Maharashtra Breaking News LIVE UPDATES : कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांनी भरला उमेदवारी अर्ज

Mon, 28 Oct 2024-1:55 pm,

Maharashtra Breaking News LIVE UPDATES : महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींना आता वेग आला असून, आजचा दिवसही अनेक बदलांचा आणि घडामोडींचा आहे...

Maharashtra Breaking News LIVE UPDATES : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नेतेमंडळीच्या प्रतिक्रिया आणि त्यांचे निर्णय या साऱ्याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. राज्याच्या राजकीय पटलावर नेमके कोणते बदल होतात आणि कोणता पक्ष या बदलांतून तरुन पुढे जातो यासंदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


Latest Updates

  • कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांनी भरला उमेदवारी अर्ज 

    कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवारी अर्ज भरलाय... तर त्यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केदार दिघेंना उमेदवारी दिलीय. केदार दिघेही आजच अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात एकनाथ शिंदे विरुद्ध आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे असा सामना रंगणारेय. अर्ज दाखल करण्याआधी दोन्ही नेत्यांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणाची वर्णी लागतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय.

  • पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची खेळी

    पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची खेळी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचे पुतणे भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांना अर्ज भरण्यासाठी दिली परवानगी. पंढरपूर विधानसभेच्या जागेवरून भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांच्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली काँग्रेसने भालकेना उमेदवारी जाहीर केली असताना आज सकाळी अनिल सावंत यांनी शरद पवारांची बागेमध्ये भेट घेतली त्यानंतर अनिल सावंत सुद्धा आज दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

  • एकनाथ शिंदे यांना संत एकनाथ महाराजांच्या वंशजांचे शुभाशीर्वाद 

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संत एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी येऊन शुभाशीर्वाद दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूरच्या वारी निर्मळ वारी व्हावी यासाठी भगीरथ प्रयत्न केले. तसेच वारकरी दिंड्यांना 20 हजारांचे अनुदान दिले. त्यामुळे आज नऊ संतांचे पूर्वज त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ठाणे येथे येत आहेत. त्याची सुरुवात एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांच्यापासून झाली.

  • राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात बंडखोरी 

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात बंडखोरी करत राजाभाऊ फड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. बीडच्या खासदारामुळे मला डावलण्यात आलं राजाभाऊ फड यांचा खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर आरोप. पोस्टर फाडणारे माझे कार्यकर्तेच नाही विरोधकांच षडयंत्र. मी पक्षाचा आणि अपक्ष दोन्हीही फॉर्म भरणार आहे, अशी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया... महाविकास आघाडीमध्ये तिकीट जाहीर होतात बंडाचा झेंडा. 

     

  • जनतेच्या हिताची जपणूक करणारं सरकार देऊ हे वचन देतो- शरद पवार 

    युगेंद्र पवार या तरुण उमेदवाराचा आम्ही फॉर्म भरला असं सांगताना शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. मविआच्या जागावाटपाच्या समीकरणाविषयी बोलचाना सगळे मिळून एकवाक्यता करण्याचा प्रयत्न करत आहोत या परिस्थिती जनतेच्या हिताची जपणूक करणारं सरकार देऊ हे वचन देतो असं ते म्हणाले. महायुतीविषयी बोलताना पक्षफुटी,सत्तेचा गैरवापर लोकांना आवडला नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. 

     

  • धंगेकर आज भरणार उमेदवारी

    कसबा पेठ विधान सभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कसबा गणपतीचे दर्शन घेऊन ते अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत.

  • भाजपच्या 6 उमेदवारांच्या हातात धनुष्यबाण 

    भाजपं आतापर्यंत 121 जागांवरी उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना शिंदे गटाला गेलेल्या 6 जागांवर भाजपमधून आयात उमेदवार शिवसेना शिंदे गटानं दिले आहेत.  

    निलेश राणे - कुडाळ मालवण
    राजेंद्र गावीत - पालघर
    विलास तरे - बोईसर
    मुरज पटेल -  अंधेरी पूर्व
    संतोष शेट्टी - भिवंडी पूर्व
    राजेंद्र राऊत - बार्शी

  • एकनाथ शिंदे यांच्या बंडातील एकमेव सीटिंग आमदाराचा पत्ता कट?

