Maharashtra Breaking News LIVE Updates: देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील व देशभरातील ठळक घडामोडी जाणून घेऊया एका क्लिकवर
Maharashtra Breaking News LIVE Updates : बीड सरपंच हत्याकांडातील घडामोडींना वेग आला आहे. या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यातील व देशातील सर्व घडामोडींचा वेगवान आढावा या लाइव्ह ब्लॉगमधून घेऊयात.
Latest Updates
देशमुख प्रकरणातील आरोपींना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन : धनंजय देशमुख
देशमुख कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सोडणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
देशमुख कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीसाठी रवाना
संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहे.
आम्हाला न विचारता याचिका दाखल, मला न्याय पाहिजे: धनंजय देशमुख
आम्हाला न विचारता याचिका दाखल करण्यात आली आहे. पुन्हा अशा घडू नये म्हणून आम्ही न्याय मागत असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
संतोष देशमुख कुटुंबीय आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
संतोष देशमुख कुटुंबीय आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने ही भेट होणार आहे.
संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी जालन्यात 10 जानेवारीला मोर्चा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी 10 जानेवारीला जालन्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते सहभागी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलीये.
मल्टिस्टेट बँक संदर्भात अजित पवार यांच्यासोबत चर्चा : सुरेश धस
मल्टिस्टेट बँकांमध्ये पैसे बुडालेल्या लोकांचे प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडल्याची माहिती सुरेश धस यांनी अजित पवार यांच्या सोबत झालेल्या भेटीनंतर दिली आहे.
सुरेध धस अजित पवार यांच्या भेटीला
राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आता सुरेश धस हे अजित पवार यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. या भेटीमध्ये ते बीड प्रकरणावर चर्चा करण्याची शक्यता आहे.
खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या शासकीय बंगल्यावर बैठक, सुरेश धस यांचा दावा
खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या शासकीय बंगल्यावर बैठक झाल्याचा दावा सुरेश धस यांनी झी २४ तासच्या टू द पॉईंट या मुलाखतीत केला. त्याबाबत बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिलीय सुरेश धस हे अभ्यास करून बोलणारे नेते आहेत. त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असेल तेव्हाच ते बोलतात. शासनाने आणि पोलीस यंत्रणेने याचा तपास करायला पाहिजे असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय.
वाल्मिक कराड शरण आलेली गाडी CID च्या ताब्यात
पुणे येथील CID कार्यालयात वाल्मीक कराड ज्या स्कॉर्पियो गाडीतून आला होता ती गाडी आता सीआयडीनं ताब्यात घेतलीये. ही गाडी शिवलिंग मोराळे यांच्या पत्नीच्या नावे असल्याची माहिती आहे. दरम्यान आता याबाबत सीआयडी नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
चर्चगेट येथील स्टारबक्सचं नाव मराठीत नसल्याने ठाकरे पक्ष आक्रमक
मुंबईतील चर्चगेटमध्ये स्टारबक्स कॅफेचं नाव इंग्रजीत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. यावेळी कार्यकर्त्यांनी स्टारबक्स कॅफेच्या बोर्डाला काळं फासत आंदोलन केलं. मरीन लाइन्स पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी माणसाची गळचेपी होताना पाहायला मिळतेय. त्यातच स्टारबक्स कॅफेचं नाव मराठीत नसल्याने ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. महानगरपालिका निवडणुकांआधी मराठी भाषा आणि मराठी माणूस या विषयावरुन ठाकरेंची शिवसेना आक्रमक होताना सध्या पाहायला मिळतेय.
मुंबईतील प्रदूषणाबाबत अधिकाऱ्यांना सूचना : पंकजा मुंडे
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील प्रदूषणामध्ये मोठी वाढ झालेली होती. अशातच आता या प्रदूषणाबाबत अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्याच पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप युती?
