Maharashtra Breaking News Live Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषद सभागृह नेते पदी निवड

Mon, 09 Dec 2024-8:50 pm,
Maharashtra Breaking News Live Updates 9 december 2024 assembly special session Political news Maharashtra Breaking News Live Updates 9 december 2024 assembly special session Political news

Maharashtra Breaking News Live Updates : राज्यातील राजकारणात सत्तास्थापनेनंतरच्या घडामोडींना वेग, राज्यात नेमकं कुठं चाललंय काय?

Maharashtra Breaking News Live Updates : विदर्भापासून कोकणापर्यंत आणि मुंबईपासून गावखेड्यांपर्यंत... राज्यात नेमकं काय सुरुय? आजचा दिवस कोणत्या घडामोडींमुळं चर्चेत राहणार, कुठं काय घडणार? पाहा महत्त्वाच्या घडामोडींच्या Live Updates एका क्लिकवर... 


Latest Updates

  • विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट

    विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आहे. नार्वेकरांची अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल दानवेंनी त्यांचे अभिनंदन केले. ठाकरे गटाच्या नेत्यांनी अध्यक्ष निवडीवेळी बहिष्कार घातला होता. दुसरीकडे दानवेंनी केलेल्या अभिनंदनामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. 

  • आमदार योगेश टिळेकर यांचे अपहरण झालेले मामा सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला

    आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून झाल्याची घटना समोर आली आहे. मृत सतीश वाघ यांचा मृतदेह यवत गावच्या हद्दीत सापडला. पुणे ग्रामीण पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली असून हडपसर पोलीस आणि ग्रामीण पुणेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

  • रक्त वाढीच्या गोळ्यांमधून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा वाढला

    रक्त वाढीच्या गोळ्या दिल्यानंतर उमरगा तालुक्यातील गांधी विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ होण्याचा त्रास जाणवू लागला. सुरुवातीला 19 विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दुपारनंतर आणखी अकरा विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असलेल्या शालेय विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून काही विद्यार्थ्यांना थोड्या वेळात डिस्चार्ज देण्यात येणार आहे. रक्त वाढीच्या गोळ्या मुळेच त्रास झाल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज.अधिक तपासासाठी विद्यार्थ्यांचे रक्त आणि लघवीचे नमुने घेण्यात आले. 

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषद सभागृह नेते पदी निवड

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषद सभागृह नेते पदी निवड झालेली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबत घोषणा केली आहे. 

  • 16 ते 21 डिसेंबर दरम्यान नागपूरमध्ये होणार हिवाळी अधिवेशन 

    सोमवारी विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तर विरोधी पक्षातील जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड ही या बैठकीला उपस्थित होते. यात 16 ते 21 डिसेंबर दरम्यान नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार हे निश्चित झालं आहे. 

  • 16 डिसेंबर पासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला होणार सुरुवात 

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर मुंबईत तीन दिवसीय विधानसभा अधिवेशन भरवण्यात आलं होतं. यात विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा वर्णी लागली आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 16 डिसेंबर पासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याची घोषणा केली आहे. 

  • RBI चे नवे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती 

    संजय मल्होत्रा ​​यांची RBI नवे पुढील गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी असून सध्या ते अर्थ मंत्रालयात सचिव म्हणून काम करत आहेत. त्यांच्या मागील असाइनमेंटमध्ये, त्यांनी भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले होते. त्यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे.

     

  • एनसीपीच्या पराभूत उमेदवारांची शरद पवारांसोबत दिल्लीत होणार बैठक

    सोमवारी एनसीपीच्या पराभूत उमेदवारांची शरद पवारांसोबत दिल्लीत बैठक होणार आहे. दिल्लीत 5 वाजता ही बैठक होणार असून पवारांची भेट घेऊन पुढील दिशा ठरवली जाणार. पराभूत उमेदवार EVM विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती असून पुन्हा निवडणूका घेण्याची मागणी करणार आहेत. एनसीपी पराभूत उमेदवार कायदेशीर सल्ला घेऊन कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. 

