Jayant Patil : 9 जणांचा शपथविधी पक्षविरोधी- जयंत पाटील

Sun, 02 Jul 2023-11:14 pm,

Maharashtra BreakinNews Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • Jitendra Awhad Live | Marathi News LIVE Today : जितेंद्र आव्हाडांकडे विरोधी पक्षनेते पदी निवड. आव्हाड राष्ट्रवादी प्रतोदपदीही नियुक्ती केली.  'जयंत पाटलांचं अध्यक्षांना पत्र',  'प्रतोद म्हणून माझा व्हीप लागू होणार', 'पवारांनी इतकी पदं दिली आता घरही द्याचं का?' ,'मरेपर्यंत शरद पवारांना सोडणार नाही', 'राष्ट्रवादीचे एकच नेते शरद पवार', 'जे आमदार सोडून गेले त्यांच्या मतदारसंघात उद्रेक',  '6 तारखेच्या बैठकीत चर्चा करायला हवी होती', 'इतरांनी मंत्रिपदं उपभोगायची', जितेंद्र आव्हाड यांचं विधान. 

  • Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची नवी टीम' ,'पक्षबांधणी हेच आमचं लक्ष्य असेल', 'माझी कुणावरही नाराजी नाही', 'पक्षबांधणी हेच आमचं लक्ष असेल', 'आता पुन्हा जोमानं काम करणार', शरद पवार यांचं वक्तव्य. 

     

  • Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'मोदींच्या वक्तव्यामुळे अस्वस्थता आणखी वाढली', 'खर्गे आणि ममता बॅनर्जींचा मला फोन', 'उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून चर्चा', 'न्यायालयीन लढाई लढणार नाही, जनतेत जाऊ','पुढच्या काळात एकत्रच काम करणार', 'ज्यांना थांबायचंय ते थांबतील',  'कोर्टात जाणार नाही, दुसरी टीम-तिसरी टीम नाही', 'आमची पुढची दिशा देशपातळीवर असेल', शरद पवार यांची माहिती. 

     

  • Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'उद्या कराडला जाणार', 'विरोधी पक्षनेतेपद सोडल्याचं आता कळलं','पटेलांना दिलेली जबाबदारी पार पाडली नाही', 'प्रफुल्ल पटेलांवर कारवाई करणार', 'पटेल, तटकरेंचं पाऊस पक्षाच्या विरोधात','सुनील तटकरेंवरही कारवाई होणार', 'पक्षावर दावा केला तरी लोकांमध्ये जाणार', 'लवकरच विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेऊ', 'उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत चर्चा करून निर्णय', 'पक्षातील नेत्यांशी चर्चा करून कारवाई','अजित पवारांसह 9 जणांवर कारवाई होणार', 'ईडी चौकशीमुळे राष्ट्रवादीतील काही आमदार अस्वस्थ', शरद पवार यांचं विधान. 

  • Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'शपथविधीमुळे मोदींचे आरोप वास्तव नाही', 'मोदींचा एनसीपीवर भ्रष्टाचाराचा आरोप','राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना सोबत घेत आरोपमुक्त केलं','सहकाऱ्यांची भूमिका 2 ते 3 दिवस स्पष्ट होईल',' पक्षातील काही सदस्यांनी वेगळी भूमिका मांडली',  'आजचा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही', 'ज्यांच्यावर आरोप त्यांनाच शपथ','हा प्रकार इतरांसाठी नवीन असेल', '1980 मध्ये 56 लोकं सोडून गेले होते', '5 आमदांना घेऊन पुन्हा पक्ष उभा केला','ज्यांची नावं आहेत त्यांचे मला फोन','त्यांच्या भूमिकेबाबत 2 ते 3 दिवसांत कळेल', शरद पवार यांंचं वक्तव्य. 

  • Eknath Shinde Live | Marathi News LIVE Today : डबल इंजिन सरकारला आता तिसरं इंजिन,  अजित पवारांसह आलेल्या सर्व आमदारांचं स्वागत. मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अजित पवारांचं स्वागत.

  • Ajit Pawar Live | Marathi News LIVE Today : 'पुढच्या निवडणुका मोदींसोबत लढणार', 'आमच्यासोबत राष्ट्रवादीचे सर्व आमदार', 'लोकशाहीत बहुमताला महत्त्व','वरिष्ठांनाही कल्पना दिली होती', उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. 

