Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Fri, 15 Dec 2023-10:33 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • 'TDR लॉबीची सुपारी घेऊन धारावी मोर्चा', उपमुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप 

     

    Devendra Fadnavis : धारावी पुनर्विकासाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटानं शनिवारी काढलेल्या मोर्चावरून देवेंद्र फडणवीसांनी जोरदार हल्ला चढवला... टीडीआर लॉबीची सुपारी घेऊन हा मोर्चा काढला जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला... धारावी विकासाबाबत ठाकरेंची भूमिका दुटप्पी आहे. ठाकरेंच्या काळात ठरलेल्या अटी आणि शर्तींनुसारच विकासकाची नियुक्ती करण्यात आल्याचा दावा फडणवीसांनी केला.

  • धारावी पुनर्विकासाविरोधात उद्या शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Police Permission Granted to Thackeray Group March : शिवसेना ठाकरे गटाच्या उद्या होणाऱ्या धारावी बचाव मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलीय. दुपारी ४ वाजता धारावी टी जंक्शनमधून हा मोर्चा सुरू होईल. हा मोर्चा अदानींच्या बीकेसीमधल्या कार्यालयावर धडक देणार आहे. धारावीचा पुनर्विकास अदानींना दिल्याविरोधात ठाकरे गट हा मोर्चा काढणार आहे. स्वतः उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • आमदार अपात्रताप्रकरणी 10 जानेवारीला ऐतिहासिक निकाल?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    MLA Disqualification : आमदार अपात्रतेबाबत विधानसभाअध्यक्ष ऐतिहासिक निकाल देणार अशी सूत्रांची माहिती आहे. विधानसभा अध्यक्ष 10 जानेवारीच निकाल देतील अशीही माहिती आहे. सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना निकाल देण्यासाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलीय... विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना निकाल देण्यासाठी 31 डिसेंबरची डेडलाईन देण्यात आली होती..निकालाचं लेखन करण्यासाठी वेळ लागणार असून, आणखी 3 आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा असा अर्ज नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टात केला होता.. यावरच सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना मुदतवाढ दिलीय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • रायगडमध्ये एमडी ड्रग्जप्रकरणी धडक कारवाई

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Raigad MD Drugs Seized Update​ : रायगडच्या खोपोलीत MD ड्रग्ज प्रकरणी सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. खोपोलीतील ढेकू MIDCतील एका कंपनीवर छापा टाकून पोलिसांनी MD ड्रग्ज बनवणारा कारखान्याचा भांडाफोड केला. यात आतापर्यंत सव्वातीनशे कोटी रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारखान्यात तयार होणारं MD ड्रग्ज परदेशातही पाठवलं जात होतं. ड्रग्जचा परदेशात पुरवठा करण्यासाठी कस्टम क्लिअरींग एजंट म्हणून काम पाहणा-या देवराज गडकर या आरोपीला या प्रकरणी अटक करण्यात आलीये. तर अटकेतील एकूण आरोपींची संख्या 4 झाली आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • '5 वेळा पक्ष बदलणारे काय निकाल देणार?', संजय राऊतांची राहुल नार्वेकरांवर टीका

     

    Sanjay Raut : आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना अजून किती मुदतवाढ हवीय...? अध्यक्षांनीच 5 वेळा पक्षांतर केलंय...5 वेळा पक्ष बदलणारे काय निकाल देणार?...असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय...विधानसभा अध्यक्षांनी कोर्टाकडे मुदतवाढ मागितल्यावरून राऊतांनी टीका केलीय..

  • '...मी ठाण्यातून निवडणूक लढायला तयार', आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना आव्हान

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Aaditya Thackeray on Eknath Shinde : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलंय.. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि माझ्याविरोधात वरळीतून लढावं नाहीतर मी त्यांच्याविरोधात ठाण्यातून लढायला तयार आहे असं आदित्य ठाकरे म्हणालेत..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Hardik Pandya Mumbai Indians Captain : नव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सनं नव्या कर्णधाराची घोषणा केलीय. मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनपदी हार्दिक पांड्याची वर्णी लागलीय. मुंबई इंडियन्सनं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे हार्दिक पांड्याच्या नावाची घोषणा केलीय. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन केल्यानंतर रोहित शर्माचं काय? असा सवालही उपस्थित होतोय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • आदित्य ठाकरेंसाठी काकी शर्मिला ठाकरे मैदानात

