Breaking News Live Updates : `एक है तो सेफ है` या मोदींच्या घोषणेला राहुल गांधींचं उत्तर

Mon, 18 Nov 2024-12:09 pm,

Breaking News Live Updates : राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच कैक घडामोडींना वेग आला आहे. काय आहेत त्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर...

Breaking News Live Updates : विधानसभा निवडणुकीसाठीचा मतदानाचा दिवस काही तासांवर आलेला असतानाच आता अखेरच्या टप्प्यात नेतेमंडळी नेमकी कोणती रणनिती आखतात हे पाहणं महत्त्वाचं.... पाहा राज्यातील प्रत्येक लहानमोठी अपडेट एका क्लिकवर.


Latest Updates

  • 'एक है तो सेफ है' या मोदींच्या घोषणेला राहुल गांधींचं उत्तर 

    एक है तो सेफ है या मोदींच्या घोषणेला राहुल गांधींचं तिजोरीच्या माध्यमातून उत्तर. मुंबईत व्यासपीठावर एक तिजोरी आणत त्यातून काही प्रातिनीधीक फोटो दाखवले. धारावी पुर्नविकास प्रकल्पाबाबतचे हे फोटो आहेत असून, अदानी आणि मोदी, धारावी प्रकल्प याचे फोटो तिथं त्यांनी सर्वांना दाखवले. 'एक है तो सेफ है' हा मोदींनी अत्यंत योग्य नारा दिला पण, प्रश्न एवढाचा आहे की यात एक कोण आहे आणि सेफ कोण आहे?? असा प्रश्न करत राहुल गांधींचा अदानींवर हल्लाबोल. पंतप्रधानांशी अदानींचं जुनं नातं असल्याचं सांगत महाराष्ट्रासाठी अदानींना दिले जाणारे प्रकल्प हा मुख्य मुद्दा आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. एकाच व्यक्तीला धारावी, एअरपोर्ट, इतर उद्योगधंदे हे दिले जातात हा मुद्दा उचलून धरत राहुल गांधींकडून महाराष्ट्रातून इतर राज्यात गेलेल्या उद्योगधंद्यांच्या यादीचं वाचन यावेळी करण्यात आलं. 

  • बारामतीत आज दोन्ही पवारांच्या प्रचाराच्या सांगता सभा

    विधानसभेच्या निवडणुकांच्या आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे युगेंद्र पवारांच्या प्रचारार्थ सांगता सभा घेणार आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांचे देखील सांगता सभा बारामतीतच होणार आहे. 

  • राज ठाकरे यांच्या सभेला महायुतीचे झेंडे

    राज ठाकरे यांच्या सभेला महायुतीचे झेंडे आणि कार्यकर्ते अँकर --शिवडी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार बाळा नांदगावकर हे निवडणूक लढवत आहेत. महायुतीने बाळा नांदगावकर यांना पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांचे लालबाग या ठिकाणी प्रचार सभा होत आहे या सभेत महायुतीचे म्हणजेच शिवसेना भाजप,आर पि आय आठवले गटाचे झेंडे स्टेज वर लावण्यात आले आहेत.तर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्तेही सभेला उपस्थित आहेत. 

  • मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले पवार ?

    झी 24तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदासंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं. ‘ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री', इतकं सोपं समीकरण त्यांनी मांडलं. सुप्रिया लोकसभेत आनंदी आहेत, असं सांगताना जनतेला सत्ताबदल हवा आहे हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. 

  • पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई 

    जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 1267 गुन्हे दाखल. तर 1179 जणांना अटक करत 5 कोटी 55 लाख रुपयांचा मुद्देमाल देखील करण्यात आला जप्त. अवैधरित्या दारूची विक्री आणि ट्रान्सपोर्ट करणाऱ्यांच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आली कारवाई. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क ॲक्शन मोडवर. 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यात 18 ठिकाणी चेक नाके उभारत आणि छापेमारी करत कारवाई

  • जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार

    जळगावात भल्या पहाटे अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार. जळगावातील मेहरूण परिसरात आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर झाला गोळीबार. अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांचे मेहरूण परिसरातील शेरा चौकात घर आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली असून घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. अहमद हुसेन यांचे समर्थक तसेच समाजातील प्रतिष्ठीत नागरिक देखील घटनास्थळी हजर झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल. गोळीबार करणाऱ्यांचा शोध कसून सुरु अपक्ष उमेदवाराला पोलीस संरक्षण मिळणार. 

  • अमित शाह यांची आजची नवी मुंबईतील सभा रद्द 

    सोमवारी अमित शाह यांची नवी मुंबईतील सभा रद्द करण्यात आली असून, जे पी नड्डा ही सभा घेणार आहेत. मणिपूरमधील बिघडलेल्या परिस्थितीवर  दिल्लीत अमित शाह यांची बैठक आहे. मणिपूरमधील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची काल बैठक झाली. अमित शाह यांनी सर्व निवडणूक रॅली रद्द करून काल सुरक्षेचा आढावा घेतला. आज दुपारी 12 वाजता पुन्हा महत्त्वाची बैठक घेणार. 

  • उदयनराजे यांनी सभा संपल्यावर स्वतः शिवेंद्रसिहराजे यांची कॉलर उडवली आहे

    सातारा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्या गांधी मैदानावर झालेल्या प्रचार सभेत शिवेंद्रसिहराजे आणि उदयनराजे हे दोघे भाऊ एकाच व्यासपीठावर दिसले येवढेच नाही तर नेहमीच कॉलर उडवून हटके स्टाईल करणाऱ्या उदयनराजे यांनी सभा संपल्यावर स्वतः शिवेंद्रसिहराजे यांची कॉलर उडवली आहे.

     

  • '...तर वाशी ते घणसोली कोस्टल रोड बनणार'

    ऐरोली विधानसभेचे अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे अण्णासाहेब पाटील आणि दि बा पाटील यांचे पुतळे नवी मुंबई शहरात उभारण्याचे वचन देत शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाशी ते घणसोली पर्यंत कोस्टल रोडची निर्मिती करण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. 

  • करवीर विधानसभा मतदारसंघातील  बंडखोर उमेदवारावर जीवघेणा हल्ला 

    करवीर विधानसभा मतदारसंघातील  बंडखोर उमेदवार संताजी घोरपडे याच्यावर जीवघेणा हल्ला. संताजी घोरपडे हे महायुतीचे बंडखोर उमेदवार,  जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक रिंगणात. रात्री प्रचारातून परतत असताना सहा ते सात जणांनी संताजी घोरपडे याच्यावर केला हल्ला. करवीर विधानसभा मतदारसंघतील मानवाड गावाजवळ झाला हल्ला. हल्यात संताजी घोरपडे जखमी. पायाला आणि डोक्याला दुखापत. रक्तस्त्राव झाल्याने संताजी घोरपडे यांना तात्काळ हॉस्पिटल मध्ये हलविले. 

  • शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचारावर बंदी

    विधानसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सोमवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू होणार आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 126 अंतर्गत मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार आणि सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास, उपस्थित राहण्यास अथवा सहभागी होण्यास मनाई आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

     

  • राज्यातील जलजन्य आजारांमध्ये वाढ यंदा अतिसाराचे सर्वाधिक रुग्ण

    राज्यात पावसाचा हंगाम संपला असला, तरी राज्यात जलजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील वर्षी राज्यात जलजन्य आजाराची 19 वेळा साथ आली होती, मात्र यंदा 1 जानेवारी ते 7 नोव्हेंबरदरम्यान 71 वेळा साथींची नोंद करण्यात आली. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णांची संख्या तिप्पट वाढली आहे.

