Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Wed, 27 Mar 2024-10:58 pm,

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Latest Updates

  • पुणे भाजपात नाराजीचं ग्रहण

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Pune BJP : माढा आणि अमरावतीपाठोपाठ आता पुण्यातही भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी जोर धरू लागलीय. पुणे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय. काकडे यांनी थेट फेसबूकवर पोस्ट लिहून
    आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काकडे नाराज असल्यामुळेच सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुण्यात त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत आपल्या वेदना आणि पुणे लोकसभेचं वास्तव चव्हाणांसमोर मांडल्याचं काकडेंनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय. पक्षातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत आपल्या भावना पोहचवण्याचं आश्वासन चव्हाणांनी दिल्याचं काकडेंनी सांगितलं. त्यामुळे पुण्यातला उमेदवार बदलणार की मोहोळच कायम 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • शरद पवार गटाकडून भाजपची पोलखोल

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar Group on BJP : शरद पवार गटानं एक ट्विट करत भाजपची पोलखोल केलीय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं प्रचारावेळी अजित पवारांवर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यावेळी ज्या जाहिराती करण्यात आल्या त्याच जाहिरातींमधील आजोबांना सोबत घेऊन पुन्हा पक्षाचा प्रचार केला जातोय . मात्र 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावर मौन बाळगण्यात आलंय. जनता चांगलच ओळखून आहे असं ट्वटि पवार गटानं केलंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • अमरावतीमधून खासदार नवनीत राणांना भाजपची उमेदवारी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Navneet Rana : अखेर अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपनं विद्यमान खासदार नवनीत राणांना उमेदवारी दिलीय... आगामी लोकसभा निवडणूक नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार आहेत... भाजपनं आज जाहीर केलेल्या उमेदवार यादीत नवनीत राणांचं नाव आहे. त्यामुळं अमरावतीमधील उमेदवाराबाबतचा सस्पेन्स संपलाय... मात्र महायुतीतला तिढा कायम आहे... शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ, अभिजीत अडसूळ आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी राणांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला होता. राणांना उमेदवारी दिल्यास प्रचार करणार नाही, असं बच्चू कडूंनी स्पष्ट केलं होतं... त्यांची नाराजी भाजपश्रेष्ठी कशी दूर करणार, याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • डॉक्टरांना निवडणूक कामात जुंपलं जाणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Election Duity to Doctors : मुंबईत इतिहासात पहिल्यांदाच डॉक्टरांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आलीय. मुंबई महापालिका रूग्णालयातील तब्बल 500 डॉक्टरांना ही इलेक्शन ड्युटी लावण्यात आलीय. यात केईएम, सायन, नायर, कुपर आणि नायर डेंटल रूग्णालयातील डॉक्टरांचा समावेश आहे. नर्सेसपासून डीनपर्यंत सर्वांनाच निवडणूक कामात जुंपलं जाणारंय. पालिका रूग्णालयांतील सुमारे 80 टक्के स्टाफ इलेक्शन ड्युटीवर जाणारंय. या तुघलकी निर्णयामुळे पालिका रूग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प पडण्याची भीती व्यक्त होतीय. खरं तर डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचा-यांना निवडणुकीच्या कामातून सूट देण्यात आलीय असं असतानाही निवडणूक आयोगानं डॉक्टरांना निवडणूक डयुटीवर हजर राहण्याचे दिले आदेश दिले आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्था ठप्प झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होतोय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • सांगलीवरून मविआत वाद विकोलापाला

     

    Sangli Loksabha : सांगलीच्या जागेवरून मविआतला वाद विकोपाला गेलाय. सांगलीची जागा ठाकरे गटानं जाहीर केली असून मविआनं जाहीर केलेली नाही असा टोला काँग्रेस आमदार विश्वजीत कदमांनी लगावलाय. यासंदर्भात कदमांनी थेट दिल्लीत धाव घेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन चर्चा केली. याबाबत राज्यातील नेते चर्चा करतील असं आश्वासन खर्गेंनी दिल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं ठरलं नव्हतं असं प्रत्युत्तरही कदमांनी संजय राऊतांना दिलं. तर सांगलीची निवडणूक लढवणारच असा निर्धार काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांनी केलाय. 
     

  • यवतमाळमधून​ इंद्रनील नाईकांच्या पत्नीला तिकीट?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mohini Naik : यवतमाळ - वाशिम मतदारसंघात शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नीच्या नावाची चाचपणी...यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे...याठिकाणी संजय राठोड यांच्या नावाची चर्चा आहे मात्र ते इच्छूक नसल्याचे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवले आहे...या मतदारसंघात बंजारा मतदारांचे प्राबल्य असल्याने बंजारा उमेदवाराची चाचपणी सुरु होती....अशातच मित्रपक्षातील मोहिनी नाईक यांच्या नावाची चाचपणी करण्यात आलीय...मात्र त्यांना मोहिनी नाईक यांना धनुष्यबाण चिन्हावर लढावे लागेल...

