Maharashtra Breaking News LIVE Updates: राज ठाकरेंनी बोलावली मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक

तेजश्री गायकवाड Sat, 04 Jan 2025-9:26 pm,

aharashtra Breaking News Live Updates : दिवसभरातील प्रत्येक लक्षवेधी घटनांचे अपडेट्स पाहा एका क्लिकवर.

Maharashtra Breaking News Live Updates : राज्याच्या राजकारणापासून ते प्रत्येक शहरातील अपडेट्सचे सविस्तर वृत्त जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


 

Latest Updates

  • राज ठाकरेंनी मंगळवारी बोलावली मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक 

    राज ठाकरे यांनी मुंबईतील विभाग अध्यक्षांची मंगळवारी बैठक बोलावली आहे. यामध्ये मुंबईतील 36 विधानसभा मनसे अध्यक्ष बैठकीला उपस्थित असणार आहेत.  आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने बैठकीला महत्त्व. 

  • कोकणातील निकालावरून मातोश्रीवर खडाजंगी? 
     
    राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. 
    यावेळी राजन साळवींनी विनायक राऊत यांच्यावर पराभवाचं खापर फोडलं. तसंच उद्धव ठाकरेंकडे तक्रारींचा पाढा वाचल्याची सुत्रांची माहिती आहे. यावर उद्धव ठाकरेंनी राजन साळवींनाच खडे बोल सुनावले आणि विनायक राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबादार नाही का असा उलट प्रश्नही विचारला. त्यावर विनायक राऊतांना 21 हजाराचा लीड दिल्याचं राजन साळवींनी स्पष्ट केलं, त्यामुळे मी जबाबदार कसा ? असा उलट प्रश्न साळवींनी केला. 

  • समुद्रातील अनधिकृत बोटींवर कारवाईसाठी सरकार घेणार ड्रोनची मदत

    समुद्रातील अनधिकृत बोटींवर कारवाईसाठी सरकार घेणार ड्रोनची मदत. खोल समुद्रातील मासेमारीवर राहणार सरकारचे लक्ष. मत्स्य विकास व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा महत्त्वाचा निर्णय. अनधिकृत मासेमारी व बोटींवर पुढील आठवड्यापासून सुरु होणार कारवाई.

  • धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती

    धीरेंद्र शास्त्री यांच्या भिवंडीच्या माणकोली नाक्याजवळील कार्यक्रमात गोंधळ उडालाय. भाविकांची गर्दी वाढल्यानं कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. गोंधळ झाल्यानं धीरेंद्र शास्त्री यांनी स्टेजवरून निघून गेल्याचं दिसून येतंय. अनेक महिलांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचंही पाहायला मिळालंय. गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानं पोलिसांनी हलक्या बळाचा वापर करुन जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केलाय.

     

  • महाराष्ट्रतील शेतक-यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याची बातमी

    येत्या चार ते सहा महिन्यांत शेतक-यांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. पुण्यामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य सरकारची आर्थिक स्थिती बरी झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे सत्तेत आल्यानंतर लगेचच शेतक-यांना कर्जमाफी दिली जाईल, असं महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी सांगितलं होतं. मात्र आता सत्तेत आल्यानंतर शेतकरी कर्जमाफीसाठी आणखी 4 ते 6 महिने थांबावं लागणार असल्याचं कृषिमंत्र्यांनी सांगितलंय. त्यामुळे यातून राजकारण रंगण्याची शक्यता आहे. 

     

  • जालन्यात राजकीय भूकंप येण्याचे संकेत

    जालन्यात एक एक राजकीय भूकंप कसा होईल, हे सर्वांना दिसणार असल्याचं विधान काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलंय. आपलं वस्त्रहरण झालं, आता चेकमेट करणारच.. अशा इशाराही माजी आमदार गोरंट्याल यांनी दिलाय.. मात्र, त्याआधी काँग्रेसमधील अनेक गद्दारांना बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

     

  • बीड प्रकरणी सर्व पक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार 

    बीड प्रकरणी 6 जानेवारीला सर्व पक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी शिष्टमंडळ राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांची भेट घेणार आहे. बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्था प्रकरणी राज्यपालांना पत्र देणार आहेत. 

     

  • नाशिक जिल्हा रुग्णालयातून बाळाला पळवलं

    नाशिक जिल्हा रुग्णालयातून बाळाला पळवल्याची घटना समोर आलीय. सरकार वाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.  चोरी करणाऱ्या महिलेचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला आहे. नाशिकचा जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अवघ्या पाच दिवसाचं बाळ अज्ञात महिलेने चोरून नेल्याने जिल्हा रुग्णालयात खळबळ माजलीय. वरिष्ठ पोलीस अधिकारी जिल्हा रुग्णालयात तपासणी केलीय. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. मूळचे उत्तर प्रदेशमधील आणि सध्या सटाणा राहत असणाऱ्या सुमन अब्दुल खान या महिलेच बाळ चोरीला गेलय. 

