Mumbai Sarvoday Bank : मुंबईतील सर्वोदय बँकेवर आरबीआयचे निर्बंध

Thu, 18 Apr 2024-12:06 am,

Latest Updates

  • मुंबईतील सर्वोदय बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने निर्बंध

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Sarvoday Bank : मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटीव्ह बँकेवर आरबीआयने निर्बंध लागू केलेत...खातेधारकांना फक्त 10 ते 15 हजार रुपयेच काढता येणारेत...पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना संरक्षण देण्यात आलंय...ढासळलेल्या आर्थिक व्यवस्थेमुळे आरबीआयनं कठोर कारवाई केलीये...आज सायंकाळपासून हे निर्बंध लागू करण्यात आलेत.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • दाऊदसोबत कोणाचं नाव जोडलं गेलं?.. अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ajit Pawar on Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांचं थेट नाव न घेता मोठा आरोप केलाय.. दाऊदसोबत कोणाचं नाव जोडलं गेलं? भूखंडाचे श्रीखंड खाल्लं आरोप कोणावर आहे? असा सवाल विचारत अजित पवारांनी शरद पवारांवर हल्लाबोल केलाय.. या आरोपांमध्ये तथ्य नव्हतं मात्र आरोप झालेच ना. बदनामी झाली ना असं विधान अजित पवारांनी केलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • पुण्यात विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटसह पाऊस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune Rain : पुण्यात सलग तिस-या दिवशी पावसाला सुरूवात झालीये...वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय...तर वाघोली परिसरात गारांचा मारा झालाय... पुण्यात विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटसह पावसाला सुरूवात झाली.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • नागपूर, चंद्रपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा-गोंदियात 19 एप्रिलला मतदान, प्रचार तोफा थंडावल्या

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    First Phase Election Campaign Over : आज पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या... नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक आणि भंडारा -गोंदियातील प्रचार आज संपला..  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय...तर देशात 21 राज्यात 102 जागांसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे...प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी जोमाने प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रचारसभा महाराष्ट्रात झाल्या.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • जामनेरमध्ये सिलेंडरचा स्फोट, पात्र्याची 20 घरं जळून खाक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Jamner Cylinder Blast : जामनेर तालुक्यातील पिंपळगाव चौकांबे येथे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आगीचे तांडव.. या आगीत जवळपास झोपडी वजा पात्र्याची 20 घरं जळून खाक.. घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू तसेच येथील रहिवाशांची वाहनं देखील पूर्णपणे जळून खाक.. चार ते पाच बकऱ्यांचा देखील या आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • हल्ल्यातून मनिषा राखुंडे-पाटील बचावल्या, वाहनांची तोडफोड करून हल्लेखोर फरार 

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Dharashiv Attack : धाराशिवमध्ये मनिषा राखुंडे-पाटील यांच्या घरावर हल्ला.. मनिषा राखुंडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला पदाधिकारी.. हल्ल्यातून मनीषा राखुंडे-पाटील बचावल्या..  वाहनांची तोडफोड करून हल्लेखोर फरार.

    बातमीचा व्हिडीओ पाहा -

  • 'रत्नागिरी -सिंधुदुर्गच्या उमेदवाराची उद्या घोषणा',दीपक केसरकरांची माहिती

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Deepak Kesarkar : सिंधुदुर्गात नारायण राणे की किरण सामंत कोण महायुतीचा उमेदवार असणार अशी जोरदार चर्चा रंगत असतानाच सिंधुदुर्ग लोकसभेचा महायुतीच्या उमेदवाराचं नाव उद्या घोषित होईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी दिली ...शिर्डीत केसरकर यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं त्यानंतर ही प्रतिक्रिया दिली. इतकंच नाही तर सिंधुदुर्ग महायुतीच्या ज्या उमेदवाराचं नाव घोषित होईल तो परवा सकाळी अर्ज भरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मविआकडून विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.   

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • 'मुख्यमंत्री शिंदेंचं रामावरील प्रेम नकली',संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

     

    Sanjay Raut on Eknath Shinde  : मुख्यमंत्री शिंदेंचं रामावरील प्रेम हे नकली आहे...राम पळपुट्यांच्या मागे उभा राहत नाही असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधलाय...राम लढणा-यांच्या पाठिशी उभा राहतो असाही टोला राऊतांनी लगावलाय...

  • सत्यजित तांबेंचा विशाल पाटलांना पाठिंबा

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Satyajeet Tambe on Vishal Patil : सांगलीतील विशाल पाटलांसाठी आमदार सत्यजित तांबे मैदानात उतरलेयत...विशाल पाटलांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळत नसल्याने सत्यजित तांबेंनी अजूनही वेळ गेलेली नाही...विशाल पाटलांना कुठेतरी संधी मिळायलाच हवी असं म्हटलंय...विशाल पाटलांवर काय अन्याय झालाय, हे फक्त त्यांचा संघर्ष माहित असलेल्यांनाच ठाऊक आहे...त्यांना हे पाऊल का उचलावे लागले ह्याचा विचार होणे गरजेचे आहे. असं सत्यजित तांबेंनी म्हटलंय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • 'लोकसभा निवडणुकीला बटण कचाकचा दाबा', अजित पवारांचं वादग्रस्त विधान 

     

    Ajit Pawar : इंदापुरात अजित पवारांचं वादग्रस्त विधान केलंय..लोकसभा निवडणुकीला बटण कचाकचा दाबा....तुम्हाला निधी पाहिजे तेवढा देतो...उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मतदारांना आमिष

  • आमिर खान डीपफेकचा शिकार

     

    Aamir Khan : बॉलिवूडमध्ये सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचंच प्रकरण ताजं असताना आता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यानंही पोलिसांत धाव घेतलीये. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमिर डीपफेकचा शिकार झालाय.. यात एका राजकीय पक्षाचा खोटा प्रचार करणारं कॅप्शन वापरुन आमिरचा व्हिडीओ व्हायरल केलाय. व्हिडीओत स्पष्ट दिसतंय की आमिरचा आवाज डब केलाय. याप्रकरणी आमिरने पोलिसांत धाव घेतली आहे.

