Maharashtra Breaking News LIVE Updates : ठाकरे गटाच्या स्थगित झालेल्या 7 जानेवारीपासून सुरू होणार
Maharashtra Breaking News LIVE Updates : आज दिवसभरात कोणत्या घडामोडी लक्ष वेधणार? राज्यात बीड प्रकरणासमवेत आणखी कोणत्या बातम्यांवनजर असणार? पाहा...
Maharashtra Breaking News LIVE Updates : राज्यभरातील शिवसेना UBTच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पालघर, मुरबाड, नवी मुंबई, धुळे, बीड, परभणी जिल्ह्यतल्या शिवसेना UBTच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला.
महाराष्ट्रात या सर्व घडामोडी घडत असतानाच आठवड्याच्या सुरुवातीला आता बीड सरपंच हत्या प्रकरणात आणखी कोणत्या घटना लक्ष वेधणार, या संदर्भातील सर्व अपडेट एका क्लिकवर...
Latest Updates
ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्थगित झालेल्या 7 जानेवारीपासून सुरू होणार
ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्थगित झालेल्या उर्वरित बैठका उद्या 7 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. 7, 8 आणि 9 जानेवारी रोजी उर्वरित बैठका पार पडतील. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत. 21 डिसेंबर रोजी मुंबईतील निरीक्षकांची बैठक पार पडली होती त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येत आहे.
मी आरोप करणाऱ्या प्रत्येकाचे तोंड दाबू शकत नाही- धनंजय मुंडे
कोणी काय आरोप करावेत, लोकशाहीने अधिकार दिलेत.मी आरोप करणाऱ्या प्रत्येकाचे तोंड दाबू शकत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. जे आरोप करताहेत, त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना प्रश्न विचारावा.महायुतीमध्ये भाजप चे असतील तर भाजपच्या पक्षाध्यक्षांना विचारावं. माझ्याकडे संशयाने बघितलं जाताहेत. त्यामुळे मी बोलणं योग्य नाही.चौकशी पूर्ण होऊ द्या, असेही ते म्हणाले.
पंकजा मुंडे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट
पंकजा मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आज अमित शहा यांची भेट घेतली.
'शासकीय कार्यालये, स्ट्रीट लाईट, पाणीपुरवठा योजना शंभर टक्के सोलारवर'
शासकीय कार्यालये, स्ट्रीट लाईट, पाणीपुरवठा योजना शंभर टक्के सोलारवर होणार असून लवकरच शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याच धोरण असल्याचं सार्वजनिक आरोग्य,ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणीत सांगितलंय, यामुळे रात्री बेरात्री शेतकऱ्यांना दार धरण्यासाठी जावं लागणार नाहीये, आज राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर ह्या परभणी जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. शासनाच्या प्रत्येक योजनेची अंमलबजावणी झाली पाहिजेत यासाठी मंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शासनाच्या वेगवेगळ्या योजनाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्यात, त्यानंतर त्यांनी ऊर्जा आणि आरोग्य विभागाची स्वतंत्र आढावा बैठक घेतली, आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील गरोदर माता, इतर गरजू रुग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी 6 आरोग्य केंद्रांना आंबूलन्स देण्यात आल्या आहेत, या अंबुलन्सचे उदघाटन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते आज करण्यात आले,सदर अंबुलन्समूळे गरजू रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहचून उपचार घेता येणार आहेत.
बीड हत्या प्रकरणात 3 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
बीड हत्या प्रकरणात 3 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जयराम चाटे, प्रतिक घुले आणि महेश केदार असे आरोपींचे नाव आहे.
वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्रकल्पावर निर्बंध लावणार
मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता बहुतांशी सुधारली आहे. वातावरणीय बदलांमुळे वायू प्रदूषणात वाढ आढळून आल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने बांधकामांसंदर्भात कठोर पावले उचलली होती. त्याचा सकारात्मक परिणाम होवून वायू प्रदूषण नियंत्रणात आल्याने मुंबईत भायखळा, बोरिवली पूर्व या भागांमध्ये बांधकामांवर लावण्यात आलेली सरसकट बंदी आता हटवण्यात आली असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली.
