Maharashtra Breaking News LIVE: राहुल कर्डीले नाशिकचे नवे महानगरपालिका आयुक्त
Maharashtra Breaking News LIVE: राजकीय घडामोडींना वेग, राज्यातील ठळक घडामोडी जाणून घेऊयात.
Maharashtra Breaking News LIVE: हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले आहे. त्यानंतर राज्यात इतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील ठळक घडामोडी आणि अपडेट्स एका क्लिकवर
Latest Updates
राहुल कर्डीले नाशिकचे नवे महानगरपालिका आयुक्त
नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त अशोक करंजकर यांची बदली करण्यात आली आहे. राहुल कर्डीले आता नाशिकचे नवे महानगरपालिका पालिका आयुक्त असणार आहेत. याआधी राहुल कर्डीले यांच्याकडे वर्ध्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार होता. तर अशोक करंजकर नव्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.
महाराष्ट्र सायबर सेलची मोठी कारवाई
महाराष्ट्र सायबर सेलची मोठी कारवाई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बदनामीकारक व्हिडिओ शेअर करणं भोवलं. 12 समाजमाध्यमांवरील लोकांवर कारवाई. नागपूर काँग्रेस सेवादलाच्या अकाऊंटवर देखील कारवाई.
तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी देण्यात आलीये. अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आलीये. यामध्ये तुमचाही संतोष देशमुख केला जाणार असल्याची धमकी देण्यात आलीये. मात्र, या प्रकरणाकडे पोलीस गांभीर्यानं पाहत नसल्याचा आरोप तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी केलाय. त्यामुळे धाराशिव पोलिसांची गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी दिलीये. तर या घटनेच्या निषेधार्थ उद्या भूम बंदची हाक देण्यात आलीये.
नागपुरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाला तडे
नागपुरातील बुटीबोरी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाला तडे गेलेत. त्यामुळे दक्षता म्हणून उड्डाणपुलावरची वाहतूक बंद करण्यात आलीये. पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पुलाची पाहणी केलीय. काही वर्षापूर्वी एका खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून NHAIने पूल बांधल्याची माहिती आहे.
मुंबईतील जोगेश्वरी -विक्रोळी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर वाहतूक कोंडी. ट्रकचा टायर फुटल्याने ट्रॅफिक जाम. दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस रुळावरून घसरली
दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस रुळावरून घसरली. गुजरातमधील सुरत जवळ रुळावरून या एक्सप्रेसचा एक डबा घसरला. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी नाही.
मुख्यमंत्री परभणीला जायला घाबरतात : संजय राऊत
महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे, आणि बीड घटनेचे संशयित आरोपी मंत्रिमंडळात आहेत, असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय. परभणीची घटना राज्याला काळीमा फासणारी आहे. या घटनेमुळे राज्याच्या प्रतिष्ठेला कलंक लागलाय, असा आरोप राऊतांनी केलाय. गृहमंत्री म्हणून फडणवीस परभणीला जायला पाहिजे होते. मात्र ते परभणीला जायला घाबरतात. ते परभणीला गेले तर सोबत सैनिक घेऊन जातील, अशी टीका राऊतांनी केलीय.
लाडकी बहीण योजनेतील पैशांचं वितरण सुरू
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेतील पैशांचं वितरण सुरू झाले आहे. महिला सशक्तीकरणाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल. राज्यातील 67 लाखांहून जास्त महिलांना लाभ.
महाराष्ट्रात मतदार वाढ नाही, केंद्रीय निवडणूक आयोगाचं काँग्रेसला उत्तर
काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची वाढलेली टक्केवारी आणि वाढलेले मतदार यावर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावर आयोगाने काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती. कुठल्याही मतदारांची संख्या वाढलेली नाही असं म्हणत काँग्रेसच्या सगळ्या आरोपांना निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे.
बीडचे पालकमंत्रीपद फडणवीस किंवा अजित पवारांनी स्विकारावं : सुरेश धस
बीडचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्विकारावं. अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केलीय. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुरेश धस आक्रमक झालेत. त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय.