  • Breaking news : पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

    पुणे शहराचा पाणी पुरवठा गुरूवारी बंद राहणार आहे. नवीन आणि जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, भामा आसखेड, वारजे, एसएनडीटी यासह अन्य ठिकाणी स्थापत्य आणि विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याने पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद असणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु होईल अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली. 

  • शिवसेना UBT पक्षाने राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला 

    महाराष्ट्र सरकारचं तीन दिवसीय अधिवेशन मुंबई येथील विधानभवनात सुरु असून सोमवारी विधानभवनात राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे. या राज्यपालांच्या अभिभाषणावर शिवसेना UBT पक्षाने बहिष्कार टाकला असल्याची माहिती त्यांच्या आमदारांनी दिली.  

  • नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी 13 डिसेंबरला होण्याची शक्यता 

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडल्यावर आता येत्या 13 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. राजभवनात राज्यपाल नव्या मंत्र्यांना शपथ देणार असून काल झालेल्या बैठकीत 13 तारखेला शपथविधी घेण्यावर चर्चा तसेच एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तसेच मंत्रिमंडळात किती व कोण कोण असणार यावर देखील चर्चा आणि निर्णय झालाय. 

  • देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक प्रस्ताव आवाजी बहुमताने मंजूर

    देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक प्रस्ताव विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव मांडण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर विश्वास व्यक्त करणारा प्रस्ताव माजी मंत्री उदय सामंत, संजय कुटे, दिलीप वळसे पाटील यांनी मांडला. तसेच फडणवीस सरकारवरील विश्वादर्शक प्रस्ताव विधानसभेत संमत देखील झाला. 

  • तहसील कार्यालयाबाहेर निकृष्ट दर्जाच्या तांदळाची खिचडी शिजवून तहसीलदारांना दिली भेट

    बीडच्या तहसीलदारांना ग्रामस्थांनी थेट निकृष्ट दर्जाच्या तांदळाने शिजवलेली खिचडी भेट दिली. बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या टेबलवर ही खिचडी ठेवून लक्ष वेधण्यात आले. बीड तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातून ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे धान्य वितरण होत असल्याचा प्रकार समोर आला होता. यावर कोणतीही कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाबाहेर खिचडी शिजवून आंदोलन केले. या आंदोलनानंतर स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जाणारे धान्य चांगल्या दर्जाचे दिले जावे अशी मागणी करण्यात आली. दरम्यान तहसीलदारांनी देखील याची दखल घेऊन दक्षता कमिटीमार्फत यात सुधारणा करू असं आश्वासन दिले आहे. परंतु थेट तहसीलदारांना भेट देण्यात आल्या खिचडीची चांगलीच चर्चा होते आहे. 

  • महाराष्ट्र एकीकरण समितीचे शेकडो कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात 

    बेळगाव मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांना कानडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मरीहाळ पोलीस  स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे.

  • वक्फ बोर्ड वादावरून राज ठाकरे आक्रमक

    वक्फ बोर्ड वादावरून राज ठाकरे आक्रमक. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील, तळेगाव गावातील बातमी धक्कादायक आहे. गावातील एकूण शेतजमीनीपैकी, जवळपास ७५% शेतजमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला आहे... यामुळे १०३ शेतकऱ्यांचं जगणंच धोक्यात आलं आहे. यावर जरी राज्य सरकारने सांगितलं असलं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, तरी हे पुरेसं नाही. प्रश्न हा या जमिनीपुरता नाहीये, वक्फ बोर्ड गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर जी दहशत बसवतंय त्याला चाप कसा बसवणार हा आहे ?काही महिन्यांपूर्वी संसदेत वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयक केंद्रसरकारने सादर केलं होतं, त्यावर मुस्लिमधार्जिण्या विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला.

  • जय पवार यांच्या बारामती दौऱ्याला सुरुवात

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आज बारामती विधानसभा मतदारसंघाचा दौरा करीत आहेत त्यांच्या दौऱ्याला मळद गावातून सुरुवात झाली आहे. आज जय पवार, बारामती तालुक्यातील मळद, निरावागज, घाडगेवाडी, मेखळी, सोनगाव, झारगडवाडी, डोर्लेवाडी, पिंपळी, ढेकळवाडी, काटेवाडी गावाचा करणार दौरा करणार आहेत. 