  • Ajit Pawar Live | Marathi News LIVE Today : 'पक्ष आणि चिन्ह आपल्याकडेच', 'सेनेसोबत गेलो तर भाजपासोबतही जाऊ शकतो', 'घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवणार', 'शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबतही', 'नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार', 'आम्ही राष्ट्रवादी पक्ष सोडलेला नाही', उपमुख्यमंत्री  अजित पवार यांची माहिती 

  • Ajit Pawar Live | Marathi News LIVE Today : 'राष्ट्रवादीतील बहुसंख्या आमदार माझ्यासोबत', 'विकासाच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा', 'मोदींच्या नेतृत्त्वात 9 वर्षात देशाचा विकास', 'शुक्रवारी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा', उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं विधान

  • 9 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

     

    Maharashtra Politics  :  अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीये. छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. दिलीप वळसे पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. हसन मुश्रीफांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. धनंजय मुंडेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ. धर्मराव बाबा अत्राम यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. आदिती तटकरेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ. संजय बनसोडेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ. अनिल पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.

  • अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

     

    Maharashtra Politics  : अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री

  • थोड्याच वेळात अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

     

    Maharashtra Politics  : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट,  थोड्याच वेळात अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, तर राष्ट्रवादीचे 40 आमदार शपथ घेण्याची शक्यता.

  •  राष्ट्रवादीचे 40 आमदार अजित पवार यांच्यासोबत- सूत्र

     

    Maharashtra Politics  : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत मोठी फूट पडलीये. विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारमध्ये सहभागी  होणार आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार. राष्ट्रवादीचे 40 आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याची माहिती मिळतेय. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे शपथ घेण्याची शक्यता

  • अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार- सूत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Politics  : राष्ट्रवादीत मोठा भूकंप होण्याची शक्यता. अजित पवार राजभवनात दाखल झाले आहे. तर आता राज्याला 2 उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. तर थोड्याच वेळात अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता. राष्ट्रवादीचे 9 आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ घेणार. शिवसेना, भाजपचेही 3 ते 4 जण शपथ घेणार असल्याची झी 24 तासला सूत्रांची माहिती.

     

  • राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार?

     

    NCP : राष्ट्रवादीत मोठा भूकंप होण्याची शक्यता. राष्ट्रवादीचे काही आमदारांसह अजित पवार राज्यपालांच्या भेटीला गेलेत. थोड्याच वेळात अजित पवार दाखल होण्याची शक्यता 

  • Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन पक्ष निर्णय घेईल','असा निर्णय घेण्यासाठी पक्षाची घटना आहे', 'विरोधी पक्षनेतेपदात अजित पवारांची इच्छा नव्हती', 'संघटनेत काम करण्याची अजित पवारांची बैठक' 'प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय मी एकटा घेत नाही', 'अजित पवार म्हणाले संघटनेत काम करायचंय', 'बैठकीत प्रदेशाध्यक्षपदावर निर्णयाची शक्यता', शरद पवार यांची माहिती.

  • Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'मुंबईतील बैठकीची माहिती नाही', 'बैठक बोलावण्याचा विरोधी पक्षनेत्यांना अधिकार', 'बैठक का बोलावली माहिती नाही', 'नगरचा कार्यक्रम आठवड्याआधीच रद्द झालाय', 'नगरचा दौरा आठवड्याआधीच रद्द','नव्या नेतृत्वाला संधी द्यावी असा पक्षात विचार', '6 जुलैच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय','दिल्लीत मीही गेलो, अजित पवारही गेलो', 'दिल्लीत लग्न सोहळ्याला आम्ही एकत्र होतो,' अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावरून शरद पवार यांची प्रतिक्रिया. 