Maharashtra Breaking News LIVE: पुणे शहरात आढळल्या बनावट नोटा
पुणे शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या रस्ता पेठेत बनावट नोटा बाळगणाऱ्या आरोपीला समर्थ पोलिसांनी केली अटक. गौरव रामप्रताप सविता (वय २४, रा. जामनगर, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
Maharashtra Breaking News LIVE: भुजबळ हे राज्याचे मोठे नेतेः सुप्रिया सुळे
भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाही तर राज्याचे खुप मोठे नेते राहिले आहेत. शुन्यातून विश्व त्यांनी निर्माण केलेय.शरद पवारांच्या बाजूला त्यांची जागा असायची. आता जे होतयं ते त्यांच्या पक्षाचा युतीचा प्रश्न. एवढ्या मोठ्या नेत्याचा एक लढवय्या नेता म्हणून ओळख आहे.बेळगावच्या लढ्यासाठी ते ताकदीने उतरले होते त्यांना अटक ही झाली होती.भुजबळ यांच्या कुटुंबाने मोठा संघर्ष केला आहे.
एनडीएच्या प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक
एनडीएच्या प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीत दुपारी 4 वाजता भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी बैठक होणार आहे. या बैठकीत राजकीय सद्यस्थितीवर चर्चा होणार आहे.
बच्चू कडू नितीन गडकरी यांच्या भेटीला
प्रहार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये बच्चू कडू यांचा पराभव झाला होता. त्यानंतर बच्चू कडू यांच्या राजकारणाची पुढची दिशा काय असणार यासंदर्भात तर्कवितर्क लावले जात असताना आज बच्चू कडू हे नागपूरमधील नितीन गडकरी यांच्या घरी त्यांची भेटी घेण्यासाठी पोहोचले आहेत.
Maharashtra Breaking News LIVE: हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवून नियोजन करा, कृषी विभागाचे शेतकऱ्यांना अवाहन
कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी या पुढे कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
Maharashtra Breaking News LIVE: आमच्यात बंगल्यावरुन वाद होणार नाहीतः उदय सामंत
अमच्या अनेक मंत्र्यांना बंगले दिले आहेत आणि फ्लॅट सुद्धा दिले गेले आहेत. आमच्यामध्ये बंगल्यावरून वाद होणारं नाही हे नक्की, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Breaking News LIVE: चार दिवसाच्या खंडानंतर सोलापुरात कांदा लिलावास सुरुवात
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल चार दिवसानंतर कांदा लिलावास सुरुवात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या विरोधात माथाडी कामगारांचे आंदोलन अखेर मागे. सोमवारपासून कांदा लिलाव सुरळीत सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील समाधान
Maharashtra Breaking News LIVE: मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात कंटेनरला अपघात
अवजड मशीन्स घेऊन जाणारा कंटेनर भोस्ते घाटात कलंडला. 100 मीटर अंतरापर्यंत डिव्हायडरला आदळत कंटेनर झाला पलटी. मागे पुढे गाडी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी नाही
Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्राचा बिहार झालायः संजय राऊतांची सरकारवर टीका
महाराष्ट्राचा बिहार झाल आहे. ज्यांच्यावर आरोप आहेत बीडचे ते मंत्रिमंडळामध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून बीड परभणी मध्ये जायला पाहिजे होतं. ज्यांनी हत्या घडवल्या त्यांना पाठीशी घालत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मानवतेचा खून झाला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Breaking News LIVE: प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या आरीफचा ‘मातोश्री’वर सन्मान
नीलकमल बोट दुर्घटनेत स्वतःचा जीव धोक्यात घालून 35 प्रवाशांचे प्राण वाचवणारा 'देवदूत' आरीफ बामणे याचा आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आरीफने दाखवलेले प्रसंगावधान, धाडस आणि शौर्याचे कौतुक केले. यावेळी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार मनोज जामसुतकर उपस्थित होते.
