Maharashtra Politics : मंत्रिमंडळाच्या 6-8 फॉर्म्युलावरुन अजित पवार नाराज ?

Tue, 03 Oct 2023-10:09 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर

Latest Updates

  • वाघनखांसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Shivaji Maharaj Waghnakha  : छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि लंडनचं म्युझियम यांच्यात सामंजस्य करार झालाय.. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची राज्य सरकारच्या वतीनं करारावर स्वाक्षरी केली. उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील यावेळी उपस्थित होते. लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखं लवकरच मुंबईला आणली जाणार आहेत.. याच वाघनखांच्या मदतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सरदारांचा खात्मा केला, असा उल्लेख वाघनखांच्या या लाल पेटीवर आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • पुण्यातील ड्रग्ज रॅकेटप्रकरणी 9 जणांचं निलंबन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Drugs Case : पुण्यातील ड्रग्ज रॅकेटप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलीय. पुणे शहर पोलीस दलातील एका अधिका-यासह ९ पोलिसांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलंय. यात ड्रग्जमाफिया ललित पाटीलशी ड्रग्ज विक्रीत संबंध असल्याप्रकरणी चार पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. तर ससूनमधून ललित पाटील पलायनप्रकरणी महिला अधिका-यासह 5 जणांचं निलंबन करण्यात आलंय. ललित पाटील हा पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार आहे... येरवडा जेलमधील कैदी असलेल्या ललितवर गेल्या ३ जूनपासून ससूननमध्ये उपचार सुरू होते... मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ललित सोमवारी रात्री आठच्या सुमारास फरार झाला...दोन दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या गेटवर 2 कोटींचं ड्रग्ज सापडलं होतं. ससून रुग्णालयातून तो ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • Sunil Tatkare Live | Marathi News LIVE Today : 'अजित पवारांच्या अनुपस्थित बैठक झाली', 'बैठकीला अजित पवार नव्हते', 'मंत्र्यांच्या मागण्यांच्या निवेदनावर बैठकीत चर्चा', 'प्रकृती अस्वास्थ्यामुळे अजित पवार अनुपस्थित', सुनील तटकरे यांची माहिती.

  • अजित पवार गटाचा महायुतीला अल्टिमेटम

     

    Ajit Pawar on Mahayuti : अजित पवार गटानं महायुतीला अल्टिमेटम दिलाय.. '7 दिवसात पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवा' असा अल्टिमेटम अजित पवार गटानं दिलाय.. पालकमंत्रिपदावरुन अजित पवार आक्रमक झालाय.. दरम्यान पालकमंत्रिपदाबाबत दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत चर्चा करणार आहेत. 

  • महायुतीतील एक इंजिन नाराज- सुप्रिया सुळे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Supriya Sule on Ajit Pawar : महायुतीतलं एक इंजिन नाराज आहे, असं मोठं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय. नाराज अजित पवारांच्या देवगिरीवर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची गेल्या दोन तासांपासून बैठक सुरूय. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोडे देवगिरीवरच्या बैठकीला उपस्थित आहेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला ठरला?

     

    Maharashtra Politics : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांसंदर्भात महायुतीचा अंतिम फॉरम्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या फॉर्म्युल्यानुसार भाजपला ६ जागा, राष्ट्रावागीच्या अजित पवार गटाला तीन जागा आणि शिवसेनेच्या शिंदे गटालाही ३ जागा देण्यावर सहमती झाल्याचं समजतंय. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागा भरण्याबाबत हालचालींना वेग आलाय. 

  • कल्याण मारहाणप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल

     

    Kalyan MNS Beating Case : कल्याणमधील मारहाण प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय... मनसे कार्यकर्त्यांकडून परप्रांतीय फेरीवाल्यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी २४ तासानंतर महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय... पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. खरेदीसाठी गेलेल्या मराठी तरुणाला परप्रांतीय फेरीवाल्यानी मारहाण केली होती. त्याचा जाब विचारताना मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना चोप दिला...

