंदे गटाने विरोध केला होता, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अक्षय शिंदेला दफन करण्यात आलेल्या स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, पोलिसांकडूनही स्मशानभूमीत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Maharashtra Breaking News Live : गोधणी चौफुलीवर ट्रक टँकरचा भीषण अपघात
यवतमाळ शहरालगत नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गोधनी चौफुली अपघात प्रवणस्थळ बनले आहे. याठिकाणी कोळसा वाहतूक करणारा ट्रक व सोयाबीनच्या कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या टँकरचा विचित्र अपघात झाला. यात दोन्ही वाहनातील चालक जखमी झाले. कोळस्याचा ट्रक चौफुलीवर यूटर्न घेत असतानाच नागपूरला जाणारा तेलाचा भरधाव टँकर आला. थेट धडक होऊन नये म्हणून चालकांनी केलेल्या प्रयत्नात ट्रक व टँकर जागेवरच उलटले. त्यामुळे मार्गावर कोळसा आणि तेल पसरले. याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Maharashtra Breaking News Live : आदिवासी आरक्षणामधून धनगरांना आरक्षण ?
आदिवासी आरक्षणामधून धनगरांना आरक्षण देणे तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मेगाभरती प्रश्नाविरोधात राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह राज्यातील सर्व आदिवासी आमदार आजपासून मंत्रालयासमोरील गांधी पुतळा येथे धरणे आंदोलन करणार आहे. सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल. आंदोलनात राज्यातील विविध आदिवासी संघटना, प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.
Maharashtra Breaking News Live : निवडणुकीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य
शरद पवारांनी निवडणुकीसंदर्भात मोठं विधान केलंय. 8 ते 10 ऑक्टोबरदरम्यान तारखा जाहीर होतील आणि 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान मतदान होईल, असा अंदाज शरद पवारांनी व्यक्त केलाय.
Maharashtra Breaking News Live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. सकाळी साडे दहा वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडेल. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतलाय. त्या पार्श्वभूमीवरच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
Maharashtra Breaking News Live : आज अजित पवारांची जनसन्मान यात्रा उदगीरमध्ये
आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा उदगीरमध्ये दाखल होणार आहे. यावेळी उदगीरमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलंय. यात्रेदरम्यान महिलांसाठी विशेष मेळावाही होईल.