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

     

  • अमोल कीर्तीकरांना ईडीचं समन्स

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amol Kirtikar : अमोल कीर्तीकरांना उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर होताच कीर्तीकरांना ईडीनं समन्स बजावलंय. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तातडीनं बैठक घेतली. `स्वत:ला अमोल किर्तीकर समजून कामाला लागा´ असे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिका-यांना दिलेत. तर भाजपनं खालच्या पातळीवरचं राजकारण केलं असून उमेदवारी जाहीर झाल्यामुळेच ईडीनं कारवाई केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा-

  • सांगलीत काँग्रेस निवडणूक लढवणार-सूत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sangli Loksabha Constituency : उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात काँग्रेस निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानं आघाडीमध्ये नाराजी आहे. त्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसच्या विशाल पाटलांना निवडणुकीत उतरवण्याची तयारी काँग्रेस करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसचं शिष्टमंडळ आमदार विश्वजीत कदम, विक्रम सावंत, विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटलांनी दिल्लीत खरगे आणि केसी वेणूगोपाल यांची भेट घेतली. संध्याकाळी ते सोनिया गांधींची भेट घेणार आहेत...  शिवसेना ठाकरे पक्षानं आघाडीच्या जागावाटपाला गालबोट लावलं, असा थेट घणाघात विजय वडेट्टीवारांनी केलाय. तर सांगलीत तिढा नाही, असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • कमळ चिन्हावर लढण्यास सामंतांचा नकार - सूत्र

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Kiran Samant : रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर लढण्यास शिवसेनेच्या किरण सामंत यांनी नकार दिलाय. हा मतदारसंघ शिवसेनेसाठी अनुकूल आहे, त्यामुळे कोकणात धनुष्यबाण चिन्हावर लढणंच अधिक सोयीस्कर असल्याचा दावा सामंत यांनी केलाय.. भाजपने किरण सामंत यांना भाजपच्या चिन्हावर लढण्याची ऑफर दिली होती अशी माहिती आहे.. किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदूर्गमधून इच्छुक आहेत, ते उदय सामंत यांचे भाऊ आहेत.. हा मतदारसंघ मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • प्रकाश आंबेडकरांकडून मविआला सोडचिठ्ठी

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी मविआशी फारकत घेत तिस-या आघाडीची घोषणा केलीय.. वंचित बहुजन आघाडीच्या 8 उमेदवारांची यादी आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. आंबेडकरांनी नागपूरमधून काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय तर अकोल्यातून स्वत: लढण्याची घोषणा केलीय.. प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी बहुजन पक्षानं सांगलीतून उमेदवार उभा केल्यास त्यांना पाठिंबा देण्याची घोषणाही आंबेडकरांनी केलीय.. मनोज जरांगेंशी आघाडीबाबत चर्चा झाली असून 30 तारखेला जरांगे आपला निर्णय जाहीर करणार आहेत, असंही आंबेडकरांनी सांगितलंय.. मंगळवारी रात्री प्रकाश आंबेडकरांनी अंतरवाली-सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतली आणि त्यानंतर वंचित आघाडीत घडामोडींना वेग आला. मविआशी आंबेडकरांनी फारकत घेतल्याचं आता पूर्णपणे स्पष्ट झालंय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सांगली जागेवरुन मविआत तिढा नाही-राऊत

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sanjay Raut : दरम्यान सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत कुठलाही तिढा नसल्याची प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिलीये. काँग्रेसच्या यादीनंतर आम्ही आक्षेप घेतला नव्हता. कोल्हापूरची जागाही काँग्रेसला दिली होती. त्यामुळे सांगलीच्या जागेचा आग्रह धरल्याचा दावा राऊतांनी केलाय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • हातकणंगलेत भाजपच्या शौमिका महाडिकांचं नाव आघाडीवर?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Hatkanangale Loksabha Constituency : हातकणंगले शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील मानेंचं नाव कापलं जाण्याची शक्यताय. लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या शौमिका महाडिक यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. तर कोल्हापुरात संजय मंडलिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिरवा कंदील दिल्याचं समजतंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सुनेत्रा पवारांकडून टीकेला उत्तर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sunetra Pawar : राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवारांवर होणा-या टीकेला सुनेत्रा पवारांनी उत्तर दिलंय.. एखाद्या गोष्टीचा कडेलोट होतो..तेव्हाच माणसं वेगळा विचार करतात.. दादांनी व्यक्तिस्वातंत्र्य वापरलं असेल तर त्यात चूक काय.. असं विधान सुनेत्रा पवारांनी केलंय.. तर सुप्रिया सुळेंनाही त्यांनी टोला लगावला.. 15 वर्षात तुमच्या आमदार, खासदारांनी केलेल्या कामांचा लेखा-जोख तुमच्यासमोर आहे असा टोला त्यांनी सुप्रिया सुळेंना लगावला.. भोर तालुक्यातल्या न्हावी गावात सुनेत्रा पवारांनी दादांची पाठराखण करताना हे वक्तव्य केलंय.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • सोलापूर लोकसभा मतदारसंघात वातावरण तापलं