     

  • कर्नाटकातून महाराष्ट्राकडे येणाऱ्या गाड्या रोखण्याचा प्रयत्न 

    कर्नाटक पोलिसांनी बेळगाव जाण्यास रोखल्यानंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक. कर्नाटकमधून महाराष्ट्राकडे येणाऱ्या गाड्या शिवसैनिकांकडून रोखण्याचा प्रयत्न. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत शिवसैनिकांनी महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटकच्या गाड्या पुणे बंगळुरु महामार्गावर रोखण्याचा प्रयत्न. 

  • ठाकरे गटाचा एकही आमदार विधानभवनाच्या सभागृहात उपस्थित नाही

    विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी ठाकरे गटाचा एकही आमदार सभागृहात उपस्थित नाही. शिवसेना पक्षाचा निकाल देताना राहूल नार्वेकर यांनी पक्षपातीपणा आणि वेळकाढूपणा केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. त्यामुळंच राहुल नार्वेकरांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी ठाकरे गटाचा बहिष्कार. 

  • कर्नाटक पोलिसांनी शिवसैनिकांना अडवलं

    कोगनोळी टोलनाक्याच्या आधीच कर्नाटक पोलिसांनी शिवसैनिकांना अडवलं. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील दूधगंगा नदीवरील पुलावर कर्नाटक पोलिसांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना रोखलं. बेळगाव मधल्या एकीकरण समितीच्या महामेळाव्याला जाण्यासाठी निघाले असता घडली घडली घटना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी घोषणाबाजी. 

  • राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष 

    विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड. नार्वेकरांची एकमतानं निवड. सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर विराजमान. 

  • दूध गंगा नदीवरील पुलावर कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त

    कोल्हापूर मधून बेळगाव कडे रवाना होणारे ठाकरे गटाचे शिवसैनिक थोड्याच वेळात कोंगनोळी टोलनाक्याच्या जवळ पोहोचणार आहेत. पुणे बंगळुरू महामार्गावरून शिवसेना ठाकरे गटाचा ताफा बेळगावच्या दिशेने रवाना होत आहेत. कोंगनोळी टोलनाका या ठिकाणी कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
    टोलनाक्याच्या अलीकडेच महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर शिवसैनिकांना अडवले जाणार. कर्नाटक पोलिसांच्या बरोबर महाराष्ट्र पोलीस देखील तैनात कोंगनोळी टोलनाक्याच्या अलीकडे दूध गंगा नदीवरील पुलावर कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त. 

  • महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते पोलिसांच्या नजरकैदेत; बेगळगावमध्ये तणाव वाढला 

    बेळगावमध्ये कर्नाटक पोलिसांची दडपशाही सुरुच. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते पोलिसांच्या नजरकैदेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते मालोजी अष्टेकरांचा पोलिसांकडून पाठलाग. व्यायामासाठी बाहेर पडले असतानादेखील त्यांच्यामागे पोलिसाचा पाठलाग. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. 

  • एमएसईबीचा निष्काळजीपणा, विद्युत वाहिनी अंगावर पडून इसमाचा मृत्यू

    हिंगोलीच्या सेनगाव येथे जीर्ण झालेली विद्युत वाहिनी वीज कंपनीच्या दुर्लक्षपणामुळे एका वृद्धाचा अंगावर पडून विद्युत शॉक लागून जागीच मृत्यू झाला होता. या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी विद्युत वितरण कंपनीच्या प्रभारी उपअभियत्यासह तिघांवर निष्काळजी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे, सेनगाव येथील बसस्थानक भागात असलेल्या मुलाच्या दुकाना समोर कवठा येथील दौलत खा पठाण थांबले असता त्यांच्या अंगावर विद्युत तार तुटून पडल्याने ते गंभीर भाजले होते,यात त्यांचा मृत्यु झाला होता, नागरिकांच्या मागणी नंतर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

     

  • अटक होईल या भीतीने शिंदे कधी बेळगावला गेले नाहीत- संजय राऊत 

    सोमवारी पत्रकार परिषदेदरम्यान बेळगावच्या संवेदनशील मुद्द्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. 'मी स्वत: बेळगावला गेलो होते. मलाही अटक झाली होती. मंत्री असताना शिंदेंकडे सीमाभागाची विशेष जदबाबदारी होती पण अटक होईल या भीतीने ते कधीच बेळगावला गेले नाहीत. शिंदेंनी कधीही बेळगावच्या जनतेकडे पाहिलं नाही', असं ते म्हणाले.  