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharmila Thackeray on Aaditya Thackeray : दिशा सालियान एसआयटी चौकशी प्रकरणी शर्मिला ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची बाजू घेतलीय...आदित्य असं काही करेल असं वाटत नाही असं मोठं विधान शर्मिला ठाकरेंनी केलंय...दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यात आलेयत...या प्रकरणी त्यांची एसआयटी चौकशी होणार आहे...त्यामुळे या प्रकरणात आदित्य असं काही करेल असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया काकी शर्मिला ठाकरेंनी दिलीय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'ललित पाटीलची पोलीस कोठडीच घेतलीच नव्हती', देवेंद्र फडणवीसांचा खुलासा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Devendra Fadnavis on Lalit Patil Case : ड्रग्जमाफिया ललित पाटीलचा मुद्दाही आज विधानसभेत गाजला.. '9 महिने ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयात कसा होता असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला. तेव्हा ललित पाटीलची पोलीस कोठडीच घेण्यात आली नव्हती असा खुलासा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. तत्कालिन आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पत्र लिहिल्यानंतरही कोठडीसाठी परवानगी देण्यात आली नाही अशी माहितीही फडणवीसांनी दिली... ललित पाटील हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नाशिक विभाग प्रमुख होते असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • सुधाकर बडगुजरप्रकरणी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nashik Police on Action Mode : नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा व्हिडिओ नितेश राणे नितेश राणेंनी दाखवल्यानंतर नाशिकची क्राईम ब्रँच ऍक्टिव्ह झाली आहे. दाऊदच्या हस्तकांसोबत सुधाकर बडगुजर पार्टी करत असल्याचे पुरावे नितेश राणेनी विधानसभेत दाखवले होते.. त्यानंतर पोलिसांनी बडगुजर यांच्या कार्यालयातील त्यांचा कार्यकर्ता पवन मटाले याला ताब्यात घेतले आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

  • 'जेलमध्ये असलेला सलीम कुत्ता बाहेर कसा?', सुधाकर बडगुजरांचा सवाल

     

    Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नेते मुंबईत झालेल्या 1993 च्या बॉम्बस्फोटातल्या आरोपींसोबत असल्याचे फोटोच नितेश राणेंनी विधानसभेत दाखवले.. बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता हा ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पार्टी करत होता असा आरोप नितेश राणेंनी केला.. सुधाकर बडगुजर यांचा राजकीय गॉडफादर कोण आहे. बडगुजर कोणाच्या संपर्कात असतात याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणेंनी विधानसभेत केली...तर व्हिडिओमध्ये मॉर्फिंग करण्यात आलंय असं प्रत्युत्तर सुधाकर बडगुजर यांनी दिलंय. जेलमध्ये असलेला सलीम कुत्ता बाहेर कसा? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. 

  • आमदार अपात्रताप्रकरणी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    MLA Disqualification : आमदार अपात्रता निकाल प्रकरणी सर्वात मोठी बातमी... सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना निकाल देण्यासाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे... विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना निकाल देण्यासाठी 31 डिसेंबरची डेडलाईन देण्यात आली होती.. सुप्रीम कोर्टानेच हा निर्णय दिला होता.. त्याचसाठी हिवाळी अधिवेशन सुरु असतानाही नार्वेकरांनी अपात्रता सुनावणी ओव्हरटाईम करत पार पाडली.. मात्र, निकाल लेखन करण्यासाठी वेळ लागणार असून, आणखी 3 आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा असा अर्ज नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टात केला होता.. यावरच आता सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना निकालासाठी मुदतवाढ दिलीय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • सॅमसंग अँड्रॉईड 11,12,13,14 व्हर्जन्सवर सायबर हल्ला?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Samsung Android Phone : सॅमसंगच्या ज्या स्मार्ट फोनमध्ये अँड्रोईड ११, १२, १३ आणि १४ ही चार व्हर्जन आहेत. त्यांचे मोबाईल फोन सायबर हल्ल्यांचे बळी ठरु शकतात असा इशारा कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम अर्थात सीईआरटी इन या केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या समितीनं दिलाय. सीईआरटीने नुकत्याच केलेल्या संशोधनातून सॅमसंगचे काही विशिष्ट मोबाईल हँकिंगचे बळी ठरु शकतात, असं समोर आलंय. असे सायबर हल्ले टाळायाचे असतील तर सॅमसंग फोन धारकांनी त्यांच्या फोनचं सॉफ्टवेअर तात्काळ अपडेट करुन घ्यावे असंही सीईआरटीने म्हटलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बडगुजरप्रकरणी SIT चौकशी करणार - फडणवीस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Devendra Fadanvis : नितेश राणेंनी विधानसभेत केलेल्या आरोपांची एसआयटी चौकशी केली जाईल अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.. देशद्रोह्यांसोबत पार्टी झोडल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • बडगुजरचा राजकीय गॉडफादर कोण? - नितेश राणे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nitesh Rane : ठाकरे गटाचे नेते मुंबईत झालेल्या 1993 च्या बॉम्बस्फोटातल्या आरोपींसोबत असल्याचे फोटोच नितेश राणेंनी विधानसभेत दाखवले.. बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता हा ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पार्टी करत होता असा आरोप नितेश राणेंनी केला.. सुधाकर बडगुजर यांचा राजकीय गॉडफादर कोण आहे.  बडगुजर कोणाच्या संपर्कात असतात याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणेंनी विधानसभेत केली...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना आव्हान