     

  • खोल समुद्रातील मासेमारीवर राहणार सरकारचं लक्ष

    समुद्रातील अनधिकृत बोटींवर कारवाई होणार, असा निर्णय मत्स्य विकास व बंदरे मंत्री नितेश राणेंनी घेतला आहे. कारवाईसाठी सरकार ड्रोनची मदत घेणार आहे. खोल समुद्रातील मासेमारीवर सरकारचं लक्ष राहणार आहे. पुढील आठवड्यापासून ड्रोनचा प्रत्यक्ष वापर सुरु होणार आहे. अनधिकृत मासेमारी आणि बोटींवर कारवाई करण्यात येणार आहे. 

     

  • ठाण्यानंतर पुण्यातूनही परप्रांतीयाचा मराठी द्वेषाची आणखी एक घटना

    ठाण्यानंतर पुण्यातूनही परप्रांतीयाचा मराठी द्वेषाची आणखी एक घटना समोर आली आहे. पुण्यात मोबाईल नेटवर्क कंपनीतल्या टीम लीडरला मनसेच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिलाय. टीम लीडर शाहबाज अहमदनं कंपनीच्या कर्मचा-यांना कार्यालयात हिंदीच बोलायचं, मराठी बोलाल तर कामावरून काढून टाकेन, अशी धमकी दिली होती. इतकंच नाही तर कुठल्याही सेनेला आणा, मराठी बोलणार नाही, असंही टीम लीडर उद्दामपणे म्हणाला होता. तसंच मराठी कर्मचा-यांवर तो अन्याय करत होता, तीन महिन्यांचा पगारही दिला नाही. ही तक्रारी घेऊन कर्मचारी मनसेकडे गेले. तेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला प्रसाद दिला..

  • संतोष देशमुख हत्या प्रकरणी तिन्ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी

    बीड देशमुख हत्याकांड प्रकरणातील दोन्ही पक्षांचे युक्तिवाद संपला असून, केज न्यायालयाकडून तिन्ही आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेची पोलीस कोठडीत रवानगी झालीय. कंपनीत जाऊन दमदाटी केली जाते, तसंच धमकावलं जातं. यामुळे बीड जिल्ह्यात उद्योग येणं कठीण झाल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असून, सर्व आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करायची असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. 

  • मुंबईतील वांद्रे परिसरातील 10 ते 15 झोपट्यांना भीषण आग

    मुंबईतील वांद्रे परिसरातील ज्ञानेश्वरनगरमध्ये झोपडपट्टीत भीषण आग लागलीय. 10 ते 15 झोपट्यांना भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

     

  • 'संतोष देशमुख हत्येचा खरा सूत्रधार धनंजय मुंडे'

    परभणीत संतोष देशमुख हत्याप्रकरणात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी नरेंद्र पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, अगोदर आकाला उचला आणि संतोष देशमुख हत्येचा खरा सूत्रधार धनंजय मुंडे आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली. शिवाय धनंजय मुंडे राजीनामा देत नाही तोपर्यंत थांबू नका, असं ते म्हणाले. 

  • आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणी

    बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाती आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागण्यासाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलीय. तर ज्योती मेटे यांनी पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्यसरकारला सवाल उपस्थित केलेत..

  • संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीत मूकमोर्चा 

    संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीत मूकमोर्चा काढण्यात आलाय.. या मूकमोर्चात जरांगे पाटील सहभागी झालेत. तसेच संतोष देशमुख यांचं कुटुंबीयही मोर्चात सहभागी झालेत. तसेच सर्वपक्षीय नेतेही मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालंय.. मोर्चात मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झालेत.. आरोपींना फाशी देण्याची एकमुखी मागणी मोर्चातून करण्यात आली..

  • सर्व मेट्रोंचे कामं पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा - मुख्यमंत्री

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक सह्याद्री अतिथी गृहावर पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्वाचे निर्णय घेतले. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक मेट्रो मार्गाचा आढावा घेतला

    - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री माधुरी मिसाळ उपस्थित

    - सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा; विलंब चालणार नाही

    - अनेक ठिकाणी कारशेड शिवाय मेट्रो सुरू होत आहेत, त्यामुळे मेट्रो सुरू करण्यासाठी त्यासाठी थांबू नका. जगात असे प्रयोग होत आहेत, त्याचा अभ्यास करा.