  • पुण्यात पती-पत्नीचा एकमेकांवर कोयत्याने हल्ला 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Crime News : पुण्यात कोयता विकण्यावरून पती-पत्नीनं चक्क एकमेकांवर कोयत्यानंच हल्ला केलाय. यात दोघेही गंभीर जखमी झालेत. ही घटना मार्केटयार्डातील एक सोसायटीमध्ये घडलीय. घरातील कोयता विकण्यावरून पती पत्नीमध्ये वाद झाला. यावेळी पत्नीनं पतीवर कोयत्यानं वार केले. संतप्त झालेल्या पतीनं पुन्हा त्याच कोयत्यानं पत्नीवर हल्ला केला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

    बातमी पाहा- कोयतामुळे जोडप्यात झाला टोकाचा वाद! बातमी ऐकून लावाल डोक्याला हात

  • राष्ट्रवादीत हालचालींना वेग

     

    NCP : राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडींनी राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण आलंय. मुंबईत अजित पवारांनी बैठकांचा धडाका उडवून दिल्यावर पुण्यात पवारांचं निवासस्थान असलेल्या मोदी बागेतही घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी थोड्याच वेळापूर्वी पवारांची भेट घेतली. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील थोड्याच वेळात मोदी बागेत पोहोचत आहेत. ते पवारांची भेट घेणार आहेत. 

  • समृद्धीवरील बस अपघातातील मृतांच्या पार्थिवावर आज सामूहिक अंत्यसंस्कार 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Samruddhi Expressway Bus Accident : समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघातातील मृतांच्या पार्थिवावर आज सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिलीय. फॉरेन्सिक एक्सपर्टसना सोबत घेऊन नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर सामूहिक अंत्यसंस्काराचा निर्णय घेण्यात आलाय...यामुळे सर्व मृतकांचे नातेवाईक बुलढाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचलेयत. या अपघातात कुणी मुलगा गमावलाय तर कुणी मुलगी...कुणाची आई गेलीय तर कुणाचे बाबा...भयानक घडलेल्या या अपघातात 25 जणांना जीव गमवावा लागलाय.

    बातमी पाहा- अपघातातील मृतांच्या पार्थिवावर सामूहिक अंत्यसंस्कार होणार

     

  • 2023 मध्ये घर विक्रीत पुणे राज्यात अव्वल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Home Sale : राज्यात घर घेण्यासाठी सर्वसामान्य पुणे शहराला सर्वाधिक पसंती देत असल्याचं दिसून येतंय.. 2023 मध्ये घर विक्रीत पुणे राज्यात अव्वल ठरलंय.. वर्षाच्या दुस-या तिमाहीत पुण्यात 20 हजारांपेक्षा जास्त घरांची विक्री झालीय... अनेक लोकांनी पुणे शहरात घर घेण्यास पसंती दाखवलीय.. पुणे शहरात गृह विक्रीत 65 टक्क्यांनी वाढ झालीय.. स्थायिक होण्यासाठी व्यावसायिक तसंच नोकरदार वर्गही पुणे शहराला पसंती देताना दिसतोय.. आयटी हब, शिक्षणाच्या सुविधा, ऐतिहासिक महत्त्व अशा गोष्टींमुळे पुणे शहराचं महत्त्व वाढतंय.

    बातमी पाहा- पुणे ठरले घरांच्या विक्रीत अव्वल, नागरिकांची मुंबईमागोमाग पुण्याला पसंती

  • राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jayant Patil : राष्ट्रवादीमध्ये भाकरी फिरणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. कारण राष्ट्रवादीत प्रचंड वेगाने घडामोडी घडतायत. एकीकडे अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीचे आमदार दाखल झालेत. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही तातडीने मुंबईकडे रवाना झालेत.. जयंत पाटील त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच इस्लामपूरवरुन मुंबईकडे निघालेत.. मुंबईत दाखल झाल्यानंतर जयंत पाटीलही राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घेणार असल्याचं कळतंय... प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवल्यास जयंत पाटील यांची नाराजी वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलीय.. 

    बातमी पाहा- जयंत पाटील तातडीने मुंबईकडे रवाना, पक्षात मोठे बदल घडण्याची शक्यता

  • मालेगावात आज हिंदू जनआक्रोश मोर्चा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Malegaon Hindu Jan Akrosh Morcha : नाशिकच्या मालेगावमध्ये सकल हिंदू समाजातर्फे आज हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.. तर, आजच इन्सानियत बचाव समितीतर्फे शांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. तेव्हा या दोन्ही मोर्चांमुळे मालेगावातलं राजकीय वातावरण मात्र तापलंय.. हिंदू जनआक्रोश मोर्चाला भाजप आमदार नितेश राणे हजेरी लावणार आहेत.. गोवंश हत्या बंदी, लव्ह जिहादरा विरोध, धर्मांतरण बंदी कायदा अशा विविध मागण्यांसाठी हिंदू जनआक्रोश मोर्चा निघेल.. तर त्याच दिवशी माजी आमदार रशीद शेख आणि आसिफ शेख शांती मोर्चा काढणार आहेत. 

