Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
फडणवीस शूर्पणखेच्या भूमिकेत- संजय राऊत
Sanjay Raut vs Nitesh Rane : फडणवीस हे शूर्पणखेच्या भूमिकेत शिरून महाराष्ट्राची दिशाभूल करतायत...नाशिकमधील शिवसेनेचं अधिवेशन हे शूर्पणखेचं नाक कापण्यासाठीच आहे...2024 च्या निवडणुकीत शूर्पणखेचं नाक कापणारच असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय...तर फडणवीस यांनी जाळलेली लंका कशी वाचवता येईल यावर नाशिकच्या शिबिरात मंथन करावे असा टोला नितेश राणेंनी लगावलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
70 वर्षांवरील खासदारांना भाजपचा डच्चू?
BJP : वयाची सत्तरी पार केलेल्या भाजप खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत डच्चू देण्यात येणार असल्याचं समजतंय... लोकसभा उमेदवारीसाठी भाजपनं हा नवा फॉर्म्युला ठरवल्याची चर्चा आहे.. कर्नाटक भाजपनं हा फॉर्म्युला सुचवला असून, तो देशभरात राबवला जाणार असल्याचं समजतंय.. हा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू झाल्यास सुभाष भामरे आणि रामदास तडस यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे.
पिंपरीत मेट्रो अचानक पडली बंद
Pimpri Metro : पिंपरीत मेट्रो अचानक बंद पडलीय. पिंपरी स्टेशनवरुन निघालेली मेट्रो कासारवाडीत थांबवण्यात आलीय. इलेक्ट्रिक वायर हेडचा वीजपुरवठा खंडित झाल्यानं मेट्रोची पिंपरी स्टेशनवरुन निघालेली मार्गिका बंद करण्यात आलीय. वीज पुरवठा नेमका कुठून बंद झाला, याचा शोध घेतला जातोय. सध्या मेट्रोची एक मार्गिका बंद आहे.
'आधीच्या सरकारांनी स्वतःच्या तिजोऱ्या भरल्या', पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका
PM Narendra Modi : दहा वर्षांपूर्वी हजारो कोटी रुपयांच्या मेगा स्कॅमची चर्चा व्हायची.. आता हजारो कोटी रुपयांच्या मेगा प्रोजेक्टची चर्चा होते.. आधीच्या सरकारांनी केवळ स्वतःच्या तिजो-या भरल्या, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी आज मागील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला.. पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई, नवी मुंबई, रायगड परिसरातील ३३ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण पार पडलं, त्यानिमित्तानं आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. 2 कोटी महिलांना लखपती बनवण्याची मोदी गॅरंटीही त्यांनी यावेळी दिली.
PM Narendra Modi Live | Marathi News LIVE Today : भारताच्या विकासासाठी सागरालाही टक्कर देऊ...कामं रखडवण्याची सवयच लागली होती...देश बदलणार, जरूर बदलणार...भारताच्या विकासासाठी सागरालाही टक्कर देऊ...अटल सेतू आमच्या विकासाचं प्रतिक...तेव्हाच मोदींनी गॅरंटी दिली होती...देश बदलणार आणि देशाचा विस्तार होणार...अटल सेतू मुंबईकरांना समर्पित करतो...माता-भमिनीतचं जीवन सुकर बनवणं हेच आमचं ध्येय...पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य.