    - भविष्यातील सर्व संभाव्य मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेत, त्यासाठी कारशेडसाठी जागा आतापासूनच आरक्षित करा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश 

    - 22 किमी मेट्रो यावर्षी सुरू करा 

    - मेट्रो-3 मुळे 20-25 किमीची त्यात आणखी भर पडेल. 

    - पण पुढच्या वर्षीपासून 50 किमी मेट्रो दरवर्षी सुरू होईल, हे सुनिश्चित करा; फडणवीसांनी दिले टार्गेट 

    - इंदू मिल स्मारक डिसेंबर 2025 अखेरीस पूर्ण करा - 

    - हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण. 

    - या दोन्ही प्रकल्पांच्या वार्षिक देखभालीसाठी आराखडा आताच तयार करा

  • संतोष देशमुख हत्याप्रकरणी सिद्धार्थ सोनवणेला अटक 

    संतोष देशमुख हत्याप्रकरणी तिसरा आरोपी गजाआड झालाय. सिद्धार्थ सोनवणे हा तिसरा आरोपी असल्याची पोलिसांनी माहिती दिलीय. सिद्धार्थ सोनवणे याला संतोष देशमुख यांचा अपहरण करण्यात आलं त्या दिवशी लोकेशन देत असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवलाय. 

  • परभणी मूक मोर्चाला विद्यालयाच्या मैदानावरून सुरुवात

    परभणी मूक मोर्चात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे मुलगी वैभवी देशमुख बहीण या मोर्चामध्ये सहभागी झाली असून आमदार सुरेश धस,आमदार राजेश विटेकर,आमदार राहुल पाटील, ज्योती विनायक मेटे, मोर्चात सहभागी झाले आहेत. 

  • ठाण्यानंतर पुण्यात हिंदी-मराठी वाद पेटला, मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला बेदम चोप

     

    मोबाईल नेटवर्क कंपनीच्या कर्मचारी वर्गाला फ्लोअर वर हिंदीच बोलायचं,मराठी बोलले तर कामावरून काढून टाकेल अशी धमकी मिळाली. या शिवाय ३ महिने कर्मचाऱ्यांचा पगार केला नाही.  त्यावर येथील कामगारांनी मनसे कडे तक्रार केली की आमचा पगार थांबवला आहे म्हणून त्या टिम लीडर ने आपल्या कर्मचाऱ्यांना धमकी दिली की "कोनसी भी सेना लेके आओ नही बोलता मराठी"आणि कामावरून काढून टाकतो बघू कोण येतंय.  कर्मचाऱ्यांच्या अन्यायाला आज मनसे स्टाईल वाचा फोडली आणि येत्या सोमवारी पोरांचे पगार करायला लावले आहेत अन्यथा एकाच वेळी एकाच दिवशी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील मोबाईल नेटवर्क ऑफिस फोडून टाकणार असा अंतिम इशारा मनसे कडून राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी दिला आहे

  • ग्रामीण भारत महोत्सवाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

    4 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता  पंतप्रधान  नरेंद्र मोदी ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.  
    ग्रामीण भारताची उद्योजकता आणि सांस्कृतिक वारसा साजरा करणारा, हा महोत्सव 4 ते 9 जानेवारी या कालावधीत होणार आहे. विकसित भारत 2047 साठी एक लवचिक ग्रामीण भारत निर्माण करणे  आणि “गाव बढे, तो देश बढे” या संकल्पनेवर या महोत्‍सवाचे  आयोजन करण्‍यात आले आहे.

  • महाकुंभमेळ्यानिमित्त डोम सिटीची उभारणी, भाविकांना अत्याधुनिक सुविधा मिळणार

    उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मधल्या महाकुंभमेळ्यानिमित्त डोम सिटीची उभारणी करण्यात आली आहे. भाविकांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहे.13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मधल्या महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नजीकच्या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिमेवरच्या सर्व रस्त्यांवर पोलिसांची गस्त वाढवली आहे.  दहशतवादी हल्ल्याच्यादृष्टीनं यूपी पोलिस सतर्क आहेत. 

  • बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी अपडेट्स

    फरार तीन आरोपीं पैकी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती बीड पोलिसांनी दिली आहे. हत्येप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर सरपंच संतोष देशमुख यांचे लोकेशन देणारा आणखी एका संशयीताला ताब्यात घेतल आहे.  एकूण तीन जण फरार होते त्यापैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.  हत्येच्या 25 दिवसानंतर दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. अद्याप फरार आरोपीला शोधण्याचं काम सुरू आहे. 

