Breaking News LIVE : राज ठाकरेंच्या बैठकीनंतर चंद्रपुरात मनसेच्या दोन गटात राडा

Thu, 22 Aug 2024-7:29 pm,

Breaking News LIVE : बदलापूर, कोलकाता घटनेचे पडसाद; न्यायालयांनी दखल घेत उचलली मोठी पावलं

Breaking News LIVE : बदलापूर, कोलकाता घटनेचे पडसाद; न्यायालयांनी दखल घेत उचलली मोठी पावलं. राज्याच्या राजकारणात आजही आरोप प्रत्यारोप की आणखी काही? पाहा Live Updates 


Latest Updates

  • राज ठाकरेंच्या बैठकीनंतर चंद्रपुरात मनसेच्या दोन गटात राडा

    राज ठाकरेंच्या बैठकीनंतर मनसेच्या दोन गटात राडा झाला आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघात सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध करत भोयर समर्थक आणि दुसरे इच्छुक चंद्रप्रकाश बोरकर समर्थकांमध्ये हा राडा झाला आहे. 

  • कल्याणी नगर अपघात प्रकरणातील आरोपींचा जामीन फेटाळला

    कल्याणी नगर अपघात प्रकरणातील आरोपींचा जामीन फेटाळण्यात आला आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आई आणि वडील त्याचप्रमाणे ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि इतरांसह सात जणांवर अल्पवयीन मुलाचे रक्त नमुने बदलण्याचा आरोप आहे. त्यांनी या प्रकरणांमध्ये पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. दोन महिन्यापूर्वी घडलेल्या या प्रकरणावर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आज निकाल दिला आहे. त्यामध्ये सर्व आरोपींचा जामीन फेटाळण्यात आला आहे.

  • इक्बाल सिंह चहल यांची गृह विभागात बदली

    इक्बाल सिंह चहल यांची गृह विभागात बदली झाली आहे. सुजाता सौनिक यांच्या जागेवर इक्बाल सिंह चहल यांची वर्णी लागली आहे. आता ते गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव असणार आहेत. मुंबई महापालिकेतील कारभार आणि कोविड काळातील भ्रष्टाचारावरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

  • कोलकाता बलात्कार-हत्याप्रकरणी पुढील सुनावणी 5 सप्टेंबरला

    कोलकाता बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 5 सप्टेंबरला होणार आहे. निदर्शने करणाऱ्या डॉक्टरांविरोधात अटक, गुन्हा दाखल करणे अशा स्वरुपाची कोणतीही कारवाई करू नका असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिला आहे. 

  • ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन

    वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु आहे. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

  • चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा, शिवसेना ठाकरे गटाची भूमिका

    16 तारखेच्या मविआच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करत त्या चेहऱ्याला आपला पाठिंबा दर्शवला होता. परंतु यावर काँग्रेस आणि शरद पवार गटाने ठोस उत्तर दिले नव्हते. त्यामुळे पुन्हा आता किमान चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याची भूमिका ठाकरे गटाने व्यक्त केल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. 

  • फडणवीसांच्या नागपूरमधील निवासस्थानाला पोलीस छावणीचं स्वरुप

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरीबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचा आंदोलनाची शक्यता आहे. धरमपेठ येथील निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुणाल राऊत आणि शिवानी वडेट्टीवार मोर्चात सहभागी झाले आहेत.

  • Breaking News LIVE :   25 तारखेच्या एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्या 

    एमपीएससी विद्यार्थी आंदोलनाला मोठं यश. 25 ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. अधिकृत X च्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.

  • Breaking News LIVE : MPSC विद्यार्थ्यांकडून सरकारला अल्टीमेटम 

    पुण्यातील MPSCच्या विद्यार्थ्यांनी सरकारला 20 मिनिटांचं अल्टिमेटम दिलंय. 20 मिनिटात निर्णय न आल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे. त्यामुळे पुण्यातील विद्यार्थ्यांच आंदोलन अधिक आक्रमक होताना दिसतंय. आंदोलन विद्यार्थ्यासोबत आमदार रोहित पवारीही उपोषणाला बसले आहेत. 

    दरम्यान पुण्यातील काही रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. इथं शास्त्री रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर दांडेकर पुलाकडे जाणारी वाहतूक वळवली आहे. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यामुळे प्रचंड आरडा ओरडा आणि गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 

  • Breaking News LIVE : बदलापूर पोलिसांच्या भूमिकेवर कोर्टाचे ताशेरे 

    बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं बदलापूर पोलिसांवर ताशेरे ओढले. नुसतं निलंबन करून काय होणार? असा खडा सवाल उच्च न्यायालयानं विचारला. कायद्याचं पालन केलं गेलं आहे का? भारतीय न्याय संहितेत व्हिडिओ रेकॉर्डिंग ची अट आहे तसं झालं आहे का? असा कोर्टाचा सवाल. न्यायालयाकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवण्याची मागणी करत बदलापूर पोलिसांवर तीव्र शब्दांत नाराजी. 

  • Breaking News LIVE : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीला सुरुवात.

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीला सुरुवात झाली असून या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आयबीपीएसची परीक्षा आणि एमपीएससी राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आलेय यावर राज्यसेवेच्या परीक्षा ची तारीख पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केलेय यावर होणार चर्चा.