  • भंडाऱ्यात परिणय फुकेंच्या कारचा अपघात

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Parinay Fuke Accident  : भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी मंत्री आणि आमदार परिणय फुकेंच्या कारचा भीषण अपघात झालाय...मध्यरात्री 2 वाजताच्या साकोलीजवळ एक अज्ञात गाडी अचानक फुकेंच्या कारसमोर आली....मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळलीय...या अपघातात त्यांच्याच ताफ्यातील एक कार हायवेवरील दुभाजकावर आदळलीय..त्यात कारचं मोठं नुकसान झालंय...या अपघातातून डॉ.परिणय फुके थोडक्यात बचावलेत...दरम्यान हा अपघात की घातपात अशी शंका व्यक्त होतेय...काही दिवसापूर्वीच भंडा-यात नाना पटोलेंच्या कारचा अपघात झाला होता...त्यामुळे भंडा-यात नक्की चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाईंच्या प्रचाराला काँग्रेसची पाठ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Anil Desai : दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाईंच्या प्रचाराला काँग्रेसने पाठ फिरवलीय...अनिल देसाई ठाकरे गटाचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार आहेत...काँग्रेसला जागा मिळाली नसल्याने काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं चित्र आहे...दक्षिण मध्यची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड या आग्रही होत्या..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • अमरावतीत राणा दाम्पत्याने घेतली अभिजीत अडसुळांची भेट

     

    Amravati Loksabha : अमरावतीत राणा दाम्पत्याने अडसूळ यांची भेट घेतलीय...गेल्या दहा वर्षांपासून राणा आणि अडसूळ हा वाद सुरू आहे...त्यातच आता राणा दाम्पत्याने अडसूळांची भेट घेत वाद मिटवण्याचा प्रयत्न केलाय...यावेळी माजी आमदार अभिजीत अडसूळ आणि त्यांच्या पत्नी यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांचे औक्षण करून स्वागत केलं...अडसूळही अमरावतीतून लढण्यासाठी इच्छुक होते...राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो असं अडसूळ यांनी म्हटलंय..त्यामुळे आता वाद मिटणार का...? अडसूळ राणांना निवडणुकीत मदत करणार का...? हे महत्त्वाचे आहे...

  • मराठा आरक्षणावर टांगती तलवार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maratha Reservation : मराठा आरक्षणावर टांगती तलवार आहे...मुंबई हायकोर्टाने आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिलाय...मात्र, प्रवेश आणि नियुक्त्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील असं मुंबई हायकोर्टाने म्हटलंय...याबाबतची पुढील सुनावणी ही 13 जूनला होणार आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • अबुधाबी, दुबई, UAEमध्ये पावसाचं थैमान

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    UAE Heavy Rainfall : मुसळधार पावसामुळे अबुधाबी, दुबई आणि UAEमध्ये पूर आलाय.. रस्ते, रेल्वे आणि विमानसेवा ठप्प झालीये.. पुरामुळे या शहरांमधील कार्यालये आणि शाळा बंद करण्यात आलीत... तसंच लोकांना घरून काम करण्यास सांगण्यात आलंय.. सोमवारपासून UAE मध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला. आजही या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. बहरीन, कतार आणि सौदी अरेबियामध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थितीही बिकट आहे. ओमानमध्ये अतिवृष्टीमुळे 18 जणांचा मृत्यू झालाय..

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये.. चार वेगवेगळ्या मोबाईलवरुन त्यांना धमकीचे फोन आलेत.. दाऊद आणि शोटा शकीलकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये... यासंदर्भात एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीये.. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.. 15 आणि 16 एप्रिलला हे फोन आल्याची माहिती खडसेंनी तक्रारीत दिलीये.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • उत्तमराव जानकर शरद पवारांच्या भेटीला

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

    Uttamrao Jankar : माढा लोकसभा मतदारसंघात नव्या घडामोडी...शरद पवार यांनी धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर याना भेटीला बोलवले...पुण्यात जानकर यांनी पवार यांच्या सोबत भेट होणार..सोबत माढा महा विकास आघाडी उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील ही उपस्थित असणार...उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आल्यास माढा.मध्ये भाजप मोठ्या संकटात

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Loksabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे...संध्याकाळी 5 वाजल्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत...महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान होणार आहे...त्यामध्ये नागपूर, गडचिरोली, रामटेक, चंद्रपूर, भंडारा गोंदियातील प्रचार आज थांबणार आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • ठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेला-सूत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Thane Loksabha : ठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता...प्रताप सरनाईक, रवींद्र फाटकांचं नाव आघाडीवर असल्याची सूत्रांची माहिती...20 तारखेला उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता...'झी 24 तास'ला विश्वसनीय सूत्रांची माहिती...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • महायुतीच्या उमेदवारांची आज घोषणा होणार?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Politics : रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि संभाजीनगरच्या महायुतीच्या जागांचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे...आज म्हणजेच राम नवमीच्या दिवशी दोन्ही नावांची घोषणा होणार असल्याची माहिती मिळतेय...सिंधुदुर्गातून नारायण राणेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे...तर संभाजीनगरातून संदिपान भुमरेंचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...सिंधुदुर्गातून राणेंना उमेदवारी दिल्यास तिथे विनायक राऊतांचं आव्हान असेल...तर भुमरेंना उमेदवारी मिळाल्यास मविआच्या चंद्रकांत खैरेंशी लढत होणाराय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link