दिल्लीच्या इंडिया गेटच नाव बदला, जमाल सिद्दीकी यांची मागणी
दिल्लीच्या इंडिया गेटच नाव बदला, अशी मागणी भाजप अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले आहे.
दादरमध्ये स्टोरेस ज्वेलर्सकडून गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक
दादरमध्ये गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक झाली आहे. स्टोरेस नावाच्या ज्वेलर्स कंपनीने कमी कालावधीत दुप्पट पैसे करून देण्याच्या नावाखाली पैसे घेतले.कालपासून दादरमधील हे दुकान बंद झाल्याने नागरिकांची दुकानासमोर मोठी गर्दी झाली आहे. आता पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
विजापूरमध्ये सुरक्षा जवानांच्या वाहनावर नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला
छत्तीसगडमधील विजापूरमध्ये सुरक्षा जवानांच्या वाहनावर नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला. या हल्ल्यात 8 जवान शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे.
विधानसभेत पराभूत उमेदवारांनी दाखल केली याचिका
काटोल मतदार संघातून विधानसभेत पराजय झालेले राष्ट्रवादी काँग्रेस चे सलील देशमुख व चरण वाघमारे यांच्यासह काही पराजित उमेदवार निवडणुक आयोगाच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली.काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या आठ पराभूत उमेदवारांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात आणखी भर टाकत सलील देशमुख आणि चरण वाघमारे सह काही पराभूत उमेदवारांनी याचिका दाखल केली.
उपमुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्याला 24 तासाच्या आत घेतलं ताब्यात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देत व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या हितेश प्रकाश धेंडे याला 24 तासाचा आत ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. हितेश प्रकाश धेंडे असे इंस्टाग्राम व्हिडिओ मार्फत धमकी देणाऱ्या तरुणाचे नाव असून मुंबई येथून ताब्यात घेतले.काही वेळातच आरोपी हितेश धेंडेला श्रीनगर पोलीस ठाण्यात घेऊन येत आहेत.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले. 4590 पानांचे आरोपत्र दाखल करण्यात आले आहे. यात 26 आरोपींना अटक केली असून 3 फरार आरोपींच्याविरोधात गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केल. या गुन्ह्यात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
मुंबईत ताज हॉटेलच्या बाहेर 2 संशयित गाड्या सापडल्या
मुंबईत ताज हॉटेलच्या बाहेर 2 संशयित गाड्या सापडल्या. दोन्ही गाड्या सेम मॉडेलच्या असून हॉटेल गेटच्या आत होत्या. पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत.
महाकुंभ मेळाव्यावर HMPV व्हायरसचं सावट
महाकुंभ मेळाव्यावर HMPV व्हायरसचं सावट. कुंभ मेळाव्यातील महंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं पत्र. चीन मधून येणाऱ्या भाविक, नागरिक, पर्यटकांवर बंदी घालण्याची मागणी. 12 जानेवारीपासून प्रयागराज इथं महाकुंभ मेळावा सुरु होत आहे. मोठ्या प्रमाणात भावीक या ठिकाणी येणार असल्यानं खबरदारी म्हणून लिहिलं पत्र लिहिल्याची माहिती.
कुणाचातरी राजीनामा घेऊन मला मंत्री व्हायचं नाही- छगन भुजबळ
कुणाचातरी राजीनामा घेऊन मंत्र मला मंत्री व्हायचं नाही. मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी भुजबळांना अमान्य. बीड प्रकरणात जे दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई होणार, चौकशी आधीच मुंडेंचा राजीनामा का मागितला जातोय? असा सवाल करत आपली मुख्यमंत्र्यांशी कोणत्याही मुद्द्यावर चर्चा झाली नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं.
