Maharashtra Breaking News LIVE Update : सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांसमोर अश्रू अनावर
Maharashtra Breaking News LIVE Update : राज्याच्या राजकारणात नेमकं घडतंय तरी काय? जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर.
Maharashtra Breaking News LIVE Update : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. विधानसभा लढतीचं चित्र आज स्पष्ट होणार. महायुती आणि मविआतील बंडखोर अर्ज मागे घेणार का, याकडे लक्ष. जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर.
Latest Updates
सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांसमोर अश्रू अनावर
सतेज पाटील यांना कार्यकर्त्यांसमोर अश्रू अनावर झाले. कोल्हापूर उत्तर मधून काँग्रेस उमेदवाराने अचानक उमेदवारी मागे घेतल्याने सतेज पाटील यांची नामुष्की झाली. मधुरिमा राजे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयावर कार्यकर्त्यांचा गराडा पाहायला मिळाला.
राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 20 नोव्हेंबर रोजी होतेय.नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. अंतिमतः राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या एकूण 7 हजार 78 उमेदवारांपैकी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 2 हजार 938 उमेदवारांनी माघार घेतली आहे.
उद्धव ठाकरेंच्या प्रचार सभांना उद्यापासून सुरुवात
कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे प्रचार सभांना सुरुवात करणार आहेत.दुपारी 12 वाजता कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी अंबाबाई देवीचा दर्शन घेतील. दुपारी साडे बारा वाजता दर्शन झाल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता राधानगरी विधानसभा आदमापुर येथे सभा होईल, कोल्हापूर नंतर रत्नागिरीकडे सभेसाठी जाणार आहेत. ५ वाजता रत्नागिरी शहरात पोहोचतील.6 वाजता साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाच्या मैदानावर उद्धव ठाकरे रत्नागिरीमध्ये सभा घेणार आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे करण्याचे बाळ माने राजापूर विधानसभा मतदारसंघातून राजन साळवी हे निवडणूक लढवत आहेत.
पेण आणि पनवेलमधून ठाकरेंच्या उमेदवाराची माघार नाहीच
उद्धव ठाकरे यांच्या आदेश देऊनदेखील पेण आणि पनवेल विधानसभेतून ठाकरेंच्या उमेदवारांनी माघार घेतली नाही.मात्र अलिबाग विधानसभेतून ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांनी माघार घेतली.उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून सुरेंद्र म्हात्रे यांना माघार घेण्याच्या आदेश दिले होते.पेण आणि पनवेल विधानसभेतील उमेदवारांना देखील आदेश दिले असताना त्यांनी माघार घेतली नाही.
विक्रमगड विधानसभेत महायुतीत बंडखोरी
विक्रमगड विधानसभेत महायुतीत बंडखोरी झाली आहे. पालघर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश निकम यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
त्यांनी शिवसेनेतून जिजाऊ संघटनेमध्ये प्रवेश केला.प्रकाश निकम यांनी जिजाऊ संघटने मधून उमेदवारी अर्ज भरला. महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्याने प्रकाश निकम नॉट रिचेबल होते. विक्रमगड विधानसभेत महायुती महाविकास आघाडी आणि जिजाऊ संघटना असा सामना रंगणार आहे.कल्याण पूर्वेत शिवसेने शिंदे गटाकडून बंडखोरी कायम
कल्याण पूर्वेत शिवसेने शिंदे गटाकडून बंडखोरी कायम आहे. शिंदे गटाचे बंडखोर कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्याकडून बंडखोरी करण्यात आली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यान महेश गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने कल्याण पूर्व विधानसभेत तिरंगी लढत होणार आहे. महायुतीकडून भाजप उमेदवार सुलभा गायकवाड ठाकरे गटाकडून धनंजय बोराडे आणि शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांच्यात लढत होणार आहे.
बहुजन विकास आघाडीला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
बहुजन विकास आघाडी ला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा.बहुजन विकास आघाडीला शिट्टी हे पक्ष चिन्ह देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि सोम सुंदर यांच्या खंडपीठाचे निवडणूक आयोगाला हे आदेश दिले. शिट्टी हे पक्षचिन्ह गोठवल्यामुळे बहुजन विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावरुन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य केले होते. दरम्यान चिन्ह पुन्हा मिळाल्यामुळे बहुजन विकास आघाडीत आनंदाचे वातावरण आहे.
जे ऐकणार नाही त्यांच्यावर कारवाई, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना इशारा
काहीजणांनी वैयक्तिक उमेदवारी अर्ज भरले आहेत. यानंतर आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. आज 3 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल. कोणीही एकमेकांच्या विरोधात न लढता एकत्र काम करावे, अशी आमची भूमिका आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढू, जे ऐकणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करु, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकरी कामगार पक्षासोबत चर्चा झाली. अलिबाग, पेण आणि पनवेल येथे शेकाप जागा लढवले. उरणला शेकाप अर्ज मागे घेईल. आणखी काही ठिकाणी आम्हाला सूचना द्यायच्या आहेत, असे ठाकरे यावेळी म्हणाले.