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विदर्भात आज चार सभा 

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विदर्भात आज चार जाहीर सभा होणार आहेत. गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा विधानसभा मतदारसंघात  गडकरींच्या जाहीर सभा होतील. 
    त्यानंतर दुपारी कामठी येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या करता कामठी विधानसभा मतदारसंघात गडकरीची सभा होणार आहे. गडकरींची समारोप प्रचार सभा मध्य नागपुरातील गोळीबार चौक या विधानसभा मतदारसंघात होणार आहे. 

  • दोन्ही पिकांसाठी खरेदी केंद्रांची  संख्या वाढविण्याचे निर्देश

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय कृषी व वस्त्रोद्योग  मंत्रालयाशी केलेल्या सकारात्मक चर्चा आणि पाठपुराव्यानंतर, केंद्र सरकारने सन 2024-25 साठी सोयाबीन आणि कापसाचे हमीभाव जाहीर केले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. 

  • लोकसभेत कांद्याने सत्ताधारी पक्षाचा केला वांदा

    पक्षाचा वांदा केल्यानंतर विधानसभेतही कांद्याचा मुद्दा कायम असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळ कांदा संपण्यास सुरुवात झाल्यानंतर कांद्याचे दर वाढले आहेत. एकीकडे शेतकऱ्यांना साठवणूक केलेल्या कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने नाराजी तर दुसरीकडे शहरात कांदा 80 ते 100 रुपये किलो झाल्याने ग्राहक बेजार झाले आहेत. थोडक्यात यंदा प्रथमच ग्रामीण आणि शहरी भागात कांदा वांदा करणार आहे. राज्यातील 60 ते 70 मतदारसंघांत कांदा उत्पादन होते. तसेच दरवाढीमुळे शहरातील 50 ते 60 मतदारसंघांत हा महागाईचा मुद्दा झाला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यामुळे लोकसभेच्या साधारण 15 मतदारसंघांत सत्ताधारी युतीला फटका बसला होता.

  • निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट बसच्या जादा फेऱ्या

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट बसच्या जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त, प्रशासक भूषण गगराणी यांनी बेस्ट उपक्रमाला मतदानाच्या दिवशी जादा बस फेऱ्या चालविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे 20 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत बस सेवा उपलब्ध असणार आहे. तसेच दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी ‘लो फ्लोअर डेक’ बसही उपलब्ध असणार आहे.

     

  • Breaking News Live Updates : आज राज्यात कोणत्या नेत्यांच्या सभा? 

    दौंड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वरवंड येथे सकाळी नऊ वाजता जाहीर सभा. वर्ध्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    नवी मुंबई  - देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची सभा  सकाळी - 10 वाजता

    मुख्यमंत्री आज संगमनेर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खा. श्रीकांत शिंदे आणि सुजय विखे संगमनेरमध्ये. दुपारी 3 वा. संगमनेर शहरात भव्य सभेचे आयोजन

    इंदापूर विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ आज इंदापूर मध्ये अजित पवार यांची दुपारी एक वाजता जाहीर सभा 

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती येथील मिशन हायस्कूलच्या मैदानावर सांगता सभा दुपारी दोन वाजता. 

    रायगड - कर्जत विधान सभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा स्थळ - कर्जत, सकाळी 11 वाजता

  • Breaking News Live Updates : आज प्रचाराच्या तोफा थंडावणार 

    आज प्रचाराच्या तोफा थंडावणार. विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्याची मुदत आज सायंकाळी सहा वाजता संपणार आहे. त्यामुळे रविवारचा मुहूर्त साधून शहरातील सर्वच उमेदवारांनी रविवारी जोरदार प्रचार केला. ढोल-ताशांचा गजर, समर्थकांसह काढलेल्या रॅली, पदयात्रा, प्रचारफेऱ्या, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पत्रके वाटप आणि मतदारांशी थेट संपर्क करत आपले पारडे जड करण्याचा प्रयत्न केला. शहरात प्रचाराची राळ उडाली अन् आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. राजकीय कलगीतुराही जोरदार रंगला होता. 

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link