'अहंकारी लोकांचा चक्कचूर होईल', मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटाला टोला
Eknath Shinde Live | Marathi News LIVE Today : कोविड काळातही अटल सेतूचं काम सुरू...20 मिनिटात मुंबईचा माणूस नवी मुंबईत...उद्घाटनही पंतप्रधानांच्याच हस्ते ही भाग्याची गोष्ट...अटल सेतू म्हणजे गेम चेंजर प्रकल्प...अटल सेतूचं भूमीपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते...इंधन आणि वेळेची बचत होणार...लेक लाडकी लखपती योजनेचा शुभारंभ... अटल सेतूच्या मजबुतीची गॅरंटी...मोदींप्रमाणे अटल सेतूचीही गॅरंटी...अटलजींच्या नावाप्रमाणे अटल सेतू मजबूत...निवडणूक निकालानंतर भूकंप येईल...अहंकारी लोकांचा चक्कचूर होईल...अहंकारी लोकांचा अहंकार धुळीला मिळणार...मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला टोला
Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : 'मोदी पंतप्रधान होताच देशात विकासाला वेग...'सूर्या प्रकल्पामुळे पाणी मिळणार...सर्व परवानग्या वेळेत देऊन अटल सेतू पूर्ण केला...नवी मुंबई, रायगडमध्ये नवं इकोनॉमिक हब...आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा...अटल सेतू पंतप्रधान मोदींमुळेच शक्य झाला...मुंबईत कुठूनही 59 मिनिटांत पोहचता येणार..
देशाला मुंबईनं ताकद दिली...उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्यशिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण
Shivadi Nhava Sheva Sea Link : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा शिवडी-न्हावा शेवा अर्थात अटल सागरी सेतूचं उदघाटन करण्यात आलं. या लोकार्पण सोहळ्यानंतर आता हा सागरी सेतू मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालंय. मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित होते.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
मोदी लक्षद्वीपला गेले, भूकंप मालदीवला झाला- एकनाथ शिंदे
Eknath Shinde on PM Modi : राम मंदिर बनवून पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केलं.. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये मोदींचं कौतुक केलं.. मोदी जगात सर्वात लोकप्रिय पंतप्रधान आहेत.. मोदी लक्षद्वीपला गेले तर मालदीवला भूकंप आला असं म्हणत मोदींचा जगभरात किती दरारा हे सांगायला मुख्यमंत्री विसरले नाहीत.
मुंबईत 3 कोटींपेक्षा जास्त मराठे जाणार - मनोज जरांगे
Manoj Jarange Patil : मुंबईत 3 कोटींपेक्षा जास्त मराठे जाणार... जर 3 कोटीपेक्षा कमी मराठे मुंबईत गेले तर माझं नाव बदलून ठेवा असा इशाराच मनोज जरांगेंनी दिलाय... घराघरातले मराठे मुंबईत जाणार.. त्यासाठीची तयारी सुरु झाली असल्याची माहितीही जरांगेंनी दिलीय.. आरक्षण देण्याच्या नावाखाली सरकार फसवणूक करत असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक
Eknath Shinde On Narendra Modi : राम मंदिर बनवून पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केलं.. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये मोदींचं कौतुक केलं.. मोदी जगात सर्वात लोकप्रिय पंतप्रधान आहेत.. मोदी लक्षद्वीपला गेले तर मालदीवला भूकंप आला असं म्हणत मोदींचा जगभरात किती दरारा हे सांगायला मुख्यमंत्री विसरले नाहीत..
संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये राडा
Sambhajinagar Hospital Rada : छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दोन गट आपापसात भिडले.. रुग्णालयाच्या अपघात विभागामध्येच मोठा राडा पाहायला मिळाला.. दोन गटांनी रुग्णालयातच आपापसात हाणामारी सुरु केली. या दोन गटातल्या एका तरुणाच्या हातातल्या रॉडचा महिला डॉक्टरच्या डोक्यात बसला. त्यामुळे निवासी महिला डॉक्टर जबर जखमी झालीय. तीच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मात्र यामुळे घाटी हॉस्पिटलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.. संतप्त डॉक्टर्सनी कामबंद आंदोलन केलं. मात्र पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केल्यानंतर डॉक्टर्सनी काम सुरु केलं.
पुण्यात 10 बिल्डरांवर गुन्हे दाखल
Pune Builder : पुण्यात अनधिकृत इमले बांधणाऱ्या १० बिल्डरांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.. विना परवाना इमारती बांधून सदनिका विकल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीये.. मनपाच्या अतिक्रमण विभागानं आंबेगाव बुद्रुकमध्ये कारवाई करत 11 अनधिकृत इमारती जमिनदोस्त केल्या होत्या. त्यानंतर या इमारती बांधणा-या बिल्डरांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. या कारवाईमुळे बिल्डरांचे धाबे दणाणलेत..