मावळ पॅटर्नला राज ठाकरेंचा पाठिंबा
मावळ पॅटर्नला राज ठाकरेंनी ही पाठिंबा दर्शवलाय. हा पॅटर्न सत्यात उतरवण्यासाठी भाजपाचे नेते बाळा भेगडेंनी स्वतः ठाकरेंची भेट घेतली. अजित पवारांचे शिलेदार सुनील शेळकेंच्या पराभवासाठी बाळा भेगडे मैदानात उतरलेत. बंडखोर बापू भेगडेंसाठी बापू भेगडे जंग जंग पछाडत आहेत. शरद पवार गटासह सर्व पक्षीयांनी बापू भेगडेंना पाठिंबा दर्शवला आहे. अशातच बाळा भेगडेंनी राज ठाकरेंची भेट घेत, मनसेच्या पाठिंब्यावर शिक्कामोर्तब केल्याचा दावा केला जातोय. त्यामुळं शेळकेंच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चाललीये.
जरांगेंच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात सुरुवात झाली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघातून करण गायकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार अपक्ष उमेदवारी करण्यासाठी करण गायकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. जरांगे पाटील यांनी निवडणूक लढणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर करण गायकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघातून माघार घेतली असली तरी नाशिक-पूर्व मतदारसंघातून मात्र करण गायकर स्वराज्य पक्षाकडूनकडून उमेदवार म्हणून कायम राहणार आहेत.
सदा सरवणकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल
रायगड - अलिबाग मधून काँग्रेस बंडखोर राजेंद्र ठाकूर यांची माघार
अलिबाग मधून काँग्रेस बंडखोर राजेंद्र ठाकूर यांनी माघार घेत उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. ठाकूर यांनी शेकापच्या चित्रलेखा पाटील यांना पाठिंबा दिल्यामुळं आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र श्रीवर्धन मधून राजेंद्र ठाकूर यांची बंडखोरी अद्याप कायम. परिणामी
श्रीवर्धनच्या जागेबाबत तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार.पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली
आताच्या क्षणाची मोठी बातमी, उपलब्ध माहितीनुसार राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली. मविआच्या मागणीला यश. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर रश्मी शुक्ला यांची बदली. पोलीस महासंचालकपदी नवी नियुक्ती केली जाणार.
सदा सरवणकरांकडून त्यागाची भाषा, पाहा नेमकं काय म्हणाले...
'बाळासाहेबांचे विचार विधानसभेत जाणं गरजेचं. मी निवडणूक लढवलतोय ती माझ्यासाठी वैयक्तिक नाही. मी टाकलेली अट जर मान्य होत असेल, तर कार्यकर्त्यांशी तुम्ही बोला आणि अंतिम निर्णय कळवा असं सदा सरवणकर सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना बोलले. आम्ही आता चर्चा करू आणि त्यानुसार निर्णय घेऊ. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीबाबत संभ्रमाची स्थिती कायम. राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे व्हावेत हाच आमचा हेतू. जास्तीत जास्त महायुतीचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी आवश्यक भूमिका आम्हाला घ्यावी लागेल. हा त्याग शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी किती फायद्याचा ठरेल हे पाहणं गरजेचं. मी अर्ज मागे घेणार नाही, पण कार्यकर्त्यांचा विचारही मला करावा लागेल. मी मुख्यमंत्र्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या असून, त्याला अपेक्षित उत्तर कार्यकर्त्यांशी संवाद साधूनच मिळेल.'
मुंबईतील बंडखोरी रोखण्यात भाजप यशस्वी
मुंबईतील बंडखोरी रोखण्यात भाजप यशस्वी. भाजपचे बंडखोर नेते गोपाळ शेट्टी यांची समजूत काढण्यात भाजपाला यश. गोपाळ शेट्टी यांची निवडणुकीतून माघार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईला यश. आपला मुद्दा पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे असं म्हणत गोपाळ शेट्टी यांनी आपण माघार घेत असल्याचं जाहीर केलं.
अलिबाग, पेण, पनवेल शेकापसाठी सोडणार - संजय राऊत
दुपारपर्यंत उमेदवारांचं चित्र स्पष्ट होईल, शेकाप नेत्यांशी चर्चा झाली असून, यानंतर आता पुढची वाटचाल असेल असं म्हणत मविआतील तिन्ही पक्ष आघाडी धर्म पाळणार असं संजय राऊत म्हणाले. यावेळी अलिबाग, पेण, पनवेल शेकापसाठी सोडणार असल्याचं मोठं वक्तव्यही त्यांनी केलं.
कोल्हापूर मध्ये काँग्रेसच टेन्शन वाढलं
कोल्हापुरातील बंडोखोर उमेदवार राजेश लाटकर नॉट रिचेबल. राजेश लाटकर यांच्याकडून कोल्हापूर उत्तर मधून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे संकेत. राजेश लाटकर सकाळपासून अज्ञातस्थळी. काँग्रेस कडून अधिकृतरित्या दिलेली उमेदवारी काही तासात नाकारल्यानंतर राजेश लाटकर आहेत नाराज. नाराजी दूर करण्यासाठी खासदार शाहू छत्रपती यांच्यासह मधुरिमा राजे छत्रपती यांनी घेतली होती लाटकर यांची भेट. बंडखोरी रोखण्यात काँग्रेस नेते सतेज पाटील यशस्वी होतात का? याकडे लक्ष.
विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे यांची माघार
मराठा आरक्षणाची मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. रविवारी जरांगेंनी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर ते आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी या निवडणुकीमधून माघार घेण्याची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला आहे.
लांजा मतदारसंघात दोन विरोधक एकाच मंचावर
रत्नागिरीतील लांजा मतदारसंघात दोन विरोधक एकाच मंचावर पाहायला मिळाले. दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राजन साळवी आणि किरण सामंत यांनी हजेरी लावलीय. दोघेही एकाच मंचावर उपस्थित होते. साळवी आणि सामंत यांच्यात राजापूर मतदारसंघात लढात पाहायला मिळणार आहे.
उद्धव ठाकरेंनी विधानसभेसाठी कोकणावर विशेष लक्ष
उद्धव ठाकरेंनी विधानसभेसाठी कोकणावर विशेष लक्ष दिलं आहे. विधानसभेच्या प्रचाराची सुरूवात कोकणातून केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे रत्नागिरीमध्ये जाहीर सभा घेणार असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 6 मतदारसंघात शिवसेने विरूद्ध शिवसेना अशी लढाई होणार आहे.
सांगलीतील तासगावमध्ये पैसे वाटण्याचा प्रकार समोर
सांगलीतील तासगावमध्ये पैसे वाटण्याचा प्रकार समोर आलाय. दिवाळी निमित्त घराघरांत मिठाई आणि तीन हजार रुपयांचं वाटप करण्यात आल्याचा आरोप होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजयकाका पाटील समर्थकांनी पैसे वाटणा-या व्यक्तिला पोलिसांच्या ताब्यात दिलंय़. तर आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी हा बनाव रचण्यात आल्याचं रोहित पाटलांनी म्हटलंय.
अमित ठाकरे उद्या पासून प्रचाराला सुरवात करणार
मुंबईतील माहिम विधानसभेचे मनसेचे उमेदवार अमित ठाकरे उद्या पासून प्रचाराला सुरवात करणार आहेत. संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत एकनाथबुवा हातिसकर मार्गावरून प्रचाराची सुरुवात होणार आहे.
भंडारा जिल्ह्यातील बंडखोरीमुळे अधिकृत उमेदवारांची धाकधुक वाढली
भंडारा जिल्ह्यातील बंडखोरीमुळे अधिकृत उमेदवारांची धाकधुक वाढलीय. भंडा-यातून काँग्रेस नेत्या पूजा ठवकर यांनी अर्ज दाखल केलाय. तर त्यांच्याविरोधत शिवसेना बाळासाहेब ठाकेर पक्षाचे नेते नरेंद्र पहाडे यांनीही अर्ज दाखल केलाय. साकोलीतून भाजपने अविनाश ब्राह्मणकर यांना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश देत उमेदवारी दिली. मात्र त्यांच्याविरोधात सिमदत्त करंजेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तुमसरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून माजी आमदार चरण वाघमारेंना पक्षप्रवेश देत उमेदवारी दिली. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झालेत. कार्यकर्त्यांनी तिसरी आघाडी करत मधुकर कुकडे यांना मैदानात उतरवले आहे.
मनोज जरांगे आज उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार
मनोज जरांगे थोड्याच वेळात उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार आहे. राज्यात 15 ते 20 ठिकाणी जरांगे उमेदवार घोषित करणार आहे. ज्या ठिकाणी उमेदवार घोषित केले जाणार त्यांनाच पाठिंबा मिळणार असल्याचं त्यांनी कालच जाहीर केलंय. त्यामुळे इतर उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत असं आवाहन त्यांनी केलंय. त्यामुळे कोणत्या 15 ते 20 जागा जरागें लढणार हे थोड्या वेळात स्पष्ट होईल. ज्या ठिकाणी जरांगे उमेदवार उभे करणार नाही त्या ठिकाणावरील उमेदवार पाडायचे असल्याचं जरांगे म्हणालेत.
Pune News : काँग्रेसच्या बंडखोर नेत्या कमल व्यवहारे नॉट रिचेबल
काँग्रेसच्या बंडखोर नेत्या कमल व्यवहारे कालपासून नॉट रिचेबल आहेत. कमल व्यवहारे कसबा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार आहेत. मात्र, कालपासून ते कुणाच्याही संपर्कात नाहीत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अंकुश काकडे यांनी दोन दिवसांपूर्वी बंडखोरांच्या घरी जाऊन बैठका घेत आहेत. मात्र, कमल व्यवहारे नॉट रिचेबल आहेत. यामुळे काँग्रेसचं टेन्शन वाढलंय.
Maharashtra Breaking News LIVE Update : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. महायुती, मविआमधील अनेक बंडखोरांकडून उमेदवार अर्ज दाखल. महायुती, मविआतील बंडखोरांच्या भूमिकेकडे लक्ष. बंडखोर अर्ज मागे घेणार की लढणार? याकडे लक्ष. विधानसभा लढतीचं चित्र आज स्पष्ट होणार. 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.