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Aaditya Thackeray On Eknath Shinde : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलंय.. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि माझ्याविरोधात वरळीतून लढावं नाहीतर मी त्यांच्याविरोधात ठाण्यातून लढायला तयार आहे असं आदित्य ठाकरे म्हणालेत..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मनोज जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये कलगीतुरा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Manoj Jarange Vs Chagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मनोज जरांगे आणि भुजबळांमध्ये आज पुन्हा कलगीतुरा रंगला... जरांगे महापुरुषांचा अपमान करतात असा आरोप भुजबळांनी केला होता... त्यावर उत्तर देताना जरांगेंनी भुजबळांवर जहरी टीका केली.. तर भुजबळांनीही जरांगेंच्या टीकेवर पलटवार केलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • फडणवीसांवरील टीका सहन करणार नाही - नितेश राणे

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nitesh Rane Vs Manoj Jarange : उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांवर टीका करू नका अशा इशारा भाजप आमदार नितेश राणेंनी जरांगे पाटलांना दिलाय. टीका केल्यास गाठ मराठ्यांशी असल्याचं जरांगेंनी लक्षात ठेवावं असं सुनावलंय. तर फडणवीस नितेश राणेंना बोलायला लावत असल्याचा पलटवार जरांगेंनी केलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी आक्रमक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sambhajiraje On Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे अ‍ॅक्शन मोडवर आलेत. त्यांनी दिल्लीत महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक बोलावलीय. त्यासाठी नितीन गडकरी, शरद पवार, नारायण राणे, रामदास आठवले, सुप्रिया सुळे यांना निमंत्रण पाठवण्यात आलंय. 18 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता महाराष्ट्र सदनात ही बैठक बोलावलीय. महाराष्ट्रात ऐरणीवर असलेला मराठा आरक्षण विषयावर सर्व खासदारांनी एकमतानं संसदेत आवाज उठवावा यासाठी राज्यातल्या सर्व खासदारांची संयुक्त बैठक बोलावलीय. आता या बैठकीला कोण उपस्थित राहतं याकडे लक्ष असेल.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राणा दाम्पत्य दोषमुक्त होणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Navneet Rana & Ravi Rana : राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी समोर येतेय.. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण प्रकरणी राणा दाम्पत्य दोषमुक्त होणार का याचा निकाल 18 डिसेंबरला लागणार आहे.. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्याने दिला होता. याप्रकरणी त्यांना अटकही झाली होती.. मुंबई सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली... राणा दाम्पत्याने दोषमुक्त करण्याची मागणी केलीय. तेव्हा न्यायाधीश राहुल रोकडे याप्रकरणाचा निकाल 18 डिसेंबरला देणार आहेत..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राणा दाम्पत्य दोषमुक्त होणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Navneet Rane & Ravi Rana : राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी समोर येतेय.. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण प्रकरणी राणा दाम्पत्य दोषमुक्त होणार का याचा निकाल 18 डिसेंबरला लागणार आहे.. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्याने दिला होता. याप्रकरणी त्यांना अटकही झाली होती.. मुंबई सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली... राणा दाम्पत्याने दोषमुक्त करण्याची मागणी केलीय. तेव्हा न्यायाधीश राहुल रोकडे याप्रकरणाचा निकाल 18 डिसेंबरला देणार आहेत..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संभाजीनगरात भीषण पाणीटंचाई