  • उल्हासनगरच्या आशेळे गावातून बांग्लादेशी दाम्पत्याला अटक

    उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे यांना गुप्त बातमीदारामार्फत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशेळे गाव मधील न्यू साईबाबा कॉलनी येथे बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीनुसार पोलीस पथकाने सापळा रचून मीना मुजिद खान आणि तिचा पती इमोन उर्फ मेहमूद खान असद खान या दोघांना ताब्यात घेतले.

  • मनोज जरांगे परभणीतील मोर्चात सहभागी होण्यासाठी रवाना

    मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीहुन परभणीकडे रवाना झाले आहेत.  संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज परभणीत निषेध मोर्चा काढला जाणार आहे.  

  • महापालिकेत आज पुण्यातील मंत्री आणि आमदार घेणार महापालिकेत बैठक 

    भाजपने आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महापालिकेत आज पुण्यातील मंत्री आणि आमदार घेणार महापालिकेत बैठक घेणार आहेत. पुण्यातील प्रकल्पांची स्थिती आणि समस्या याचा आढावा घेणार आहेत. केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ , मंत्री चंद्रकांत पाटील , माधुरी मिसाळ आणि भाजपचे सगळे आमदार उपस्थित राहणार आहेत. ११.२० वाजता बैठकीच आयोजन करण्यात आलं आहे. 

  • निफाड तालुक्यात आज कडाक्याची थंडी, पारा 7.3 अंश सेल्सिअस वर 

    निफाड येथील कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात 7.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या थंडीपासून उब मिळवण्यासाठी पुन्हा शेकोट्या पेटल्या आहेत. 

  • विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला आज कोर्टात हजर करणार

    कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर  लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी व त्यांची पत्नी साक्षी गवळी यांना कल्याण कोर्टात हजर करणार

  •  वन विभागाने लावलेल्या पिंजय्रात ओतूर येथे बिबट्या जेरबंद

    जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात मनुष्यासह पाळीव प्राण्यांवरती हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभाला यश आलं असून वनविभागाने लावलेल्या पिंजय्रात हा बिबट जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला असा तरी अद्यापही या परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणीत असल्याने या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची हि मागणी नागरिकांकडून केली जातेय

  • दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा बच्चू कडूंचा तडकाफडकी राजीनामा

    दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा बच्चू कडू यांच्याकडून तडकाफडकी राजीनामा देण्यात आला आहे. निधीबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

  • केंद्रीय मंत्री शिवराज सिंग थेट द्राक्ष उत्पादकाच्या घरी

    केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांचं शेतकऱ्यांशी असलेलं प्रेम नाशिक दौऱ्यावेळी पाहायला मिळालं. आपल्या नियोजित दौऱ्यात कुठलाही कार्यक्रम नसताना त्यांनी थेट द्राक्ष उत्पादक शेतकरी हर्षल काटे यांच्या घरी भेट दिली. विविध कार्यक्रमांमुळे आधीच उशीर झालेला असतानाही विमानतळा जवळ असलेल्या जानोरी गावातील थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन द्राक्ष बागांची पाहणी केली. 

  • राज्यात तालुका तिथे कृषी उत्पन्न बाजार समिती

    राज्यात तालुका तिथे कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करणारा असून वर्षभरात राज्यातील 50 तालुक्यांमध्ये नव्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती करणार असल्याची घोषणा राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून जगातली सर्वात मोठी कृषी बाजारपेठ मुंबईत स्थापन करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

  • रावल यांचे मतदारसंघात करण्यात आले जंगी स्वागत

    राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचे मतदारसंघात जंगी स्वागत करण्यात आले. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे धुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच आगमन झाले, यावेळी शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे मंत्री जयकुमार रावल यांचे आगमन होताच दोंडाईचाकरांतर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे, यावेळी मंत्री जयकुमार रावल यांच्या स्वागतासाठी जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली आहे, त्याचबरोबर क्रेनच्या सहाय्याने भव्य हार घालून मंत्री जयकुमार रावल यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण दोंडाईचा शहरात जंगी मिरवणूक देखील मंत्री जयकुमार रावल यांची काढण्यात आली. 

  • सात वर्षांनी शुक्रवार ठरला जानेवारीमधील सर्वाधिक उष्ण दिवस

    सात वर्षांनी शुक्रवार ठरला जानेवारीमधील सर्वाधिक उष्ण दिवस, सांताक्रूझ येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून वाढ झालेल्या मुंबईतील किमान तापमानाच्या पाऱ्यात शुक्रवारी घट जरी झाली असली तरी कमाल तापमानाचा पारा मात्र चढाच होता.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link