HMPV : चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर नजर; भारत कशी घेणार काळजी?
चीनच्या आरोग्य विभागाने हिवाळ्यात नव्या व्हायरसचा प्रकोप झाल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे. चीनमध्ये HMPV व्हायरसने थैमान घातला आहे. असं असताना चीनमध्ये जाणे किती सुरक्षित आहे. तसेच चीनमधून येणाऱ्या प्रवाशांबाबत सरकारने काय घेतला निर्णय?
सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.
HMPV ची भारतात एन्ट्री; बंगळुरुतील 3 आणि 8 महिन्यांच्या दोन चिमुकलींना लागण
HMPV Virus India : चीनमधील HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री झाली आहे. HMPVचा भारतात पहिला रुग्ण आढळला आहे. HMPV व्हायरसने चीनमध्ये थैमान घातलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचे नियम देखील लागू केले आहेत.
सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.
वातावरण बदलाचा ज्वारीच्या पिकाला फटका
गेली काही दिवस उत्तर पुणे जिल्ह्यात पडलेलं ढगाळ हवामान आणि अचानक वाढलेली थंडी बदलत्या हवामानाचा ज्वारी पिकाला फटका बसलाय, ज्वारीच्या पिकावरती चिकटा मावा सारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली असून याचा उत्पन्नावरती परिणाम होणार आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी
अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशन हद्दीतील रहिवासी असलेल्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली होती. घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पोक्सो कायद्यानुसार आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आलीय. तर आरोपीला दोन दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहेय. आरोपी युवक मुलीचा पाठलाग करुन तिला त्रास देत होता एका रात्री आरोपीने चाकूचा धाक दाखवून मुलीचा विनयभंग केला होता.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या' सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मागणी
सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट. संतोष देशमुख हत्येप्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने 'चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या' अशी मागणी राज्यपालांकडे केली. वाल्मिक कराडवर कलम 302 लावण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली.
तुळजाभवानीच्या दर्शन व्यवस्थेत अचानक बदल
तुळजाभवानीच्या दर्शन व्यवस्थेत अचानक बदल. तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याचे काम सुरू, सेंड ब्लास्टिंग मुळे गाभाऱ्यात धूळ व कचरा. तुळजाभवानीचे दर्शन गाभाऱ्यातून करण्यात आले बंद. बांधकाम सुरू असल्याने देवीच्या दर्शन व्यवस्थेत बदल ,भाविकांना सूचना न देता मंदिर संस्थांनी केला बदल. तुळजाभवानीचे दर्शन, आरती खिडकीतून सध्या सुरू. मंगळवारी पहाटेपर्यंत दर्शन पूर्वत होण्याची अपेक्षा. दिवस-रात्र काम सुरू असतानाही दर्शन व्यवस्थेत अचानक बदल झाल्याने भाविकात मोठी नाराजी
धाराशिवमध्ये दोन 2 गटात हाणामारी; चौघांचा मृत्यू
धाराशिवमध्ये दोन 2 गटात हाणामारी झाली असून, या हाणामारीत 4 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये 3 पुरुष आणि एक महिला मृत्युमुखी पडले आहेत. वाशी तालुक्यातील बावी पिडी इथं ही घटना घडली. शेतात पाणी देण्यावरून वाद झाल्याची माहिती. मध्यरात्री रात्री घडली घटना येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल.
भारतात सापडला एचएमपीवी विषाणूचा दुसरा रुग्ण
भारतात एचएमपीवी व्हायरसचा आणखी एक रुग्ण सापडला असून, आता रुग्णसंख्या 2 वर पोहोचली आहे. कर्नाटकातच बंगळुरू इथं एका तीन महिन्याच्या मुलीला या विषाणूजन्य संसर्गाची लागण झाली आहे.
भारतात सापडला एचएमपीवी विषाणूचा पहिला रुग्ण...
