Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Tue, 19 Sep 2023-3:31 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर

     

    Women's Reservation Bill Passed : नव्या संसदेतील कामकाजाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक संसदेत सादर झालंय. लोकसभेत कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी बिल सादर केलंय. यापुढे महिलांना ३३ टक्के आरक्षण असणार आहे... नव्या संसदेतलं हे पहिलं बिल आहे....नारी शक्ती वंदन अधिनियम लोकसभेत सादर करण्यात आलंय. हे अधिवेशन ऐतिहासिक होणार, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. 

  • PM Narendra Modi Live | Marathi News LIVE Today : 'भारत आता थांबणार नाही, नवीन लक्षापर्यंत पोहोचणार','जुन्या कायद्यात बदल केले',जनतेच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करणार', 'आत्मनिर्भर भारताची जगभरात चर्चा','आत्मनिर्भर भारताकडे वेगाने वाटचाल', 'भारताच्या प्रगतीचं जगाला आकर्षण','देशातील युवा आपल्या देशातील नाव उज्ज्वल करेल', 'आंतरराष्ट्रीय खेळामध्येही तिरंगा अभिमाने फडकतोय', 'आज भारत सर्वात जास्त तरुणांचा देश', 'जल जीवन मिशन योजनांवर वेगानं काम', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य.

  • PM Narendra Modi Live | Marathi News LIVE Today : 'देशातील महत्त्वाचे कायदे याच संसदेतून लागू झाले','देशाच्या लोकशाहीसाठी ऐतिहासिक क्षण', 'कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता', 'य़ाच संसदेतून काश्मीरमधील कलम 370 हटवलं', 'अर्थव्यवस्थेत भारताला टॉप 3मध्ये पोहोचवणार','भारताच्या बँकिंग सेक्टरची जगभरात चर्चा', 'भारतातील टेक्नॉलॉजीचं जगभरात कौतुक', 'देशात नवी चेतना, नवी ऊर्जा', 'भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणारच','भारत जगासाठी चर्चेचं केंद्रस्थान','भारत सकारात्मक विचारांचं केंद्र', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य.

     

  • महिला आरक्षण विधेयक आजच मांडणार- सूत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Women's Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक आजच लोकसभेत मांडण्यात येणार आहे...तर महिला आरक्षण विधेयकावर उद्या लोकसभेत चर्चा होणार आहे...ही माहिती सूत्रांनी दिलीय...महिला आरक्षण विधेयक पास झाल्यावर महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे...

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

  • गर्दीचा फायदा घेणाऱ्या चोरांची खैर नाही

     

    Pune Police : पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मोबाईल चोरांची काही खैर नाही. गर्दीचा फायदा घेत नागरिकांचे मोबाईल चोरणा-यांना अटकाव करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेनं पावलं उचललीय. पोलिसांकडून तीन पथकं नेमण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ही पथकं प्रामुख्यानं फरासखाना, विश्रामबाग पोलीस ठाण्यासह खडक आणि समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असणारेय. या पथकात एक निरीक्षक, तीन उपनिरीक्षक आणि 15 पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे. पुढचे 10 दिवस हे पथक कार्यरत असेल.विशेष म्हणजे साध्या वेशात हे पथक गस्त घालणारेय.

  • नव्या संसद भवनाचा आज श्रीगणेशा

     

    New Parliament Building : आज नव्या संसदेत भवनाचा श्रीगणेशा होणाराय. आजपासून नव्या संसदेत कामकाजाला सुरूवात होणार आहे..थोड्याच वेळात दोन्ही सदनातील खासदारांची बैठक होणार आहे...त्या बैठकीत पंतप्रधान मोदी, लोकसभा सभापती, दोन्ही विरोधी पक्षनेते भाषण करतील...त्यानंतर पंतप्रधान मोदी जुन्या संसदेतून संविधान घेऊन चालत नव्या संसदेत जातील...त्यानंतर सव्वा एक वाजता नव्या संसदेचं कामकाज सुरू होणार आहे.

  • निपाह विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात अलर्ट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nipah Virus : केरळमध्ये निपाह विषाणूचा संसर्ग वाढल्यानं राज्यातील आरोग्य विभाग सतर्क झालीय. राज्याच्या साथरोग विभागानं सर्व जिल्ह्यांच्या आरोग्य विभागाला सतर्क राहून निपाहबाबत सर्वेक्षण करण्याच्या सूचना केल्यायत. केरळमध्ये निपाह विषाणूचा संसर्ग झाल्यानं दोन जणांचा मृत्यू झालाय. निपाहचा राज्याला धोका नसला तरी राज्यात खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलंय. त्यामुळे राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Doctor Salary Hike : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागानं घेतलाय. विद्यावेतनात १० हजार रुपयांनी वाढ करण्यात आली असून, आता वेतन 85 हजार एतके होणार आहे. याचा फायदा राज्य सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील सुमारे ३ हजार निवासी डॉक्टरांना होणारेय. वेतन वाढीसाठी मार्डनं गेल्या दोन वर्षांपासून आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला अखेर यश आलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा- 

  • 16 सप्टेंबरपासून कापलेला टोल परत मिळणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Fastag : टोलमाफी असूनही कोकणात जाणा-या गणेश भक्तांचा टोल फास्टॅगनं कापण्यात आला.. मात्र आता हा कापेला टोल गणेशभक्तांना परत मिळणार आहे. वाहनचालकांच्या तक्रारीनंतर परिवहन विभाग यासाठी प्रयत्नशील आहे..गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या गणेशभक्तांना 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत टोलमाफी देण्यात आलीये. मात्र तरिही अनेक गणेशभक्तांचा टोल फास्टॅगनं कापण्यात आलाय.. ही कापलेली टोलची रक्कम गणेशभक्तांच्या खात्यावर पुन्हा जमा होणार आहे.

     

  • मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Ganesh Chaturthi 2023 : आज गणेश चतुर्थी...घराघरात गणपती बाप्पाचं आगमन. मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबईत लालबागचा राजा, मुंबईचा राजाची प्राणप्रतिष्ठा पहाटेच करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी गणपती दर्शन सुरू झालंय...भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केलीय. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठीही मुंबईकरांनी गर्दी केलीय...झी 24 तासवर तुम्हाला घरबसल्या गणपतीचं दर्शन घेता येणाराय...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link