  • अखेर रोहित आर आर पाटलांचं उपोषण  मागे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rohit Patil : अखेर सुमन पाटील आणि रोहित आर. आर. पाटील यांनी उपोषण मागे घेतलंय. टेंभू सिंचन योजनेत सांगलीच्या तासगाव आणि कवठे महाकाळमधील 19 गावांचा समावेश करण्यात आलाय.. या मागणीसाठी उपोषण सुरू करणा-या राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांना तसं पत्र देण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्याबाबतचा जीआरही काढण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर सुमन पाटील आणि रोहित पाटलांनी उपोषण मागे घेतलंय.  

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • मंत्रिमंडळाच्या 6-8 फॉर्म्युलावरुन अजितदादा नाराज ?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Politics : मंत्रिमंडळ विस्तारात यात भाजप 8 तर शिवसेना 6 मंत्री पद ,,असा फॉर्म्युला असणार आहे ...सूत्र अजित दादा यांना आणखी काही मंत्रिपद पाहिजे होती त्याच बरोबर सातारा आणि पुणे पालकमंत्री पद ही हवे होतें ,त्याच बरोबर त्यांच्या त्यांच्या मंत्र्यांन पालकमंत्री पद हवी होती आणि या बाबतच काही गणिते शिंदे व फडवणीस यांच्या बरोबर जुळली नाही त्यामुळे अजित दादा नाराज असल्याची सूत्रांची माहिती

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • अजित पवार GST काऊन्सिल बैठकीला जाणार नाहीत?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar : अजित पवार जीएसटी कौन्सिल बैठकीस दिल्लीला जाणार नाहीत. येत्या 7 ऑक्टोबरला बैठक दिल्लीत होत आहे त्याला दीपक केसरकर बैठकीला जाणार. त्या दिवशी दिल्ली ऐवजी नाशिक येथे नियोजित कार्यक्रमाला अजित पवार जाणार असल्साची सूत्रांची माहिती.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • उपमुख्यमंत्री अजित पवार-मुख्यमंत्री शिंदेंमध्ये तणाव ?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये तणाव असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.. मुख्यत: पालकमंत्री-मंत्रिपदावरुन पवार-शिंदेंमध्ये तणाव असल्याचं समजतंय.. य़ाच तणावपूर्ण परिस्थितीत फडणवीस-शिंदे दिल्ली वारीवर आहेत. अजित पवारांनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली.. त्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.. 

     

  • राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Grampanchayat Election Declared : राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तारीख जाहीर झालीय. 5 नोव्हेैंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. याचबरोबर 2 हजार 950 सदस्यपदांसाठी पोटनिवडणूक तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांसाठीही निवडणूक होणार आहे. तर गडचिरोली गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे 07 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : '2 पक्षांना सोबत घेऊन चालायचंय', 'योग्य मेहनत केल्यास यंदा रेकॉर्ड तोडू', '3 पक्षांचं सरकार असलं तरी ध्येय सोडणार नाही', '3 पक्षांच्या सरकारमध्ये भाजप मोठा भाऊ', 'युती सरकार असलं तरी भाजपच्या अजेंड्यात बदल नाही', 'सरकारमध्ये सर्वाधिक जागा भाजपकडे', 'ओबीसी कल्याणाचे 26 GR मी काढले','राहुल गांधींना आता ओबीसी का आठवलं?','सुवर्णाक्षरांनी निवडणूक लिहिली जाईल','मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील','मोदी पंतप्रधान होताच भारताची प्रगती', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य.

  • Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : 'मोदींच्या स्वागताला कायम मोठी गर्दी', 'एकही जण दुसऱ्याला मत देऊ शकत नाही', 'आपली लढाई इंडिया आघाडीविरोधात नाही','वेगवेगळी शकलं एकत्र येऊन इंडिया आघाडी', 'मोदींना विरोध एवढाच इंडियाचा संकल्प','काही शक्तींना अराजक तयार करायचंय', 'देशात अराजक माजवण्यासाठी इंडिया आघाडी', 'भारताच्या शत्रूंना देशातील लोकांची मदत','भारताच्या शत्रूंना राजकीय अराजकीय लोकांची मदत','यांची दुकानं बंद होतील म्हणून मोदींना विरोध', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची इंडिया आघाडीवर निशाणा.

  • Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : 'भारताच्या जनतेचा मोदींवर विश्वास','देशात भारतविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न','राजकीय आणि अराजकीय लोकांचा यात समावेश','राहुल गांधींबद्दल विश्वासार्हता नाही','राहुल, ममता नेतृत्व देऊ शकत नाही','इंडिया आघाडी आपल्याशी लढू शकत नाही','इंडिया आघाडीत राष्ट्रीय नेता नाही','इंडिया आघाडीत कुणीही नेतृत्त्व देऊ शकत नाही', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
     

     

  • Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : 'मोदींना जिंकवण्यासाठी 2024 विजय संकल्प','अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर', 'भाजपसाठी नव्हे भारतासाठी 2024चा विजय महत्त्वाचा','जगातील देशांचा भारताजवळ यायचा प्रयत्न', 'मोदींना जिंकवण्यासाठी भाजपचा महासंकल्प', 'शेजारच्या राष्ट्रांची अवस्था वाईट', 'मोदींना जगात कुणी बॉस म्हणतं' उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य.

  • दिल्ली भूकंपानं हादरली

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Earthquake in Delhi : दिल्लीला पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के बसले. 6 पॉईंट 2 रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता नोंदवली गेली. दुपारी 2 वाजून 51 मिनिटांनी भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरली. काही मिनिटं मोठ्या स्वरुपाचे धक्के दिल्लीकरांना जाणवले. नेपाळमध्ये या भूकपांचं केंद्रबिंदू होतं. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • Eknath Shinde Live | Marathi News LIVE Today : 'नांदेड प्रकरणी अहवाल सादर करा','पुरेसा औषध साठा होता', 'नांदेड मृत्यू प्रकरणाची चौकशी होईल','नांदेड हॉस्पिटलमध्ये औषधांची कमतरता नव्हती', 'मुख्यमंत्र्यांचे कृषी, मदत पुनर्वसन विभागाला निर्देश','9 जिल्ह्यात सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव', 'रोग पडलेल्या सोयाबीन पिकांचे पंचनामे करा','सोयाबीनचे पंचनामे करण्याचे आदेश','इमारत पुनर्विकासाला चालना देणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. 'दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा देणार','दिवाळीला मिळणार 100 रुपयांचा आनंदाचा शिधा', 'आनंदाचा शिधामध्ये मैदा, पोह्यांचाही  समावेश', कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • खा. हेमंत पाटलांनी डीनला स्वच्छतागृह करायला लावलं साफ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nanded Hemant Patil : नांदेड शासकीय रूग्णालयात आज डीनला खा.हेमंत पाटलांनी स्वच्छतागृह साफ करायला लावलं. नांदेड रूग्णालयात 2 दिवसांत तब्बल 31 मृत्यू झालेत. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी या रूग्णालयाला आज भेट दिली. यावेळी पाहणी करताना रूग्णालयाच्या स्वच्छतेची भीषण अवस्था त्यांच्या लक्षात आली. टॉयलेटची तर अतिशय वाईट अवस्था होती. यामुळे संतापलेल्या खासदार पाटील यांनी डीनच्या हाती झाडू देत टॉयलेट साफ करायला लावलं. रूग्णालयात 260 स्वच्छता कर्मचारी असताना टॉयलेटची ही अवस्था का असा सवाल पाटील यांनी केला. अनेक विभागप्रमुख स्वतःच्या घरची कामं करण्यासाठी या कर्मचा-यांना वापरतात असा आरोप यावेळी पाटील यांनी केला.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • गोव्यात मासे पकडण्याची झुंबड