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sambhajinagar Water Problem : ऐन हिवाळ्यात छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पाणीटंचाई भेडसावू लागलीय. 93 गावं आणि 7 वाड्या आतापासूनच टँकरवर अवलंबून आहेत. यंदा पाऊस कमी झाल्यानं जिल्ह्यातील भूजल पातळी खालावलीय. जलस्त्रोत कोरडेठाक पडलेत. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झालीय. जिल्ह्यातील 93 गावं आणि वाड्यांना भीषण पाणीटंचाईची समस्या भेडसावतेय. या गावांची तहान भागवण्यासाठी 100 खासगी टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय. तर 73 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलंय. त्यामुळे येणा-या काळात जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरं जावं लागणार अशी चिन्हे दिसतायत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • महाबळेश्वरपेक्षा परभणी थंड

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Parbhani Temprature : राज्यात कडाक्याच्या थंडीची चाहूल लागलीये.. महत्त्वाचं म्हणजे थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरपेक्षा परभणीत थंडाचा कडाका अधिक आहे.. परभणीत 12.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये.. यंदाच्या मोसमातलं हे सर्वात कमी तापमान ठरलंय... या गुलाबी थंडीमुळे गहु, हरभरा पिकांना फायदा होणार आहे.. तर दुसरीकडे सातारा आणि महाबळेश्वरमध्येही थंडीचा कडाका वाढलाय.. महाबळेश्वरमध्ये पारा 13 अंशावर तर साता-यात 14 अंशावर पोहोचलाय.. त्यामुळे नागरीकांना उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडावं लागतंय...  जानेवारीमध्ये थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं दिलाय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संसद घुसखोरीप्रकरणी सहावा आरोपी अटकेत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Loksabha Security Breach : संसद भवनातील घुसखोरी प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक करण्यात आलीय...मास्टरमाईंड ललित झा सोबत महेश नावाच्या आरोपीला अटक करण्यात आलीय...संसदेत घुसखोरीचा कट रचण्यात ललितसोबत महेशचा हात असल्याचं समोर आलंय...महेश हा आरोपी नीलम कौरच्या संपर्कात होता...मूळचा राजस्थानचा असलेला महेश मजुरी करायचा...गेल्या कित्येक दिवसांपासून तो भगतसिंह फॅनक्लब पेजच्या माध्यमातून नीलमशी संपर्कात होता...घटनेत सहभागी असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आलीय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • भाजपचं लोकसभेसाठी मिशन 45