शरद मोहोळवर ऑक्टोबरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न
Sharad Mohol Murder Update : पुण्यातला कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी नवा खुलासा समोर आलाय... शरद मोहोळवर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.. मात्र तो यशस्वी ठरला नाही.. मोहोळच्या हत्येप्रकरणी सध्या रवींद्र पवार आणि संजय उढाण या दोन वकिलांनाही अटक करण्यात आलीय. महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही आरोपी वकिलांना हत्येची माहिती होती.. गुन्हेगारांनी याआधी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या आरोपी वकिलांसोबत बैठकही घेतली होती.. वकील संजय उढाणने एका आरोपीसोबत हत्या करण्याआधी संभाषण केल्याचंही तपासात समोर आलंय. त्यामुळे दोन्ही आरोपी वकिलांना हत्येच्या कटाची माहिती होती असा दावा पोलिसांनी केलाय...
दहशतवादी हाफिज भुट्टावीचा तुरुंगात मृत्यू
Hafiz Bhuttavi : दहशतवादी हाफिज अब्दुल सलाम भुट्टावीचा पाकिस्तानातील तुरुंगात मृत्यू झालाय. भुट्टावी हा लष्कर ए तोयबाचा प्रमुख दहशतवादी होता.. मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्यातील कसाबसह इतर दहशतवाद्यांना यानंच प्रशिक्षण दिलं होतं.. संयुक्त राष्ट्र संघानं भुट्टावीचा मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिलाय.. टेरर फंडिंगप्रकरणी ऑक्टोबर 2019मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. पाकिस्तानातील शेखूपुरा जिल्हातील तुरुंगात त्याला ठेवण्यात आलं होतं. छातीत दुखू लागल्यानं त्याला रुग्णालयात नेलं मात्र तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मिशन महाराष्ट्र
Prime Minsiter Narendra Modi Visit Solapur : पंतप्रधान नरेंद्र मोदी मिशन महाराष्ट्रावर आहेत. पंतप्रधान आज नाशिक, मुंबई दौ-यावर आहेत. तर पुढील आठवड्यात सोलापूरचा दौरा करणारेत. 19 जानेवारीला सोलापुरात 15 हजार घरकुलांचं लाभार्थ्यांना वाटप केलं जाणारेय. सोलापुरातील रे नगर इथं हा प्रकल्प राबवण्यात आलाय. श्रमिकांकडून पंतप्रधानांचं जोरदार स्वागतही करण्यात येणारेय. सहा हजार कोटीच्या सुरत चेन्नई ग्रीन कॉरिडोर हायवे, एशियाटिक पॉवरलूम टेक्स्टाईल पार्कचं उद्घाटनही यावेळी होणारेय. त्यानंतर सोलापुरात मोदींची जाहीर सभा होईल.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर
Prime Minsiter Narendra Modi Nashik Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौ-याची सुरुवात होणार आहे ती नाशिकमधून.. नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.. मोदींचा नियोजीत नाशिक दौरा सव्वा अकरा वाजता सुरु होणार होता. मात्र पंतप्रधान सकाळी सव्वा दहा वाजताच नाशिकमध्ये दाखल होतील. मोदी नाशिकमध्ये उशिरा आल्यास मुंबईतल्या कार्यक्रमांना उशीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोदींच्या दौ-यात बदल करण्यात आलाय. राष्ट्रीय युवा अभियानाच्या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आलंय.. मोदींकडून या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उदघाटन होईल. तसंच मोदी काळाराम मंदिरात दर्शन करणार आहेत, तसंच मोदींच्या हस्ते गोदा आरतीही होईल.. नाशिकनंतर मोदी मुंबईकडे रवाना होतील..
बातमीचा व्हिडीओ पाहा -