आगामी महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप युती होण्याची चर्चा रंगली आहे. लोकसभा आणि विधानसभेत शिंदेंमुळे मनसेची युती होऊ शकली नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र, आता महापालिका निवडणुकीत युतीची चर्चा आणि युतीतील इतर बाबीवर वाटाघाटी करण्यासाठी मनसेकडून एका टीमची नेमणूक केली जाणार आहे. मनसेची पहिली टीम सध्याच्या राजकीय स्थितीचा आढावा घेणार आहे. त्यावरुन युतीबाबत अंतिम निर्णय होणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, 5 फेब्रुवारीला मतदान, 8 फेब्रुवारीला निकाल होणरा जाहीर; 70 जागांसाठी होणार रणसंग्राम
मराठा क्रांती मोर्चाकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी यांचे राजकीय व्यावसायिक लागेबांधे लक्षात घेता तपासात हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. तसेच हे प्रकरण शेवटापर्यंत जाण्यातील धोके लक्षात घेऊन धनंजय मुंडे यांनी तपास होईपर्यंत मंत्रीपदाचा तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे.
संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडीओ CIDच्या हाती?
संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीच्या तपासात धक्कायदायक माहिती पुढे आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करतानाचा व्हिडिओ सीआयडीच्या हाती आला असल्याची माहिती झी 24 तासाला विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करण्यात आल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे सीआयडीला मिळालेला व्हिडिओ या प्रकरणाचा मोठा पुरावा असल्याची माहिती आहे. या व्हिडिओसह सीआयडीच्या पथकांनी अनेक शस्त्रे जी मारहाण करताना वापरली ती जप्त केली आहेत.
Maharashtra Breaking News LIVE Updates: विधानसभेत झालं ते विसरा; महापालिकेच्या तयारीला लागा: मनसे बैठकीत राज ठाकरेंचे आदेश
आज मनसेच्या विभाग अध्यक्षांच्या बैठक झाली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश राज ठाकरेंनी बैठकीत दिला. मनसेच्या विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याचे आदेश देण्यात आलेत. आगामी निवडणूकीत मनसेची राजकीय वाटचाल ; इतर पक्षांसोबत युतीबाबतच्या चर्चा यांबाबतचे अंतीम निर्णय घेतांना राजकीय आढावा घेणा-या टिमची मते लक्षात घेतली जातील
Maharashtra Breaking News LIVE Updates: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील याचिकेबाबत मोठी अपडेट
औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका प्रलंबित ठेवण्याची धनंजय देशमुखांची न्यायालयाला विनंती. धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती याचिका. देशमुख हत्या प्रकरणात तपासला दिशा देण्यासाठी दाखल केली होती याचिका. तपास यंत्रणेला आणखी वेळ द्यावा असे म्हणत पुढील सुनावणी न घेण्याची केली विनंती
Maharashtra Breaking News LIVE Updates: राजीनामा दिला का? धनंजय मुंडेंनी एका शब्दात दिले उत्तर
बीड हत्या प्रकरणावरुन राज्यात वातावरण तापलं असून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चा असतानाच खुद्द मुंडेंनीच यावर स्पष्टीकरण दिलं आहे. मी राजीनामा दिलेला नाही, असं मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: आजच्या कॅबिनेटमधूनच ई-कॅबिनेटचा शुभारंभ
ई-कॅबिनेटच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात. बैठकीतील प्रस्तावांचे टीपण आणि इतर माहिती टॅबवर उपलब्ध करुन दिली जाणार . मंत्र्यांना प्रस्तावाला आक्षेप किंवा सूचना द्यायची असल्यास तशीही व्यवस्था असणार
Maharashtra Breaking News LIVE Updates: सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण: देशमुख कुटुंबीय आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
Maharashtra Breaking News LIVE Updates: पालघरमध्ये आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर
पालघरमध्ये आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर. प्रसुती झालेल्या आईला चिमुकल्यांसाठी गाठावं लागलं 80 किलोमीटरचं अंतर. पालघरमधून जव्हारला फरफट
Maharashtra Breaking News LIVE Updates: वाल्मिक कराड ईडीच्या रडारवर?