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Solapur Ram Satpute : सोलापूर लोकसभा मतदारसंघात वातावरण चांगलंच तापलंय. राम सातपुते आणि प्रणिती शिंदेंमध्ये इथं लढत होतेय. दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करतायत. माझ्या सगळ्या प्रॉपर्टीचा हिशोब देतो, सुशीलकुमार शिंदेंनीही त्यांच्या प्रॉपर्टीचा हिशोब द्यावा असं आवाहन सातपुतेंनी दिलंय.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • ठाकरे गटाकडून 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Thackeray Camp Loksabha Election Candidate List : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झालीय. मुंबईतल्या 4 जागा ठाकरे पक्षाकडून जाहीर करण्यात आल्यात.. छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे तर सांगलीतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर झालीय. त्यामुळे सांगलीत काँग्रेस काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलंय. 

    बातमी पाहा - ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर! मुंबईतील 4 जागांसहीत 17 जागांवरील उमेदवारांची घोषणा

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • अमोल किर्तीकर यांना ईडीचं समन्स

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Amol Kirtikar : ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मुंबईतील संभाव्य उमेदवार अमोल किर्तीकरांच्या अडचणी वाढल्यायत. खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीनं त्यांना समन्स बजावलंय. आजच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीनं दिलेत. अमोल किर्तीकर हे ठाकरे गटाचे उत्तर पश्चिममधून लोकसभेचे संभाव्य उमेदवार आहेत. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगेंची भेट

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Prakash Ambedkar & Manoj Jarange : वंचित बहुजन आघडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलीय. अंतरवाली सराटीमध्ये रात्री या दोन्ही नेत्यांची भेट झाली.. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकी बाबत चर्चा झाली... ही चर्चा सकारात्मक असल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिलीये.. या भेटीत काय चर्चा झाली याबाबत 30 मार्चला बोलणार असल्याचं यावेळी जरांगेंनी सांगीतलं.. दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीये.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • नितीन गडकरी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Nagpur Nitin Gadkari : नागपूर लोकसभेचे भाजप उमेदवार नितीन गडकरी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नितीन गडकरींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असतील. सकाळी 11 वाजता शक्तिप्रदर्शन करत भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Sharad Pawar Meeting : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईत बैठक बोलावण्यात आलीये... मुंबईतील बलार्ड इस्टेट इथं या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय... शरद पवारांच्या अध्यक्षतेत ही बैठक होणार असून या बैठकीत लोकसभा उमेदवारांच्या नावांवर अंतिम चर्चा होणार आहे.

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • मनसेची 'शिवतीर्थ'वर महत्त्वाची बैठक

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai MNS Meeting : आज सकाळी नऊ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या दादरच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आलीय. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केलीय. मनसेच्या महायुतीतला सहभाग आणि मनसेला देण्यात येणाऱ्या जागांबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत राज ठाकरे यांची बैठक होऊन आठवडा उलटलाय. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबती बैठक होऊन अनेक दिवस उलटले आहेत. मात्र अद्यापही मनसेच्या महायुतीतील सहभागाबद्दल आणि जागांबद्दल ठोस निर्णय झालेला नाही...त्यामुळे आजची बैठक महत्त्वाची मानली जातेय. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

  • कडू आणि अडसूळ यांची नाराजी दूर?

     

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Loksabha Election 2024 : महायुतीतला अमरावतीचा तिढा सोडवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सोपवण्यात आलीय. त्यानुसार बच्चू कडू आणि अडसूळ कुटुंबासोबत मुख्यमंत्री शिंदेंची बैठक पार पडली.. या बैठकीत बच्चू कडू आणि अडसूळ कुटुंबाची समजूत काढण्यात मुख्यमंत्र्यांना यश आल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. अमरावतीत नवनीत राणांना उमेदवारी देण्यावरुन बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ नाराज आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कडू आणि अडसूळांची समजूत मुख्यमंत्र्यांनी घातली. 

    बातमीचा व्हिडीओ पाहा - 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link