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    BJP Loksabha Plan : लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात 45 जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपने ठेवलंय.. आणि त्याचसंदर्भात भाजपची रणनिती ठरल्याची माहिती समोर येतेय... राज्यातले काही मंत्री तसंच मोठ्या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये भाजपने केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं.. त्याचा खूप मोठा परिणाम निकालात पाहायला मिळाला.. तेव्हा हीच रणनिती महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीसाठीही भाजप अवलंबणार असल्याची माहिती आहे.. राज्यात नव्या आणि तरुण चेह-यांना संधी देण्याची भाजपची रणनिती आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • संसद घुसखोरी प्रकरणी ललितचा मोठा खुलासा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Loksabha Security Breach : संसद  भवनातील घुसखोरी प्रकरणी ललित झा यानं मोठा खुलासा केलाय.. घुसखोरी करण्यापूर्वीच ललित आणि महेशनं सर्वांचे मोबाईल जाळून टाकल्याची माहिती ललितनं पोलिसांना दिलीये.. संसद भवनात शिरण्यापूर्वीच  सर्व आरोपींनी त्यांचे मोबाईल फोन ललितकडे जमा केले होते... ललितनं संसद भवनाबाहेरील घोषणाबाजीचं चित्रीकरणही केलं. त्यानंतर तो फरार झाला होता.. या सर्व आरोपींचे मोबाईल जाळल्यामुळे ते कोणाच्या संपर्कात होते..त्यांना कोणाची मदत मिळाली होती.. याचा तपास करण्याचं मोठं आव्हान पोलिसांपुढे उभं राहिलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • आगामी लोकसभा पार्श्वभूमीवर भाजपची बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur BJP Meeting : आगामी लोकसभेच्या अनुसंघाने भाजपच्या बैठकांचा धडाका सुरु आहे...उद्या भाजप पदाधिकाऱ्यांची नागपुरात महत्वपूर्ण बैठक होणार आहे...तीन राज्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेले नेते त्याठिकाणी मार्गदर्शन करणार आहे...यासोबतच लोकसभेच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे...या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पदाधिका-यांना मार्गदर्शन करणार आहेत...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची घोषणा?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Winter Session : विधानसभेत शेतक-यांना आर्थिक मदत घेण्याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे.. अवकाळी पाऊस आणि शेतीचं नुकसान यासंदर्भातल्या चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सभागृहात उत्तर देणार आहेत... राज्यात अवकाळी पावसामुळे शेतक-यांचं मोठं नुकसान झालंय... त्यामुळे शेतक-यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी विरोधकांनी केलीय. यासाठी विरोधकांनी विधानसभेच्या पाय-यांवर आंदोलनही केलं होतं.. मुख्यमंत्री शेतक-यांच्या नुकसानभरपाईसोबतच मराठवाडा आणि विदर्भासाठीही पॅकेज घोषीत करणार का याकडेही सर्वांचं लक्ष असेल.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नवी मुंबईत 6 कोटींचे ड्रग्ज जप्त

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Navi Mumbai Drugs Seized : नवी मुंबईत तब्बल 6 कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार शिरढोण इथं सापळा रचून ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून त्याच्या इतर 5 साथीदारांचा शोध लागला. त्यानंतर एका बंद कंपनीत आणि फार्महाऊवर ड्रग्ज तयार करण्याचं काम सुरू होतं असं पोलिसांना आढळून आलं. याठिकाणी छापे टाकत 330 लिटर केमिकल्स आणि 25 किलोग्राम पावडर जप्त करण्यात आलीये.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • संसद भवन घुसखोरीचा मास्टरमाईंडला अटक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Loksabha Security Breach : संसद भवनाची सुरक्षा भेदणा-या मास्टरमाइंडला अटक करण्यात आलीये.. ललित झा असं या आरोपीचं नाव आहे.. दिल्लीतील कर्तव्य पथावरुन पोलिसांनी त्याला अटक केली.. संसद भवनात घुसखोरी करण्यापूर्वी सर्व आरोपींनी त्यांचे मोबाईल ललितकडे दिले होते.. संसदेत घुसखोरी केल्यानंतर काही तरुणांनी संसद भवनाच्या बाहेरही रंगीत धुराचे फटाके फोडले त्यांचं चित्रिण करुन ललित झा फरार झाला होता.. त्याला काल पोलिसांनी अटक केलीये.. ललीत झा याला आजच कोर्टात हजर केलं जाणार असून चौकशीसाठी पोलीस त्याचा रिमांड मागणार आहेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • आमदार अपात्रतेबाबत मुदत वाढवून मिळणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    MLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणी मुदत वाढवून देण्याबाबत आज सुप्रीम कोर्टात निर्णय होणार आहे... विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 30 डिसेंबरपर्यंत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेयत...मात्र, निकाल वाचन करण्यासाठी वेळ लागणार असून, आणखी 3 आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा असा अर्ज नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टात केलाय...या अर्जावर आज सुप्रीम कोर्ट आदेश देणार आहे...त्यामुळे कोर्ट मुदतवाढ देणार की 30 डिसेंबरच अंतिम तारीख ठेवणार...? याकडे लक्ष लागलंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आलाय...अंधेरीच्या बेलेव्ह्यू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, अँजिओप्लास्टी करण्यात आलीय...श्रेयस तळपदे वेलकम टू जंगल या चित्रपटांचं शुटिंग संपवून घरी आला होता...त्यावेळी त्याची तब्येत बिघडली...दरम्यान त्याला चक्करही आली...श्रेयसला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं...सध्या त्याची अँजिओप्लास्टी झाली असून, प्रकृती सुधारणा होतेय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link