    बंडातील 40 आमदारांपैकी पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्या उमेदवारीवर अजूनही टांगती तलवार. वनगा यांच्या जागी पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्याने वनगा यांच्या उमेदवारी बाबत अजूनही सस्पेन्स कायम. बंडावेळी गुजरात कडे जाण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासह सहकाऱ्यांनी श्रीनिवास वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाच कारण केलं होतं पुढे. महायुतीकडून डहाणू विधानसभेसाठी अजूनही उमेदवार जाहीर नाही.

  • भांडुप मधून उबाठा गटाचे सुनील राऊत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

    संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत हे आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत दुपारी एक वाजता ते त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत दरम्यान सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी भांडुप तमिल संघाकडून तामिळनाडू मधील पारंपारिक वाद्य वाजविली जात आहेत.. उमेदवारी अर्ज दाखल करताना सुनील राऊत यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे.

  • वसुबारसच्या मुहूर्तावर सातारा जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते भरणार आज उमेदवारी अर्ज 

    वसुबारसच्या मुहूर्तावर सातारा जिल्ह्यातील अनेक दिग्गज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तर कराड उत्तर मधून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मनोज घोरपडे पाटण मधून मंत्री शंभूराज देसाई आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शंभूराज देसाई यांच्या विरोधात सत्यजित पाटणकर हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले हे उदयनराजेंच्या सोबत मोठ्या शक्ती प्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कोरेगाव मध्ये महेश शिंदे तर मान मध्ये जयकुमार गोरे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. फलटणमध्ये अजितदादा गटाचे सचिन पाटील हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

  • शिवसेनेचे सदा सरवणकर मंगळवारी अर्ज भरणार

    शिंदेंच्या शिवसेना पक्षाकडून सदा सरवणकर भरणार अर्ज. समाधान सरवणकरांची सोशल मीडियावर पोस्ट. माहीममधून निवडणूक लढवण्यावर सरवणकर ठाम. माहीममध्ये तिरंगी लढत होणार

  • ठाण्यात प्रथमच दिघे विरुद्ध शिंदे लढत

    महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघान पैकी एका विधानसभेवर सर्वांचे लक्ष लागले आहे. ही विधानसभा म्हणजेच कोपरी पाचपाखाडी विधानसभा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा मतदारसंघ असून त्यांच्या विरोधात शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केले आहे यामुळे दिघे विरुद्ध शिंदे अशी चुरशीची लढत या कोपरी पाच पाखाडी मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे हे आज मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. येणाऱ्या काळात आता या कोपरी पाच पाखाडी विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणाची वर्णी लागते हेच पाहणे महत्त्वाचे असेल. 

  • बारामतीत आज दोन्ही पवारांचे उमेदवारी अर्ज होणार दाखल 

    बारामतीत आज पवार विरुद्ध पवार अशा लढाईला सुरुवात होणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार आज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे देखील आपले आजोबा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कन्हेरी येथील श्री हनुमान मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवून ते या निवडणुकीचे रणसिंग फुंकतील. 

     

  • अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजानी राजीनाम्यानंतर कारंजातून लढणार अपक्ष निवडणूक

    मुस्लिम समाजावर अन्याय होत असताना युती सरकार कडून मुस्लिम समाजाला न्याय मिळत नसल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाशिम जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजाणी यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. आता ते कारंजा विधानसभा मतदार संघात अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी सांगितले.2014 आणि 2019 च्या निवडणुकीत त्यांनी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मत मिळवली होती.त्यामुळे आता महायुतीच्या उमेदवाराला याचा फटका बसणार असल्याचं बोललं जातंय.

  • उमरखेड मध्ये काँग्रेसचे दोन माजी आमदार नाराज, बंडखोरी करणार

    यवतमाळच्या उमरखेड मतदार संघात काँग्रेसने साहेबराव कांबळे या नवख्या उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरवल्याने काँग्रेसच्या ईतर गटांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. माजी आमदार विजय खडसे यांनी नाराजी व्यक्त करीत आपण उमेदवारी अर्ज दाखल करू असे स्पष्ट केले. ही उमेदवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पैशांची सौदेबाजी करून विकली असा आरोप त्यांनी केला असून, कांबळे हे समृद्धीच्या ठेकेदारीतील पैसे घेऊन आव्हान देत असल्याने निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी कांबळेचे पार्सल परत पाठविण्याचे आवाहन माजी आमदार विजय खडसे यांनी केले तर निष्ठा हरली पैसा जिंकला अशी प्रतिक्रिया देत बंडखोरीची भाषा माजी आमदार प्रकाश देवसरकर यांनी केली. 