     

  • अटक होईल या भीतीने शिंदे कधी बेळगावला गेले नाहीत- संजय राऊत 

    सोमवारी पत्रकार परिषदेदरम्यान बेळगावच्या संवेदनशील मुद्द्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. 'मी स्वत: बेळगावला गेलो होते. मलाही अटक झाली होती. मंत्री असताना शिंदेंकडे सीमाभागाची विशेष जदबाबदारी होती पण अटक होईल या भीतीने ते कधीच बेळगावला गेले नाहीत. शिंदेंनी कधीही बेळगावच्या जनतेकडे पाहिलं नाही', असं ते म्हणाले.  

     

  • खळबळ! नागपूरातील द्वारकामाई हॅाटेलमध्ये बॉम्ब असल्याची धमकी 

    नागपूरातील गणेशपेठ परिसरातील द्वारकामाई हॅाटेलमध्ये बॅाम्ब असल्याचा मेल आल्यानं एकच खळबळ. सकाळच्या सुमारास पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला फोन. ज्यानंतर अग्निशामक दल, पोलीस आणि बॅाम्बमाशक पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून शोध सुरु

     

  • शिवसेनेला 10 कॅबिनेट मंत्रीपद तर 3 राज्यमंत्रीपदं? 

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशिरा झालेल्या बैठकीत मंत्रिपदांसह इतर खात्यांबाबत चर्चा झाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती. या बैठकीत शिवसेनेला 10 कॅबिनेट मंत्रीपद तर 3 राज्यमंत्री पदाबाबत निर्णय. 

     

  • मारकडवाडीत आलेल्या नेत्यांवर कारवाई करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

    मारकडवाडी प्रकरणासंदर्भात ईव्हीएम बाबत गैरसमज पसरवणाऱ्यांच्या विरोधात होणार कारवाई, करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा.  ज्यांच्यावर कारवाई करायचे आहे त्यांच्यावर आम्ही करूच, मारकडवाडी आमच्या जिल्ह्यात आहे तेथील नागरिक आमचेच लोक आहेत त्यामुळे सर्वांवरच गुन्हा दाखल करणे योग्य राहणार नाही, काल जे मारकडवाडीत लोकप्रतिनिधी होते त्यांच्यावर देखील कारवाई होईल जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिला इशारा. 

  • निफाडमध्ये पारा 6 अंशांवर; महाबळेश्वर, माथेरानहून इथं कमालीचा गारठा 

    निफाडमध्ये पुन्हा थंडीची लाट, निफाडचा पारा 6 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. थंडीचा गहू, हरभरा पिकांना फायदा. मात्र थंडीमुळे द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली. थंडीमध्ये आरोग्याची काळजी घेण्याचं डॉक्टरांनी केलं आहे आवाहन. 

     

  • बेळगावमध्ये कानडी पोलिसांची दडपशाही सुरूच 

    बेळगावमध्ये कानडी पोलिसांची दडपशाही सुरूच आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवलाय. महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते मालोजी अष्टेकर हे व्यायामासाठी बाहेर पडले असताना देखील त्यांच्या मागे एक पोलीस पाठलाग करत असल्याचं पाहायला मिळालं. 

  • पिंपरी चिंचवड शहरात नोंद नसलेल्या अडीच लाख नवीन मालमत्ता

    पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने एका खासगी संस्थेकडून केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 2 लाख 51 हजार 165 नोंद नसलेल्या मालमत्ता आढळल्या आहेत. यामधील 203894 मालमत्तांची मोजणी पूर्ण झाली असून कर आकारणीची कार्यवाही सुरू झाली आहे. विभागाकडून
    1 लाख 13 हजार 831 मालमत्ताधारकांना कर आकारणीसाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजाविली आहे. नोटीस देऊनही कागदपत्रे वेळेत सादर न केल्यास संबंधित मालमत्ताधारकांना नियमानुसार मागील सहा वर्षांपासूनची कर आकारणी केली जाणार आहे.