भारतात HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला असून, बंगळुरूमध्ये 8 महिन्यांच्या रुग्णाला या विषाणूची लागण झाल्याचं सांगितलं जात आहे. मुलीनं चीनचा प्रवास न केल्याची महत्त्वाची बाब इथं लक्ष घेण्याजोगी आहे.
बीड सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर
विष्णू चाटे याला आज पुन्हा कोर्टासमोर हजर केले जाणार बीड:विष्णू चाटे याला आज पुन्हा कोर्टासमोर हजर केले जाणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये विष्णू चाटे ला सहा तारखेपर्यंत सुनावण्यात आलेली होती पोलीस कोठडी. सीआयडीच्या अधिकारी आज विष्णू चाटेला कोर्टात पुन्हा करणार हजर. विष्णू चाटेला केज च्या कोर्टामध्ये केलं जाणार हजर
त्र्यंबकेश्वर मंदिरात आलेल्या भाविकांना पिसाळलेल्या कुत्र्यांचा चावा
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने दहा जणांना घेतला चावा. यामध्ये पाच मुलांसह शालेय मुलाचा समावेश. जखमींना त्र्यंबकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल करण्यात आले. पिसाळलेल्या कुत्र्याने अंधाधुंद हल्ला केला, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर परिसर भागात ही घटना घडली. जखमींमध्ये नाशिक, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि इतर ठिकाणाहून आलेल्या नागरिकांचा समावेश. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी.
आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिगारेट आणि औषधांची तस्करी
कार्गोद्वारे अवैधरित्या लंडनला पाठविण्यात येणारी 74 हजार कॅप्सूल औषधे आणि 24400 सिगारेट सिगारेट्स राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने जप्त केली आहेत. त्यांची किंमत सुमारे 75 लाख रुपये आहे. औषधांच्या तस्करीत गुंतलेल्या एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार 3, 4 जानेवारीदरम्यान एअर कार्गो टर्मिनल परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. एनसीबीने दोन कंटेनरवर पाळत ठेवून त्यांची तपासणी केली. यूडीएक्स वर्ल्डवाइडच्या इतर कंटेनरची झडती घेतली असता, विविध बँडच्या 24400 सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. हा सर्व साठा खाद्यपदार्थांच्या पिशव्यांमधून नेण्यात येत होता.
रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या अज्ञात चोरांच्या टोळीची दहशत
पुणे सातारा महामार्गालगत असणाऱ्या सारोळा आणि सावरदरे गावात, रात्रीच्या सुमारास धारधार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या अज्ञात चोरांच्या टोळीची दहशत. गावातील सतर्क नागरिकाच्या मध्यरात्री गावातून ही टोळी फिरताना निदर्शनास आल्याने घटना उघडकिस. नागरिकांच्या सतर्कतेमुळं चोरटे पळून गेल्यानं कुठलीही अनुचित किंवा चोरीची घटना घडलेली नाही. मात्र धार धार शस्त्र घेऊन फिरताना ही अज्ञात टोळी, गावात ठिकठिकाणी लावलेल्या cctv कॅमेरात कैद. मध्यरात्री गावात फिरणाऱ्या शश्त्रधारी या अज्ञात चोरांमुळं गावातील नागरिकांमध्ये दहशत. पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहून खबरदारी घेण्याचे आवाहन.
एसटी घोटाळ्याची चौकशी सुरू; मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून...
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) 1310 बसच्या खरेदी प्रक्रियेची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने सुरू झाली असून निविदा प्रक्रियेची सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश महामंडळास देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे खरेदीसाठी 21 विभागनिहाय निविदा काढण्याच्या संचालक मंडळाच्या प्रस्तावास तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असताना महामंडळाच्या स्तरावर निविदेतील अटी-शर्ती बदलण्यात आल्याचे समोर आले आहे.