     

  •  

    मावळात भाजपला धक्का 

    मावळात भाजपला धक्का बसला आहे. प्रदेश सहकार आघाडी सहसंयोजक पदी रुजू असलेले बाळासाहेब नेवाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मावळ तालुक्यात भाजप नेते मंडळी यांचे राजीनामा नाट्य सुरू असताना मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर होताच तालुक्यात भाजपच्या गोटात असंतोष पसरला होता. त्यामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

  • मावळात भाजपला धक्का 

    मावळात भाजपला धक्का बसला आहे. प्रदेश सहकार आघाडी सहसंयोजक पदी रुजू असलेले बाळासाहेब नेवाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मावळ तालुक्यात भाजप नेते मंडळी यांचे राजीनामा नाट्य सुरू असताना मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर होताच तालुक्यात भाजपच्या गोटात असंतोष पसरला होता. त्यामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

     

  • विकास हेच माझं ध्येय असणार आहे आणि तो मी खेचून आणणार- भावना गवळी

    वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदार संघात माजी खासदार आणि विधान परिषद सदस्य भावना गवळी यांना शिंदे सेने कडून उमेदवारी मिळाली आहे. महायुतीत या जागेवरून मोठा पेच निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होत. इथ भाजपकडून माजी मंत्री अनंतराव देशमुख आणि शिंदे सेनेकडून भावना गवळी इच्छुक होत्या मात्र शिंदे सेनेच्या भावना गवळी यांना ही जागा सोडण्यात आली आहे. विकास हेच माझं ध्येय असणार आहे आणि तो मी खेचून आणणार आहे अशी प्रतिक्रिया भावना गवळी यांनी दिली. 

  • शरद पवारांना अहिल्यानगर जिल्ह्यात दुसरे लंके सापडल्याची चर्चा , पवारांची सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद 

    राष्ट्रवादीच्या फुटी नंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून कोल्हे परिवाराने माघार घेतल्यानंतर शरद पवारांनी विद्यमान आमदार आशुतोष काळे विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिलीय. संदीप वर्पे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवारांना अहिल्यानगर जिल्ह्यात अजून एक निलेश लंके सापडला ही चर्चा जोरदार कोपरगाव मतदार संघात रंगताना दिसत आहे.

  • राज्याच्या राजकारणात काका पुतण्याचा नवा वाद

    राज्याच्या राजकारणात काका पुतण्याचा नवा वाद. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या बंडाची चिन्ह. बीड जिल्ह्यात सोळंके कुटुंबात फूट पडण्याची शक्यता. माजलगांव विधानसभा मतदारसंघात तिकिटावरून प्रकाश सोळंके विरुद्ध जयसिंह सोळंके यांच्यात वाद. प्रकाश सोळंके यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी तर आमदारकीसाठी इच्छूल असलेल्या पुतण्या जयसिंह सोळंकेकडून बंडखोरीचे संकेत. जयसिंह सोळंके समर्थक आज घेणार पक्षाध्यक्ष अजित पवारांची भेट. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यावर जयसिंह सोळंके समर्थक ठाम. 

  • आज दिग्गज नेते उमेदवारी अर्ज भरणार 

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोपरी पाचपाखाडी विधानसभेसाठी  उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर अजित पवार  बारामतीमधून उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहे. मनसेकडून अमित ठाकरे दादर-माहिमसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ते अर्ज भरणार आहे. तर विरोधी पक्षनेते  विजय वडेट्टीवारही उमेदवारी अर्ज दाखल करणार  आहेत. बारामतीतून युगेंद्र पवार उमेदवारी अर्ज भरणार आहे तर सदा सरवणकरही उमेदवारी अर्ज भरणार आहे.

     

  • स्नेहल जगताप भरणार उमेदवारी अर्ज 

    रायगडच्या महाडमधील ठाकरेंच्या पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत अर्ज भरणारेय. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीसह जाहीर सभेचं  ही आयोजन करण्यात आलंय. तर स्नेहल जगताप या शिवसेनेचे  आमदार भरत गोगावले यांच्या विरुद्ध लढणारे. त्यामुळे  आदित्य ठाकरे आज गोगावलेंवर काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link