Maharashtra Breaking News LIVE: 26 तारखेपासून ठाकरे गटाच्या मातोश्रीवर बैठकांचे सत्र
विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईत विधानसभा निहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती त्यांनी वार्डनिहाय शाखाप्रमुख ते विभागप्रमुखांशी बातचीत केली होती. 26 डिसेंबर, 27,28 आणि 29 डिसेंबर पर्यत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक
Maharashtra Breaking News LIVE: ईडीची कारवाई; इकबाल कासकरचा जप्त केलेला फ्लॅट ताब्यात घेतला
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा फ्लॅट जप्त केला होता. हा फ्लॅट आधीच ईडीने जप्त केला होता आता ताब्यात घेतला आहे.
Maharashtra Breaking News LIVE: पुणे महापालिका करणार ओढे-नाले, कालव्यावरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट
शहराच्या विविध भागातील ओढे-नाले, कालव्यांवर पुल आहेत, मात्र संबंधित पुलांची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी, त्यामध्ये काय सुधारणा कराव्या लागतील यासाठी हे ऑडीट केले जाणार. नदी, नाल्यावर बांधलेले संबंधित पुलाची पाहणी महापालिकेकडुन केली जाणार
Maharashtra Breaking News LIVE: मनोज जरांगे यांचा उद्यापासून गाठी-भेटी दौरा
कसा असणार मनोज जरांगे यांचा दौरा
२४ डिसेंबर
संभाजी नगर, जालना, मंठा, परतूर, पाथरी, पुर्णा, दामपुरी मुक्काम२५ डिसेंबर
आलेगाव, परभणी, साळेगाव, मस्साजोग, नागझरी, अंतरवालीMaharashtra Breaking News LIVE: काँग्रेसने इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याचा विचार सोडावा - मणिशंकर अय्यर
काँग्रेसने इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याचा विचार सोडावा, असं वक्तव्य मणिशंकर अय्यर यांनी केलं आहे. एका इंग्रजी वर्तमान पत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे मत मांडलं आहे.
Maharashtra Breaking News LIVE: नाताळ सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी
नाताळ सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत भाविकांनी अलोट गर्दी केल्याचं चित्र आहे.. साई दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी दिसत असून पुढील आठ ते दहा दिवस शिर्डीत भाविकांचा ओघ असाच सुरू राहणार आहे
Maharashtra Breaking News LIVE: उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना
उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील शासकीय प्रसूतीगृह ते व्हीनस चौक रस्त्यावर पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. भरधाव वेगातील एक स्विफ्ट डिझायर कारने दोन दुचाकी आणि एका रिक्षेला धडक दिली. यात कारमधील प्रवासी सुद्धा जखमी झाले. या सर्वांवर उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालय आणि क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत
Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरुच
पुणे पुण्यातील लोहगाव येथील साठे वस्ती परिसरात कोयता आणि दगडाने अनेक वाहनांची तोडफोड करत दहशत करण्यात आलीय. दोन तरुणांनी या परिसरातील गाडी दुकाने आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कोयत्याने तोडफोड केली आहे
Maharashtra Breaking News LIVE: लोकप्रिय गायक शान याच्या इमारतीला आग
वांद्रे पश्चिम येथील फॉर्च्यून एन्क्लेव्ह या निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग लागली होती. दरम्यान, याच इमारतीच्या अकराव्या मजल्यावर बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक शानचे निवासस्थान आहे. ही आग लागली तेव्हा शान घरात होता की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आतापर्यंत समोर आलेली नाही.
Maharashtra Breaking News LIVE: सामाजिक न्याय भवन न्यायाच्या प्रतीक्षेत, 8 वर्षात इमारत ठरली धोकादायक
रायगडच्या सामाजिक न्याय भवनची अलिबाग येथील इमारत अवघ्या आठ वर्षात धोकादायक झाली. त्यामुळे या इमारती मधील सर्व कार्यालये गेली 2 वर्ष भाड्याच्या जागेत आहेत. त्यासाठी सरकारला दरवर्षी लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत.