Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Tue, 09 Apr 2024-10:06 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा

     

    Raj Thackeray Live Marathi News LIVE Today : एकाला संधी होती पण त्याला तील कळलीच नाही...माझाकडे चिन्ह आयतं आलेलं नाही...रेल्वेचं इंजिन तुमच्या कष्टावर कमवलेलं चिन्ह...चिन्हावर कोणताही तडजोड होणार नाही..जागावाटपाबाबत चर्चा झाली...याच विषयावर मला एकदा काय ते जाणून घ्याचं होतं...शिवसेनेमुळे भाजपसोबत संबंध आले...संबंध राजकारणाच्या पलीकडे होते...माझा जन्म झाला, त्याच घरात शिवसेनेचा जन्म.विधानसभेच्या तयारीला लागा.'नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा'..मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा

  • 'शिवसेना प्रमुख व्हायचं, तर तेव्हाच झालो असतो', राज ठाकरेंचं वक्तव्य

     

    Raj Thackeray Live Marathi News LIVE Today :  ज्या डॉक्टर्स, नर्सवर निवडणुकीची जबाबदारी आहे...त्यांनी निवडणुकीच्या कामाला जाऊ नये...तुम्हाला नोकरीवरून कोण काढतो हे पाहतो...डॉक्टर मतदारांच्या नाड्या तपासणार?.. राज ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल..अमित शाहांच्या भेटीनंतर चर्चा सुरु झाल्या...शाहांच्या भेटीनंतर बोलायला माझ्याकडे काही नव्हतं...12 तास थांबावं लागलं नाही...दुसऱ्या दिवशीची भेट ठरली होती..शिंदे सेनेचे प्रमुख होणार, अशा बातम्या...प्रमुख व्हायचं, तर तेव्हाच झालो असतो...कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही...मी मनसेचाच अध्यक्ष राहणार..एखादी गोष्ट ठरली तर ती पत्रकार परिषदेत सांगेन... राज ठाकरे यांची माहिती

  • अहमदनगरमध्ये मांजरीला वाचवताना 6 जण बायोगॅसच्या खड्ड्यात बुडाले

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Cat Rescue Accident : अहमदनगरमध्ये मांजरीला वाचवताना सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यात बुडाले... नेवासा तालुक्यातील वाकडी गावात ही दुर्घटना घडली. बायोगॅसच्या खड्ड्यात पडलेल्या मांजरीला वाचवण्यासाठी एकजण उतरला... तो बुडत असताना त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आणखी पाचजण बुडाले... बायोगॅसचा हा खड्डा शेणाने भरलेला आहे. त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आलंय. पोलीस आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल झालेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'राज ठाकरे वाघ माणूस, दिल्लीपुढे झुकणार नाहीत',विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Vijay Wadettivar on Raj Thackeray : राज ठाकरे हे वाघ माणूस आहेत.. मात्र त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न सत्ताधा-यांकडून होत असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलीय.. राज ठाकरेंना पिंज-यात अडकवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले.. मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कवर होतोय. त्यापार्श्वभूमीवर राज ठाकरे महायुतीला साथ देणार का.. राज ठाकरे कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्याआधीच विजय वडेट्टीवारांनी टीका केलीय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  •  'पवार आडनाव असेल तिथेच मतदान करा', अजित पवारांचं आवाहन

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar : पवार आडनाव असेल तिथेच मतदान करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज बारामतीत केलंय.. 1991 मध्ये मला निवडून दिलं. मग साहेबांना निवडून दिलं.. त्यानंतर लेकीला निवडून दिलं. तेव्हा आता सुनेला म्हणजे सुनेत्राला निवडून द्या असं आवाहन अजित पवारांनी केलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड नाराज

     

    Varsha Gaikwad : मुंबईतल्या लोकसभा जागा वाटपावरुन महाविकास आघाडीत नाराजी नाट्य दिसतंय.. दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला न दिल्याने मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड नाराज असल्याची चर्चा आहे.. मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेलाही त्या उपस्थित राहिल्या नाहीत.. वर्षा गायकवाड दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होत्या.. मुंबईत काँग्रेसला केवळ 2 जागा दिल्यानं काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत.. नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंच्या हट्टी भूमिकेमुळे मुंबईतल्या काही जागा काँग्रेस पक्षाला मिळाला नसल्याचा वर्षा गायकवाड यांचा आरोप आहे.. वर्षा गायकवाड यांनी आपली नाराजी दिल्लीत हायकमांडला कळवलीय...

  • 'कुणी धमकावत असेल तर पोलीस तक्रार करा', अजित पवारांचं वक्तव्य

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar on Sharad Pawar : कुणाला मतांसाठी धमक्या दिल्या असत्या तर बारामतीकरांनी पाठिंबा दिला नसता.. कुणी कुणाला धमकावत असेल तर त्याची तक्रार पोलिसात द्यावी असं विधान अजित पवारांनी केलंय. बारामतीत प्रचार आणि मत देण्यासाठी अजित पवार पक्षाकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून करण्यात आला होता, त्याला अजित पवारांनी उत्तर दिलं.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • विशाल पाटील अपक्ष लढणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sangali Vishal Patil : सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाला सुटल्यानंतर विशाल पाटील यांचे समर्थक, कार्यकर्ते आक्रमक झालेत. आमचं चुकलं काय? आता लढायचं अशा स्वरुपाचे विशाल पाटील यांचे पोस्टर व्हायरल होत आहेत. त्यामुळं विशाल पाटील अपक्ष लढणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • सांगलीतील काँग्रेस नेत्यांची बुधवारी बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sangali Congress Leader Meeting : मविआत सांगलीबाबत झालेल्या निर्णयानंतर काँग्रेस नेत्यांची उद्या बैठक होणार आहे.. विश्वजित कदम, विशाल पाटील, विक्रम सावंत, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील अशा प्रमुख नेत्यांची उद्या बैठक होणार आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या चर्चेनंतर विशाल पाटील अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय.. उद्या 11 वाजता ही बैठक होणार आहे..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते नॉट रिचेबल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sangali Congress Leader : काँग्रेसनं सांगलीची जागा अखेर ठाकरे गटाला सोडलीय. मात्र त्यानंतर सांगली जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर शुकशुकाट दिसून येतोय. जिल्ह्यातील काँग्रेस नेते विश्वजीत कदम, विशाल पाटील आणि आमदार विक्रम सावंत नॉट रिचेबल आहेत.  सांगलीत आता चंद्रहार पाटील हेच मविआचे उमेदवार असतील. दरम्यान सांगलीतील नेत्यांशी संपर्क झाला असून सर्व एकत्र असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मविआचा 21-17-10 फॉर्म्युला निश्चित

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Loksabha Election 2024 : मविआचं जागावाटप अखेर जाहीर झालंय. काँग्रेस 17, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 10 आणि  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 21 जागांवर लढणार आहे. विशेष म्हणजे सांगलीची जागा काँग्रेसनं शिवसेनेसाठी सोडली तर भिवंडीच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. मुंबईत शिवसेना 4 तर काँग्रेस 2 जागांवर लढेल. उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर काँग्रेस लढणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मविआच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, जयंत पाटील या नेत्यांनी मविआचं जागावाटप जाहीर केलं. 

    बातमी पाहा - Loksabha 2024 : MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार जाणून घ्या एका क्लिकवर

  • राजू वाघमारे यांचा शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश

     

    Raju Waghmare : काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारेंनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केलाय. सर्वसामान्य माणसाला आपलासा वाटणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा गौरव करत वाघमारेंनी भगवा हाती घेतलाय..

  • नवनीत राणा यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Loksabha Election 2024 : अमरावतीच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना टोला लगावलाय.. एक दिवस नवनीत राणाच रवी राणांना भाजपमध्ये आणतील असं जाहीर विधान बावनकुळेंनी केलं.. त्यावर नवरा-बायकोत बाहेरच्यांनी बोलू नये, माझे नेते मोदी-शाहा-फडणवीस आहेत असा टोला नवनीत राणांनी लगावलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शिंदे, फडणवीस, अजित पवारांवर संजय राऊतांची बोचरी टीका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut : संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केलीय. नाव न घेता तिघांचाही उल्लेख राऊतांनी साडेतीन शहाणे असा केलाय. त्याचवेळी अर्धा शहाणा कोण..यावरही राऊतांनी उगीच त्याची झोप कशाला उडवता, अर्धा शहाणा कोण ते उद्या सांगतो.. असं विधान केलं. त्यामुळे राऊतांचा रोख कुणाकडे याची चर्चा सुरु झालीय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • वरंध घाट 30 मे पर्यंत वाहतुकीसाठी बंद

     

    Varandha Ghat : पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणा-या वरंध घाट मार्गावरची सर्व प्रकारची वाहतूक 30 मे पर्यंत बंद करण्यात आलीये.. या कालावधीत रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील 21 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कामं करण्यात येणार आहेत.. घाटात रस्त्याचे दुपदरीकरणं, संरक्षक भिंत बांधणे तसेच आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची कामं केली जाणार आहेत... त्यामुळे वाहतुकीसाठी घाट बंद ठेवण्यात आलाय. या कालावधीत महाड, कोकणकडे जाणाऱ्या प्रवाशांनी ताम्हिणी घाट, अंबेनळी घाट या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असं आवाहन रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलंय.

  • Dombivli Vaishali Darekar & Shrikant Shinde : डोंबिवलीत शोभायात्रेतही राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याच्या मुद्द्यावरुन कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदे आणि कल्याण लोकसभेच्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात जुंपली.. सर्वसामान्य कार्यकर्ता लोकसभा खासदार होऊ शकते हे स्वप्न पूर्ण होईल, टार्गेट पूर्ण करत लोकसभेत दाखल होणार असा विश्वास ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकरांनी व्यक्त केलाय. तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्वात आधी मुलाची उमेदवारी जाहीर केली नाही..असा टोला खासदार श्रीकांत शिंदेंनी ठाकरे पक्षाला लगावला.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बातमीचा व्हिडीओ पाहा 

  • राज्यात 4-5 दिवस अवकाळी पावसाचा इशारा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Rain Alert : राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.. आज मध्यमहाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वा-यासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.. हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या भागात हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागातही आयएमडीकडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • महाविकासआघाडीची आज संयुक्त पत्रकार परिषद

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    MVA Press Conference : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होणाराय... शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंसह मविआचे नेते यावेळी उपस्थित असतील. मविआतील सगळे वाद मिटले असून, मविआत कोणतीही बिघाडी नसल्याचा दावा राऊतांनी केला. मात्र मविआतील सांगली, भिवंडी आणि मुंबईतील जागांचा तिढा सुटला का...? या जागा कुणाला मिळाल्या...याबाबतचं चित्र आज अखेर स्पष्ट होणाराय...दरम्यान मविआच्या याच पत्रकार परिषदेवरुन शिवसेना शिंदे पक्षानं हल्लाबोल केलाय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राज्यात मराठी नववर्षाचं उत्साहात स्वागत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Gudipadwa : गुढीपाडव्याला मराठी नववर्षांचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात येतंय. डोंबिवली, कल्याण, ठाणे आणि गिरगावात शोभायात्रांच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत करण्यात येतंय.. पारंपरिक वेशभूषेत तरुणाईसह लहानथोर उत्साहाने या शोभायात्रांमध्ये सहभागी होत आहेत... या शोभायात्रांच्या माध्यमातून केवळ तरुणाई नटून थटून बाहेर पडते असं नाही तर यातून विविध सामाजिक संदेशही दिले जात आहेत.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai MNS Gudipadwa Melava : मुंबईच्या शिवाजी पार्कवर आज संध्याकाळी मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणारेय. या मेळाव्याची तयारी पूर्ण झालीये..गुढीपाडवा मेळाव्यासाठी परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आलीये.. अमित ठाकरेंनी काल या तयारीचा आढावा घेतला.. आजच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसैनिकांना संबेधित करणार आहेत.  राज ठाकरे महायुती, लोकसभा निवडणुकांबाबत काय बोलणार याकडे लक्ष लागलंय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link