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Goa Fish : गोव्याच्या बीचवर माशांचा खच पडलाय.. गोव्यातील शापोरा बीचवर अचानक हजारो मासे आढळून आलेत.. हे मासे पकडण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडालीये.. वातावरणातील बदलांमुळे हे मासे किना-यावर आल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलीये. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नांदेड, संभाजीनगर मृत्यूंची केंद्राकडून दखल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Bharti Pawar On Nanded, Sambhajinagar Incident : नांदेड आणि संभाजीनगरमधील रुग्णांच्या मृत्यूप्रकरणाची केंद्राकडून दखल घेण्यात आलीय.  झी २४ तासने सातत्याने ही बातमी लावून धरल्यावर अखेर केंद्र सरकारचा त्याची गंभीर दखल घ्यावी लागलीय. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांनी रुग्णालय प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Prime Minister Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौ-यावर येणार आहेत. 14 किंवा 17 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी मुंबईत येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मुंबईतल्या विकास कामाचं उदघाटन तसंच बीपीटी कार्यक्रमानिमित्त मोदी यांचा हा मुंबई दौरा असणार आहे. लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महाराष्ट्र आणि मुंबईवर विशेष लक्ष आहे. त्याचनिमित्तानेही हा दौरा होणार असल्याचंही बोललं जातंय.  

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर घणाघात

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vijay Wadettiwar On Nanded Incident : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नांदेड प्रकरणावरून सरकारवर घणाघात केलाय..लोणी खाण्यासाठी मृत्यू घडवून आणणारे राज्यकर्ते आज महाराष्ट्रात सत्ता चालवताय अशी टीका वडेट्टीवारांनी केलीय...आधी ठाणे, आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात मृत्यूचं थैमान झालंय...किती वेळा मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठीशी घालणार आहेत...आरोग्य खात्याचे हजारो कोटींची टेंडर निघतायत त्याचा पैसा कुणाच्या खिशात चाललाय? असे सवाल विचारत मुख्यमंत्र्यांनी तातडीने आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री दोघांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी वडेट्टीवारांनी केलीय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नांदेडमध्ये मृत्यूचं तांडव, 48 तासांत 31 मृत्यू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nanded Hospital Death Update : नांदेडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात गेल्या 48 तासांत 31 रूग्णांचा मृत्यू झालाय. 24 तासांत 24 मृत्यू झाल्यावर काल पुन्हा 7 जणांचा बळी गेला अशी माहिती ट्विट करत अशोक चव्हाण यांनी उघड केलीय. मृतांमध्ये ४ बालकांचाही समावेश आहे असं चव्हाण यांनी म्हटलंय. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी त्यांनी केलीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नांदेड प्रकरणावरुन विरोधकांचा सरकारवर घणाघात

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut & Supriya Sule On Nanded Incident : नांदेड मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय...आरोग्य मंत्र्यांना त्यांच्या खात्यात रस नसल्याने ते वेगळ्याच कामात अडकलेयत...त्यामुळे माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी राऊतांनी केलीय...तर या प्रकरणाला सरकारच जबाबदार असून, हे तीन इंजिनचं खुनी सरकार असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केलीय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सरकारी यंत्रणाचं हे अपयश - शरद पवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar On Nanded Incident : नांदेड इथल्या शासकीय रूग्णालयातले मृत्यू ही मन हेलावून टाकणारी आहे असं शरद पवारांनी म्हटलंय. कळव्यातले मृत्यू गांभीर्याने न घेतल्यानेच या घटनेची पुनरावृत्ती झाली असं पवारांनी म्हटलंय. सरकारी यंत्रणांचं हे अपयश असल्याची टीका त्यांनी केलीय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Raj Thackeray On Nanded Incident : राज्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे अशी टीका राज ठाकरेंनी केलीय. नांदेडमधील मृत्यूंनंतर राज ठाकरेंनी टीका करणारी पोस्ट लिहिलीय. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? असा सवाल त्यांनी केलाय. स्वतःचं आयुर्मान वाढवण्याची सरकारची धडपड आहे अशी टीका त्यांनी केलीय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • काँग्रेस खासदार राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rahul Gandhi On Nanded Incident : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही नांदेड रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी ट्वीट करत भाजपवर निशाणा साधलाय...नांदेडच्या शासकीय रुग्णालयात औषधांच्या कमतरतेमुळे 12 नवजात बालकांसह 24 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. भाजप सरकार हजारो कोटी रुपये प्रचारावर खर्च करते. पण मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत? भाजपच्या नजरेत गरिबांच्या जीवाला किंमत नाही...असं सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नांदेडमध्ये 24 मृत्यू कशामुळं?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nanded Hospital Update : नांदेडच्या शासकीय रुग्णालयानं मात्र या मृत्यूबाबत अजब दावा केलाय. 24 मृत्यू हे वैद्यकीय सेवेअभावी नाहीत तर अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्यानं आकडा वाढल्याचं रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय. तर दुसरीकडे रुग्णालयात वेळेवर उपचार दिले जात नाहीत...औषध पुरवठा होत नाही...रुग्णांची काळजी घेतली जात नाही असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्याने रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • घाटी रुग्णालयात 24 तासांत 10 जणांचा मृत्यू

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sambhajinagar Ghati Hospital : छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात गेल्या 24 तासांत 2 शिशूंसह 10 जणांचा मृत्यू झालाय. घाटी हॉस्पिटलमध्ये औषध टंचाई आहे. केवळ 15 दिवस पुरेल इतकाच औषध साठा सध्या रूग्णालयात आहे. त्यामुळं औषधसाठी हातात प्रिस्क्रिप्शन घेऊन भटकणारे रूग्ण हे चित्रं नेहमीच तिथे दिसतं. औषधांच्या कमतरतेमुळे मृत्यू होत असल्याचं प्रमाण वाढलंय असा आरोप करण्यात येतोय. तर अनेक रूग्ण अखेरच्या क्षणी घाटीत दाखल होतात. त्यामुळे मृत्यूचं प्रमाण अधिक आहे असं डॉक्टर्स खासगीत सांगतात. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • विवाहित मुलींचाही अनुकंपावरील नोकरीवर अधिकार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Good News For Women : आता लग्नानंतरही मुलींना अनुकंपा तत्वावर वडिलांच्या जागी नोकरी मिळणारेय. मुलीचं लग्न झाल्यानंतर तिला वडिलांच्या जागी नोकरीचा हक्क मिळत नव्हता. मात्र मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं याबाबत एक महत्त्वाचा निकाल दिलाय. विवाहित मुलीला अनुकंपा तत्वावर नोकरी नाकारणं असंवैधानिक असल्याचं कोर्टानं म्हटलंय. त्यामुळे आता लग्न झाल्यानंतरही वडिलांच्या जागी मुलींना नोकरीचा हक्क मिळालाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार फरार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Sasoon Hospital : पुण्यातील ड्रग रॅकेटचा सूत्रधार असलेला ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेलाय...पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ललित सोमवारी रात्री आठच्या सुमारास फरार झाला...ललित पाटील हा पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार आहे...येरवडा जेलमधील कैदी असलेल्या ललितवर सूसनमध्ये उपचार सुरू होते...दोन दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या गेटवर 2 कोटींचं ड्रग्ज सापडलं होतं त्याचाही सूत्रधार ललितच होता...याचा तपास सुरू असतानाच तो पोलिसांच्या तावडीतून फरार झालाय...या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय...तसंच ससून रुग्णालयातून ललित रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना होती...त्यामुळे प्रकरण आपल्यावर येऊ नये यासाठी ललित पाटीलला ससूनमधील अधिका-यांची साथ होती का...? असा सवाल उपस्थित केला जातोय..

    बातमी पाहा - पुण्यातील ड्रग रॅकेटच्या सूत्रधाराने ससून रुग्णालयातून 'अशी' ठोकली धूम, 2 तासाने पोलिसांच्या आले लक्षात

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यातही ओबीसी जनगणना?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    OBC Census : बिहारमधील ओबीसी जनगणनेची आकडेवारी जाहीर झाल्यावर राज्यातही ही मागणी जोर धरू लागलीय. राज्य सरकारने ओबीसी स्टॅटेस्टिकल डेटा तयार करावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय. तर शरद पवारांनीही जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली. या मागणीचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करतंय. राज्यातही ओबीसी सर्वेक्षण करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link