आर्वी तालुक्यातील सावळापूर शिवारात 70 जनावरांना विषबाधा
आर्वी तालुक्यातील सावळापूर शिवारात 70 जनावरांना विषबाधा. 11 जनावरांचा मृत्यू. प्रकृती बिघडलेल्या 59 जनावरांवर उपचार सुरू. कपाशीच्या शेतात चराईत जास्त प्रमाणात कपाशीची बोंड खाण्यात आल्यानं विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावरांवर उपचार. प्रयोगशाळेचा अहवाल मिळाल्यानंतर कारण स्पष्ट होणार.
धाराशिव जिल्ह्यात सर्वपक्षीय मूक मोर्चा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिव जिल्ह्यात सर्वपक्षीय मूक मोर्चाय. 11 जानेवारीला निघणार धाराशिव शहरात मोर्चा. मनोज जरांगे पाटील राहणार मोर्चाला उपस्थित. जिल्हाभर मोर्चाची जय्यत तयारी सुरू.
पालघर मध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के
पालघर मध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के . पहाटेच्या सुमारास दोन सलग लागलेल्या भूकंपाच्या धक्क्याने पालघर हादरलं . पालघर च्या बोर्डी , दापचरी , तलासरी भागात जाणवले भूकंपाचे धक्के . सतत बसणाऱ्या धक्क्यामुळे परिसरात भीतीच वातावरण . 4.35 च्या सुमारास लागलेल्या धक्क्याची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल .
दाट धुक्यामुळे तब्बल 32 विमानांना उशीर
दिल्लीतील दाट धुक्याचा परिणाम विमान सेवेवर होत आहे. यामुळे अनेक विमानांना उशीर होत आहे. शनिवारी दिल्लीहून येणाऱ्या आणि पुण्यातून जाणाऱ्या तब्बल 32विमानांना उशीर झाला, तर रविवारीदेखील काही विमानांना धुक्याचा फटका बसला आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळच्या सुमारास दिल्लीमध्ये दाट धुके पडले होते. यामुळे दिल्लीहून जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांना फटका बसला आहे. दाट धुक्यामुळे दिल्ली येथे विमानांचे उड्डाण थांबविण्यात आले होते. त्यामुळे पुण्यातून दिल्ली व इतर ठिकाणी जाणाऱ्या तब्बल 31विमानांना अर्ध्या तासांपासून ते तीन तासांपर्यंत उशीर झाला. त्यामुळे पुणे व दिल्ली विमानतळावर मोठी गर्दी होत आहे.
थंडीचा कडाका आणखी वाढणार
राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. त्यानुसार आता राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. येत्या तीन दिवसात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तरेकडील अतिशीत वारे राज्यात येत असल्याने राज्यात हुडहुडी भरवण्याची थंडी जाणवणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
अवैध पिस्तूल, एका जीवंत काडतुसासह दोघांना अटक
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध शस्त्र बाळगणारे, चोरी घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पथकास रिसामा येथील स्थानिक नागरीकांकडुन माहिती मिळाली की, नरेश तिराले हा त्याचे जवळील पिस्तूल द्वारे लोकांच्या मनात भिती घालुन दहशत माजवत होता. परंतु त्याच्या भितीमुळे लोकांनी त्याचेविरूध्द तक्रार दिलेली नाही. पण पोलिसांनी त्याच्या घरी धाड टाकली असताना एक पिस्तूल व काळतुस आढळून आले. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक करत गुन्हा दाखल केला.
पश्चिम रेल्वेने रेल्वेस्थानकावर विश्रामगृह
पश्चिम रेल्वेने रेल्वेस्थानकावर विश्रामगृह उघडण्याचा घेतला निर्णय. प्रवाशांना आता रेल्वे स्थानकावर मिळणार विमानतळासारख्या सुविधा. या प्रकल्पाअंतर्गत रेल्वे काही स्थानकावर डिजिटल लाउंज उभारण्यात येईल. यामध्ये चार्जिंग प्लग पॉइंट, वायफाय, कॅफे, खुर्च्या, टेबल सोफा यासारख्या अनेक सुविधा होणार उपलब्ध. फक्त रेल्वे प्रवाशीच नाही तर इतरांसाठी देखील ही सुविधा असेल.