  • पुण्यात पारव्यांना खायला टाकत असाल तर सावधान 

    पुण्यात पारव्यांना खायला टाकत असाल तर सावधान कारण पारव्यांच्या विष्ठेपासून नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत पुणे महानगरपालिकेने कारवाईचा फतवा काढला आहे. तर ज्या भागात पारव्यांची बसण्याची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे नागरिकांना त्रास होतोय अशा ठिकाणावरून पारवे हटवण्याचे उपयोजना महापालिका राबवत आहे. 

  • पुण्यात मांजा गळ्यात अडकून तरुण जखमी 

    दुचाकीवरून जात असताना मांजा गळ्याला कापल्याने  तरुण जखमी झाला. पुण्यातील मार्केटयार्ड जवळील डायस प्लॉट वसाहत परिसरात ही घटना घडली. तरुणाला गळ्याला आणि हाताला कापले असून, मोठी जखम होऊन टाकेही पडले आहेत. ऋषिकेष वाघमोडे असे जखमी तरुणाचे नाव आहे. नायलॉन आणि चायनीज मांजाच्या विक्रीस कायद्याने बंदी असतानाही अनेक ठिकाणी या मांजाची विक्री सुरू आहे. या मांजाच्या विक्रीवर पूर्ण बंदी आणावी तसेच चीनी बनावटीचा मांजा वापरणाऱ्यांवरही कारवाई करा, अशी मागणी नागरिक सातत्याने करत आहेत.

     

  • मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात रात्री उशिरा बैठक 

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशिरा बैठक पार पडली. रविवारी रात्री ही बैठक पार पडल्याची माहिती. फडणवीस शिंदेंच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. हिवाळी अधिवेशनाआधी फडणवीस सरकारचा मंत्री मंडळ विस्तार होणार असल्याने दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा. 

  • बेळगावमधील छत्रपती संभाजी चौकाला पोलीस छावणीचे स्वरूप

    बेळगावमध्ये ज्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्यासाठी परवानगी मागितली आहे त्या सर्वच ठिकाणाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बेळगाव मधील धर्मवीर संभाजी चौकात देखील अशीच स्थिती आहे. 

     

  • राज्यात वाढतोय थंडीचा कडाका 

    मागील दोन आठवड्यांपासून राज्यावर पावसाचं सावट पाहायला मिळालं. किंबहुना काही भागांना या अवकाळी पावसानं झोडपलं. पण, आता मात्र पावसानं राज्याकडे पाठ फिरवली असून, बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे आणि उत्तर भारतातील पर्वतीय राज्यांमध्ये शीतलहरींचा प्रभाव वाढल्यामुळे राज्यातही तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. 

    सविस्तर वृत्त : Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढला; पुढील 24 तासात 'इथे' वाढणार गारठा 

     

  • जयंत पाटील आज घेणार आमदारकीची शपथ 

    राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि उत्तमराव जानकर आज आमदारकीची शपथ घेणार आहेत. मारकडवाडी गावाच्या दौऱ्यावर असल्याने जयंत पाटील आमदारकीची शपथ घेऊ शकले नाही. त्यामुळे आज जयंत पाटील आणि उत्तमराव जानकर शपथ घेणार आहेत.

  • बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचं महाअधिवेशन

    बेळगावात आज महाराष्ट्र एकीकरण समितीचं महाअधिवेशन होणार आहे.  मात्र अधिवेशनाला कर्नाटक सरकारची मंजुरी नाही नसल्याची माहिती प्रकाश मरगाळे यांनी दिलीय. तर महाराष्ट्रातून येणा-या नेत्यांना बंदी असल्याचं मरगाळेंनी स्पष्ट केलंय.  

     

  • विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस 

    विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या दिवशी राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार असल्याची चिन्हं. सोमवारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार असून,  दुसरीकडे संसदेच्या हिवाळी अधिवेशन आज वन नेशन वन इलेक्शन बील सादर केलं जाणार आहे. त्यामुळे विरोधकांची काय भूमिका असेल याकडे लक्ष लागलंय. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link