वाल्मिक कराड ईडीच्या रडारवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. वाल्मिकनं दीड हजार कोटींची संपत्ती गोळा केल्याचा आरोप. खंडणी, काळ्या धंद्यातून वाल्मिकनं गोळा केली माया. वाल्मिक ईडी चौकशीच्या फे-यात सापडणार असून वाल्मिकची बायकोही ईडीच्या रडारवर येणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: सौदी अरेबियामध्ये मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर, मक्का मदीनापर्यंत साचलं पाणी, पुरात अनेक गाड्या गेल्या वाहून, पुढील 24 तास रेड अलर्ट
Maharashtra Breaking News LIVE Updates: पुण्यात शिवसेना UBT पक्षाला धक्का
शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत करणार भाजपमध्ये प्रवेश
Maharashtra Breaking News LIVE Updates: दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होणार. दुपारी 2 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद.
Maharashtra Breaking News LIVE Updates: वाघीण-बछड्यांचा मार्ग अडवल्याप्रकरणी नागपूर खंडपीठात सुमोटो दाखल. दोन दिवसात मुख्य वनसंरक्षकांना उत्तर देण्याचे आदेश
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रात HMPV चा शिरकाव?
नागपुरात एचएमपीव्ही विषाणूचे 2 संशयित रुग्ण सापडल्याची माहिती समोर येत आहे. 7 आणि 14 वर्षाच्या बालकांना HMPV ची लागण झाल्याचा संशय. मात्र प्रशासनाकडून अद्याप याला दुजोरा देण्यात आलेला नाही
Maharashtra Breaking News LIVE Updates: डोक्यात नारळ पडून एकाचा मृत्यू
मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील व्यक्तीचा डोक्यात नारळ पडून मृत्यु झाला. जयेश पांडुरंग गीते असे 48 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. देवपूजेसाठी मुरुडच्या बाजारात शहाळे आणण्यासाठी गेला असता झाडावरून नारळ त्याच्या डोक्यात पडून तो गंभीर जखमी झाला त्यातच त्याचा मृत्यू झाला.
Maharashtra Breaking News LIVE Updates: खवय्यांना धक्का; शाकाहारी थाळी ६ टक्के महागली
टोमेटो, बटाट्यासारख्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने डिसेंबरमध्ये घरगुती अन्न महाग झाले. सोमवारी एका अहवालात ही माहिती दिली. क्रिसिलच्या उपकंपनीनुसार, शाकाहारी थाळी तयार करण्याचा सरासरी खर्च डिसेंबरमध्ये ६% वाढून ३१.६ रुपये प्रति प्लेट झाला आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: विमानतळावर ४ कोटींचा गांजा जप्त
मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने ४ कोटी रुपयांच्या गांजाच्या तस्करीचा पर्दाफाश केला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. बँकॉकहून येणाऱ्या विमानात प्रवाशाकडे अमली पदार्थ असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती
Maharashtra Breaking News LIVE Updates: मनसेची आज आढावा बैठक
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतील 36 विभाग अध्यक्ष यांची त्याचबरोबर नेत्यांची शिवतीर्थावर बैठक राज ठाकरे यांच्या नेतृत्वात बैठक होणार असून मुंबई महापालिका निवडणुका तयारी विषयी घेतला जाणारा आढावा सकाळी दहा वाजता सुरू होणार बैठक.
Maharashtra Breaking News LIVE Updates: पश्चिम बंगाल, पाटणा भूकंपाच्या धक्क्याने हादरले
पाटणा, पश्चिम बंगाल येथे आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथे सकाळी 6.37 वाजता 15 सेकंदासाठी भूकंपाचे धक्के जाणवले. तर, जलपाईगुडी येथेदेखील भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून तिबेट-नेपाळ सीमेलगत भूकंपाचे केंद्र असल्याचे समोर आले आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला
नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे. एप्रिल 2025 अखेरीस देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रकारच्या विमानसेवा सुरू होणार. मार्च 2025 खेरीज देशांतर्गत वाहतूक सुरू होणार तर एप्रिल 2025 अखेरीस आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती
Maharashtra Breaking News LIVE Updates: ठाकरे गटाच्या स्थगित झालेल्या उर्वरित बैठका 7 जानेवारीपासून सुरू होणार
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत. 21 डिसेंबर रोजी मुंबईतील निरीक्षकांची बैठक पार पडली होती त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या स्थगित झालेल्या उर्वरित बैठका आजपासून ३ दिवस सुरू होणार आहेत.