11 तारखेला बीड हत्या कांडातील फरार आरोपी भिवंडीत दाखल
बीड मस्साजोग येथील आरोपी ११ डिसेंबर रोजी भिवंडीतील वळगाव येथील स्वरीत बिअर शॉप व हॉटेल दिपाली वाईन आणि डाईन बार एंड रेस्टॉरंट येथे आले असल्याची बातमी समोर आलीयं.
नवी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाला खिंडार
नवी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडले असून, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे द्वारकानाथ भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि काही माजी नगरसेवकानी शिवसेनेत प्रवेश केला आहे. द्वारकानाथ भोईर विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्याने नाराज होते आगामी. मनपा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.
घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे.तिघांना अटक करत त्यांच्याकडून पाच लाखांच्या रोकडसह साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या तिघांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले असून हे तिघेही कर्नाटक राज्यातल्या होसपेठ येथील आहेत.मिरज तालुक्यातल्या तानंग फाटा येथेही संशयतरित्या फिरत असताना तिघांना ताब्यात घेण्यात आले होता, यावेळी त्यांच्याकडून चोरीतील पाच लाखांची रोकड व दुचाकी मिळाली होती.
केशर आंब्याची पहिली पेटी दाखल
कोकणातील केशर आंब्याची पहिली पेटी मुंबई मार्केट मद्ये आली असून, हापूस आंबा आधी केशर आंबा मार्केटमध्ये दाखल होणार आहे. देवगड तालुक्यातील शेतकरी शकील मुल्ला यांच्या आंबा बागेतील ही पेटी असून यावर्षी च्या आंबा हंगामातील पहिली केशर आंबा पेटी असणार आहे ,पाच डझन ची ही पेटी असून मुंबई एपीएमसी मार्केट ला त्यांनी ही पहिली पेटी पाठवली आहे.
क्रिकेट खेळताना तरुणांचा मृत्यू
क्रिकेट खेळताना ३४ वर्षीय झुबिन राजेंद्र दामजी या तरुणाचा हृदयविकारामुळे दुरदैवी मृत्यू झाला आहे . वाशीत सेक्टर ९ मध्ये राहणारा झुबिन माटुंग्याचे डॉन बॉस्को शाळेच्या मैदानात गावाकडून आलेल्या मित्रांसोबत क्रिकेट चे सामने खेळायला गेला होता , खेळा दरम्यान दोन सिक्सर मारून तिसरा सिक्सर मारते वेळी हृदयविकाराचा झटका येऊन जागीच कोसळला. लागलीच त्याला जवळच्या रुग्णालयात नेले आता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अचानक आलेल्या मृत्यू मुले परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अखेर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवून रस्ता केला खड्डे मुक्त..!
मुंबई नाशिक महामार्गावर पडघा-खडवली बायपास जवळ नवीन उड्डाण पूलाच्या निर्मितीचे काम सुरू असून करीता बाह्यवळण रस्ते तयार केलेतं. परंतु या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सततची वाहतूक कोंडी होऊन धुळीचे साम्राज्य पसरत असल्याने वाहन चालकांसह नागरीकांना याचा त्रास सहन करवा लागत होता. तसेच पूलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, वाहतूक धिम्या गतीने सुरू असून सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरीक व वाहन चालक हैराण झालेत. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने याबाबींकडे लक्ष केंद्रित करून बाह्यवळण रस्ते दुरुस्ती करुन धुळीची समस्या सोडवावी या संदर्भाची झी २४ तासने बातमी प्रसिद्ध करताच याची दखल घेऊन रस्त्यावर डांबर पडली असून उड्डाणपुलाच्या कामाही गती आली आहे.