  • Breaking News LIVE : मुख्यमंत्र्यांचा अर्धा दिवस तर... संजय राऊतांचा घणाघात 

    बदलापूरमधील शाळेमध्ये अल्पवयीन मुलींवर करण्यात आलेल्या अत्याचारांनंतर नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देत बदलापूरमध्ये मोठा जनसमुदार आंदोलन करताना दिसला. या आंदोलनाला राजकीय वळण देणाऱ्या नेतेमंडळी आणि मुख्यमंत्र्यांवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शाब्दिक वार केले. मुख्यमंत्र्यांनी आंदोलनावर व्यक्त केलेल्या संशयानंतर त्यांनी संशय करणं स्वाभाविक असल्याचं म्हणत ते एक संशया आत्मा आहेत असं राऊत म्हणाले. त्यांचा अर्धा दिवस जादूटोणा मंत्र तंत्र यामध्ये जातो.. त्यांना संशय होणारच.. बदलापूरचे लाखो लोक रस्त्यावर उतरले ते सुद्धा जादूटोणा केला असेल असे त्यांना वाटेल, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याता खरपूस समाचार घेतला. 

  • Breaking News LIVE : पुणे कल्याणीनगर कार अपघातप्रकरणी आज निकाल 

    कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज निकाल. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपींच्या जामीन अर्जावर न्यायालय निकाल देणार आहे. आरोपींच्या जामीन अर्जावर सरकार पक्ष आणि बचाव पक्षाने युक्तिवाद पूर्ण केला आहे. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल सुरेंद्र अगरवाल, आई शिवानी, ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्फाक मकानदार, अमर गायकवाड यांनी जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यामुळे आज पुणे न्यायालय कुणाकुणाला जामीन देत याकडे लक्ष असणार आहे. 

  • Breaking News LIVE : दोन लाख रुपये बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला अटक 

    गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या व मौजा कापेवंचा येथील निरपराध ग्रामस्थाच्या खुनामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या एका कट्टर नक्षलवाद्याला अटक केली. जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 89 नक्षल्याना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. भंगारामपेठा जंगल परिसरामध्ये उप-पोस्टे दामरंचा पोलीस पथक व सीआरपीएफ जी-9 बटा. चे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना त्यांना प्रमोद मधुकर कोडापे, वय 37 वर्षे, रा. भंगारामपेठा, ता. अहेरी, जि. गडचिरोली हा व्यक्ती आढळून आला. तो कट्टर नक्षल समर्थक व नक्षली काम करणारा असल्याचे निष्पन्न झाले. 

  • Breaking News LIVE : अफवांवर विश्वास ठेवू नका 

    बदलापूर शहरात  सोशल मीडियावर वरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं  आवाहन पोलिसांनी केलं असून कोणी चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर पसरवत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं बदलापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी सांगितलं. 

  • Breaking News LIVE : एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब... 

    एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच विमान तातडीनं तिरुवअनंतपूरम इथं लँड करण्यात आलं. बॉम्ब असल्याची माहिती मिळताच आपात्कालीन सूचनाही देम्यात आला. ज्यानंतर हे विमान आयसोलेशन बे मध्येपाठवण्यात आलं असून, त्यातून प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे. 

  • Breaking News LIVE : कोलकाता महिला डॉक्टर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरण 

    कोलकाता महिला डॉक्टर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. सीबीआय आज स्टेटस रिपोर्ट कोर्टासमोर सादर करणार असून, आतापर्यंत सीबीआयकडून चार लोकांची चौकशी करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल सरकार आणि सीबीआय आज कोर्टासमोर काय मत मांडणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. घटना घडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्वतःहून दखल घेत हे प्रकरण हाती घेतलं होतं. 

  • Breaking News LIVE :आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल

    सुप्रीम कोर्टाने SC/ST आरक्षणाच्या बाबत दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल. वकील जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी दाखल केली याचिका. इंदिरा साहनी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मागासवर्गीयांच्या उप-वर्गीकरणाबाबत केलेले स्पष्टीकरण SC/ST आरक्षणाला लागू होत नाही. 'राज्य किंवा केंद्र सरकारला अनुसूचित जातींचे वर्गीकरण किंवा उप-वर्गीकरण करण्याचा अधिकार नसून संविधानाच्या कलम 341 आणि 342 नुसार फक्त राष्ट्रपती आणि संसदेला हा अधिकार आहे' जयश्री पाटील यांची याचिकेत मागणी. आता सुप्रीम कोर्ट आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करणार का हे पाहणं महत्वाचं. 

  • Breaking News LIVE : शरद पवारांच्या सुरक्षेत वाढ

    शरद पवारांच्या सुरक्षेत वाढ. पवारांना आता केंद्राचीही सुरक्षा देण्यात आली असून, त्यांना Z + सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये CRPFचे 10 कमांडो पवारांसोबत असणर आहेत.

  • Breaking News LIVE : प्रचार यात्रा पुढे ढकलण्यात आली 

    आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर होणारी महायुतीची प्रचार यात्रा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. राज्याच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्यामुळे प्रचार यात्रेच्या नियोजनात बदल करण्यात आलाय. 

  • Breaking News LIVE : MPSC आयोगाची आज बैठक

    MPSC आयोगाची आज सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक पार पडणार आहे.. MPSC आणि IBPS ची परीक्षा एकत्र होणार आहे.. ही परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झालेत.. त्यानंतर आता मुख्यमंत्री सकाळी MPSC आयोगाशी चर्चा करणार आहे.  या बैठकीत काय तोडगा निघणार हे पाहावं लागणे. दुसरीकडे पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. 

  • Breaking News LIVE : या क्षणाची सर्वात मोठी बातमी

    बदलापूर घटनेची मुंबई हायकोर्टानं दखल घेतलीय. मुंबई हायकोर्टानं घटनेची सु मोटो दखल घेऊन आंदोलनाचीह दखल घेतली. बदलापूरसह इतर ठिकाणी लहान मुलीवर होणाऱ्या अत्याचारावरही आज सकळी 10. 30 वाजता सुनावणी पार पडणार आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link