    बातमी पाहा- मालेगावात वातावरण तापणार? राणेंचा हिंदू आक्रोश मोर्चा; तर शेख काढणार शांती मोर्चा

     

  • शरद पवारांचं नाव शकुनी मामा लिहिलं जाईल- सदाभाऊ खोत 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sadabhau Khot on sharad pawar : महाराष्ट्राच्या राजकारणाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा शरद पवारांचं नाव शकुनी मामा म्हणून लिहिलं जाईल असं वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय. सोलापुरातल्या कासेगाव इथल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना खोतांनी पवारांवर आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. राष्ट्रवादी हा पक्ष नाही तर अलिबाबा आणि चाळीस चोरांची टोळी असल्याची टीकाही खोतांनी केली.

    बातमी पाहा- "शरद पवार म्हणजे शकुनी मामा" खोत यांची राष्ट्रवादी आणि पवारांवर सडकून टीका

     

  • राष्ट्रवादीचे आमदार,  जिल्हाध्यक्ष आज अजित पवारांची भेट घेणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Meeting with NCP MLA Ajit Pawar : राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याबाबत आता मोठ्या घडामोडी घडताना दिसतायत. आमदार धनंजय मुंडे, किरण लहमाटे आणि दौलत दरोडा अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झालेत... राष्ट्रवादीचे आणखीही काही आमदार तसंच जिल्हाध्यक्ष आज अजित पवारांची भेट घेणार आहेत... राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत निर्णय न झाल्यानं ही भेट असल्याची चर्चा आहे.. अजित पवारांच्या देवगिरी शासकीय बंगल्यावर छोटेखानी खासगी कार्यक्रम असल्याचं कळतंय..

    बातमी पाहा- राष्ट्रवादीत पुन्हा उलथापालथ होणार? आमदार घेणार अजित पवारांची भेट

  • मुंबईच्या धरण क्षेत्रात संततधार

     

    Mumbai Rain : मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सातही धरणक्षेत्रात दररोज मोठी वाढ होत आहे. गेल्या शनिवारी 6.49 टक्क्यांवर आलेला पाणीसाठा आठच दिवसांत 12.85 टक्क्यांवर पोहोचलाय. सध्या धरणक्षेत्रात संततधार सुरू आहे. रोज 100 ते 150 मिमी पावसाची नोंद होत आहे. मुंबईच्या हद्दीतील विहार आणि तुळशी धरणांमध्ये समाधानकारक पाऊस पडतोय. धरणांमध्ये 1 ऑक्टोबरला 14 लाख 47 हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध असल्यास पुढील वर्षभर मुंबईकरांना सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा करणं शक्य होतं. 

    बातमी पाहा- मुंबईकरांसाठी गुड न्यूज! एक आठवड्यात धरणक्षेत्रात पावसाची दमदार हजेरी

  • भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक 

     

    BJP Core Committee Meeting today : भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता ही बैठक होणार आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तार तसंच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारांसंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

  • राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग 

     

    State Cabinet Expansion : राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही मंत्र्यांना तातडीने मुंबईला बोलावलंय. आज सकाळी 9 वाजता वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक होणार आहे. तसंच भाजपनेही त्यांच्या काही मंत्र्यांना तातडीने बोलावलंय.

  • राज्यभरात पावसाचा इशारा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    State Rain : कोकणात येत्या आठवड्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय. आजपासून कोकणता पावसाचा जोर वाढणार आहे. तर मुंबईत आज मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. कोल्हापूर घाट परिसर, साता-यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. विदर्भात पुढील आठवड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळं नारिकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय.

    बातमी पाहा- हवामान विभागाने दिला पावसाचा अलर्ट, पाहा कुठे कोसळणार पावसाच्या सरी

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link